' …आणि महात्मा गांधींनी चक्क क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं! – InMarathi

…आणि महात्मा गांधींनी चक्क क्रिकेटचं मैदान गाजवलं होतं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

गांधीजी म्हटलं की आपल्यासमोर त्या साध्या पोशाखातील महात्म्याची प्रतिभा उभी राहते ज्यांनी सदैव सत्याच्या मार्गाचे आचरण केले. अहिंसावादाच्या आधारावर त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. अश्या या महापुरुषाबद्द्दल आपल्याला एवढेच माहित आहे की ते एक सत्यपुरुष आणि स्वातंत्र्यसेनानी होते.

त्यांची अहिंसा, देशासाठी केलेलं कार्य या सगळ्या गोष्टींबद्दल आपल्याला ठाऊक असतंच. पण त्यांच्या सगळ्याच आवडींबद्दल तुम्हाला माहित आहे असं तुम्हाला वाटत असेल तर जरा थांबा. कारण तुम्हाला एक गोष्ट नक्कीच ठाऊक नसणार…

समजा तुम्हाला कोणी सांगितले की गांधीजींना क्रिकेट खेळामध्ये विलक्षण रस होता तर??? तुम्हाला थोडेसे आश्चर्य वाटेल, कारण गांधीजींच्या एकंदर व्यक्तिमत्वाकडे पाहता यावर विश्वास बसणे कठीणचं!

पण गांधीजींबद्दल सामान्यतः माहित नसलेली ही गोष्ट अगदी खरी आहे की गांधीजी क्रिकेट खेळत असतं.

 

mahatma-gandhi-cricketmarathipizza02

 

ब्रिटीश खेळाडूंच्या एका संघाचा भारतीय वंशाच्या खेळाडूंसोबत लंडन येथे क्रिकेटचा एक सामना आयोजित करण्यात आला होता आणि त्या सामन्यात आपल्या गांधीजींनी उत्तम खेळ करत स्वत:मधील क्रिकेटर सर्वांसमोर सिद्ध केला होता. या सामन्यात गांधीजींनी २१ धावा केल्या होत्या.

विशेष म्हणजे त्यात ३ चौकारांचा देखील समावेश होता. एवढेच नाही तर त्यांना आपली गोलंदाजी दाखवण्याची संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं करत त्यांनी एक बळी देखील घेतला. या प्रसंगावरून एक गोष्ट मात्र सिद्ध होते की गांधीजी उत्तम क्रिकेट खेळायचे.

===

हे ही वाचा – एक विलक्षण स्त्री, जिचा पुनर्जन्म झालाय अशी ग्वाही महात्मा गांधींनी दिली होती

===

दुसरा एक प्रसंग म्हणजे एकदा एम. सी. सी. क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता आणि त्या संघाचे नेतृत्व करत होता डग्लस जोर्डीन.

या संघात गांधीजींची देखील निवड झाली होती. परंतु ते सामना  खेळले नव्हते, बहुधा राखीव खेळाडू म्हणून त्यांची निवड झाली होती, कारण एम.सी.सी.च्या लॉर्ड मैदानावरच्या पुस्तकामध्ये १७ वा खेळाडू म्हणून त्यांची सही आहे.

 

mahatma-gandhi-cricketmarathipizza01

 

गांधीजींचा क्रिकेटमधील रस दर्शवणारा अजून एक प्रसंग त्यांचे शाळेतील मित्र आर. जी. मेहता यांनी लिहून ठेवली आहे. ते म्हणतात,,

गांधीजी क्रिकेटचे मोठे चाहते होते. त्यांना या खेळामध्ये अतिशय रस होता ही गोष्ट त्यांच्या जवळील व्यक्ती वगळता फारशी कोणाला ठावूक नाही. एकदा आम्ही क्रिकेटचा एक सामना पाहायला गेलो होतो.

तो सामना होता राजकोट शहर वि. राजकोट सरदार (कँप विभाग) यांच्यामध्ये! सामना अतिशय रंगत आला होता आणि गांधीजी अतिशय उत्सुकतेणे सामन्याची मजा घेत होते. अचानक एका क्षणाला ते उद्गारले, “हा फलंदाज आता आउट होईल बघ!” आणि काय आश्चर्य! तो फलंदाज दुसऱ्याच क्षणाला बाद झाला.

 

mahatma-gandhi-cricketmarathipizza03

 

(डर्बनच्या क्रिकेट क्लबमधील गांधीजीं आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा एक दुर्मिळ फोटो)

असे होते गांधीजी आणि क्रिकेटमधील नाते !!!

===

हे ही वाचा – एकमेव हिंदी सिनेमा बघण्याआधी गांधीजींनी डॉक्टरांची परवानगी का घेतली होती, ते वाचा

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?