' थ्रिलर स्टोरी एका शैतानाची!

थ्रिलर स्टोरी एका शैतानाची!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

दुसऱ्या महायुद्धातील जर्मन नाझी सैन्यातील उच्च पदावर कार्यरत असणारा रायनहर्ड ट्रिस्टन युजीन हेड्रीच ह्याचा ज्यूंच्या नरसंहारामागे मोठा हात होता. त्यानेच ह्या भयानक नरसंहाराची योजना आखली होती.

तो गेस्टापो (सिक्रेट पोलीस ऑफ नाझी जर्मनी), क्रिपो(क्रिमिनल इन्व्हेस्टीगेशन डिपार्टमेंट) ह्या विभागांमध्ये तसेच सिनियर ग्रुप लीडर अँड जनरल ऑफ पोलीस ह्या पदावर कार्यरत होता.

त्याने इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस कमिशनचे अध्यक्षपद भूषवले तसेच १९४२ च्या वॉंसी कॉन्फरंसचा तो अध्यक्ष होता. ह्याच वॉंसी कॉन्फरन्समध्ये ज्यूंच्या प्रश्नावर “तोडगा” काढण्यात आला, आणि जर्मन अधिपत्याखालील युरोपमध्ये ज्यूंचा संहार तसेच त्यांना जर्मन अधिपत्याखालील युरोपातून हाकलून देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

नाझी अधिकाऱ्यांमधील सर्वात क्रूर व्यक्ती म्हणून ह्या रायनहर्ड हेड्रीचचा उल्लेख करण्यात येतो. तो इतका क्रूर होता की एडॉल्फ हिटलरने सुद्धा त्याला “पाषाणहृदयी” व्यक्ती असल्याचे म्हटले होते.

 

nazi-inmarathi
dwindia.com

हे ही वाचा :

===

 

त्यानेच नाझी जर्मनी व ऑस्ट्रियाच्या काही भागात ज्यू लोकांवरील अत्याचार, त्यांचा संहार, त्यांना अटक आणि हद्दपार करण्यात महत्वाची भूमिका बजावली होती. त्यानेच हा नरसंहाराची आणि अत्याचारांची पद्धतशीर योजना आखून ९ व १० नोव्हेंबर १९३८ रोजी एसए स्टॉर्मट्रुपर्स (नाझी पार्टीचे पॅरामिलिटरी दल) ना ज्यू लोकांवर अत्याचार करून त्यांना हद्दपार करण्याचे तसेच ठार मारण्याचे आदेश दिले होते.

त्याने प्राग मध्ये येताच झेक रिपब्लिक लोकांना हद्दपार करून, त्यांना ठार मारून तसेच झेक संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न करून नाझी पक्षाला असलेला विरोध मोडून काढला.

नाझी पक्षाच्या “आईनझॅट्सग्रूपेन” ह्या पॅरामिलिटरी डेथ स्क्वाडचा तो प्रमुख होता. हे पॅरामिलिटरी स्क्वाड दुसऱ्या महायुद्धात गोळीबार करून मास किलिंग करत असत.

hitler-youth nazi inmarathi

ह्या डेथ स्क्वाडने सुमारे दोन दशलक्ष लोकांची गोळीबार करून किंवा गॅस चेम्बरमध्ये कोंडून हत्या केली. ह्यात १३ लाख ज्यू लोकांचा समावेश होता.

इतक्या लोकांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या क्रूर रायन हेड्रीचला म्हणूनच लोक “द ब्लॉन्ड बीस्ट” व “द हँगमॅन” तसेच “द बचर ऑफ प्राग” म्हणत असत. तो Kristallnacht चा सूत्रधार होता. Kristallnacht हा होलोकॉस्ट पूर्वी झालेला ज्यूंचा नरसंहार, हेड्रीचच्याच आदेशांवरून करण्यात आला होता.

त्याने त्याच्या “आईनझॅट्सग्रूपेन”ह्या पॅरामिलिटरी दलाच्या लोकांना आदेश दिले होते की युरोपमध्ये कुठलाही ज्यू पुरुष, स्त्री किंवा लहान मूल असता कामा नये. कुठलीही ज्यू व्यक्ती मग ते लहान बाळ का असे ना, ते दिसले की त्यांना संपवून टाकण्याचे आदेश त्याने त्याच्या पॅरामिलिटरीच्या सैनिकांना दिले होते.

heydrich-inmarathi
cellcode.us

म्हणूनच एडॉल्फ हिटलर सुद्धा त्याच्याविषयी बोलताना एकदा म्हणाला होता की “ही हॅज अ हार्ट ऑफ आयर्न!” नाझी अधिकाऱ्यांपैकी तो सर्वात क्रूर, भावनाशून्य आणि निर्दयी माणूस होता. तो थंड डोक्याने लोकांना मारून टाकण्याच्या योजना आखत असे.

खुद्द हिटलर सुद्धा ज्याला पाषाणह्रदयी म्हणतो म्हणजे हेड्रीच किती क्रूर आणि भावनाशून्य असावा ह्याची आपण कल्पना करू शकतो.

जेव्हा नाझी पक्षाला एका थंड डोक्याने दहशत पसरवू शकणाऱ्या व्यक्तीची गरज होती तेव्हा रायन हेड्रीचची महत्वाच्या पदांवर नियुक्ती करण्यात आली.

रायनहार्ड हेड्रीचचा जन्म ७ मार्च १९०४ रोजी जर्मनीच्या Halle an der Saale ह्या ठिकाणी झाला. त्याचे वडील एक गायक होते तसेच ते राष्ट्रवादी सुद्धा होते. ते कायम जर्मन समाजाच्या श्रीमंत आणि मोठ्या लोकांना प्राधान्य देत असत. त्याची आई एक समर्पित कॅथलिक होती. रायनहर्ड हेड्रीच आणि त्याची दोन भावंडं ह्यांचे बालपण श्रीमंतीत आणि हाय सोसायटीमध्ये गेले.

त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यात लहानपणापासूनच राष्ट्रभक्तीचे बी पेरले. शाळेत असताना हेड्रीचला त्याच्या नाजूक मुलीसारख्या आवाजामुळे त्याच्या वर्गातील मुले त्याला चिडवत असत. त्याला एकटे पाडत असत.

अशीही अफवा होती की हेड्रीचचे पूर्वज ज्यू होते. सतत एकटे पाडल्यामुळे त्याने एकटयाने फक्त अभ्यासावरच लक्ष केंद्रित केले. तो एक कुशल ऍथलिट होता तरीही तो लाजाळू आणि अंतर्मुख व्यक्ती होता.

हे ही वाचा :

===

 

nazi-inmarathi
HistoryNet.com

पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला तेव्हा हेड्रीच आपल्या देशाच्या बचावासाठी उभा राहिला. युद्धात पराभव झाल्यामुळे देशातील सामाजिक आणि राजकीय वातावरण अस्थिर झाले होते. त्यामुळेच हिटलरचा उदय झाला. त्याने सत्ता काबीज केली. तेव्हा पंधरा वर्षाच्या हेड्रीचने पॅरामिल्ट्री फ्रीकोर्प्समध्ये प्रवेश मिळवला.

त्याने नंतर नॅशनल जर्मन प्रोटेक्शन आणि शेल्टर लीगमध्ये सामील झाला. १९२२ साली त्याने जर्मन नेव्हीमध्ये प्रवेश मिळवला. पण नंतर त्याला अधिकाऱ्यांना अयोग्य वागणूक दिल्यामुळे कामावरून काढून टाकण्यात आले.

तो कायम स्त्रियांच्या मागे असायचा.नेव्ही मध्ये असतानाही त्याचे शिपयार्ड डायरेक्टरच्या मुलीबरोबर अफेअर होते पण त्याने तिच्याशी लग्न करायला नकार दिला होते. त्याने अनेक स्त्रियांशी अफेअर्स केली आणि शेवटी १९३१ साली लीना वॉन ऑस्टिनशी लग्न केले.

लीना नाझी पक्षाची सदस्या होती. तिच्या मार्फतच हेड्रीचची हेनरिच हिमलरशी ओळख झाली. तो नाझी पक्षात मोठ्या हुद्द्यावर होता. ह्या दोन व्यक्तींमध्ये लगेच घनिष्ठ मैत्री झाली.

leena nazi inmarathi

त्याला मूल झाल्यानंतर त्याने हिमलर आणि अर्न्स्ट रोहमला आपल्या मुलाचे गॉडफादर होण्याची विनंती केली. हिमलरने हेड्रीचची नाझी पक्षात लगेच नियुक्ती केली. त्याला नाझी पार्टीचे सिक्युरिटी युनिट तयार करण्यास सांगितले गेले. हेड्रीचने एसडी म्हणजेच Sicherheitsdienst ही सुरक्षा व्यवस्था तयार केली.

हेड्रीचच्या नेतृत्वाखाली ही सुरक्षा व्यवस्था नाझी पक्षासाठी अतिशय महत्वाची आणि उपयोगाची गुप्तचर संस्था ठरली. जेव्हा हिटलर जर्मनीचा चॅन्सेलर झाला तेव्हा एसडी ही एकमेव गुप्तचर संस्था कार्यरत होती.

एसडी नंतर शक्तिशाली एसए स्टॉर्मट्रुपर्स ही संस्था कार्यरत झाली. ही संस्था अर्न्स्ट रोहमच्या नेतृत्वाखाली कार्यरत होती. ह्याच स्टॉर्मट्रुपर्सने पुढे प्रचंड रक्तपात केला. ह्याच घटनेला रोहम पर्ज किंवा नाईट ऑफ द लॉन्ग नाईव्ह्ज असे म्हणतात.

३० जून १९३४ ते २ जुलै १९३४ ह्या दरम्यान नाझी जर्मनीमध्ये हिटलरची जर्मनीवर पकड मजबूत व्हावी म्हणून अनेक अधिकाऱ्यांना ठार मारून टाकण्यात आले. ह्याच घटनेला द नाईट ऑफ द लॉन्ग नाईव्ह्ज म्हणतात.

ह्या मोहिमेत ८५ लोकांना ठार मारण्यात आले. पण असे म्हणतात की खरा आकडा ७००-१००० इतका जास्त आहे.

हेड्रीचला नंतर बढती मिळत गेली आणि वयाच्या तिसाव्या वर्षाआधीच तो एसएस जनरल म्हणून नियुक्त झाला. त्याचे पूर्वज ज्यू आहेत अशी त्याच्या शत्रूंनी आवई उठवली तेव्हा त्याला जवळजवळ काढून टाकलेच होते. पण हिटलरच्या मते हेड्रीच अत्यंत धोकादायक मनुष्य असल्याने व त्याचा नाझी पक्षाला उपयोग होऊ शकत असल्याने त्याला पक्षात कायम ठेवण्यात आले.

हेड्रीचने नाझी पक्षाच्या सर्व विरोधकांना शोधून शोधून संपवून टाकले. हेड्रीच आणि हिमलर ह्यांनी नाझी पक्षाचे विरोधक आणि नव्या जर्मनीत राहण्यास लायक नसल्याने ज्यू, रोमन आणि सिंटी लोकांना संपवून टाकण्याचे आदेश दिले.

१९३८ साली त्याने जर्मन ज्यू लोकांचा पहिला रक्तपात घडवला. त्या रात्री त्याने मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या ज्यू लोकांना अटक करण्याचे आदेश दिले. ज्यू लोकांची घरे व व्यवसायकेंद्रे जाळून टाकण्याचे आदेश दिले. १९३९ साली त्याने डेथ स्क्वाडला जर्मन सैन्याबरोबर पूर्वेकडे जाऊन ज्यू लोकांना हद्दपार करण्याचे किंवा संपवून टाकण्याचे आदेश दिले.

नाझी पक्षाच्या ताब्यात असलेल्या युरोपात सुद्धा ह्याच आदेशांचे पालन करण्यात आले आणि ज्यू लोकांना संपवण्यात आले.

gas-chambers-inmarathi
audiatur-online.ch

सुरुवातीला त्याचे आदेश होते की प्रत्येक ज्यू स्त्री, पुरुष व लहान मुलांना पकडून त्यांच्यासाठी खास तयार करत असलेल्या कॅम्पमध्ये पाठवण्यात यावे. पण नंतर नंतर तो अधिक क्रूर आदेश देऊ लागला.

पूर्व युरोपातल्या ज्यू लोकांना त्यांच्या घरांतून फरफटत आणून तत्क्षणी गोळ्या घालून मारून टाकण्याचे किंवा गॅस व्हॅन्स मध्ये घालून मारून टाकण्याचे त्याने आदेश दिले.

ज्यू लोकांवर कायमचा “तोडगा’ काढण्यासाठीच आदेश रायनहर्ड हेड्रीचनेच दिले होते. त्याने वॉंसी कॉन्फरन्समध्ये नाझी पक्षाच्या उच्चपदस्थांची मिटिंग बोलावली आणि होलोकॉस्टची योजना आखण्यात आली.

त्यानंतर त्याने युरोपातील ११ दशलक्ष ज्यू लोकांची यादी त्यांच्या पत्त्यांसकट सादर केली. ह्या पत्त्यांवरून त्यांना शोधून,अटक करून डेथ कॅम्प मध्ये आणून मारून टाकण्याचे आदेश ह्या कॉन्फरन्समध्ये देण्यात आले.

death nazi inmarathi

ह्यातून एकही ज्यू सुटता कामा नये असे कडक आदेश डेथ स्क्वाडला देण्यात आले.

हिटलरने हेड्रीचला झेक रिपब्लिकच्या “स्वच्छतेची” जबाबदारी दिली आणि “कचऱ्यासमान” झेक लोकांना “जर्मन” बनवण्याचे आदेश दिले होते. प्राग मध्ये येताच तीन दिवसांत हेड्रीचने ९२ लोकांना ठार करवले.

त्यानंतर संपूर्ण झेक रिपब्लिकमध्ये दहशत पसरावी म्हणून त्याने चौकाचौकांत त्या ९२ लोकांची नावे असलेली पोस्टर्स लावली. पाचच महिन्यात त्याने झेक मधील पाच हजार लोकांना डेथ कॅम्प मध्ये पाठवले.

 

death-camp-inmarathi
upi.com

सुरुवातीला आपल्या वैयक्तिक कारणांमुळे जॅन क्युबीस आणि जोएफ गॅबकीक ह्यांनी हेड्रीचला हार मारण्याची योजना आखली होती. पण हा सगळं नरसंहार बघून त्यांनी “ऑपरेशन अँथ्रोपॉइड“ची योजना आखली.

ह्या ऑपरेशनमध्ये हेड्रीचला त्याच्या घरापासून ते प्राग पर्यंतच्या प्रवासात ठार मारण्याची योजना झेक अधिकाऱ्यांनी आखली. एका वळणावर जेव्हा हेड्रीचच्या गाडीचा वेग मंदावेल तेव्हा त्याचा काटा काढण्याचे क्युबीस आणि गॅबकीक ह्यांनी ठरवले.

ठरल्याप्रमाणे वळणावर गॅबकीक झुडुपातून उडी मारून बाहेर आला आणि त्याने हेड्रीचवर मशिनगन रोखली. आणि ट्रिगर दाबताना त्याच्या लक्षात आले की त्याची मशिनगन जॅम झाली आहे. त्यामुळे तो तिथेच घाबरून खिळून उभा राहिला. हेड्रीच घाबरला नाही. तो पळाला देखील नाही. त्याने ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले आणि आपली पिस्तूल गॅबकीकवर रोखली.

मशिनगनशी झगडत असलेल्या आता गॅबकीकला आपण मरणार असे वाटत असतानाच क्युबीसने प्रसंगावधान दाखवत मेकशिफ्ट बॉम्ब हेड्रीचच्या गाडीत फेकला.

8_Heydrich_E_Assassination_Recon inmarathi

परंतु ह्या सगळ्यात क्युबीस गाडीच्या इतक्या जवळ आला होता की त्या बॉम्बमुळे तो सुद्धा थोडा जखमी झाला. इतके होऊन सुद्धा हेड्रीच मेला नाही. जळालेल्या गाडीतून तो सरपटत बाहेर आला आणि त्याने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या.

त्या दरम्यान क्युबीसने आपली सायकल घेतली आणि तो पळाला. हेड्रीचने त्या अवस्थेतही क्युबीसचा पळत पळत पाठलाग केला. आणि त्याच्यावर गोळीबार केला. पण जखमी झालेल्या हेड्रीचच्या पायांनी त्याला सहकार्य केले नाही आणि तो कोसळला.

हेड्रीचच्या ड्रायव्हरने गॅबकीकचा पाठलाग केला. पण गॅबकीकने त्याच्या पायांवर गोळी झाडली आणि तो निसटला. इकडे हेड्रीच गंभीर जखमी झाला होता आणि त्याला आपला मृत्यू समोर दिसत होता. त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले पण ४ जून १९४२ रोजी जखमांमध्ये इन्फेक्शन झाल्याने त्याचा ३८व्या वर्षी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूमुळे चिडलेल्या हिटलरने बदला घेण्याचे जाहीर केले.

हे ही वाचा :

===

 

adolf-hitler-marathipizza
medium.com

हेड्रीचचे मारेकरी लिडिस आणि लेझॅकी ह्या गावात लपून बसले असल्याचे नाझी सैनिकांना कळले आणि त्यांनी त्या गावातील सोळा वर्षांवरील सर्व पुरुषांना मारून टाकले. आणि लहान मुले व स्त्रियांना डेथ कॅम्पमध्ये पाठवण्यात आले. नाझी सैनिकांनी संपूर्ण गाव जाळून टाकले.

हेड्रीचचे मारेकरी सापडले नाही तर असाच रक्तपात होत राहील असे हिटलरने जाहीर केले. ह्यामुळे घाबरून जाऊन कॅरेल चुर्दा नावाच्या एका व्यक्तीने नाझी सैनिकांना क्युबीस व गॅबकीक प्रागमधील एका चर्चमध्ये लपून बसल्याचे सांगितले.

काहीच वेळात चर्चभोवती ८०० सैनिकांनी वेढा घातला आणि मारेकरी बाहेर यावे म्हणून अश्रूधूर आणि गोळ्या झाडण्यात आल्या. त्यांनी स्फोट करून इमारतीला छिद्र पडले आणि ते आत घुसले. क्युबिसने २ तास त्याच्या २ सहकाऱ्यांबरोबर खिंड लढवली पण अखेर गोळीबारात त्याचा मृत्यू झाला.

गॅबकीक व त्याच्याबरोबर असणारी इतर माणसे चर्चखाली असणाऱ्या दफन करण्याच्या खोलीत गेली व त्यांनी नाझी सैनिकांच्या हाती लागण्यापेक्षा स्वतःला संपवलेले बरे असा विचार करत आत्महत्या केली.

nazi church InMarathi

पण ह्या दोन व्यक्तींचा निर्णय अगदी योग्य ठरला कारण जेव्हा त्यांनी हेड्रीचवर हल्ला केला तेव्हा तो बर्लिनमध्ये हिटलरलाच भेटण्यास निघाला होता व नंतर तो फ्रांसला स्थायिक होऊन तिथे नाझी सत्ता स्थापन करणार होता. हेड्रीचला मारले तरी होलोकॉस्ट व्हायचे थांबले नाहीच.

असंख्य ज्यू लोकांना मरणयातना देऊन नाझी सैनिकांनी ठार केलेच. हा नरसंहार अतिशय भयंकर होता. त्याबद्दल नुसते वाचले तरी अंगावर काटा येतो. ह्या “फायनल सोल्युशन” चे नाझी लोकांनी हेड्रीचच्या सन्मानार्थ “ऑपरेशन रायनहार्ड” असे नामकरण केले. आणि होलोकॉस्ट झाले ते रायनहर्ड हेड्रीचच्याच नावाने!

पाषाणहृदयी हेड्रीचच्या नावाने हा नरसंहार व्हावा, हा त्याला आपला सन्मानच वाटला असेल!

एकीकडे मानवी उदारपणाची, स्वतःचा जीव धोक्यात घालून दुसऱ्याचा जीव वाचवण्याची वृत्ती तर दुसरीकडे हेड्रीच सारखी क्रूर व्यक्ती, असे क्रूरकर्मा लोक जन्माला कसे येतात हाच मोठा प्रश्न पडतो!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?