' भाजपचा आणखी एक भयानक पर्यावरण द्रोह: सरदार पुतळ्यासाठी संरक्षित मगर स्थलांतरित!

भाजपचा आणखी एक भयानक पर्यावरण द्रोह: सरदार पुतळ्यासाठी संरक्षित मगर स्थलांतरित!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

मी नेहमीच म्हणतो, भाजप हा भारतातला पर्यावरणाचा सर्वात मोठा प्रिडेटर आहे. विकासाला आलेली सूज ही सूज नसून ग्रोथ आहे हे दाखवण्यासाठी हे लोक कोणत्याही स्तरावर जाऊ शकतात.

झाले असे आहे अनेक गुजराती लोकांना अहमदाबाद ते सरदार वल्लभभाई पटेल पुतळा हे अंतर बाय रोड कापणे कठीण होत चालले आहे.

मग काय अहमदाबाद ते हे स्मारक अशी सी-प्लेन सर्व्हीस सूरु करण्याचे गुजरात सरकारने ठरवले आहे. आता सी-प्लेन उतरवण्यासाठी मोठा वॉटर रिझरवॉयर हवा.

यांच्या सी-प्लेनवाल्यांनी नर्मदा सरोवरातला जो पॉन्ड निवडला आहे त्यात मगरी आहेत.

 

mugger-crocodile-inmarathi
TripAdvisor.com

The mugger crocodiles (Crocodylus palustris) ह्या प्रजातीतल्या मगरी क्रिटिकली इनडेंजर्ड या स्केड्युलमध्ये इंडियन वाईल्डलाईफ अॅक्टने डीमार्क केलेल्या आहेत.

म्हणजे यांना पण त्याच लेव्हलचे प्रोटेक्शन दयायला हवे जे आपण वाघांना देतो.

आता ह्या मगरींना इथून काढून दुसरीकडे रिलोकेट केले जाणार आहे. ज्या सिंहांना रिलोकेट करायला गुजरात सरकारने गुजरातची अस्मिता म्हणून नकार दिला होता, त्यांना मगरी गेल्या तर चालणार आहे. वा रे तुमचा न्याय!

जे प्राणी क्रिटिकली इनडेंजर्ड आहेत, संपले तर पुढील पिढीला केवळ फोटो दाखवावे लागतील अश्या प्राण्यांच्या आयुष्याशी किंवा त्यांच्या अस्तित्वाशी फक्त भाजपचे गुजरात सरकारच खेळू शकते.

 

mugger-inmarathi
evolveback.com

एशियाटिक सिंहांना त्यांनी जवळपास शेवटच्या कड्यावर उभे केले आहे, आता मगरीचा नंबर आला. आत्तापर्यंत १५ मगरी पकडण्यात आल्या असून अजून अंदाजे ४८५ मगरी पकडायच्या आहेत.

सोडणार कुठे, काहीही प्लान नाही? का धरताय, वरतून ऑर्डर्स आल्यात म्हणून!

 

muggr-inmarathi
india.com

मग माहीत काय आहे, तर शेठ लोक विमानाने येतील आणि काही रुपडे खर्चून जातील.

उद्या ह्याच मगरी लोकांच्या घरात शिरल्या की चूक फक्त मगरींची असेल कारण त्यांनी या देशात जन्म घेतला आहे.

व्हॉट इज गोइंग ऑन मोटाभाई ?

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भाजपचा आणखी एक भयानक पर्यावरण द्रोह: सरदार पुतळ्यासाठी संरक्षित मगर स्थलांतरित!

  • January 31, 2019 at 10:04 am
    Permalink

    तुमच्या

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?