' खुद्द इंग्रजांना रणांगणात धूळ चारणाऱ्या मराठा वीराच्या शौर्याची अजरामर कहाणी – InMarathi

खुद्द इंग्रजांना रणांगणात धूळ चारणाऱ्या मराठा वीराच्या शौर्याची अजरामर कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

इंग्रजांशी झालेल्या संघर्षात त्यांना सळो की पळो करून सोडणाऱ्या शूर मराठयांची कहाणी सर्वज्ञात आहे. पण याच मराठयांचे नेतृत्व करणारे सरदार महादजी शिंदे यांनी तळेगाव-उंबरीच्या लढाईत निजामाविरूध्द शौर्य गाजवून नावलौकिक मिळवला.

त्यानंतरही महादजींनी अनेक युध्दांमध्ये आपले पराक्रम गाजविले, त्यांच्याबद्दल अधिक माहिती आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राज्यास सशक्त ठेवणारे अनेक मराठा नेते होते. महादजी शिंदे हे त्यापैकीच एक प्रसिध्द मराठी वीर.

सरदार राणोजी राव सिंधीया व चिमाबाई यांचे ते पाचवे सुपूत्र होते, त्यांचा जन्म ३ डिसेंबर १७३० मध्ये झाला. राणोजींनंतर महादजी हे पेशव्यांच्या खाजगी पागेत कार्यरत होते.

ते लहानपणापासूनच विविध मोहिमांवर जात असत, त्यामुळे त्यांना युध्दशास्त्राचे शिक्षण तेव्हापासूनच मिळाले होते. त्याचप्रमाणे ते मुत्सद्दीही होते. पुढे ते ग्वाल्हेर राज्यात मराठा शासक म्हणून पुढे आले.

 

shinde-inmarathi

 

१७६१ मध्ये पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर उत्तर भारतातील मराठा साम्राज्याला बळकटी देण्याचे श्रेय महादजींना जाते. मराठा साम्राज्य परत मिळवण्यासाठी माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांनी महत्त्वपूर्ण संघर्ष केला होता.

त्यामुळेच ग्वाल्हेर हे मराठयांचे एक महत्त्वाचे राज्य बनले होते व ते भारतातील अग्रगण्य सैन्य शक्तींपैकी एक होते.

महादजींनी दिल्लीतील मुगल साम्राज्याचा पुनर्विकास करण्यास मदत केल्याने ते मराठयांच्या अंतर्गत होते. त्यावेळी महादजींनी रोहिलखंड, मथुरा व पख्तुन येथील रोहिल्लासच्या जाटांना पराभूत केले होते.

पण महादजींचा नावलौकिक तेव्हा झाला जेव्हा त्यांनी भारतात स्थिरावण्याच्या प्रयत्नात असलेल्या इंग्रजांना धारेवर धरले.

त्यावेळी मराठा सैनिकांनी इंग्रजांना चांगलेच त्रासून सोडले होते. १३ व १४ जानेवारी १७७९ ला झालेली पहिली इंग्रज-मराठा लढाई महादजींची कामगिरी शौर्याचा पराक्रम गाजविणारी ठरली व इंग्रज पराभूत झाले होते, त्या लढाईचे वर्णन नाना फडणवीस यांनी आपल्या लेखांमध्ये केले होते.

ही एक उत्कृष्ट लढाई होती ज्यात महादजींच्या मराठा घोडेस्वारांनी इंग्रजांना चहूबाजूंनी घेरून त्यांच्या पुरवठा छावणीवर हल्ला चढविला होता.

 

maratha-war-inmaratahi

 

त्यामुळे नुकसानग्रस्त झालेल्या इंग्रजांनी महादजींसमोर आत्मसमर्पण केले होते. इंग्रजांशी झालेल्या लढाईंमध्ये त्यांच्याकडील कवायती पलटणींचा उपयोग पाहून महादजींनीही फ्रेंचांना आपल्याकडे चाकरीला ठेवले व त्यांच्याकडून तोफा ओतण्याचे व हत्यारे तयार करण्याचे कारखाने काढून कवायती पलटणींची उभारणी केली.

याच पलटणींच्या जोरावर त्यांनी दिल्लीच्या बादशहावरील मराठयांचे नाहीसे झालेले वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले होते व पुढील १० ते १२ वर्षे उत्तर हिंदुस्थानची सुत्रे त्यांनी आपल्या हाती ठेवली होती.

त्यावेळी नानांच्या मुत्सद्दीपणाने व महादजींच्या शौर्याने सतलजपासून तुंगभद्रेपर्यंत संपूर्ण हिंदुस्थानवरच मराठयांचा साम्राज्यविस्तार झाला होता. पण कालांतराने महादजी, नाना फडणवीस व तुकोजी होळकर यांच्यात संघर्ष निर्माण झाला.

दिल्लीच्या बादशाहीला हाताखाली ठेवण्याचे काम शीख, इंग्रज व मराठे हे तिन्ही करीत होते परंतु त्यात मराठेच अग्रस्थानी होते.

महादजींनी उत्तर हिंदुस्थानावर मिळवलेल्या एकहाती अंमलामुळे मुघल व राजपूत हे एकमेकांना मिळाले व त्यांनी महादजींविरोधात बंड पुकारले होते.

 

salher-war-inmarathi03

 

त्यामुळे १७८६-८७ साली झालेल्या लालसोटच्या लढाईत महादजींना हार पत्करावी लागली व गुलाम कादरने दिल्ली, अलीगड ही शहरे ताब्यात घेतली.

त्यामुळे महादजींच्या सत्ता साम्राज्यावरील वर्चस्वास धक्का बसला होता पण त्यांनी धीर न सोडता गेलेले प्रांत परत मिळविण्याचा पुरेपूर प्रयत्न केला.

त्यासाठी त्यांनी आपली ताठर भुमिका काहीशी सौम्य करत नाना फडणवीसांकडे मदतीची मागणी केली होती.

दिल्ली हातची जाऊ नये यासाठी नाना फडणवीस यांनी अली बहाद्दरला महादजींच्या मदतीला पाठविले व त्यांनी दिल्लीसह उर्वरीत प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले आणि गुलाम कादरला देहांत शासन केले.

त्यावेळी महादजींनी बादशहाकडून पेशव्यांना वकील-ए-मुलक हे पद व त्या पदाची नायबगिरी मिळवून दिली होती.

त्यानंतर बादशहाला दरमहा ६५ हजारांची मदत देउन त्यांनी सारी सत्ता आपल्या हाती घेतली व मुघल साम्राज्य लुप्त होउन हिंदुस्थानावर हिंदूंचे राज्य प्रस्थापित झाले होते.

निजामांना दक्षिणेकडे मर्यादित ठेवण्यासाठीही ते कार्यरत होते. १७९२ मध्ये त्यांनी मैसूरच्या टिपू सुलतानबरोबर शांतता करार केला होता.

 

Tipu-Sultan-inmarathi02

 

त्यानंतर इंग्रज व पेशवे यांच्यात साल्बाईचा करार झाला होता. कालांतराने महादजी पुण्याला आले. त्यानंतर ते दोन वर्षे स्वस्थ होते. पण १२ फेब्रुवारी १७९४ ला ज्वर झाल्यामुळे त्यांची पुण्याजवळील वानवडी येथे वयाच्या ६७ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

महादजींनी आपला धाकटा भाऊ तुकोजी व नातु दौलतराव यास वारस नेमले होते.

महादजी कोणत्याही प्रसंगात न डगमगणारा, शूर, मुत्सद्दी, राष्ट्रहित जपणारा, काटकसरी, सुदृढ, कवी व उत्तम राज्य कारभारी होता. नानासाहेब पेशवे यांनी म्हटल्याप्रमाणे अष्टपैलू राज्यकारभार करणारा तो पुरुष होता.

महादजींच्या ग्वाल्हेर येथील राजधानीत त्यांचे ३० हजार सैन्य, ५०० तोफा व १ लाख घोडदळ होते, त्यावरून त्यांच्या ताकदीची कल्पना येते.

महादजी शिंदे यांच्या काळात चार आणे, अर्ध पैसा, अर्ध रूप्या आणि रूपी यांसारख्या विविध प्रकारांमध्ये जारी करण्यात आली होती. चांदी व तांब्याचा वापर करून ही नाणी तयार करण्यात आली होती. त्याबाबतची फारसी दंतकथा मोहम्मद शाह आलम यांनी मांडली.

त्या नाण्यांवरील लेख हा मुगल काळातील फारसी दंतकथा दर्शवितो. त्यामुळे ती नाणी महादजींच्या कार्यकाळाची साक्ष देतात.

 

shinde-coins-inmarathi

 

पण दुर्देवाने महादजींचा पराक्रम हुशारीने लपवून ठेवत इंग्रजांनी स्वतःच्या पराभवाची स्मृतीही दडवून ठेवली.

मराठा विजय, महादजी शिंदे यांचे एक स्मारकही नव्हते पण १७ वर्षांपूर्वी पुण्यातील काही उत्साही इतिहासकार व सार्वजनिक उत्साही नागरिकांचे समुह एकत्र आले व या विजयी मराठयास सन्मानित करण्यासाठी ‘दीपामाला’ बांधल्याचे निवृत्त कर्नल व प्रसिध्द सैन्य इतिहासकार अनिल अथळे यांनी स्पष्ट केले आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?