' चौदाव्या शतकात लागला 'प्रिंटिंग'उद्योगाचा शोध.. हे पुस्तक आले पहिले छापून

चौदाव्या शतकात लागला ‘प्रिंटिंग’उद्योगाचा शोध.. हे पुस्तक आले पहिले छापून

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मध्ययुगीन काळात असे अनेक शोध लागले ज्याने मानवाच्या आयुष्यात क्रांती घडली. छपाईचा शोध ही अशीच एक क्रांती होती ज्याने पुस्तके मोठ्या प्रमाणात सहज छापून मिळाल्यामुळे शिक्षणाचा आणि ज्ञानाचा प्रसार झटकन होण्यास खूप मोठी मदत मिळाली.

योहानेस गुटेनबर्गने प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. सर्वात पहिले छापलेले पुस्तक म्हणून गटेनबर्ग बायबलचे नाव घेतले जाते.

हे ४२ ओळींचे बायबल किंवा मझरीन बायबल हे योहान्स गुटेनबर्गने मुव्हेबल मेटल पद्धतीने छापलेले पहिले पुस्तक आहे असे म्हणतात. खरे तर ह्या आधी सुद्धा गुटेनबर्गने अनेक पुस्तके छापली होती पण गटेनबर्ग बायबलमुळे गटेनबर्ग क्रांती किंवा अक्षरक्रांती झाली असे म्हटले जाते.

इसवी सन १४५५ साली गटेनबर्ग बायबल पहिल्यांदा मुद्रित करण्यात आले असे म्हणतात.

 

gutenbergh-inmarathi

हे ही वाचा – धोकादायक ते सुरक्षित : ‘आग लावण्या’च्या गोष्टीच्या शोधाची रंजक कथा

जर्मनीच्या योहान्स गुटेनबर्गच्या ह्या शोधामुळे पुस्तके मोठ्या प्रमाणात मुद्रित करण्याची सुरुवात झाली. ह्या आधी पुस्तके हाताने लिहून काढावी लागत असत किंवा जुन्या पद्धतीने वुडब्लॉक प्रिंटींग केले जात असे.

आशिया खंडात तर फार पूर्वीपासून कापडावर किंवा जनावरांच्या कातडीवर स्टेन्सिल्स किंवा वुडब्लॉक वापरून प्रिंटिंग करीत असत.

त्यामुळे काहीही छापायचे असेल तर त्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागत असे. तसेच हे वेळखाऊ काम होते त्यामुळे ह्यासाठी पैसाही जास्त लागत असे. त्यामुळेच सर्वसामान्य लोकांना पुस्तके विकत घेणे सहसा परवडत नसे.

त्यांच्या मर्यादित प्रति निघत असत. पण छपाईच्या शोधामुळे पुस्तकांच्या अनेक प्रति एकाच वेळी तयार होऊ लागल्या आणि तिथूनच अक्षरक्रांतीला सुरु वाट झाली.

माहितीचा, ज्ञानाचा जगभर प्रसार होऊ लागला. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये छपाईचा शोध हे अत्यंत महत्वपूर्ण घटना आहे.

 

gutenbergh-print-inmarathi

 

गुटेनबर्गने पहिल्यांदा बायबल मुद्रित केले त्याच्या १८० प्रतींपैकी ४८ प्रति आजही जगभरात विविध ठिकाणी आजही जतन करून ठेवल्या आहेत. त्यापैकी ब्रिटिश लायब्ररी मध्ये ह्याच्या २ प्रति आहेत.

त्यापैकी एक प्रत कागदावर छापलेली आहे तर दुसरी प्रत वेल्लम (चर्मपत्र) वर छापलेली आहे. पहिले मुद्रित पुस्तक असले तरीही या पुस्तकाची छपाई उत्कृष्ट केली आहे. इतिहासकार ह्याबाबतीत बोलताना म्हणतात की

“Gutenberg’s Bible was a marvel of technology and a beautiful work of art. It was truly a masterpiece. The letters were perfectly formed, not fuzzy or smudged. They were all the same height and stood tall and straight on the page. The 42 lines of text were spaced evenly in two perfect columns. The large versals were bright, colorful and artistic. Some pages had more colorful artwork weaving around the two columns of text.”

गुटेनबर्गच्या ह्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पुस्तकाच्या एकावेळी ६०० प्रति छापल्या जाऊ शकत होत्या. त्याने रिपीटेबल प्रिंट करण्याचा शोध लावला.त्याच्या ह्या शोधाचा चांगला उपयोग करण्याची जबाबदारी आपसूकच लेखकांवर आली आणि उत्तमोत्तम साहित्य लिहून, छापून लोकांपर्यंत पोहोचू लागले.

त्याच्या ह्या शोधामुळे अवघ्या पन्नास ते साठ वर्षांतच युरोप खंडात जवळजवळ दोन कोटी पुस्तके छापली गेली.

हे ही वाचा – घरोघरी तसेच उद्योगक्षेत्रात अत्यंत उपयोगी असलेल्या ‘रबर’ चा शोध कसा लागला? वाचा

 

printing-inmarathi

 

सगळीकडे माहितीचा व ज्ञानाचा प्रसार सहज होऊ लागला आणि ह्याचा मानवाला प्रचंड फायदा झाला.खूप लोक ह्यामुळे साक्षर झाले. शिक्षणाचे महत्व लोकांना पटले. पुस्तक हे मास कम्युनिकेशनचे महत्वपूर्ण माध्यम झाले.

सारखी पुस्तके वाचून लोक त्याबद्दल एकमेकांशी चर्चा करू लागले. लोकांची विचारशक्ती अधिक जागृत झाली. लवकरच मुद्रणकलेचा आणि तंत्राचा संपूर्ण युरोपात झपाट्याने प्रसार झाला आणि पाश्चिमात्य देशांत क्रांती घडली.

योहानेस गुटेनबर्ग ह्याचा जन्म २४ जून १३९८ रोजी जर्मनीतील माइन्झ ह्या ठिकाणी झाला. त्याचे वडील एक यशस्वी व्यापारी होते व त्याला मोठे होऊन सोनार होण्याची इच्छा होती.

त्याने सुरुवातीला वडिलांप्रमाणेच लोखंडाचा व्यवसाय केला तसेच काही काळ सोन्याचा देखील व्यवसाय केला.

गुटेनबर्गच्या शोधाच्या आधी मुद्रणासाठी ब्लॉक्समध्ये अक्षरे कोरावी लागत असत. माइन्झ शहरात अशांतता पसरल्यामुळे त्याला व त्याच्या कुटुंबाला ते शहर सोडून जावे लागले आणि तो स्ट्रासबोर्ग ह्या शहरात आला. ह्याच ठिकाणी त्याने त्याचे धातूंविषयक तांत्रिक ज्ञान पणाला लावून अनेक प्रयोग केले.

१४४८ साली तो माइन्झला परत आला आणि त्याने बहुतेक प्रिंटिंग प्रेससाठीच त्याच्या मेव्हण्याकडून कर्ज घेतले. तोपर्यंत त्याला कदाचित इंटॅलिगो प्रिंटींगचे ज्ञान मिळाले असावे.

 

intalogo-inmarathi

तांब्याच्या तुकड्यांवर त्याने उलटी अक्षरे गिरवली आणि त्यापासून शब्द व वाक्ये तयार करण्यासाठी त्याने ते तुकडे एकमेकांना जोडले. अश्या प्रकारे तयार झालेला ब्लॉक त्याने काळ्या शाईसारख्या द्रव्यात बुडवून पार्चमेंटवर जास्तीतजास्त दाब दिला.

अश्या प्रकारे त्याने पहिल्यांदा प्रिंट केले. नंतर ह्याच पद्धतीत त्याने काही सुधारणा केल्या. त्याने अनेक प्रयोग करता करता मुव्हेबल पद्धतीच्या प्रिंटिंग प्रेसचा शोध लावला. तसेच प्रिंटिंगसाठी ऑइल बेस्ड शाई वापरणे सुद्धा सुरु केले.

गुटेनबर्गने जगाला दिलेल्या महत्वाच्या क्रांतिकारक गोष्टी म्हणजे मोठ्या प्रमाणावर छपाई करणारे मुव्हेबल पद्धतीची प्रेस, मुद्रणासाठी ऑइल बेस्ड शाईचा वापर, यांत्रिकदृष्ट्या चलनक्षम ऍडजस्टेबल मोल्ड्स, लाकडी प्रिटिंग प्रेसचा वापर ह्या आहेत.

ह्यामुळे कमी खर्चात, कमी वेळेत अनेक पुस्तकांची छपाई करणे शक्य झाले. पुस्तकछपाईसाठी खर्च कमी येऊ लागल्यामुळे ही पुस्तके सर्वसामान्य लोकांना कमी खर्चात विकत घेता येऊ लागली.

 

bible-inmarathi

 

ह्या शोधाचे रेनेसान्स, सुधारणा आणि वैज्ञानिक क्रांती तसेच मानवाच्या विकासामध्ये मोठे योगदान आहे. आधुनिक पद्धतीच्या प्रिंटिंग प्रेसने आधुनिक ज्ञान आधारित अर्थव्यवस्था तयार करण्यात व सर्वसामान्य जनतेमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

===

हे ही वाचा – ज्याच्याशिवाय आपले एकही काम पुर्ण होत नाही अशा बॉलपेनच्या शोधामागची रंजक कथा जाणून घ्या

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “चौदाव्या शतकात लागला ‘प्रिंटिंग’उद्योगाचा शोध.. हे पुस्तक आले पहिले छापून

  • February 26, 2019 at 11:19 pm
    Permalink

    pan

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?