कित्येक वर्षांपासून मोफत सेवा देणारा जगातील एकमेव रेल्वेमार्ग भारतात आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

लहानपणी ‘झुक झुक अगीनगाडी’ हे गाणं गाताना आणि ऐकताना खूप आनंद वाटत असे. त्या गाडीत बसल्यावर किती मज्जा येईल याची कल्पना करूनच अंगावर रोमांच उमटतं. अशी ही रेल्वे मोठे झाल्यावर मात्र आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनते.

कोणत्याही ठिकाणी प्रवास करायचा झाल्यास, पहिल्यांदा रेल्वेचाच विचार मनामध्ये येतो.

रेल्वे ही जनसामन्यांसाठी बीएमडब्लू किंवा मर्सिडीजचं आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये. कमी खर्चामध्ये आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी योग्य वेळेमध्ये पोहचवण्याचे काम रेल्वे करते. रेल्वेचा प्रवास हा कधीही न विसरता येण्यासारखा असतो.

रेल्वे ही गतिमान प्रवासाचे साधन म्हणून ओळखली जाते. औद्योगिक क्रांतीमध्ये रेल्वेचा प्रमुख वाटा आहे. आताच्या फास्ट जगात आरामदायक तसेच जलद प्रवासाचे साधन म्हणून जवळपास सगळेच लोक रेल्वेला पसंती देतात.

 

railway-gears-inmarathi
india.com

भारतीय रेल्वेने अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प हाती घेऊन ते अविरत मेहनतीने आणि श्रमाने पूर्णत्वास नेले आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे जगातील एकमेव अशी रेल्वे भारतात अस्तीत्वात आहे जी गेली ५९ वर्षे प्रवाशांकडून एकही रुपयाचे तिकिट न घेता अविरतपणे प्रवाशांना सेवा देत आहे.

या लेखामध्ये आपण जाणून घेऊयात या जगातील एकमेव विना तिकीट रेल्वे प्रवासाबद्दल.

भारत सरकारचा भाकरा नांगल प्रकल्प १९२३ मध्ये बांधून पूर्ण झाला. पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संयुक्तपणे फाळणीच्या आधी इंग्रजांनी तयार केलेला हा प्रकल्प.

या प्रकल्पाचे काम चालू होते त्यावेळी “भाकरा बीयाज मॅनेजमेंट बोर्ड” म्हणजेच “बी बी एम बी” म्हणून एक समिती या प्रकल्पाचे काम जलद गतीने कसे होईल हे बघण्यासाठी नेमण्यात आली होती.

या समितीने एक असा प्रस्ताव ठेवला की येथे काम करणारा कामगार वर्ग किंवा कर्मचारी आपल्याला वेळेत प्रकल्पाच्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी एखाद्या रेल्वेची व्यवस्था करण्यात यावी.

म्हणून हा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला, आणि या रेल्वेमध्ये रोज ८०० कर्मचारी प्रवास करू शकतील अशा क्षमतेची रेल्वे येथे रुजू करण्यात आली.

 

himachl-inmarathi
youtube.com

या रेल्वेसाठी वापरण्यात आलेले कोचेस हे कराचीमध्ये बनवण्यात आले होते. नंतर १९५३ मध्ये या रेल्वेला विद्युत इंजिनही बसवण्यात आले जेणेकरून पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही.

ही रेल्वे दिवसातून दोन फेऱ्या आजही मारते कर्मचाऱ्यांना घेण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना सोडण्यासाठी. हा प्रकल्प ७४० फूट उंच आहे.

बिलासपुर जिल्ह्यात हिमाचल प्रदेशमध्ये हा प्रकल्प वसवण्यात आलेला आहे. यासंदर्भात ज्यावेळी बीबीएमबी शी संपर्क केला त्यावेळी कुलदीपसिंग जे रेल्वेचे अधिकारी आहेत त्यांनी असं सांगितलं की,

“या रेल्वेमध्ये पर्यटनीय असं काही नाहीये पण याची खासियत म्हणजे ही रेल्वे मोफत प्रवास देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ही रेल्वे जेमतेम ४० किलोमीटर प्रति प्रति तास या वेगाने प्रवास करू शकते आणि त्यामुळेच या प्रवासाचा आनंद घेण्यासाठी लोक लांबून गर्दी करतात”.

बी बी एम बी यांच्या दस्ताऐवज अनुसार रेल्वे पहिल्यांदा वाफेवर चालणारे इंजिन वापरून प्रवास करत असे आणि ही रेल्वे पहिल्यांदा १९४८ रोजी धावली होती.

१९५३ मध्ये या रेल्वेला विद्युत आणि इंधन याचं मिश्रण करून वापरण्यात येणारे इंजिन बसवण्यात आलं जे अमेरिकन बनावटीचे आहे. ही रेल्वे रोज १३ किलोमीटरचा प्रवास पूर्ण करते.

यामध्ये ती शिवालिक पर्वत रांगा,तळे,जंगल पूर्ण करते त्यामुळे हा प्रवास खरंच नयनरम्य असतो.

 

nangal-inmarathi
dainikbhaskar.com

हा प्रवास नांगल आणि पंजाब याच्या दरम्यान असल्यामुळे हिमाचल प्रदेशचे खरे सौंदर्य आपल्याला या रेल्वे प्रवासादरम्यान दिसू शकते, आणि या रेल्वेतून फक्त कर्मचारीच प्रवास करतात असे नाही तर या रेल्वेतून शाळेत जाणारे विद्यार्थी, शेतकरी ही प्रवास करतात त्यामुळे या रेल्वेचे महत्त्व आपणास लक्षात येऊ शकते.

ट्रेन आजही एका दृष्टीने गरिबांसाठी तारक ठरलेली आहे कारण या रेल्वेमधून प्रवास करणारे अधिक तर व्यक्ती या पंप ऑपरेटर, सुतार, शेतकरी आणि मजूर वर्ग आहे.

त्यामुळेच कदाचित इंग्रजांच्या काळात या रेल्वेला गरिबांची रेल्वे असे संबोधले जात असे. इंग्रजांच्या काळात रेल्वे म्हणजे श्रीमंत आणि गरीबांमधील अंतर दाखवणारे एक द्योतक होते.

त्यामुळेच ब्रिटिशांनी कामगारवर्गासाठी रेल्वे तर त्यापेक्षा उच्च दर्जाच्या कर्मचाऱ्यांसाठी बस तसेच चार चाकीची व्यवस्था केलेली होती यामुळेच ही दरी पडत गेली.

या रेल्वेमध्ये लाकडाच्या मदतीने विभाजन केलेलं आहे. जेणेकरून प्रत्येकाला या रेल्वेमध्ये पुरेशी जागा मिळू शकेल. पण गेली कित्येक वर्ष या रेल्वेच्या रचनेत कसलाही बदल न केल्यामुळे रेल्वे कालबाह्य झाल्यासारखी वाटते.

 

train-dam-inmarathi
news18.com

याबद्दल स्थानिक नागरिकांशी संवाद साधला असता त्यांनी असे सांगितले की,

“आमच्यासाठीही रेल्वे एक जीवनदायिनी आहे. गेली कित्येक वर्षांपासून आम्ही बी बी एम बी यांना या रेल्वेची रचना बदलण्यासाठी विनंती करत आहोत पण आत्तापर्यंत तरी काहीच घडलं नाही”.

२०११ मध्ये बी बी एम बी यांनी मोफत प्रवास थांबवावा का याचा विचार केला. कारण या रेल्वेच्या प्रवासाचा खर्च दोन कोटींपेक्षाही जास्त वर जात होता. यावर सांगताना तेथील अधिकारी अस बोलतात की,

“या रेल्वेला प्रवासासाठी रोज २० ते २५ लिटर इंधन लागते आणि आताही रेल्वे खूप जुनी असल्यामुळे हे प्रमाण काही तासांवर आलेल आहे जे खूप महाग आहे पण सुदैवाने बोर्डाने हा निर्णय घेतला नाही”.

भारतात अशा प्रकारची कुठली ट्रेन आहे, जीे प्रवाशांना मोफत सेवा देते? याची माहिती सर्वसामान्य माणसाला क्वचितच असते.

भारत सरकार सध्याच्या परिस्थितीत या रेल्वेकडे एक सेवा प्रकल्प म्हणून बघत आहे. त्यामुळेच बीबीएमबी गेली ५९ वर्षे या रेल्वेसाठी दरवर्षी काही बजेट निर्धारित करत आले आहे.

 

nangal railway station InMarathi

 

आणि प्रवाशांच्या सेवेत खंड पडू नये म्हणून यापुढेही प्रत्येक वर्षी हे बजेट देण्यात येईल असे म्हटले जाते. भारतात धावणाऱ्या अनेक रेल्वेपैकी ही एक आगळीवेगळी रेल्वे आहे, ही रेल्वे अशीच अनेक वर्षे प्रवाशांची सेवा करत राहो एवढीच आशा व्यक्त करूयात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?