' EVM हॅक करणे शक्य आहे का? वाचा… – InMarathi

EVM हॅक करणे शक्य आहे का? वाचा…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

लेखक : स्वप्नील श्रोत्री 

===

निवडणूक असो वा खेळाचे मैदान, यश आणि अपयश सर्वांच्याच वाट्याला येत असते. परंतू  मिळालेले यश पचविणे व आलेल्या अपयशातून शिकणे महत्त्वाचे असते. कारण जो अपयशातून शिकतो तोच यशाची पायरी चढतो असे रवींद्रनाथ टागोरांनी उगाचच म्हणलेले नाही.

गेल्या काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या ( तथाकथित ) सायबर एक्सपर्ट सय्यद शुजा याने लंडनमध्ये पत्रकार परिषद घेऊन २०१४ च्या लोकसभा निवडणूकांच्या वेळी देशातील ईव्हीएम मशीन हॅक झाले होते असा दावा केला.

या खळबळजनक दाव्यानंतर काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षांनी २०१९ च्या निवडणूका ह्या ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर वर घ्याव्यात अशी जोरदार मागणी करण्यास सुरुवात केलेली आहे.

देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी बॅलेट पेपर चे मागणी साफ फेटाळून लावली असली तरीही, प्रत्येक निवडणुकीनंतर मतदान यंत्रणाच पराभवास जबाबदार ठरविण्याच्या राजकीय पक्षांच्या दाव्यात खरच तथ्य आहे का?

 

evm voting machine
india.com

सय्यद शुजा याने म्हटल्याप्रमाणे ईव्हीएम मशीन खरच हॅक होऊ शकतात का? याचा प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

निवडणुकीत पराभव झाल्यानंतर आपल्या पराभवाचे खापर फोडण्यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाकडे ३ पर्याय उपलब्ध असतात.

१) पक्षनेतृत्वाला पराभवास जबाबदार ठरविणे.

२) आपल्या पक्षास मतदान न केल्याबद्दल जनतेलाच जबाबदार ठरवणे.

३) ईव्हीएम मशीनला दोष देणे.

सध्याच्या काळात सर्वच पक्षात राजकीय नेत्यांनी आपली संस्थाने स्थापली आहेत. चूक किंवा बरोबर आपल्याच नेत्याचा उदो – उदो करण्याची प्रवृत्ती वाढते आहे.

त्यामुळे निवडणुकीतील पराभवास आपल्या नेत्यास जबाबदार ठरविण्याचे धाडस कोणी करीत नाही आणि जर कोणी केलेच तर त्याला बाहेरचा रस्ता दाखविला जातो.

 

newsnation.com

आपण चांगले काम करून सुद्धा आपल्याला जनतेने नाकारले म्हणून जनतेलाच दोषी ठरविणे म्हणजे राजकीय आत्महत्या करण्यासारखे आहे. त्यामुळे लोकशाहीत असले धाडस कोणी करत नाही.

तीसरा आणि सर्वात सोपा पर्याय म्हणजे ईव्हीएम मशीनलाच जबाबदार ठरविणे. बऱ्याचवेळा राजकीय पक्षांकडून व उमेदवारांकडून ह्याचा वापर साॅफ्ट टार्गेट म्हणून केला जातो.

भारतात ईव्हीएम मशीनचा वापर सर्वप्रथम स.न १९९८ साली दिल्ली, राजस्थान व मध्यप्रदेश विधानसभांच्या निवडणूकीत प्रायोगिक तत्त्वावर करण्यात आला.

तेव्हापासून आजपर्यंत पराभूत पक्ष व उमेदवारांकडून कायमच ईव्हिएमच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले गेले.
ईव्हीएम वर साधारणपणे २ प्रकारचे आरोप कायम केले जातात.

१) ईव्हीएम ठीकपणे काम करीत नाही.

२) ईव्हीएम हॅक केले जाते.

सन २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ईव्हीएम मशीन खराब होण्याचा दर साधारणपणे २०% होता. परंतु, मशीन तपासणीत एक गोष्ट लक्षात आले की खराबी ही ईव्हीएम मशीन मध्ये नाही तर त्याला जोडलेल्या व्हिव्हिपेक मशीन मध्ये होती.

 

firstpost.com

निवडणूक आयोगाने हा विषय गांभीर्याने घेत व्हिव्हिपेक मशीनमध्ये अनेक बदल केले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या छत्तीसगढ, राजस्थान आणि मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीत व्हिव्हिपेक मशीनमध्ये खराबी होण्याचे प्रमाण घटून ते १.५% ते २% इतके खाली आले.

भारतामध्ये ईव्हीएम ची निर्मिती ही भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीकडून केली जाते आणि त्यात असलेली प्रोग्रॅमिंगची चीप ही वन टाईम लोडेड असते.

म्हणजेच ती एकदा बसवली की पुन्हा दुरुस्त होत नाही किंवा प्रोग्राम बदलता येत नाही. त्यामुळे त्यात फेरफार करणे शक्य नाही. कारण जर असा प्रयत्न कोणी केला तर ते मशीन भंगारात टाकण्याच्या योग्यतेची होईल.

त्याचबरोबर ईव्हीएम हॅक होवू शकते असा दावा सुद्धा बिनबुडाचा आहे. कारण ईव्हीएम मध्ये कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नसते.

मोबाईल, संगणक किंवा लॅपटॉप हे इंटरनेट किंवा ब्लू – टूथ च्या माध्यमातून बाहेरून नियंत्रित करता येते. परंतु, ईव्हीएम मध्ये काही नसल्यामुळे हिम्मत नियंत्रित करता येते परंतु इव्हीएम मध्ये असले काही नसल्यामुळे ईव्हीएम हॅक करणे अशक्य आहे.

आधी सांगितल्याप्रमाणे ईव्हीएम हे वन टाइम लोडेड उपकरण आहे. उदाहरणार्थ : कॅलक्यूलेटर. कॅलक्यूलेटर कोणाला हॅक करता येऊ शकते का ?

 

news18.com

अखिलेश यादव जेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्या निवडणुकीत जे ईव्हीएम वापरले तेच दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी वापरले होते यात अरविंद केजरीवाल विजयी झाले. म्हणजेच प्रत्येक वेळी ईव्हीएम ने वेगवेगळा कौल दिला असून तो स्थानिक जनतेने दिलेला जनाधार होता.

भारतात जेव्हा बॅलेट पेपरवर निवडणुका व्हायच्या तेव्हासुद्धा बॅलेट पेपरवर मोठ्या प्रमाणात आक्षेप घेतला गेला आहे.

असे मतपत्रिका अशा कागदापासून बनविल्या आहेत की काँग्रेस सोडून कोणालाही मत दिले तरी ते आपोआप पूसले जाते. असाच आरोप शाईच्या बाबतीत सुद्धा केला गेला आहे. विशेषत: इंदिरा गांधी यांच्या काळात.

अनेकवेळा विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात आरोप करताना अमेरिका, आयर्लंड, जर्मनी यांसारख्या प्रगत देशांची उदाहरणे दिली जातात.

परंतु, हे कधीच सांगितले जात नाही कि तेथे ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपर का वापरले जातात. अमेरिका जगातील सर्वात प्रगत देश असल्याचा समज आहे. परंतु, तेथे सुद्धा बॅलेट पेपरवर वेळोवेळी प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहेत.

 

evm 64 candidates marathipizza
notorious.com

या संदर्भातील अनेक बातम्या वेळोवेळी आल्या आहेत. जर्मनीने ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपर वापरण्यास सुरुवात केली कारण ईव्हीएम किंवा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हे जर्मनीच्या राज्यघटनेप्रमाणे अवैधानिक आहेत असा तेथील न्यायालयाचा निकाल आहे.

आयलँड ने तर भारताप्रमाणे ईव्हीएम बनवण्यास सुरुवात सुद्धा केली आहे.

जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचा लोकसभेचा निवडणूक खर्च अधिकृत आकडेवारीनुसार ४०,००० करोड रुपये इतका आहे. बॅलेट पेपरवर निवडणुका घेवून हा खर्च त्याचबरोबर लागणारा वेळ भारताला परवडण्यासारखा आहे का? हा विचार व्हायला हवा.

राजकीय पक्ष हे जनतेचे प्रतिनिधी असतात त्यामुळे त्यांच्या ईव्हीएम बद्दल असलेल्या शंका लोकशाहीत सोडवून त्यांचे समाधान करणे सुद्धा गरजेचे आहे. परंतु, दरवेळेस पराभवाचे खापर यंत्रावर फोडून गंगेत झाल्या सारखे वागणे हे सुद्धा गैर आहे.

निवडणूक असो वा खेळाचे मैदान, यश आणि अपयश सर्वांच्याच वाट्याला येत असते. परंतु, मिळालेले यश पचविणे व आलेल्या अपयशातून शिकणे महत्त्वाचे असते. कारण जो अपयशातून शिकतो तोच यशाची पायरी चढतो असे रवींद्रनाथ टागोरांनी उगाचच म्हणलेले नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?