'७५ वर्षापूर्वी, एका आदेशावरून या वायुसेनेने एका रात्रीतून तब्बल २५,००० लोक मारले

७५ वर्षापूर्वी, एका आदेशावरून या वायुसेनेने एका रात्रीतून तब्बल २५,००० लोक मारले

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास हा किती रक्तरंजित आहे ही गोष्ट काही नवीन सांगायला नको आहे. दुसऱ्या महायुद्धावेळी झालेली जीवितहानी इतकी भीषण होती कि त्यामुळे संपूर्ण जगाला पुन्हा अस युद्ध होणार नाही यासाठी एकत्र यावं लागलं.

ह्या महायुद्धाच्या आठवणी आणि विध्वंसाच्या कथा ऐकताना आपल्या अंगावर काटा आल्यावाचून राहत नाही.

अशीच एक विध्वंसाची कथा एका जर्मन शहराची, ज्याचा विनाश घडवून आणण्यामागे तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांनी मोठी भूमिका बजावली होती, ज्यात तब्बल ४०००० च्या आसपास नागरिकांनी आपला जीव गमावला होता.

ड्रेस्डेन हे जर्मनीच्या उत्तरेला वसलेल एक शहर होतं. हे शहर जर्मनीतील प्रमुख सांस्कृतिक केंद्र होतं. वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं ठिकाण, एल्ब नदीच्या काठी वसलेलं हे शहर सेक्सोनि राज्याच राजधानिच ठिकाण देखील होतं.

या शहराची तत्कालीन लोकसंख्या हि ६,५०,००० इतकी होती. हे शहर उत्तरेतलं व्हेनिस म्हणून देखील ओळखलं जात असे. पण ह्या शहरात राहणाऱ्या लोकांच नशीब इतकं चांगलं नव्हतं.

 

dresden-inmarathi
arehistoricalphotos.com

दुसऱ्या महायुद्धाचा शेवट दृष्टीक्षेपात येऊ लागला होता, जर्मन सैन्याची पीछेहाट सुरु झाली होती, दोस्त राष्ट्रांनी एकत्र येत जर्मनिवर हल्लाबोल सुरु केला होता.

ब्रिटीश सरकार व अमेरिकन सरकारने एकत्र येत जर्मनीतील प्रमुख सत्ता केद्रांवर, वाहतूक केंद्रांवर बॉम्बहल्ले करायला सुरुवात केली.

त्यासाठी ब्रिटीश रॉयल एयरफोर्स आणि अमेरिकन एयरफोर्स संयुक्तिक कार्यक्रम आखला होता. यानुसार जर्मनीतील वार्सा, बर्लिन, ड्रेस्डेन तसेच चेमित्ज ह्या शहरांची लक्ष म्हणून निवड करण्यात आली.

तत्कालीन ब्रिटीश वायुदल प्रमुख आर्चिबाल्ड सिंक्लेयर ने यासंबंधित शिफारस ब्रिटीश पंतप्रधान विस्टन चर्चिल यांच्याकडे केली.

कुठलिही पार्श्वभूमी न तपासता चर्चिल ह्यांनी ह्या कारवाईला हिरवा कंदील दिला. अमेरिकन वायुदल पण ह्यात सहभागी असणार होतं, असा करार याल्टा येथील बैठकीत झाला होता.

मुळात ह्या हल्ल्यामागे सोव्हिएत युनियनचा पूर्व जर्मनीत वाढता प्रभाव रोखने हा उद्देश होता, त्यानुरूप अमेरिका व ब्रिटनने पावले उचलायला सुरुवात केली होती, त्याचाच ही कारवाई एक भाग होती.

 

fiamine-feature
thevintagenews.com

२७ जानेवारी १९४५ ला घडून आलेल्या बैठकीत ह्या संबंधित अंतिम प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती. त्या अनुरूप कारवाईला प्रारंभ करण्यात होता.

हाम्बुर्ग हे जर्मनीतील मोठ्या शहराला आधीच बॉम्बहल्ले करून नेस्तनाबूत करण्यात दोस्त राष्ट्र यशस्वी झाले होते, सोबतच ६ जानेवारी १९४५ ला निर्णय होण्या आधी ड्रेस्डेनच्या रेल्वे यंत्रणेवर ब्रिटीश वायुदलाने हल्ला केला होता. त्यामुळे एकूणच परिस्थितीचा अंदाज ब्रिटीश वायुदलाला होता.

१३ फेब्रुवारी १९४५ च्या रात्री ब्रिटीश वायुदलाने ड्रेस्डेनवर बॉम्बहल्ला चढवला, ठरल्याप्रमाणे अमेरिकन वायुदल सहभागी होणार होतं, परंतु काही कारणावश ते सहभागी होऊ शकले नाहीत.

पण ब्रिटीश वायुद्लाने एकट्याने हल्ला चढवला. ब्रिटीश वायूदलाने त्यांचा जवळच्या ७९६ ब्रिटीश लांकेस्तर आणि लढाऊ विमानांच्या मदतीने ड्रेस्डेनवर हल्ला चढवला, बघता बघता संपूर्ण ड्रेस्डेन मध्ये हाहाकार पसरला होता.

तब्बल १४७८ टन ज्वलनशील हत्यारांचा आणि ११२८ बॉम्बचा मारा ड्रेस्डेनवर पहिल्या टप्प्यात करण्यात आला होता. दुसऱ्या टप्प्यात ८०० टन दारुगोळा ड्रेस्डेन वर टाकण्यात आला.

बॉम्बमध्ये वेगवेगळ्या प्रकारची रसायनं होती ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. दुसऱ्या दिवशी म्हणजे १४ फेब्रुवारीला अमेरिकन ३११ ह्या विमानांच्या मदतीने ७७१ टन दारुगोळा असलेला बॉम्ब हल्ला पुन्हा करण्यात आला.

हे सर्व करतांना सैनिक तळच नव्हे नागरी वस्त्या ही लक्ष करण्यात आल्या होत्या.

 

dresden_bombed_1945_inmarathi
rarehistorical.com

ह्या विध्वंसक हल्ल्यात संपूर्ण ड्रेस्डेन बेचिराख झालं. ड्रेस्डेनमधील शाळा, हॉस्पिटल, घरं सगळं काही भुईसपाट झालं होतं. ब्रिटिश सेनेचा हा हल्ला इतका विध्वंसक होता की तब्बल २५,००० लोकांनी जीव गमावल्याची सरकार दरबारी नोंद आहे.

मृत्यू पावलेल्या लोकांच्या एकूण कबरी २७,००० आहेत! तरी अनेक जाणकार आणि प्रत्यक्षदर्शींच्या मते ह्या हल्ल्यात आपले प्राण गमावणाऱ्या लोकांची संख्या ही ४०,००० च्या घरात आहे.

ह्या हल्ल्यात लाखो लोक गंभीर जखमी झाले होते. ड्रेस्डेन शहराचा संस्कृती वारसा मिरवणाऱ्या वास्तू जमीनदोस्त झाल्या होत्या. उरलं होतं फक्त प्रेतांचं एक शहर!

ड्रेस्डेनच्या ह्या हत्याकांडाला मात्र राजकीय हत्यार म्हणून सोव्हिएत युनियन कढुन वापरण्यात आलं होतं. हे हत्यार वापरून सोव्हिएत महासंघाने ब्रिटिशांवर व अमेरिकेवर शीत युद्धाच्या काळात प्रचंड टीकास्त्र उगारलं होतं.

याला राजकीय व अनावश्यक हत्याकांड म्हटलं गेलं होतं परंतु सोव्हिएत युनियन द्वारे करण्यात आलेल्या राजकीय हत्यांपुढे आणि अमेरीकन सरकारच्या जपानवरील आण्विक हल्ल्यामुळे हे प्रकरण झाकोळलं गेलं होतं.

 

economictimes.indiatimes.com

विस्टन चर्चिल यांना मात्र ह्या हल्ल्याने प्रचंड व्यथित झाले होते. ह्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानी मुळे त्यांना त्यांचा चुकीबद्दल पश्चाताप होत होता.

ह्या हल्ल्यात जखमी झालेले लोक जे आजही हयात आहेत ते ह्या हल्ल्याच्या कटू आठवणींना उजाळा देत असतात, त्यांनी गमावलेल्या प्रियजनांची आठवण करत असतात.

आज ड्रेस्डेन पुन्हा उभं राहिलं आहे, नव्या दमाने कार्यरत होत प्रगती पथावर आहे परंतु ड्रेस्डन शहरात त्या भग्न इमारती , अवशेष आहेत जे इथे घडवून आणलेल्या हत्याकांडाची आणि दुसऱ्या महायुद्धाच्या कटू आठवणींची साक्ष देत उभ्या आहेत.

ब्रिटिश महाराणीने ड्रेस्डेनला भेट देऊन ब्रिटिश सैन्याकडून करण्यात आलेल्या नरसंहारासाठी स्थानिकांची माफी मागितली आहे.

दुसरं महायुद्ध एकंदरीत प्रचंड नरसंहार व विनाशाच्या रुपकांनी व्यापलेलं आहे. ह्या महायुद्धामुळे मानवजातीला महायुद्ध हे किती विनाशकारी असतं याची कल्पना करवून दिली आहे.

 

nazi-plunder-inmarathi
wikiwand.com

आज ही ह्या दुसऱ्या महायुद्धात झालेल्या विनाशाच्या खुणा बघितल्या तर मानवतावाद जपणं का गरजेचं आहे, हे कळल्यावाचून राहत नाही सोबतच माणसाच्या अतिरेकी महत्वकांक्षेला आवर घालणे किती गरजेचे आहे याची देखील जाणीव झाल्यावाचून राहत नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “७५ वर्षापूर्वी, एका आदेशावरून या वायुसेनेने एका रात्रीतून तब्बल २५,००० लोक मारले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?