' शाळा बंद होऊ नये म्हणून हा शिक्षक ड्रायव्हरचं कामही स्वतः करतोय! – InMarathi

शाळा बंद होऊ नये म्हणून हा शिक्षक ड्रायव्हरचं कामही स्वतः करतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतात गुरु शिष्य परंपरा ही अनादिकालापासून चालत आलेली आहे. महाराष्ट्रातही अनेक शिक्षण तज्ञ तसेच शिक्षण महर्षी होऊन गेले ज्यांनी सर्वसामान्यांपर्यंत शिक्षण पोहोचावे म्हणून अहोरात्र मेहनत करत शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला.

त्यांचीच गुरुची निस्सीम परंपरापुढे घेऊन जाणार्‍या एका शिक्षकाबद्दल आपण या लेखामध्ये वाचणार आहोत.

४७ वर्षीय राजाराम हे शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ते फक्त शिक्षकच नव्हेत तर ते येथील विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या गाडीचे ड्रायव्हर म्हणूनही काम बघतात.

ही परिस्थिती आहे कर्नाटकातील बेलारी या जिल्ह्यामधली. जिथे रोज सकाळी शाळा चालू झाली की ते विद्यार्थ्यांना घेण्यासाठी त्यांच्या घरासमोर गाडी घेऊन हजर असतात, आणि शाळा संपली की त्यांना परत सुखरूप त्यांच्या घरी पोहोचवण्यासाठी ते कटिबद्ध असतात.

 

rajaram-inmarathi

 

राजाराम गेली २४ वर्षे या शासकीय शाळेमध्ये सेवा देत आहेत. १४ वर्षांपेक्षा जास्त कालावधी राजाराम यांनी गणित, विज्ञान आणि भौतिकशास्त्र शिकवण्यामध्ये घातलेला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

राजाराम यांनी ड्रायव्हर होण्यामागे कारण सांगितलं ते असं की,

“गेले अनेक वर्ष झाला बघतोय बरेच विद्यार्थी शाळेमध्ये दाखला काढून घेऊन जात आहेत. एके काळी तर अशी परिस्थिती उद्भवली की एक सोबत ६० विद्यार्थ्यांनी शाळेतून दाखला काढला. त्याचे कारण असे होते की इथे एकही रस्ता पक्का नाहीये.

भरपूर पाऊस पडत असल्यामुळे आणि येथील सभोवताली खूप जंगल असल्यामुळे चिखलाचा रस्ता तुडवुन मुलांना यावे लागत असे.

पालकांनीही अशी तक्रार केली की मुलांना अनवाणी अशा रस्त्याने पाठवणे त्यांना सोयीस्कर वाटत नाही आणि मग मला भीती वाटू लागली की या कारणामुळे शाळा बंद पडू शकते.

मग मात्र मीच विचार केला की जर विद्यार्थ्यांसाठी एखाद्या वाहनाची व्यवस्था केली तर मात्र शाळा सोडून जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी होऊ शकते आणि मग मी ही कल्पना माझ्या सहकाऱ्यांना ऐकवली आणि मग आमच्या समोरचा सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे आर्थिक प्रश्न.”

 

udupi-inmarathi

 

त्यानंतर राजाराम यांनी शाळेतील काही माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्याकडे मदत मागितली. राजाराम यांनी सांगितल्याप्रमाणे मागील वर्षी विजय जे या शाळेतील माजी विद्यार्थी आहेत आणि बंगलोर येथे मालमत्ता व्यवस्थापन व्यवसाय करतात.

त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबाने मिळून शाळेला बस विकत घेण्यासाठी तीन लाखांची मदत केली.

या पैशातून शाळा प्रशासनाने सोळा मुलं बसतील एवढी बस घेतली. त्यातील काही दानशूर व्यक्तींनी या बस साठी लागणारे डिझेल व इतर साहित्य यासाठी प्रत्येक महिन्याला पैसे देण्याचे मान्य केले.

मग शोध चालू झाला तो बस ड्रायव्हरचा!

शाळा प्रशासनाने काही ड्रायव्हरशी यासंदर्भात संवादही साधला त्यांनी शाळा प्रशासनाकडून कमीत कमी सात ते आठ हजार रुपये महिना पगाराची अपेक्षा दर्शविली, आणि मग पैशांच्या अभावाने राजाराम यांनी ही जबाबदारी मोठ्या आनंदाने स्वीकारली आणि याबद्दल त्यांना गर्व आहे.

 

duties-inmarathi

 

मग काय राजाराम यांचं दैनंदिन वेळापत्रक मात्र झपाट्याने बदलल राजाराम बसच्या सोयीसाठी सकाळी साडेपाच वाजता उठत असतात.

रोजच्या व्यायामानंतर राजाराम रोज सकाळी बरोबर ८ वाजता आवरून तयार होतात आणि मग त्यांच्या शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा पहिला जथ्था शाळेत सोडत असतात.

या बदललेल्या वेळापत्रका बद्दल बोलताना राजाराम म्हणतात की, सर्व विद्यार्थ्यांना शाळेत सोडण्यासाठी मला चार फेऱ्या मारायला लागतात.

माझी शेवटची फेरी सव्वानऊला संपते आणि शाळा बरोबर साडेनऊ वाजता चालू होते.

राजाराम यांना या कामातून एवढा आनंद मिळतो की त्यांच्या व्हाट्सअप चा फोटोही हेच पिवळी बस आहे आणि अर्थातच या बसचा व्हायचा तोच परिणाम विद्यार्थ्यांच्या संख्येवर झालेला आपल्याला दिसून येईल.

 

rajaram-karnataka-inmarathi

 

हा अत्यंत चांगला निर्णय होता. मागच्या वर्षी या शाळेमध्ये तीस विद्यार्थ्यांनी परत प्रवेश घेतला आणि सध्याच्या परिस्थितीत या शाळेत ४७ मुली आणि ४७ मुले शिक्षण घेत आहेत आणि या बसमुळे पालकांनाही सुरक्षिततेची हमी आलेली आहे.

असा प्रश्न विचारला जातो की शासन विद्यार्थ्यांना साठी निधी उपलब्ध करून देत? नाही त्यावेळी राजाराम म्हणाले,

“आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पुस्तक आणि गणवेशासाठी झगडावं लागतं आणि अशा अवस्थेत शासन अशा काही गोष्टींसाठी निधी उपलब्ध करून देईल असे वाटत नाहीत.”

या शाळेमध्ये राजाराम यांच्यासोबत अजून चार शिक्षक अध्ययनाचे काम करतात. राजाराम गेली दोन वर्ष झालं विद्यार्थ्यांसाठी ही बस चालवताना दिसून येत आहेत.

 

rajaram-school-inmarathi

 

एवढे सगळे होऊनही त्यांच्या अध्ययनाच्या कार्यामध्ये कसलाही कसूर ते होऊ देत नाहीत. शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ते गेली दोन वर्ष झाले अविरतपणे काम करत आहेत.

कधी कधी तर ते विद्यार्थ्यांच्या शारीरिक शिक्षक म्हणूनही काम बघतात आणि जर कधी त्यांना सुट्टी घ्यायची असेल तर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी ते कटाक्षाने घेत असतात.

प्रत्येक शिक्षकाने आजच्या काळात, या खडतर प्रयत्नातुन अध्यापन करनाऱ्या शिक्षकाचा आदर्श घेणे आवश्यक आहे. अशा या शिक्षणासाठी वाहून घेतलेल्या शिक्षकाच्या कार्याला इनमराठीचा सलाम.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?