' एकेकाळी अतोनात छळ झालेल्या इस्रोच्या ह्या वैज्ञानिकाचा आता पद्मविभूषणाने सन्मान झालाय!

एकेकाळी अतोनात छळ झालेल्या इस्रोच्या ह्या वैज्ञानिकाचा आता पद्मविभूषणाने सन्मान झालाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सरकार बदललं की सामान्यपणे आपल्याकडे सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या होतात, पण कॉंग्रेसच्या शासनकाळामध्ये काहीजणांचं तर जगणेही मुश्कील करून टाकलं होतं. विनाकारण त्या माणसांना यातना देणे जणू या सरकारच कामच झालं होतं.

या यातना भोगलेलं एक नाव म्हणजे प्रसिद्ध शास्त्रज्ञ नंबी नारायण आणि भाजप प्रणीत सरकारने त्यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर केला होता.

जाणून घेऊयात या शास्त्रज्ञाच्या खडतर संघर्षाबाबत.

तुम्हाला आठवतं आहे का, १५ एप्रिल २०१० मध्ये भारताने जीएसएलव्ही एम के २ नावाचा उपग्रह अवकाशात पाठवण्याचे ठरवले होते आणि भारताचा हा महत्त्वाकांक्षी प्रयोग त्यावेळी फसला होता. अवकाशात सोडलेला तो उपग्रह भरकटला होता.

 

mk2-inmarathi

 

भारताच्या असा महत्त्वकांक्षी प्रकल्प यशस्वी का होऊ शकला नाही याचं कारण म्हणजे “इंडीजिएस क्रायोजेनिक इंजिन”. हे इंजिन म्हणजे तत्कालीन सर्वात शक्तिशाली इंजिन समजलं जायचं.

प्रक्षेपित केलेला उपग्रह त्याच्या कक्षेमध्ये स्थिरावेपर्यंत हे इंजिन उपग्रहाला उर्जा पुरवीत राहते.

त्यावेळेसच नव्हे तर आजही प्रक्षेपणाच्या वेळी हे इंजिन वापरले जाते आणि याच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अमेरिकेने चंद्रावर झेप घेतली होती.

आणि या तंत्रज्ञाना बद्दल सर्व माहिती असणारा कुशल तंत्रज्ञ तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्ही तंत्रज्ञानाच्या जागतिक पटलावर स्वतःचे अस्तित्व बनवू शकत नाही आणि अर्थातच हे तंत्रज्ञान जगात कोणीही कुठल्याही देशाला देणार नाही.

हे तर उघडच आहे की त्यामुळे आपल्याला या तंत्रज्ञानावर स्वतःच प्रभुत्व मिळवणे महत्त्वाचे होते. त्यावेळी आपल्याकडे एक अद्वितीय असा संशोधक उपलब्ध होता ज्याचे या तंत्रज्ञानावर प्रभुत्व होते.

असे असतानाही त्या शास्त्रज्ञाला या सर्वांपासून दूर ठेवण्यात आले. त्याला गद्दार ठरवण्यात आले आणि त्याच्या आयुष्याशी तथाकथित सेक्युलर सरकारने घातक खेळ केला.

तो माणूस म्हणजे दुसरं कोणीच नसून ज्यांना सरकारने पद्मभूषण सन्मान देऊन गौरव केला ते नंबी नारायण होय.

 

nambi-narayan-inmarathi

 

शास्त्रज्ञ, देशभक्त तल्लख बुद्धिमत्तेचा माणूस:

आता दुसरे उदाहरण… तुम्हाला पीएसएलव्ही आठवतंय? ज्या तंत्रज्ञानाद्वारे भारताने मंगलयान २०१४ मध्ये प्रक्षेपित केलं. आणि भारताने मंगळावरती पाय रोवला, तेच पीएसएलव्ही ज्याने २००८ रोजी चंद्रावर पाणी आहे की नाही याची तपासणी केली.

या पीएसएलव्ही ने भारताची मान जगासमोर नेहमीच उंचावली आहे. हे पीएसएलव्ही “विकास इंजिन” (जे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्यात आले) या तंत्रज्ञानावर काम करते.

नंबी नारायण यांनी या इंजिनाच्या बांधणीमध्ये सिंहाचा वाटा उचललेला आहे. १९९० च्या दशकामध्ये नंबी नारायण भारतातील अग्रणी शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जात होते. ते वर उल्लेख केलेल्या इंडिजीएस क्रायोजेनिक इंजिन वर काम करत होते.

 

nambi narayan 1 InMarathi

 

त्याआधी भारताने ही सामग्री रशियाकडून आयात करण्याचे ठरवले होते. पण अमेरिकेने या गोष्टीला कडाडून विरोध केला.

जसे आम्ही आधी सांगितले की ज्या राष्ट्राकडे हे तंत्रज्ञान असेल ते राष्ट्र या तंत्रज्ञानाचे गौडबंगाल बाहेर पडू देणार नाही. आता भारताला स्वतःच स्वतःची मदत करणं गरजेचं होतं.

 

isro-InMarathi

 

मग १९९४ मध्ये नंबी नारायण यांच्या वरती असा ठपका ठेवण्यात आला की ते जासूसी करत आहेत आणि भारतातील तंत्रज्ञान आणि त्याबद्दलची माहिती बाहेर देत आहेत आणि या मुळे त्यांना अटक करण्यात आली आणि दुर्दैवाने त्यांच करिअर संपुष्टात आलं.

आणि या सोबतच भारतही त्याच्या महत्त्वकांक्षी स्वप्नापासून कित्येक दिवस दूर राहिला आणि याचाच परिणाम म्हणून की काय २०१० मध्येही भारत या तंत्रज्ञानाला विकसित करण्यासाठी संघर्ष करत असलेला आपणास दिसून येईल.

आणि या प्रयत्नांना यश आलं ते शेवटी जानेवारी २०१४ मध्ये. मग सर्वसामान्य माणसाच्या मनात प्रश्न उभा राहिला की राष्ट्राची वाया गेलेली ही वीस वर्षे कोण भरून देणार?

आणि जसं न्यायप्रविष्ट नंबी नारायण यांच्यावरील खटल्याची सुनावणी झाली तसे लक्षात आले की नारायण यांच्यावर ठेवण्यात आलेले सर्व आरोप धांदात खोटे आहेत सीबीआय ने देखील हे मान्य केले की नारायण यांना या सर्व आरोपांमध्ये फसवण्यात आलेले आहे.

या सर्व प्रकारावर कडी म्हणजे आरबी श्रीकुमार यांनी त्यांच्या याच पद्धतीने अनेकांची मने जिंकली. याचाच परिणाम म्हणून की काय त्यांना अनेक पुरस्कारही प्रदान करण्यात आले.

 

rb-shrikumar-inmarathi
easterncrescent.in

 

आता हाच फोटो बघा.. २४ एप्रिल २००८ च्या “द हिंदू” या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला होता, ज्यात आरबी श्रीकुमार यांना सर्वोत्कृष्ट मल्याळी पोलीस अधिकारी म्हणून पुरस्कार देण्यात येत आहे.

हा पुरस्कार त्यांना सीपीआय-एम चे प्रदेश अध्यक्ष श्री पिनरई विजयन यांच्या हस्ते देण्यात येत आहे तर त्यांच्या बाजूलाच आपण बघू शकता त्या म्हणजे मानवाधिकार कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड! हा फोटो आपल्याला बरेच काही सांगून जातो, नाही का?

सीपीआय-एम किंवा पिनरई विजयन यांच्यावर रागवून चालणार नाही, यांचा सन्मान तर काँग्रेसनेही केला होता.

एवढंच नव्हे तर नारायण यांच्या सोबत अन्याय केला असा ठपका ज्या मंत्र्यावर ठेवण्यात आला होता, त्या मंत्र्यावरील सर्व आरोप फक्त ४३ दिवसांमध्ये साफ करण्याचा विक्रमही याच अधिकाऱ्याने घडवून आणला होता.

या सर्व शासकांनी या देशाचे फार मोठे नुकसान केलेले आहे आणि या सर्वांमधून संघर्ष करत असणारे नारायण मात्र त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि न्यायासाठी या काळात झगडत होते.

 

narayan-inmarathi
lawstreetjournal.com

 

अखेर सप्टेंबर २०१८ मध्ये सुप्रीम कोर्टाला जाग आली आणि कोर्टाने त्यांना पन्नास लाखांची नुकसान भरपाई देऊ केली. या सर्व घटनेमध्ये केरळ पोलिसांचा काही हात आहे का याची तपासणी करण्यासाठी एक चौकशी समिती नेमण्यात आली.

न्यायालयाच्या या दुसऱ्या निर्णयाबद्दल मात्र कुठेही गवगवा झालेला दिसला नाही.

या सगळ्या पार्श्वभूमीवर, गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला भारत सरकारने पद्मपुरस्कारांची यादी जाहीर केली त्यात नंबी नारायण यांचे नाव आले. त्यांच्या अतुलनीय योगदानाची दाखल घेण्यात आली.. हे चित्र आश्वासक आहे.

 

nambi narayan InMarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

 

–  आमचे सर्व  मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “एकेकाळी अतोनात छळ झालेल्या इस्रोच्या ह्या वैज्ञानिकाचा आता पद्मविभूषणाने सन्मान झालाय!

  • February 4, 2019 at 5:49 pm
    Permalink

    Ads मुळे संपूर्ण लेख वाचता येत नाहीये

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?