' "मिराज २०००" : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे विमान इतके खास का आहे? जाणून घ्या..

“मिराज २०००” : भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातील हे विमान इतके खास का आहे? जाणून घ्या..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

पुलवामा मध्ये झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यातुन आपण सावरेपर्यंतच आपल्या हुतात्म्यांच्या हौतात्म्याचा १३ दिवसातच बदला घेऊन दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानची नांगी ठेचल्याबद्दल वायुसेनेचे कौतुक करावे तितके थोडे आहे.

पाक वायुसेनेने काल रात्रीच ट्विटरवर ‘निश्चिंत झोपा.. आम्ही संरक्षणासाठी जागे आहोत’ अश्या अर्थाचा संदेश दिलेला असतानाही भारताने या ‘अलर्ट’ असलेल्या सेनेवर शांततेत केलेल्या या क्रांतीमूळे यांवर उधळाल तितकी स्तुतीसुमने कमी आहेत.

भारताने किती मोठे आव्हान दिले आहे किंवा याचे परिणाम किती काय होतील यापेक्षा, आपल्यासाठी हे शक्ती प्रदर्शन आणि हा सर्जिकल स्ट्राईक किती महत्वाचा होता याचा विचार केला पाहिजे.

या हल्ल्यातील हिरो ठरलेलं आहे ते म्हणजे “मिराज २०००” हे लढाऊ विमान!

 

mirage2000-inmarathi
News18.com

पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट या भागात लष्करी कारवाई करत मिराज २००० या लढाऊ विमानांच्या ताफ्यांने बालाकोट मधील दहशतवादी तळांवर हल्ला केला.

या हल्ल्याला समोरून प्रत्युत्तर देत पाकिस्तान वायुसेनेने एफ 16 या विमानांच्या ताफ्यांने हल्ला चढविला पण ‘मिराज २०००’चा ताफा, त्याची क्षमता आणि आपल्याकडे असलेला स्फोटकांचा साठा पाहून पाकिस्तान वायू सेनेची विमाने परत फिरली.

हो ही मस्करी नाही तर आलेल्या माहितीच्या आधारे हे स्पष्ट झालेलं आहे. या घटनेने जगात चौथ्या क्रमांकावर असलेल्या ‘भारतीय वायू सेनेच्या’ ताकदीचं पुन्हा एकदा प्रदर्शन झालं असून आपल्या ‘मिराज २०००’ ची शक्ती समोर आली आहे.

“मिराज २०००” नक्की काय प्रकार आहे?

‘द डसौल्ट मिराज २०००” हे ‘एव्हिएशन डसौल्ट’ यांनी साकारलेले फ्रेंच बनावटीचे प्रचंड ताकदवान असे लढाऊ विमान आहे.

 

mirage-inmarathi
Hush-Kit.com

एक कमी वजनाचे पण अतिशय चपळ आणि शक्तिशाली असे लढाई साठी उपयुक्त असणाऱ्या विविध सोयिनीं युक्त असे चौथ्या जनरेशनचे एक इंजिन असलेले विमान आहे. मिराज २००० हे १९७० च्या काळात मिराज-३ ला पुनर्स्थित करण्यासाठी डिजाईन केले गेलेले.

एक किंवा दोन वैमानिकांची जागा असणार हे विमान दिशादर्शक, फाईट कंट्रोल, रडार यंत्रणा आणि शास्त्राचा मारा करण्यात पटाईत आहे.

मिराज 2000 हे 125 -12 अंतर्निहित ट्विन डीईएफए 554 ऑटोकॅनन, (आता जीआयएटी 30-550 एफ 4) 30 मिमी रिव्हॉल्व्हर-टाइप कॅनन्ससह सुसज्ज आहे ज्यात प्रत्येकी १२५ राऊंड्स आहेत.

यांचा फायर रेट सुमारे १२०० ते १८०० प्रति मिनिट असा आहे. याचे वजन सुमारे ७५००किलोग्रॅम असून याच्या उड्डाणाच्यावेळी असलेले वजन १७००० किलोग्रॅम असू शकते.

तसेच हे १४४० किलोमीटर पर्यंत सशस्त्र मारा करताना प्रवास करू शकते. मिराज ५९००० फूट उंचावरून नियंत्रण केले जाऊ शकते.

 

mirage-2000-inmarathi
dnaindia.com

या विमानाचा सर्वाधिक वेग ताशी २३३६ किलोमीटर पर्यंत जाऊ शकतो तसेच याच्या बनावटीमध्ये दोन जुळे नोज व्हील्स आणि प्रत्येक व्हील्सवरती एक गिअर आणि चपळतेने मागे घेण्यासारखे गिअर अशी रचना आहे.

लँडिंग गेअरचा कार्बन ब्रेक करून जमीन व विमान यांच्यातील अंतर कमी करण्यासाठी हे वापरात येऊ शकते.

कॉकपिटच्या समोर काढता येण्याजोग्या फ्युएल रिफीलिंग प्रोबचा समावेश असतो. भारताकडे असलेल्या दुसऱ्या लढाऊ विमान (रशियन बनावटीचे सुखोई Su30MKI) चा वेग तशी २१२० किलोमीटर आहे जो मिराज पेक्षा कमी असून ते जास्ती जाड देखील आहे.

यामध्ये एकाच वेळी वेगवेगळ्या निशाणांवर हल्ले करण्याची सोय आहे. मिराज हे हवेतून हवेमध्येच तसेच जमिनीवरून हवेमध्ये स्फोटकांचा साठा नेण्यास समर्थ आहे.

परमाणू स्टॅन्ड ऑफ मिसाईल वाहून नेण्याच्या उद्देशाने मिराज २००० हे आण्विक विमान म्हणून ठरविले होते.

 

mirage-use-inmarathi
zeenews.com

भारताने १९८२ मध्ये एकूण (सिंगल सीटर ८ आणि ट्वीन सीटर १ असे) ९ विमाने खरेदी केली होती. यासमवेतच भारताने मिराजकडून हल्ल्यासाठी १००० किलोंचे लेझर गाईडेड स्फोटके देखील खरेदी केली होती ज्यांना “वज्र” असे नाव दिले होते.

मीराजचा भारतातील एकूण इतिहास पाहता जेंव्हा १९९९ मध्ये कारगिल युद्ध उफाळून आले त्यावेळी मीराजची कामगिरी उल्लेखनीय होती.

मिराज विमानाची २०००C, मिराज २०००B, मिराज २०००N, मिराज २०००D, मिराज २०००-5F इत्यादी रूपे आहेत.

सध्या भारताकडे मिराज २०००H (२००० I पर्यंत अपग्रेड केलेले) ४२ आणि मिराज २००० TH (दोन सीट ट्रेनर व २००० TI पर्यंत अपग्रेड असलेले, H- हिंदुस्थान) ८ असे एकूण ५० विमान आहेत.

भारतासह फ्रांस, UAE , तैवान, ग्रीस, इजिप्त, ब्राझील, कतार, पेरू इत्यादी देशांकडेही मीराजचे विमान आहेत.

अश्या या अचाट शक्ती असणाऱ्या विमानाचा समावेश आपल्या वायुसेनेत असल्यामुळे जगातील चौथ्या क्रमांकाची शक्तिशाली वायुसेना म्हणून आपली गणना झाली आहे.

 

iaf-inmarthi
defence.com

वायुसेनेतील हा आपला गरुडाचा राजा अचूकपणे निशाणा साधून शत्रू टिपत आपले संरक्षण करण्याचे काम निरंतर करत राहील.

याच्या सामर्थ्याने आज आपली किमया दाखवून दिली आहे. हा पाकिस्तान व इतर शत्रूंना एक इशारा आहे.

मिराजच्या या ताकदीला पाहून आपली विमाने घेऊन पाकिस्तानच्या सेनेने पळ काढला यात नवल वाटण्यासारखे काय?!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?