' मोदीजी, 'डिस्लेक्सिया'असूनही खूप यशस्वी झालेल्या या व्यक्ती माहित करून घ्या!

मोदीजी, ‘डिस्लेक्सिया’असूनही खूप यशस्वी झालेल्या या व्यक्ती माहित करून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिस्लेक्सिया या आजारावर एक टिप्पणी केली. ज्यात त्यांचा हेतू हा प्रतिस्पर्धी राहुल गांधींना चिडविण्याचा होता पण अनावधानाने त्यांनी राहुल गांधी यांना डिस्लेक्सिक असे हिनवले.

विरोधकांवर बोचरी टीका करताना राजकारणी अनेकदा असंवेदनशील होतात त्याचे हे उदाहरण.

पंतप्रधानांनी त्या कार्यक्रमा जे म्हटलंय त्याने या रोगाचा सामना करणाऱ्या अनेकांना असं विधान ऐकून काय वाटत असेल हाही वेगळा चर्चेचा विषय आहे..

यापलीकडे जाऊन आपण ‘डिस्लेक्सिया’ नक्को काय आहे जाणून घेऊया.

काय आहे ‘डिस्लेक्सिया’ ?

 

dyslexia-inmarathi
india.com

डिस्लेक्सिया हा आजार साधारणपणे लहान मुलांमध्ये आढळतो. ज्यात मुख्यतः त्यांना लिहिण्या-वाचण्यात व आकलन करण्यात अडथळा येऊ शकतो. हा एक सामान्य आजार आहे जो बऱ्याच लहान मुलांमध्ये त्यांच्या सुरुवातीच्या वयात आढळतो. हा एक असा आजार आहे जो त्यांच्यावर छोटासा कलंक म्हणून देखील राहू शकतो.

मेंदूतील डाव्या व उजव्या गोलार्धांमधील पेशींचा एकमेकांशी व्यवस्थित समन्वय न साधल्या गेल्यामुळे अशी परिस्थिती असू शकते.

जी मुले डिस्लेक्सियाचा सामना करत आहेत, त्यांचा अभ्यासातील कल कमी असू शकतो ज्यात वाचताना किंवा लिहिताना वेगळ्या दोन गोष्टींतील फरक न समजणे, थोड्याफार सारख्या गोष्टींमध्ये गोधळ उडणे वेगैरे गोष्टी दिसून येतात.

याचा त्यांच्या शिक्षणासोबतच इतर सामाजिक प्रगतीवर देखील थोडाफार परिणाम जाणवतो.

काही मुलांमध्ये तर डिस्लेक्सियामुळे डोळे आणि कानांवर देखील परिणाम होऊ शकतो परिणामी दिसणे आणि ऐकणे कमी झालेले दिसून येते. तसेच गणितातील गोष्टी आणि आकडेमोड यामध्ये जास्ती त्रास दिसतो.

अगदीच सध्या भाषेत सांगायचे झाले तर डिस्लेक्सिया हा एक ‘शैक्षणिक विकार’ आहे. ज्यात लिहिण्यावाचण्यातील मूलभूत गोष्टींमध्ये कमतरता दिसून येते, मुळे शिक्षणासोबतच बोलण्यातही मागे दिसून येतात.

 

dyslexic-inmarathi
news18.com

यांच्यात, शिक्षणाशी संबंधित बऱ्याच गोष्टींमध्ये इतर विद्यार्थ्यांपेक्षा किंवा इतर मुलांपेक्षा शैक्षणिक प्रगतीतील अभाव दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी मूल हे एखादी गोष्ट शिकण्यासाठी अतिशय कष्ट करत असूनही त्याला त्या गोष्टी समजण्यास अडथळा येतो.

यात त्यांना दोन अक्षरे, दोन अंक किंवा वस्तू यातील फरक ना समजणे, बेरीज किंवा वजाबाकी न जमणे, शब्द बनवणे यात कठिनता जाणवते.

‘डिस्लेक्सिया ची काही लक्षणे’

डिस्लेक्सिया जरी खूप वेगवेगळ्या लक्षणांवरून ओळखता येऊ शकत असेल तरीही त्यात मुलांमधील एक महत्वाचा अभाव म्हणजे लिहिता वाचताना किंवा शब्द बनवताना येणार अडथळा.

अगदी साधी मुळाक्षरे किंवा अंक वाचता न येणे शब्द बनवता किंवा वाचता न येणे स्पेलिंग लक्षात न राहणे किंवा न समजणे हे अगदी मूलभूत लक्षण या विकारात दिसून येते.

सारख्या वयाच्या इतर मुलांमध्ये आणि या मुलांमध्ये कमालीचा फरक दिसून येतो. त्यांच्या बोलण्यावागण्यावर तसेच इतर आकलनावर याची छाप दिसून येते. वेगवेगळ्या वयातील मुलांमध्ये अशी लक्षणे दिसून येतात.

१) बालवाडी / प्रिस्कुल

या वयात असलेल्या चिमुकल्यांना शब्दांचा यमक जुळवताना त्रास होतो. तसेच त्यांना नवीन शब्द शिकण्यात किंवा शब्द ओळखण्यात व त्यांना बोलण्यात, प्राण्यांचे आवाज लक्षात ठेवण्यास देखील कष्ट पडतात.

 

disle-inmarathi
india.com

२) प्राथमिक माध्यमातील मुले

या वयातील मुलांना गणिते तसेच शब्द बनवण्यात अडथळा येऊ शकतो. साधी आकडेमोड देखील यांना अतिशय अवघड वाटू शकते आणि शब्दांमध्ये फरक न समजणे किंवा जोडाक्षरे ना जमणे असे दिसून येते.

३) माध्यमिक मधील मुले

स्पेलिंग बऱ्याचदा चुकीचे असते, यांना एखादा परिच्छेद किंवा उतारा वाचण्यात आणि वाक्य बनविण्यात अतिशय कष्ट पडतात. त्यांच्या बोलण्यात आणि त्यांचा वाचनात खूप फरक दिसून येतो.

अशी मुले स्वतःहून उत्तर लिहिण्यापेक्षा पर्याय असलेले प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देतात. कारण एखादी गोष्ट पाठविण्यास त्यांना कष्ट पडतात व त्यापेक्षा असलेल्या पर्यायातून निवडणे त्यांना कमी किचकट वाटते.

डिस्लेक्सिया असण्यामागचे कारणे-

डिस्लेक्सिया हा अतिशय सामान्यपणे आढळणारा विकार असून हा असण्यामागे बरीचशी करणे असू शकतात जसे,

१) अनुवंशिकता

अनुवंशिकता हे डिस्लेक्सिया असण्याचं महत्वाचं कारण असू शकतं. आई-वडील किंवा अनुवंशिकता येण्यासारख्या कोणत्याही व्यक्तीपैकी कोणी डिस्लेक्सिया चे शिकार ठरले असतील तर ती मुलांमध्ये जन्मतः येऊ शकते.

हा विकार अनुवांशिकतेमध्ये सुद्धा असू शकतो, लिहिण्यावाचण्यास कष्ट पडलेल्या पालकांची मुलेदेखील बऱ्याचदा या विकाराचा सामना करताना आढळून येतात.

 

heriditory-inmarathi
hatsoff.com

२) मेंदूचे कार्य व रचना

संशोधनात असे आढळून आले कि, ज्या मुलांमध्ये डिस्लेक्सिया हा विकार असल्याचे स्पष्ट झालेय त्यांचा मेंदू हा अभ्यासाच्या दरम्यान म्हणजेच लिहिताना किंवा वाचन करताना हवा तितका कार्यक्षम नसतो, त्याची सक्रियता तितकी नसते.

त्यामुळे मुलांना अभ्यास करताना किंवा आकलन करताना कष्ट पडू शकतात.

डिस्लेक्सिया असणारी मुले आणखी काही अडचणी सहन करतात. जसे कि,

एकाग्रता- या मुलांना एकाग्र होण्यास अतिशय कष्ट पडतात. मेंदूवर अति ताण दिल्यावरही त्यांना खूप वेळ एकाग्र राहण्यास जमू शकत नाही. जवळपास ४०% डिस्लेक्सिक मुले हे अनुभवतात.

यामुळेच एका गोष्टीत लक्ष केंद्रित करून ते ती पार पाडू शकत नाहीत. कोणतेही काम पटकन करणे त्यांना सहजासहजी जमत नाही. त्यांचा प्रतिसाद हा बऱ्याचदा धीमा असू शकतो, हेच त्यांच्या शैक्षणिक आयुष्यावरही परिणाम करते ज्यामुळे इतर मुलांसारखे लवकर शिकणे व इतर गोष्टी त्यांना जमत नाहीत.

 

tare zamin par 1 Inmarathi

 

तसेच गोष्टी लवकर लक्षात येणे आणि लक्षात ठेवणेही अवघड वाटू शकते. डिस्लेक्सिया हा दृष्टी तसेच श्रवणशक्तीवर देखील परिणाम करतो त्यामुळे बऱ्याचदा अगदी साम्य असणाऱ्या गोष्टी ऐकल्यानंतर त्यातील फरक त्यांना लवकर ओळखता येत नाही किंवा बऱ्याच मुलांना अक्षरे ओळखता येत नाहीत, ती उलट सुलट फिरल्याचा भास होतो.

डिस्लेक्सिया त्यांच्या सामान्य विचारशक्ती तसेच व्यावहारिक विचारशक्तीवर(गणिती आकडेमोड) देखील परिणाम करते.

डिस्लेक्सिया हा साधारण एकूण १०% मुलांमध्ये दिसून येतो. वरील लक्षणांवरून जर मुलास शैक्षणिक गोष्टींमध्ये अडचणी येत आहेत असे जाणवल्यास त्यांना बालरोगतज्ज्ञांना किंवा बाल मानसशात्रतज्ज्ञांना दाखवून उपचार घेणे गरजेचे आहे.

इथे ‘डिस्लेक्सिया’ हा शैक्षणिक अभाव समजला गेला नाही पाहिजे तर हा ‘अवघड शैक्षणिक विकार’ समजला जाऊ शकतो, जो वयोमानानुसार कमी होऊन नाहीसा होतो.

 

Shikshanachya_Aaicha_Gho_InMarathi

 

‘हा एक सामान्य विकार असून योग्य पद्धतीने उपचार घेऊन त्या मुलास वैयक्तिक लक्ष देऊन त्यांच्यात बदल घडवून आणता येतो व तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. आजच्या काळातही बालपणी डिस्लेक्सियाचा सामना करूनही आज यशस्वी आयुष्य जगणारे बरेच लोक आहेत-

१) टॉम क्रूझ- सर्वात देखणा पुरुष असलेला टॉम क्रूझ जगातील सर्वोत्कृष्ट ऍक्शनहीरो म्हणून प्रसिद्ध आहे.

 

tom kruz InMarathi

२) स्टीव्ह जॉब्स- हे apple कंपनीचे सह संस्थापक असून अमेरिकेतील एक अतिशय यशस्वी उद्योजक आणि गुंतवणूकदार होते.

३) जेनिफर अनि

स्टन- हि एक अतिशय देखणी आणि लोकप्रिय अमेरिकन अभिनेत्री असून अभिनयक्षेत्रात व उद्योजक क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहे. तिची ‘ FRIENDS ‘ या मालिकेतील भूमिका अतिशय गाजलेली आहे.

४) अभिषेक बच्चन- अमिताभ बच्चनचे सुपुत्र असलेले अभिषेक हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे.

 

abhishek-bachchan-inmarathi
mensxp.com

५) मार्क रॅफलो- हे देखील अभिनयक्षेत्रातील एक नावाजलेलं व्यक्तिमत्व असून राजकारणिदृष्ट्या देखील सक्रिय आहेत.

६) विल स्मिथ- हा एक अमेरिकन अभिनेता असून एक रॅपरदेखील आहे. ग्रॅमी, गोल्डन ग्लोब व अकॅडेमि पुरस्कारांचा मानकरी आहे.

७) कॅटलीन जेन्नर- ऑलम्पिक मेडल विजेती असलेली कॅटलीन हि एक नावाजलेली अभिनेत्री आहे.

 

Caitlyn jenner InMarathi

 

८) मुहम्मद अली- “द ग्रेटेस्ट” अश्या टोपण नावाने ओळखले जाणारे हे एक २०व्या दशकातील मुष्टियोद्धा असून अमेरिकेत व्यावसायिक, मुष्टियोद्धा म्हणून प्रसिद्ध होते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?