नक्की कोणत्या अंधश्रद्धेतून बाबरचा मृत्यू झाला? एक न उलगडलेल रहस्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

इतिहासातील गूढ मृत्यू बाबत आजही तेवढ्याच रसिकतेने चर्चा होताना आपण पाहतो.

तेव्हा झालेले हे मृत्यू नैसर्गिक होते की अनैसर्गिक, कि सत्ता लालसेतून झालेले खून तर नव्हते ना असा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये कधी ना कधीतरी डोकावून गेलेलाच असतो.

पण इतिहासातील अशा गूढ मृत्यूंची उकल होणे कठीणच असते, त्याचे कारणही तसेच आहे.

सध्याच्या युगातील बौद्धिक विचारातून या मृत्यूबद्दल ठेवले जाणारे तर्कवितर्क तंतोतंत योग्यच असतील असे नाही. परिस्थितींमुळे आपणही अनेक विचार क्षणाक्षणाला बदलत असतो.

मग अशावेळी ५०० ते ६०० वर्षांपूर्वी झालेल्या गुढ मृत्यूंची उकल इतिहासाच्या पुस्तकांच्या आधारे करणे म्हणजे एक दिव्यच आहे.

तसं बघायला गेलं तर भारतातच अनेक गूढ मृत्यू घडलेले आहेत. त्यांची उकल आजपर्यंत आपल्याला करता आलेली नाही.

बाबरचाही मृत्यू असाच अनैसर्गिक झाला असे म्हटले जाते म्हणून, आज आपण बाबरच्या मृत्यूचे कारण काय होतं हे जाणून घेणार आहोत.

 

babur-inmarathi
indiatoday.com

 

असं म्हटलं जातं की मुघल सत्तेचा निरंकुश विस्तार जर कोणी केला असेल तर तो बाबरने केला.

बाबर, एक प्रसिद्ध मुगल शासक होऊन गेला ज्याने जनसामान्यांमध्ये स्वतःसाठी प्रेम निर्माण केलं होते.

तो एक कठोर शासक म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे, पण त्याच्या काळातही अनेक रूढी, प्रथा आणि परंपरा अस्तित्वात होत्या.

त्यातील काही चांगल्या होत्या, काही अघोरी होत्या. त्यावेळी पाळण्यात येणाऱ्या अनेक अघोरी प्रथा इतिहास वाचल्यानंतर आपल्या दृष्टीक्षेपात येतात.

आज एकविसाव्या शतकाच्या उंबरठ्यावर उभं असतानाही भारतातील काही अघोरी प्रथा कमी झाल्याचे चिन्ह दिसत नाही.

मग विचार करा सहाशे वर्षांपूर्वी या प्रथा किती जोमात चालत असतील!

जनसामान्यांच्या भाबड्या भावना दुखावल्या जाऊ नये अशी भूमिकाही कधीकधी शासक घेत असत.

बाबरच्या काळामध्ये असा एक प्रघात होता की आजार एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला काही अघोरी शक्ती मार्फत दिला जाऊ शकतो. यासाठी मात्र फार मोठा त्याग करावा लागतो किंवा दानधर्म करावा लागत असे.

आणि याचे सर्वात मोठे उदाहरण इतिहासात सापडते ते म्हणजे बाबरच्या मृत्यूबद्दलचे गुढ.

 

babur-death-inmarathi
youtube.com

 

अशी एक कथा सामान्य जनमानसामध्ये रूढ आहे की बाबरने स्वतःच्या मुलाच्या आजारपणासाठी या अघोरी प्रथा चा वापर केलेला होता. बाबरच्या मृत्यू बबतीत अनेक कथा आहेत त्यातील दोन कथा या फारच प्रसिद्ध आहेत.

त्यातील पहिली कथा अशी की बाबरने इब्राहिम खान लोधी याला पानिपतच्या पहिल्या महायुद्धामध्ये धूळ चारली होती आणि त्याने या युद्धात लोधीचा शिरच्छेद केला.

 

babur- mughal inmarthi

 

त्याच्या सैन्याला बंदी बनवले, त्याच्या संपूर्ण संपत्तीवर बाबरने कब्जा मिळवला. पण बाबरने लोधी च्या विधवांना तसेच आईला अभय दिले.

त्यांना सन्मानाने वागणूक दिली पण मुलांच्या मृत्यूचा प्रतिशोध घेण्याचे लोधीच्या आईने मनात ठरवले होते.

एक दिवस संधी मिळून तिने बाबरच्या अन्नामध्ये विष कालवून त्याला मारून टाकले. पण ही कथा किती खरी आहे याबाबत साशंकता आहे.

बाबरच्या मृत्यूबाबत एक दुसरी कथा प्रसिद्ध आहे या कथेमध्ये तत्कालीन अघोरी विद्येचा उल्लेख करण्यात आलेला आहे असं म्हटलं जातं की हुमायुन जेव्हा अफगाणिस्तानातील बदक्शान मधून संभल म्हणजेच आत्ताच उत्तर प्रदेश मार्गे हिंदुस्थानात परत येत होता.

तेव्हा या परतीच्या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये प्रवासामुळे त्याला अनेक ऋतूंचा सामना करावा लागला.

 

humayun-inmarathi
YouTube.com

 

हा दंडकारण्याचा भाग आहे. इथे दमट वातावरण असल्यामुळे अनेक प्रकारचे जीवजंतू वाढतात परतीच्या प्रवासात हुमायुन अचानक आजारी पडला.

त्याला आश्चर्यकारक रित्या ताप आला होता. ज्या तापावर कुठल्याही प्रकारच्या वनौषधींचा परिणाम होत नव्हता.

अनेक हकीम आणि वैद्य त्याच्यावरती उपचार करण्याचा प्रयत्न करत होते. पण त्यांच्या प्रयत्नांना कुठेही गुण येताना दिसून येत नव्हते.

त्या काळातील काही अघोरी उपचार करण्याशिवाय तेथील राज हाकिमाकडे पर्यायच उरला नव्हता आणि त्यावेळी अशा प्रकारच्या असाध्य आजारांवर अघोरी उपचार करणे हे स्वीकारावे लागत असे.

तेथील काही तांत्रिकांना बोलविण्यात आले आणि त्यावर उपचार करण्याची विनंती करण्यात आली.

त्यांनी बाबरला अनेक प्रकारचे दानधर्म करण्याचे सुचवले त्यानुसार मक्का आणि मदिना येथील मुस्लिम समुदायाच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात दानधर्म बाबर यांच्याकडून करण्यात आला.

 

makka madina inmarathi

 

काही हकिमांनी बाबरला जगप्रसिद्ध “कोहिनूर” हा हिरा दान करण्याचा सल्ला दिला.

कोहिनूर हिरा ग्वाल्हेरच्या विक्रमजीत महाराजांनी हुमायूनला भेट म्हणून दिला होता ज्यावेळी ते हुमायुन सोबत युद्धामध्ये हरले होते.

 

kohinoor-inmarathi
deccanchronicle.com

 

हा हिरा आजही जगामध्ये अत्यंत मौल्यवान हिरा म्हणून समजला जातो.

पण बाबरने कोहिनूर वर आपला हक्क नसून हुमायूनचा हक्क आहे. आणि हुमायूनच्या गैर उपस्थितीमध्ये हा हिरा दान करणे योग्य ठरणार नाही असे कारण सांगून दुसरा उपाय सुचवण्यास सांगितले.

“हुमायुननामा” मध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख आढळतो. हुमायूननामा बाबरच्या सर्वात लहान मुलगी “गुलबदन बेगम” हिने अकबराच्या काळामध्ये लिहिलेला आहे.

या हुमायुन नाम्या मध्ये लिहिले आहे, की जेव्हा हुमायुन खूप आजारी पडला आणि त्याचे आतील अवयवही या तापामुळे बाधित होऊ लागले तेव्हा, हताश होऊन बाबरने हुमायूनच्या पलंगाला तीन चकरा मारल्या आणि अल्लाकडे प्रार्थना केली की,

“हे अल्ला जर तुला कोणाचे प्राण घ्यायचेच असतील तर ते माझे घे आणि माझ्या मुलाला या आजारपणातून बरं कर.”

अशा या अघोरी उपचाराला यश आलं असं म्हटलं जाते. हुमायुन ची तब्येत दिवसेंदिवस ठीक होत जात होती आणि बाबर ची तब्येत दिवसेंदिवस ढासळत होती.

आणि हुमायून ठीक झाल्याच्या काही महिन्यांमध्येच बाबरचा मृत्यू झाला. (बाबर चा मृत्यू २६ डिसेंबर १५३० रोजी झाला होता.)

 

babur_illness-inmarathi
Timetoast

 

पण वैद्यकीय इतिहासामध्ये अशा प्रकारच्या अघोरी उपचाराला कुठेही स्थान नाही. या आश्चर्याकडे वैद्यकीय इतिहास दुर्लक्ष करते.

यातून वडिलांचे मुला विषयीचे असणारे निस्सीम प्रेम आणि कुठल्याही स्तराला जाऊन मुलाच्या स्वास्थासाठी चिंता करणाऱ्या पित्याचे प्रयत्न मात्र दिसून येतात.

यात विरोधाभास आढळणारी गोष्ट एकच की बाबर हा सुन्नी मुसलमान होता. आणि या कथेच्या अनुसार त्याने हजरत आली म्हणजेच इस्लामचा प्रचारकाकडे त्याच्या मुलाच्या स्वास्थासाठी विनंती केली होती.

पण सुन्नी मुसलमान अशी विनंती कदापिही करत नाहीत.

या कथा सत्य आहेत की असत्य आहेत, यातील तथ्य काय आहे ? याचे गूढ आजही कायम आहे.

खरच अशा प्रकारची अघोरी उपचार पद्धती भारतामध्ये उपलब्ध होती का असाच प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?