' एका लहान मुलीने दिलेल्या सल्ल्यामुळे अब्राहम लिंकन "लोकप्रिय" राष्ट्राध्यक्ष झाले...

एका लहान मुलीने दिलेल्या सल्ल्यामुळे अब्राहम लिंकन “लोकप्रिय” राष्ट्राध्यक्ष झाले…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपल्या दिसण्यामुळे खरंच आपले आयुष्य बदलू शकते का? प्रसिध्द बॉलीवूड अभिनेते अमिताभ बच्चन ह्यांच्या कारकिर्दीला जेव्हा उतरती कळा लागली तेव्हा आता त्यांची सद्दी संपली असे एकूण चित्र दिसत होते, पण दरम्यान त्यांनी प्रयोग म्हणून फ्रेंच कट दाढी ठेवली आणि जणू चमत्कार झाला!

त्यांनी राखलेल्या दाढीमुळे त्यांचे दिवस पालटले, पूर्वीपेक्षाही जास्त यशस्वी झाले.

आज जाणून घेऊ, एक मनोरंजक किस्सा जो आहे खुद्द अमेरिकेचे जगप्रसिध्द राजाध्यक्ष अब्राहम लिंकन ह्यांच्याबद्दल.

अमेरिकेचे १६ वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांना जगातील सर्वोत्तम राष्ट्रपतींपैकी एक मानले जाते. ते केवळ अमेरिकेचे अध्यक्षच नव्हे तर संपूर्ण जगाचे प्रेरणास्त्रोत होते.

अपयश पचवून पुढे कसे जायचे त्याचे ते उत्तम उदाहरण आहेत. पडले असूनही मजल्यावर कसे जायचे याबद्दल अब्राहम लिंकनने आम्हाला प्रेरणा दिली आहे.

आजही, अब्राहम लिंकन ह्यांचे विचार आणि त्यांच्या आयुष्यापासून शिकण्यासारखे बरेच काही आहे.

Abraham-Lincoln InMarathi

अब्राहम लिंकन ऑक्टोबर १८६० मध्ये अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपती बनले. त्यांनी राष्ट्रपती पदाचा कारभार सांभाळायला लागल्याच्या एक महिन्यानंतरच अमेरिकन गृहयुद्ध सुरु झाले.

या युद्धात ६० लाखांहून अधिक अमेरिकन नागरिक मारले गेले. सर्व अडचणीं नंतर, लिंकन शेवटी युद्धात विजयी होऊन शांतता स्थापित करण्यात यशस्वी झाले. युद्ध जिंकल्यानंतर त्यांनी सर्व प्रथम गुलामीची प्रथा बेकायदेशीर घोषीत केली.

अब्राहम लिंकन यांना ह्यासाठीही ही वाखाणले जाते की वारंवार अयशस्वी होऊन ही ते निराश झाले नाहीत आणि एके दिवशी अमेरिकेचे राष्ट्रपती झाले.

अब्राहम लिंकन ह्यांनी अमेरिकेत गुलामगिरीची प्रथा संपवून, लाखो लोकांना मानवी हक्क दिले.

abraham_lincoln_ 2 InMarathi

आज आम्ही तुम्हाला अब्राहम लिंकन ह्यांच्याशी संबंधित एक गोष्ट सांगणार आहोत, जी खूप मनोरंजक आहे-

प्रत्यक्षात, अध्यक्ष बनण्यापूर्वी लिंकन दोनदा सीनेट निवडणुकीत पराभूत झाले. काही काळानंतर अमेरिकी अध्यक्षांच्या निवडणुका झाल्यानंतर त्यांनी त्यांचा प्रवेश अर्ज देखील सादर केला. लिंकन ह्यांची शरीरयष्टी किरकोळ होती.

एकदा निवडणुक मोहिमेच्या मधल्या काळात घरी परतल्यावर त्यांना ११ वर्षाच्या ग्रेस बेडेल ह्या चिमुकलीने लिहिलेले पत्र मिळाले.

या पत्रात ग्रेसने लिहिले,

‘प्रिय अब्राहम लिंकन, आपला चेहरा अत्यंत निमुळता आहे. आपण जर दाढी राखलीत तर ते छान दिसेल. बऱ्याच स्त्रियांना दाढी मिशी ठेवलेले पुरुष आवडतात. त्यामुळे तुम्ही स्त्रीयांना आवडाल आणि त्या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यांनाही सांगतील तुम्हालाच मत द्यायला. असे झाल्यास आपण सहज निवडून याल आणि राष्ट्राध्यक्ष बनू शकाल.”

 

========

हेदेखील वाचा

पुरुषांच्या दाढीमुळे स्त्रियांना होत आहेत गंभीर आजार…

पुरुषांच्या दाढीत असतात कुत्र्याच्या केसांपेक्षाही जास्त जंतू…

=========

 

त्या निवडणुकीत लिंकन प्रचंड मतांनी विजयी झाले. त्यामुळे ते इतके प्रभावित झाले की त्यांनी दाढी ठेवायला सुरुवात केली, ते पहिले असे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष होते ज्यांनी दाढी ठेवली होती.

Abraham-Lincoln 4 InMarathi

 

अब्राहम लिंकन कोण होते?

एका गरीब कुटुंबात जन्म घेऊन एका शक्तिशाली देशाचा राष्ट्राध्यक्ष बनण्याचा त्यांचा हा प्रवास अत्यंत कठीण होता. जेव्हा लिंकन लहान होते तेव्हा त्यांची आई मरण पावली. त्यामुळे सावत्र आईनेच त्यांना वाढवलं.

अत्यंत गरीब परिस्थिमुळे त्यांना दुकानात मदतनीस म्हणून काम करावं लागायचं. पोटासाठी त्यांना लोखंडी साल्या कापण्यापासून अगदी दंगल करण्यापर्यंत सर्व काही करावं लागलं.

मात्र हे सगळ करत असतांना त्यांनी आपले शिक्षण सुरूच ठेवले.

जेव्हा अब्राहम लिंकन कपड्यांच्या दुकानात काम करत असत, तेव्हा गणिताचे प्रश्न सोडवण्याकरिता कापडाच्या मोठ्या गाठोड्यावर डोके टेकवून आकडेमोड करीत असत. दरम्यान या काळात त्यांनी कायद्याचा अभ्यास केला.

Lincoln-family inmarathi

वकिलांची कमाई जास्त असते. हे पाहून अब्राहम लिंकन यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होण्याआधी वीस वर्षे वकिली केली.

पण त्यातून त्यांना आणि त्यांच्या क्लायंट ला मिळणारे समाधान आणि मानसिक शांती पैशांत मोजण्यासारखी नव्हती. त्या दिवसातले असंख्य लोक त्यांच्या प्रामाणिकपणाची साक्ष देतात.

आपल्या क्लायंटकडून लिंकन ह्यांनी कधीही जास्तीचे पैसे घेतले नाहीत जे त्यांच्यासारखेच गरीब होते. एकदा त्याच्या एका क्लायंटने त्यांना पंचवीस डॉलर्स पाठवले परंतु लिंकन ह्यांनी त्यांना दहा डॉलर्स परत केले आणि म्हणाले की पंधरा डॉलर्स पुरेसे आहेत.

सहसा ते आपल्या क्लायंटला न्यायालयाच्या बाहेरच प्रकरण संपवण्याची विनंती करीत जेणेकरून दोन्ही बाजूंचे पैसे केसमध्ये वाया जाणार नाहीत.

अशा केसेस मध्ये त्यांन आगदी नगण्य पैसे मिळत. एक पेंशन एजंट एका शहीद जवानाच्या विधावेकडून पेंशनचे ४०० डॉलर्स मिळवून देण्यासाठी २०० डॉलर्स मागत होता.

Abraham-Lincoln 6 InMarathi

लिंकन ह्यांनी फक्त त्या महिलेची बाजू कोर्टात मांडली नाही, तर हॉटेलमध्ये राहण्याची आणि तिच्या परतीच्या तिकिटची व्यवस्था सुद्धा केली.

लिंकन म्हणत असत,

‘जेव्हा मी काहीतरी चांगले करतो तेव्हा मला चांगले वाटते आणि जेव्हा मी वाईट करतो तेव्हा मला वाईट वाटते. हाच माझा धर्म आहे ‘

जगातल्या प्रत्येक मनुष्याला अडचणींना सामोरे जावे लागते. एखाद्या व्यक्तीचे चरित्र पारखायचे असेल तर त्याच्या हाती सत्ता सोपवा. नेहमीच लक्षात ठेवा की आपल्या यशासाठी फक्त आपला संकल्प महत्वाचा आहे, त्यापेक्षा दुसरे काहीही महत्वाचे नाही.

Abraham-Lincoln 5 InMarathi

अब्राहम लिंकन ह्यांच्या विचारांइतकेच त्यांनी त्यांच्या मुलाच्या शिक्षकांना लिहिलेले पत्रही जगभरात प्रसिद्ध आहे ज्यात आपल्याला त्यांनी लहान मुलांच्या भावविश्वाची दखल घ्यायला भाग पाडून शिक्षणाच्या तुमच्या आमच्या धारणेची परिभाषाच बदलून टाकली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “एका लहान मुलीने दिलेल्या सल्ल्यामुळे अब्राहम लिंकन “लोकप्रिय” राष्ट्राध्यक्ष झाले…

  • February 15, 2019 at 10:52 am
    Permalink

    खूप छान लेख

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?