''उदारमतवाद' म्हणजेच Liberalism... याचा नेमका अर्थ काय ते जाणून घ्या!

‘उदारमतवाद’ म्हणजेच Liberalism… याचा नेमका अर्थ काय ते जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – सागर वाघमारे 

आपण उदारमतवादी/लिबरल या शब्दाचा चुकीचा वापर करत आहोत. भारतीय वैचारिक क्षेत्रात उदारमतवादी या शब्दाचा प्रयोग विशेषण म्हणून प्रत्येक डाव्या विचारांकडे झुकलेल्या पुरोगामी समाजवादी व साम्यवादी विचारवंतांसाठी केला जातो आहे. पण पुरोगामी असणे आणि उदारमतवादी असणे यात मुळातच खूप फरक आहे.

पुरोगामी नि उदारमतवादी या शब्दांचे अर्थ नि त्यांचा इतिहासदेखील भिन्न भिन्न आहे. तरीही डाव्या पुरोगामी विचारवंतांसाठी उदारमतवादी हा शब्दप्रयोग सर्रास फक्त भारत देशातच नसून अमेरिकेत देखील केला जातो आहे.

 

libralism
vector stock

 

अमेरिकेत त्यांना लेफ्ट लिबरल (डावे उदारमतवादी) हा शब्दप्रयोग केला जातो.काही भारतीय उजवे देखील स्वतःला उजवे उदारमतवादी (राईट लिबरल) म्हणवून घेत आहेत.

आज डाव्यांनी व उजव्यांनी उदारमतवादाची काही तत्व आपल्या सोयीप्रमाणे आत्मसात केली असली तरी डावे नि उजवे मुळातच उदारमतवादाचा विरोधीच भुमिका घेत आले आहेत. मुळात डावे नि उजवे दोन्ही समाजवादीच असतात.

डावे म्हणजे आंतराष्ट्रीय समाजवादी तर उजवे फासीवादी किंवा नाझीवादी म्हणजे राष्ट्रीय समाजवादी असतात. दोन्ही डाव्या व उजव्या विचारांचा कोअर हा समाजवादच आहे.

 

samajwaad
gyanapp

 

पण डाव्या पुरोगाम्यांना उदारमतवादी ठरवणे हे चूक आहे.

Fredric Bastiat, Ludwig Von Mises, FA Hayek, Ayn Rand, Milton Friedman सारख्या थोर उदारमतवादी विचारवंतांनी आपलं संपूर्ण आयुष्य उदारमतवादी विचारांचा प्रसारासाठी नि त्याकाळी प्रभावी असलेल्या समाजवादी व फासीवादी विचारांचा विरोधात लढा देतच खर्ची केलं आहे.

तर १९ व्या शतकात मार्क्सवादी व राष्ट्रवादी विचारांचा उगम हा उदारमतवादी विचारांना प्रखर नी हिंसक विरोध करतच झाला होता. मग उदारमतवादाच्या विरोधी भुमिका घेणारे हे समाजवादी आज उदारमतवादी कसे?

पण मग उदारमतवाद म्हणजे नक्की काय? उदारमतवादी कुणाला म्हणावं? हे बघू.

उदारमतवाद म्हणजे इंग्रजीत Liberalism या शब्दाचा उगम Liber या लॅटीन शब्दातून झाला आहे. Liber म्हणजे लॅटीन भाषेत “स्वातंत्र्याचे तत्वज्ञान” असा त्याचा अर्थ होतो. त्यामूळे स्वातंत्र्याचा आग्रह धरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हा शब्दप्रयोग एकेकाळी अभिमानाने केला जात असे.

पण आज लिबरल हा शब्द डाव्या समाजवादी विचारवंतांनी स्वतःसाठी हस्तगत करत तो बदनाम केला आहे.

समाजवादी तत्वज्ञानाचा राज्यसंस्थेचा चांगुलपणावर विश्वास असतो. केंद्रात बसून मुठभर राज्यकर्ते बहुसंख्य करोडो जनतेसाठी अर्थव्यवस्थेत योग्य काय नि काय नाही हे एखाद्या आर्थिक हुकुमशाह प्रमाणे ठरवतात. समाजवादी नेत्यांना राज्यसंस्थेचा ताकदीची गरज ही कल्याणकारी राज्याचा निर्मितीसाठी हवी असते.

अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेपाची मागणी करून बाजारपेठेच नियंत्रण ते मिळवतात.

हे सगळे समाजवादी विचार खऱ्या उदारमतवादी विचारांच्या विरोधीच आहेत आणि अशा अ-उदारमतवादी विचारांचे पुरस्कर्ते असलेले प. नेहरूं सारखे समाजवादी नेतेही उदारमतवादी का समजले जात असावेत?

 

liberals
liberals word.. wordpress.com

 

समाजवादापेक्षा “उदारमतवाद” हे एक वेगळे तत्वज्ञान आहे. उदारमतवाद राज्यसंस्थेपेक्षा व्यक्तिस्वातंत्र्यला जास्त महत्त्व देते. माणसाला काही नैसर्गिक मानवी अधिकार असतात.

या नैसर्गिक अधिकारांचा रक्षणासाठी राज्यसंस्थेचा म्हणजे त्याकाळी अस्तित्त्वात असलेल्या राजेशाही, सामंतशाही, वंशानुगत विशेषाधिकार व एकाधिकारशाहीचा विरोधातील आधुनिक आशा उदारमतवादी तत्वज्ञानाचा उगम १७ शतकात झाला.

युरोपातील नेपोलियनचा युद्धांपासून ते पहिल्या महायुद्धा पर्यंतचा मधला काळ हा उदारमतवादाचा सुवर्ण काळ होतो. पण पुढे जगाने उदारमतवादाचा त्याग केला. उदारमतवादाचे शत्रू असलेले राष्ट्रवाद नि समाजवाद यांचा स्विकार केला.

Mercantalists system चा स्विकार करून अर्थव्यवस्थेत शासन यंत्रणेने नियंत्रण मिळल. खुल्या मुक्त बाजारपेठचा त्याग केला.

इतरांचं नुकसान करूनच आपला आर्थिक फायदा करून घेता येतो व त्यासाठी इतर देशांतून होणार्‍या वस्तूंवर आयात बंदी नि आपल्या देशांतून इतर देशांत होणार्‍या निर्यातीला निर्यात सब्सीडीचा वापर करत प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली. व्यापार युद्ध सुरू झाली.

त्याचाच दुष्परिणाम म्हणजे जगाने लढलेली दोन महायुद्धे. आजही जगात व्यापार युद्ध सुरूच आहे. अमेरिकन उजव्या विचारसरणीचे राष्ट्रवादी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनीही चीन व इतर देशांशी व्यापार युद्ध काही दिवसांपूर्वीच सुरू केलं आहे.

आज जगभरात उदारमतवादी कुठेही सत्तेत नसल्याने राज्यसंस्थेला अती महत्व प्राप्त झाले आहे. इतके की राज्यसंस्थेविरोधात नि व्यक्तिस्वातंत्र्याचा बाजूने उभ्या राहणार्‍यांना देखील देशद्रोही ठरवलं जात आहे.

“अमेरिकन सरकार देशहिताचा बुरखा ओढुन जनतेच्या वैयक्तिक आयुष्यवर अतिक्रमण करत त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवून आहे, त्यांची ते जासूसी करत आहेत.”

हे अमेरिकी राज्यसंस्थेच्या विरोधात जाऊन कोणतीही तमा भिती न बाळगता जगासमोर निर्भिडपणे मांडणाऱ्या Edward Snowden सारख्या व्हिसलब्लोअरला सुद्धा देशद्रोही ठरवलं गेलं.

 

edward snowden
computer business review

 

मानव कल्याण हा उदारमतवाद्यांप्रमाणेच आधुनिक लोकशाहीप्रधान राज्यसंस्था व समाजवाद्यांचा देखील उद्देश आहेच. पण त्या उद्देश पूर्तीसाठी आधुनिक राज्यसंस्था व समाजवादी वापरत असलेले मार्ग हे उदारमतवाद विरोधी आहेत.

त्यामुळे आज राज्यसंस्थेची ताकद वाढत आहे तर व्यक्ती नी त्याचे स्वातंत्र्य मात्र कमजोर पडत चालल आहे.

व्यापार हा दोन पक्षांमध्ये Mutual Understanding ने होत असतो. त्यात शासन यंत्रणेने हस्तक्षेप करणे मुळातच व्यक्तीस्वातंत्र्याविरोधी भूमिका ठरते. उदारमताला खुली मुक्त बाजारव्यवस्था अपेक्षित असते.

अर्थव्यवस्थेत सरकारी हस्तक्षेप नको असतो. पण समाजवादी व राष्ट्रवादी नेत्यांना आजही हे मान्य नाही. ते जागतिकीकरणाला विरोध करतात. नेहरूंनी व त्यांचा नंतरचा समाजवादी कॉग्रेसने ९० चा दशकात उदारीकरणाचा स्विकार करेपर्यंत देशात बंदिस्त व नियंत्रित बाजार व्यवस्थाच राबली.

आयात निर्यातीवर अनेक बंधने लादली. सरकारी आरक्षित क्षेत्रे म्हणजे सरकारचीच त्या व्यवसायातली मक्तेदारी निर्माण केली. मला किंवा इतरांना त्या क्षेत्रात व्यवसाय करण्यास बंदी घातली.

ही सगळी आर्थिक धोरण उदारमतवादी विचारांचा विरोधी होती. त्यामुळे अशाप्रकारे खुल्या मुक्त बाजार व्यवस्थेला विरोध करणारा कोणताही समाजवादी नेता उदारमतवादी ठरत नाही.

उदारमतवाद हा “व्यक्तीवादाचा” पुरस्कर्ता आहे. डावे उजवे दोघेही आजपर्यंत व्यक्तिस्वातंत्र्य विरोधी भूमिका घेत आले आहेत. उदारमतवादाला लोकांचा खाजगी जिवनात सरकारी हस्तक्षेप नको असतो.

 

libral symbol
youtube

 

जीविताचा, मालमत्तेचा व व्यक्तिस्वातंत्र्याचा रक्षणाव्यतिरिक्त शासनयंत्रणा करत असलेले कोणतेही कार्य उदारमतवादाला मान्य नाही.

आज लोकांचा वैयक्तिक आयुष्यात सरकारी हस्तक्षेप वाढला आहे. शासन यंत्रणा व्यक्तीपेक्षा प्रचंड शक्तीशाली बनली आहे. नेहरूयुगातही लायसन्स कोटा राज सुरू झाला. कोणत्या व्यक्तीने कोणता व्यवसाय करावा,नी किती नफा कमवावा, वस्तू व सेवांची किंमत काय असावी यावरही सरकारी बंधने व सक्ती घालून दिली.

उदारमतवादाला अशाप्रकारची सरकारी सक्ती मान्य नाही. ही सक्ती करत असताना अर्थव्यवस्थेवर होणार्‍या इतर दुष्परिणांमांचा विचार समाजवादी करत नाहीत.

 

freedom-expression-inmarathi
conatus.com

 

उदारमतवादाला अमर्याद व अनियंत्रित अभिव्यक्ति स्वातंत्र्य अपेक्षित असतं. पहिल्या घटनादुरूस्तीने वेगवेगळी कारणे देत भारतीयांचा अमर्याद अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार देखील काढून घेतला गेला.

अभिव्यक्तीचा स्वातंत्र्यांवर गदा आणणारा हा निर्णय देखील उदारमतवादा विरोधीच ठरतो. या अमर्याद अभिव्यक्तीस्वातंत्र्यला डावे व उजवे मिळूनच विरोध करत असतात.

मानवी सभ्यतेचा विकासास कारणीभूत ठरलेला खाजगी जमिन मालकीचा आधिकारही उदारमतवादाला अपेक्षित असतो. तैवान या देशासारखी भारतात जमिन सुधारणा होवून जमिनीची पूनर्वाटणी होणे गरजेच होत.

नेहरुयुगात जमिन सुधारणा होवून देखील जो जमिन मालमत्तेचा आधिकार भूमिहीन वंचितांना मिळायला हवा होता तो त्यांना मिळाला नाही. उलट सरकार स्वतःच जमिनदार बनून राहिलं. आजही देशातील सगळ्यात मोठा जमिनदार भारत सरकारच आहे तर देशात ७७% दलित नी ९०% अदिवाशी भुमिहीनच राहिले आहेत.

आशाप्रकारे उदारमतवादाचा या महत्वांचा तत्वांविरोधी असणारा कोणताही नेता व विचारवंत उदारमतवादी ठरत नाही. त्यांना पुरोगामी म्हंटलं जाऊ शकत पण ते उदारमतवादी नाही.

पण उदारमतवादच का?

उदारमतवादी तत्वज्ञानाने युरोपीय प्रबोधनाची चळवळ समृद्ध केली होती. याच उदारमतवादी विचारांनी आमेरिकन स्वातंत्र्यांचा घोषवाक्याचा पाया देखील घातला. उदारमतवादी तत्वज्ञानाने भारतीय स्वातंत्र्याची व समाजिक सुधारांची चळवळ देखील समृद्ध केली होती.

मानवी समाजाला कोणत्याही मालक किंवा गुलामाची गरज नसते. समाजिक व्यवस्था ही स्व-संगठित नि स्वयंचलित असते.

मानवी समाजात कुणीही उच्च किंवा नीच नाही. प्रत्येक व्यक्तीला समान अधिकार आहेत. हा रॅडिकल विचार उदारमतवादानेच जगाला सर्वप्रथम दिला. याच विचारांचा जोरावर आजचा आधुनिक समाज देखील उभा राहिला आहे.

उदारमतवादाने खाजगी मालमत्तेचा अधिकाराचं रक्षण केलं. गुलामीची अनिष्ट प्रथा संपुष्टात आणली. स्त्रीयांना पुरुषांचा बरोबरीने अधिकार मिळवून दिले.

 

liberal-inmarathi

 

भारतात जातीभेद नि अस्पृश्यता निवारणासाठी लढा उभा केला. अमर्याद अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं. धार्मिक अमानवीय छळ थांबवले. प्रत्येक व्यक्तीला आर्थिक प्रगती करून घेण्याची संधी मिळवून दिली. वेगवेगळ्या प्रकारचा जुलुमशाही विरोधात नैतिक लढा उभारला.

याच उदारमतवादी विचारांतून अॅडम स्मिथचा भांडवलवादाचा देखील पश्चिमेकडे उदय झाला आणि औद्योगिक क्रांती घडून आली व माणसाने कधी नव्हे इतकी अफाट प्रगती करून घेतली. औद्योगिकक्रांतीने बहुसंख्य जनतेचा आर्थिक परिस्थितीत प्रचंड कायापालट घडवूण आणला.

सर्वसामान्य वर्गातील स्त्री पुरूषांसाठीही शिक्षणाचे दरवाजे उघडले. ऐषोरामाचा गोष्टींवर पूर्वी फक्त राजे महाराजे, जमिनदार, अमीर उमराव यांचीच मक्तेदारी होती त्या गोष्टीही सर्वसामान्य वर्गातील जनतेपर्यंत पोहचवल्या.

वेगवेळ्या रोगांवरती आधुनिक औषधोपचारांनी नियंत्रण मिळवल. लोकांचं आयुर्मान व आर्थिक उत्पन्न वाढु लागलं. ते निरनिराळ्या वस्तू नि सेवा खरेदी करू लागले. ग्राहक हाच राजा बनला. दळवळणाचा संसाधनांचा विकास झाला.

जग जवळ येऊन खऱ्या अर्थाने जागतिकीकरणास सुरूवात झाली. वसुधैव कुटुंबकमची प्राचीन भारतीय कल्पना वास्तवात उतरू लागली.

उदारमतवादाचा अंतिम हेतू जात, धर्म, वंश, लिंग, राष्ट्र,भाषा यांचा विचार न करता प्रत्येकाचा व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर राखत अखिल मानव जातीच्या कल्याणाचा आहे. उदारमतवाद हाच खरा मानवतावाद आहे. उदारमतवाद प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सद्सदद्विवेकबुद्धीचा वापर करत त्याचा आयुष्याचं कल्याण त्याने कस करावं याचं स्वातंत्र्य देतो.

आजपर्यंत मानवी समाजाने केलेल्या अफाट प्रगतीच कारण म्हणजे लोकांनी त्यांचा स्वस्वार्थ व स्वारस्यातून केलेली कृती हेच आहे. लेखक, वैज्ञानिक, संशोधक यांना कोणत्याही सरकारने त्यांनी काय कराव नि काय नाही याचे आदेश दिले नव्हते.

Henry Ford ला कुण्या सरकारी अधिकाऱ्याने सांगितल नव्हत इंजिन गाड्यांचा शोध घे,आईनस्टाईनला कुण्या सरकारने सांगितल नव्हत आपली जगप्रसिद्ध थेअरी मांड, राईट बंधूंना कुण्या सरकारने सांगितल नव्हत हवेत उडणाऱ्या विमानाचा शोध घे.

 

henry-inmarathi
history.com

 

मानवी समाजाची प्रगती सरकारे करत नसतात तर स्वस्वार्थातून वागणारे सर्वसामान्य लोक हेच ती प्रगती घडवूण आणत असतात. सरकारे ही फक्त कष्टकर्यांचा पैशांवर परजीवी म्हणून जगत असतात.

आजचा आधुनिक युगातील मानवी समाजाची आणि मध्ययुगीन मानवी समाजाची तुलना केल्यास उदारीकरण व भांडवलवादाने घडवूण आणलेल्या सकारात्मक बदलाची तूम्हाला कल्पना येऊ शकते.

पण आज “उदारमतवाद” हा शब्द उदारमतवादाचाच विरोधी भूमिका घेणाऱ्या डाव्या विचारवंतांसाठीच वापरला जातो आहे. वेळ आली आहे खऱ्या उदारमतवाद्यांनी गौरवशाली असा इतिहास असणारा आपला उदारमतवाद पून्हा अ-उदारमतवादी समाजवाद्यांकडून हिसकावून घेण्याची.

मानवतावाद टिकवण्यासाठी उदारमतवाद टिकणे नी त्याचा प्रसार करणे ही मानवी समाजाची आजही खरी गरज आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com  वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com  त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on “‘उदारमतवाद’ म्हणजेच Liberalism… याचा नेमका अर्थ काय ते जाणून घ्या!

 • February 3, 2019 at 8:43 pm
  Permalink

  क्ष

  Reply
 • February 3, 2019 at 8:59 pm
  Permalink

  खूप छान लेख आहे. धनयवाद

  Reply
 • February 4, 2019 at 8:07 am
  Permalink

  very

  Reply
 • February 4, 2019 at 11:16 pm
  Permalink

  खूप छान लेख आहे हा

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?