' या जगप्रसिद्ध धाडसी वैमानिकाचं बाळ बेप्पता झालं होतं.. आणि त्याचं गूढ आजही कायम आहे – InMarathi

या जगप्रसिद्ध धाडसी वैमानिकाचं बाळ बेप्पता झालं होतं.. आणि त्याचं गूढ आजही कायम आहे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अमेरिकेतील हवाई दलात वैमानिक असलेल्या चार्ल्स लिंडबर्ग याच्या एक वर्षीय बालकाचे अपहरण होऊन त्याचा मृतदेह आढळून आला होता. १९३२ साली घडलेल्या या घटनेचा तपास त्यावेळी झाला, गुन्हेगार सापडला व त्याला फाशी देखील झाली.

पण या प्रकरणाचे खरे गुढ मात्र आजतागायत उलगडलेले नाही. कशी घडली ही घटना व त्यामागचे गुढ इतक्या वर्षांनंतरही कायम कसे?

याबाबत आपण या लेखातून जाणून घेऊ.

गुन्हेगारी स्वरूपाची कुठलीही घटना घडली म्हणजे पोलीस त्याचा तपास करतात, मग गुन्हेगार सापडवतात, गुन्हेगारावर न्यायालयात खटला चालतो व त्याला शिक्षा होते आणि खटला निकालात निघतो, अशी एकंदरीत प्रक्रिया जगाच्या पाठीवर कुठेही गुन्हा घडला तरी होत असते.

पण अमेरिकेत घडलेल्या चार्ल्स लिंडबर्ग या हवाई दलातील वैमानिकाच्या एक वर्षीय बालकाचे अपहरण झाल्याच्या घटनेत नियमानुसार सर्व प्रक्रिया पार पडूनही गुन्हयाचे गुढ मात्र अजूनही कायम आहे.

 

lindbergh-inmarathi
independent.co.uk

त्याचे झाले असे की, वैमानिक चार्ल्स लिंडबर्ग याच्या बालकाचा मृतदेह न्यु जर्सी येथील जंगलात आढळून आला तो दिवस होता १२ मे १९३२. त्यानंतर मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला व तपासणी करून साधारणपणे दोन महिन्यांपूर्वी त्या मुलाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधला.

त्या मुलाच्या मृतदेहाच्या कपाळावर एक छिद्र होते तसेच काही भाग फ्रॅक्चर झालेले होते आणि मृतदेहाचे काही अवयव गहाळ झालेले होते.

प्राथमिक तपासात डोक्यावर वार केल्यामुळे मृत्यू झाल्याचे कारण घोषित करण्यात आले व तेथून या प्रकरणाचा तपास सुरू झाला. लिंडबर्ग सिनियर याच्या मुलाचे साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी अपहरण झाले होते.

नर्सने सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास त्याला अंथरूणात झोपवले. त्यानंतर रात्री दहा वाजेच्या सुमारास लिंडबर्गला स्वयंपाकघरातून बाळाचा आवाज आला शिवाय कुणीतरी लाकडाचा तुकडा फेकून मारल्याचेही त्याला जाणवले.

दरम्यान, त्याने तपास केला असता बाळ त्याची आई किंवा नर्सबरोबरही नसल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच लिंडबर्गला खिडकीच्या कप्प्यात एक खंडणीची मागणी करणारे पत्र आढळून आले व खिडकीच्या बाहेर तुटलेले एक शीडीचे तुकडेही मिळून आले.

 

kidnap-inmarathi
nytimes.com

सापडलेले खंडणी पत्र वाचून लिंडबर्गने लागलीच आपल्या घराचा संपूर्ण परिसर पिंजून काढला व बाळ सापडत नसल्याचे स्पष्ट झाल्यावर त्याने पोलीसांना माहिती दिली. त्यानंतर पुढील तीन महिने पोलीस व लिंडबर्ग कुटूंबिय बाळाचा शोध घेत होते.

या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस अनेक संशयित व साक्षीदारांची चौकशी करीत होते. त्यादरम्यान त्यांनी रिचर्ड हयूप्टन नावाच्या एका व्यक्तीस चौकशीसाठी ताब्यात घेतले.

हयूप्टन हा जर्मनीचा होता व त्याला गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी होती. एका गॅस प्रकरणातील बिलांच्या पावत्यांमध्ये झालेली आर्थिक अफरातफर व त्या रक्कमेचा झालेला गैरवापर या प्रकरणावरून त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

तर दुसरीकडे लिंडबर्ग प्रकरणाचा तपास सुरू असतांना न्युयाॅर्कमधील एका शाळेचे निवृत्त शिक्षक या प्रकरणात रस घेत होते.

त्यानंतर ब्राॅनक्स येथील एक प्रसिध्द व्यक्तीमत्व असलेले जाॅन एफ. काॅन्डन यांनी एका अपहरणाच्या प्रकरणासंदर्भात स्थानिक वृत्तपत्रात पत्र लिहिले व एक हजार डाॅलर्सचे बक्षिसही जाहीर केले.

त्यांना प्रत्युत्तरादाखल एक पत्र मिळाले ज्यात काॅन्डन हे अपहरण करणारे लोक व लिंडबर्ग यांच्यातील मध्यस्थ असल्याचे म्हटले होते.

काॅन्डन यांनी दुसऱ्या वृत्तपत्रात पत्र लिहित बाॅनक्स येथील वुडलॅड स्मशानभूमीत अपहरणकर्त्यांसोबत एक बैठक आयोजित केली. ही बैठक अंधारात झाल्यामुळे कुणाचाही चेहरा स्पष्ट दिसत नव्हता.

 

charles-inmarathi
nytimes.com

त्या बैठकीस आलेल्या व्यक्तीने त्याचे नाव जाॅन असल्याचे सांगितले व तो स्कॅन्डेनेव्हियनच्या एका टोळीचा सदस्य असल्याचेही म्हणाला. तसेच आपण किनाऱ्यावरील एका बोटीत एका बाळाचा ताबा घेतल्याचे तो म्हणाला व त्या बाळाचा पायजमा पुराव्यादाखल देण्याचेही त्याने मान्य केले.

काही दिवसांनी खरोखर काॅन्डनला एका लहान मुलाने झोपण्यावेळी घातलेले कपडे मिळतात व ते लिंडबर्ग यांच्या बाळाच्या असल्याचे स्पष्ट होते.

या प्रकरणाच्या तपासात लिंडबर्ग व काॅन्डन यांना तब्बल सात खंडणीपत्रे मिळाली होती ज्यात लिंडबर्गच्या बाळाच्या अपहरणाचे वर्णन केले गेले होते व ५० हजार डाॅलर्सची मागणी करण्यात आली होती.

शिवाय तीन मंडळांमध्ये तीन छिद्रांचा समावेश असलेले एक हाताने काढलेले चिन्हही त्यात होते.

लिंडबर्गच्या घरी आणि स्थानिक अन्वेशकांनी काढलेल्या चित्रांशी ती मिळतीजुळतीच होती. पण अपहरणकर्त्याने सांगितलेल्या बोटीत प्रत्यक्षात बाळ आढळले नाही व १२ मे रोजी बाळाचा मारून टाकण्यात आले.

काॅन्डनने पैसे देण्याचे मान्य केले व त्याची बिले पोलीसांनी आधीच रेकाॅर्ड करून ठेवली. २ एप्रिल १९३२ ला काॅन्डनला जाॅन भेटला व लिंडबर्गचे बाळ हे दोन निष्पाप महिलांच्या ताब्यात होते पण त्याला पुढील माहिती नाही असे तो म्हणाला.

 

baby-inmarathi

या प्रकरणात आणखी काही तथ्ये समोर यावीत यासाठी पोलीसांनी यापूर्वी घडलेल्या खंडणी प्रकरणांचाही तपास करण्यास सुरूवात केली. ज्यात खंडणी मालिकेतील विविध क्रमांकांचा मागोवा घेतला जात होता पण विशेष माहिती हाती लागत नव्हती.

एक दिवस न्युयाॅर्कच्या एका व्यक्तीने मॅनहॅटन बॅंकेत २ हजार ९८० डाॅलर्सची गुंतवणूक केली व त्याने बॅंक सोडल्यानंतर असे लक्षात आले की खंडणी रक्कमेच्या मालिकेतील क्रमांकाशी ती रक्कम जुळत आहेत.

ही रक्कम मेट्रो मार्गावर खर्च केली जात होती. पोलीसांनी त्या रक्कमेतील एका क्रमांकाच्या आधारे रिचर्ड हप्ट्मॅन याला ताब्यात घेतले व त्याला कालांतराने लिंडबर्गच्या बाळाचा अधिकृत अपहरणकर्ता मानले गेले.

हप्टमनच्या रक्षकांनी मात्र त्याचे कुठलीही शीडी किंवा खंडणीबाबत पुरावे नसल्याचे स्पष्ट केले. परंतु कालांतराने खंडणी पत्रावरील अक्षरे व शीडी बनविल्या जाणाऱ्या लाकडाशीही त्याचा संबंध असल्याचे समोर आले.

शिवाय त्याच्या  विरोधात देण्यात आलेल्या साक्षींमुळे त्याला दोषी ठरवून एप्रिल १९३५ मध्ये फाशी देण्यात आली.

दरम्यान, हप्ट्मॅन हा खरा गुन्हेगार असल्याचे लिंडबर्गला माहित होते पण तो त्याबाबत बोलण्यास घाबरत होता असा दावा काहींनी केला तर काहींनी लिंडबर्ग याने स्वतःच अपहरण केल्याचा दावा केला. काहींनी या प्रकरणाला व्यावहारिक विनोद असे संबोधले.

 

dad-baby-split-inmarathi

 

काहींचे म्हणणे तर असेही आहे की लिंडबर्ग ने अहपरणकर्त्यांशी साटेलोटे करून केवळ प्रचारक म्हणून काम केले. परंतु या प्रकरणातील सत्य बाहेर आलेच नाही असे अजूनही अनेकांना वाटते.

या प्रकरणानंतर अपहरण ही संघीय गुन्हेगारी म्हणून उदयास आली. अपहरण व खंडणीच्या घटना आजपर्यंत घडत असल्याचे दिसून येते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved/ 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?