' हे १० जिगरबाज ज्या प्रकारे भारतीय प्रजासत्ताक सशक्त करत आहेत त्याला तोड नाही – InMarathi

हे १० जिगरबाज ज्या प्रकारे भारतीय प्रजासत्ताक सशक्त करत आहेत त्याला तोड नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपण सरकारी कर्मचारी आणि प्रशासनाला नेहमी दोष देत असतो. सरकारी काम अन् सहा महिने थांब, ही म्हण आपल्याला उद्विग्न करू लागली आहे, पण खरं आव्हान असतं ते हे चित्र बदलण्याचं…

हे चित्र बदलण्याची, अन्यायाला वाचा फोडण्याची आणि शासनाचा कारभार सुरळीतपणे चालविण्याचे भूमिका बजावतो तो म्हणजे प्रशासकीय अधिकारी.

आपल्या भारतात असे देखील प्रशासकीय अधिकारी आहेत, जे प्रामाणिकपणे अहोरात्र जनतेसाठी आणि शासनाला मदत करतात.

प्रशासकीय अधिकारी हे शासनाने आधारस्तंभ आहेत. जनतेसाठी जनतेसाठी हितासाठी ते कामगिरी बजावत असतात.

==

हे ही वाचा : भारतातील सर्वात तरुण आयएएस अधिकारी आहे महाराष्ट्राचा “हा” सुपुत्र!

==

ias-inmarathi

प्रशासकीय कार्य सुरळीतपणे चालत असेल तर आपलं शासन आणि समाज भारतीय प्रजासत्ताक मजबूत करणारे १० जिगरबाज प्रशासकीय अधिकारी-

१) शिवदीप लांडे :

सगळीकडे दबंग पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे हे शिवदीप लांडे. शिवदीप लांडे यांचा जन्म २९ ऑगस्ट १९७६ला आकोला जिल्ह्यातील बालापूर तालुक्यातील परस या छोट्याशा खेडेगावात एका मराठी कुटुंबात झाला.

त्यांचे आई-वडील दोघेही शेतकरी. त्यांच्या घरची परिस्थिती तशी अत्यंत बेताची होती. पण त्यांनी शिक्षणाचा ध्यास काही सोडला नाही.

त्यांनी शेगावच्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून बी.ई इलेक्ट्रिकलची पदवी घेतली. २००४ मध्ये त्यांचे महसूल खात्यामध्ये अधिकारी म्हणून सिलेक्शन झाले. महसूल खात्यात काही काळ काम केल्यानंतर २००६ च्या बँचमध्ये आय.पी.एस अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

 

shivdeep-lande-marathipizza04

जिथे सगळ्यात जास्त शस्त्र बनविली जातात आणि पोलीस अधिकाऱ्यांची पण हत्या केली जाते. अशाठिकाणी सुरूवातीला त्यांची पोस्टिंग ट्रेंगिनसाठी मुंगेरला झाली. त्यानंतर त्यांची पोस्टिंग ASP जमलपूर येथे झाली.

तिथे स्टोन माफिया, नक्षलवादी त्यांच्या विरुद्ध काम केले. पटना येथील १० महिन्याच्या कारकिर्दीनंतर अचानक ते प्रसिद्धीस आले.

जेव्हा त्यांची बदली झाली तेव्हा पटनातील तरूणाई, जनता रस्त्यावर उतरली, आंदोलने झाली, शाळा बंद राहिल्या त्यावेळी संपूर्ण हा एक मराठी पोलीस अधिकारी आहे जो जनतेसाठी प्रामाणिकपणे सिंगमसारखे काम करतोय.

प्रशासकीय त्यांचा अनेक सामाजिक कार्यात देखील सहभाग आहे. ते आपल्या पगारातील ६०% रक्कम सामाजिक संस्थेला देतात.

२) तुकाराम मुंढे :

तुकाराम मुंढे यांचे नाव बदलीच्या संदर्भात मध्यंतरी खूप गाजले होते. तुकाराम मुंढे यांना घरच्या संस्कारातच प्रामाणिकपणा, सत्य आणि बेडरपणा शिकण्यास मिळाला. त्यामुळे त्यांची प्रशासकीय क्षेत्रात देखील तशीच कारकीर्द आहे.

बीड जिल्ह्यात ताडसोना या लहानशा गावात तुकाराम मुंढे यांचा जन्म ३ जून १९७५ ला झाला. ते लहानपणापासून अतिशय हुशार आणि समाजनिष्ठ होते.

त्यांनी आपले उच्चशिक्षण औरंगाबाद येथून पूर्ण केले. त्यांनी इतिहास, सामाजिक शास्त्र मधून त्यांनी बीए ही पदवी प्राप्त केली.

सोबतच राज्यशास्त्र घेऊन एम.ए पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण केल्यानंतर २००१ मध्ये त्यांनी राज्य सेवा परिक्षेत प्राविण्य मिळवले व त्यांना दुस-या दर्जाची वित्त विभागात नोकरी मिळाली. ही निवड प्रक्रिया काहीशी वेळखाऊ असल्याने त्यांनी दोन महिने जळगावमध्ये व्याख्याता म्हणून काम केले.

 

tukaram-munde-inmarathi

 

त्यानंतर मे २००५ ला यशदा पुणे येथे प्रशिक्षणादरम्यान ते केंद्रीय सेवा परिक्षेत उत्तीर्ण झाल्याचे समजले. विशेष म्हणजे ते देशात २०वे आले होते आणि तेथून त्यांचा हा बेडर प्रवास सुरु झाला.

तुकाराम मुंढे यांच्या सेवेची सुरूवात सोलापूरातून झाली, नंतर त्यांची बदली धरणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून झाली तिथून त्यांची बदली नांदेडला उपजिल्हाधिकारी म्हणून झाली.

२००८ साली नागपूर जिल्हा परिषदेवर जेव्हा त्यांची CEO म्हणून निवड झाली. पुढे मे २०१० ला मुंबईला KVIC ला CEO म्हणून बदली झाली.

नंतर त्यांची जालन्याला कलेक्टर म्हणून बदली झाली. जायकवाडीवरून जालन्याला पाणी आणण्याचे काम सहा वर्षापासून रखडले होते त्यांनी तीन महिन्यात ते करून दाखवून जालनाकरांची तहान भागवली. पुढे २०११-१२ साली त्यांनी सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर पद सांभाळले.

सप्टेंबर २०१२ साली त्याची बदली मुंबई, विक्री व कर विभागाच्या सह आयुक्तपदी झाली. नवी मुंबई मनपा आयुक्तपदी असताना ‘आयुक्तासोबत चाला’ हा Walk With Commissioner चा कार्यक्रम जनतेत चांगलाच गाजला.

३) श्रीमती स्नेहलता श्रीवास्तव :

 

snehalata-inmarathi

श्रीमती स्नेहलाता श्रीवास्तव या लोकसभेच्या पहिल्या महिला सरचिटणीस आहेत. १९८२ च्या बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी आहेत आणि वित्त मंत्रालयाच्या अर्थ मंत्रालयातील अतिरिक्त सचिव आहेत.

त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवा ३० पेक्षा अधिक वर्षे केली.

आपल्या आमदारकीच्या काळात त्यांनी वित्त, दूरसंचार, महामार्ग, महसूल, बहुपक्षीय बँका, म्हणजे जागतिक बँक आणि समावेश क्षेत्रात विविध काम आशियाई विकास बँक, परकीय चलन नियंत्रण, युनायटेड स्टेट्स आणि कॅनडा मध्ये अव्दितीय कामगिरी बजावली.

२९ नोव्हेंबर २०१७ रोजी लोकसभेच्या पहिल्या महिला महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

४) बी.चंद्रकला :

बी.चंद्रकला या IAS अधिकारी सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत.त्यांच्या निवासस्थानावर सीबीआयचे छापे पडल्यानंतर त्या अधिकच चर्चेत आल्या.

त्यांचं गाव करिमनगर जिल्ह्यातील गर्जनापल्ली. एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म २७ सप्टेंबर १९७९ साली झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण करिमनगरमध्ये झाले.

पदवीपूर्ण होण्यापूर्वी त्यांचा विवाह ए. रामूल्ला यांच्याशी झाला. लग्न झाल्यावर पदवीचे शिक्षण पुर्ण केले. पुढे काय असा जेव्हा प्रश्‍न आला तेव्हा रामूला यांनी त्यांना “यूपीएससी’ची तयारी कर असा सल्ला दिला.

२००८ हे वर्ष त्यांच्या आयुष्यातला एक वेगळीच कलाटनी मिळाली. एका बंजारा समाजातील मुलीचे कलेक्‍टर होण्याचे स्वप्न प्रत्यक्ष वास्तवात उतरले.

==

हे ही वाचा : १४ वर्षात १५ बदल्या, असं करतात तरी काय मुंढे साहेब?

==

कलेक्‍टरचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पहिली पोस्टींग उपजिल्हाधिकारी म्हणून बुलंदशहर येथे झाली. एखाद्या कलेक्‍टरने जर ठरविले तर तो काय करू शकतो हे त्यांनी आपल्या अधिकारात दाखवून दिले. सरकारी योजना तळागाळापर्यंत पोचतात की नाही याची दक्षता चंद्रकला नेहमीच घेत आल्या आणि हेच त्यांच्या कामाचे वैशिष्ठ्य आहे. त्यामुळे त्यांचे बदलीशी तर खुपच जवळचे नाते.

बदलीला कधीही न घाबरणाऱ्या कलेक्‍टर म्हणूनच त्यांच्याकडे पाहिले जाते. ज्या ठिकाणी जातात तेथे आपल्या कामाचा ठसा उमठवितात. तत्वाशी तोडजोड कदापी करीत नाहीत.

चंद्रकला कलेक्‍टर म्हणून उत्तरप्रदेश सारख्या राज्यात खूपच गाजल्या. कोणाच्या धमकीला आणि राजकीय दबावाला बळी न पडणाऱ्या या कलेक्‍टरबाईंनी भ्रष्ट ठेकेदारांना धडा शिकविला. अधिकाऱ्यांवरही जरब बसविली.

चंद्रकला यांचा बुलंदशहरमधील एक व्हिडिओ आहे. एका शाळेचे बांधकाम सुरू असताना त्या अचानक पाहणी करण्यासाठी गेल्या. तेव्हा त्यांना विटा कच्च्या आणि तुटलेल्या दिसल्या. बांधकामाचे साहित्यही निकृष्ठ असल्याचे आढळले.

हा सर्व प्रकार पाहताच त्या इतक्‍या संतापल्या, की त्या कंत्राटदाराला घाम फुटला होता.

आमदार, मंत्री जर चुकीच्या गोष्टीला पाठिंबा देत असतील तर त्यांनाही खडे बोल सुनावण्यास त्या मागेपुढे पाहत नाहीत. एक प्रामाणिक आणि कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची ओळख असली तरी दुसरीकडे त्या गोरगरीबांच्या कैवारीही आहेत.

आदिवासींची लहान मुले असोत की गावखेड्यातील मुली त्यांच्या मदतीसाठी या कलेक्‍टरबाईंचा हात पुढे असतो. त्यांना लेडी दबंग देखील बोलले जाते.

५) सत्येंद्र दुबे :

 

satyendra-dube-inmarathi

 

महामार्ग बांधकाम प्रकल्पातील भ्रष्टाचारविरोधी लढा म्हटलं की सत्येंद्र दुबे हे नाव लगेच समोर येतं. सत्येंद्र दुबे १९७३ साली त्यांचा जन्म झाला.

ते एक भारतीय अभियांत्रिकी सेवा (आयईएस) अधिकारी होते. ३१ वर्षाचे सत्येंद्र दुबे आयआयटीतून इंजिनियर झाले होते. केंद्र सरकारच्या सुवर्ण चतुष्कोन योजनेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यांची नियुक्ती केली होती.

या योजनेतील भ्रष्टाचार दुबे यांनी एका पत्राद्वारे वाजपेयींच्या कानावर घातला होता. त्यात अधिकारी, राजकारणी आणि कंत्राटदार हातमिळवून कसे भ्रष्टाचार करतात हे त्यांनी पुराव्यासह त्या पत्रात मांडले होते.

परंतु, संबंधित भ्रष्टाचारी मंडळींनी ही बातमी कळली आणि त्यांनी २७ नोव्हेंबर २००३ मध्ये बिहारमधील गया जिल्ह्यात सर्किट हाऊस समोरच दुबेंना गोळ्या घालून संपवून टाकले.

६) अपराजिता राय :

 

aparajita-rai-inmarathi

सिक्कीम मधली पहिली आईपीएस अधिकारी म्हणून अपराजिता राय या ओळखल्या जातात.लहानपणीच वडीलांचे कार्य बघून आपल्याला पण
आईपीएस अधिकारी व्हायचं आहे. हे त्यांनी ठरवलं होतं.

अत्यंत हुशार व्यक्तिमत्त्व तेवढचं धाडसी सुध्दा.. त्यांनी बेस्ट लेडी आऊटबाउंड प्रोबेशनचा पुरस्कार देखील पटकावला.

७) स्मिता सब्बरवाल :

यापूर्वी कधीच एवढ्या कमी वयाच्या अधिकाऱ्याने मुख्यमंत्री कार्यालयात काम केले नाही. स्मिता सब्बरवाल यांनी करून दाखवले. त्यांच्या कामामुळे त्यांना द पिपल्स आँफिसर म्हणून ओळखले जाते.

 

smita_inmarathi

 

आतापर्यंत स्मिता यांनी वारंगल, विजाग, करीम नगर, चित्तुर या जिल्ह्यात काम केले. मूळच्या बंगालच्या दार्जिलिंग येथील असणाऱ्या स्मिता यांचे वडील आर्मीत होते. यूपीएससी परीक्षेमध्ये त्यांना ४ थी रँक मिळाली.

त्यावेळी त्या फक्त २३ वर्षाच्या होत्या. त्यांच्या कामामुळे त्यांना अनेक पुरस्कारानी गौरविण्यात आले. स्मिता म्हणतात की, त्यांचे कामच त्यांच्यासाठी खरे काम आहे.

८) पी नरहारी :

४२ वर्षांच्या आयुष्यात, पी नरहारींना अपंगव्यक्तींना भारतीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास आणि खुले दुर्गम-मुक्त उपक्रमांवर    काम करण्याकरिता श्रेय देण्यासाठी ४० हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.

 

narhari-inmarathi

२००१ मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये प्रवेश केला. २००२ मध्ये त्यांना छिंदवाडा येथे सहायक कलेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आले. असा त्यांचा प्रशासकीय प्रवास सुरू झाला.

त्यांनी महिला बालविकास, गरीबांना मदत,स्वच्छता अशा विविध क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.

९) रितु महेश्वरी :

उत्तर प्रदेशमध्ये कानपूर येथे असताना विद्यमान वीज चोरीसंदर्भात ३०० वर्षीय आयएएस अधिकारी रितु महेश्वरी यांना माहिती मिळाली. उत्तर प्रदेशमध्ये ९९ टक्के गावांमध्ये विद्युतीकरण झाले असले तरी ६० टक्के घरांनाच वीज मिळते.

विजेचा दर वाढवण्याच्या दरामुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.

कानपूर इलेक्ट्रिसिटी सप्लाई कंपनी लिमिटेड (केईएससीओ) येथे कार्यरत असते. वीज चोरी कमी करण्यासाठी वीज डिजिटलीकरण करून कंपनीच्या नुकसान कमी करण्यासाठी उपाय करीत आहेत.

 

mark-inmarathi

२०११ मध्ये केईएससीओच्या अधिकृत पदावर प्रभारी म्हणून काम केल्यानंतर तिने कंपनीच्या ग्राहक सेवेच्या एक-तृतियांश ठिकाणी नवीन मीटर स्थापित केले.

हे डिव्हाइसेस डिजिटल वेळेस विद्युतीय वापराच्या वितरणाची नोंद करू शकतात आणि वितरण व्यवस्थेत लीक उघडकीस आणू शकतात. याआधारित त्यांनी बरेच काम केले.

१०) एसआर शंकरन :

शंकरन यांना “आदर्श आयएएस अधिकारी” म्हणून ओळखले जात होते. गरीब-धोरणात्मक धोरणे तयार करण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

 

shankaran-inmarathi

समाजातील वंचित गट, अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी विशेष घटक योजना तयार करणे आणि ग्रामीण विकास कार्यक्रमात अल्पसंख्य समुदायांसाठी स्थान देणे हि त्यांची उल्लेखनीय कामे.

ते अविवाहित राहिले जेणेकरुन ते समाजाची सेवा करू शकतील. त्यांनी ५०० ​​हून अधिक गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठीही मदत केली.२०१० मध्ये आजारपण झाल्यामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या कार्याचा अजूनही उल्लेख आवर्जून केला जातो.

भारताचे अस्तित्व टिकवण्यासाठी, प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते. जनतेवर होणाऱ्या अन्यायाला, धमक्यांना वाचा फोडत ते जनतेसाठी आणि भारतासाठी लढा देतात. त्यांच्या कार्याला सलाम!!

==

हे ही वाचा :  सरकारी नोकरी मिळवण्यात अपयश आल्यानंतर ९ वर्षांनी तो थेट आयएएस झाला…

==

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?