' ९४ वर्षीय आजोबांनी “ह्या” कारणासाठी कोक आणि पेप्सीविरोधात दिला होता असामान्य लढा – InMarathi

९४ वर्षीय आजोबांनी “ह्या” कारणासाठी कोक आणि पेप्सीविरोधात दिला होता असामान्य लढा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आजच्या युगात आपण अनेक वेळा ऐकतो की अधुनिकीकरणामुळे मानवाचे जीवन कमी होते आहे.

अनावश्यक प्रगतीमुळे मानवाच्या जीवनातील अनेक वर्ष कमी होत आहेत. यामुळेच की काय आज तरुणाई व्यसनाधीनतेच्या नादी लागून आळशी होताना दिसत आहे.

पण तमिळनाडूमध्ये एक आजोबा होते ज्यांनी वयाच्या ९६ व्या वर्षीही त्यांच्या गावातील एक नदी वाचवण्यासाठी निकराने लढा दिला होता. त्याबद्दल आपण आज या लेखामध्ये जाणून घेऊयात.

एक रिपोर्टर तामिळनाडूमध्ये तिरूनेलवेली आणि तुटिकोरिन या गावांमध्ये काही वकील आणि शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी गेला होता.

तेव्हा त्या पत्रकाराला असे विचारण्यात आले की आपण “नयीनार कुलसेकरन” आजोबा यांचे पुस्तक वाचले आहे का?

मग तेथील वकिलांनी त्या पत्रकारास भेटून यावे असे सुचवले.

 

nayinar-inmarathi
thehindu.com

 

डिसेंबर महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली होती आणि मद्रास हायकोर्टाने नुकताच एक आदेश दिला होता.

ज्यात असे सांगितले होते की, थामिरबारी या नदीमधून जे पाणी कोको कोला आणि पेप्सी बनवण्यासाठी फॅक्टरीमध्ये सोडलं जातं ते पाणी बंद करण्यात यावं.

एड्वोकेट प्रभाकरण यांनी यासाठी कोर्टापुढे एक याचिका दाखल केलेली होती. २ मार्च रोजी कोर्टानेच त्यांच्या आदेशावर स्थगिती आणली.

जनहित याचिका फेटाळून लावत असताना असे सांगितले की इंडस्ट्रीज त्यांना देऊ केलेल्या पाण्याच्या प्रमाणापेक्षा खुप कमी पाण्याचा वापर करत आहेत.

आजोबांची भेट

थामिरबाणी ही नदी तिरूनेलवेली आणि तुटिकोरिन या गावांना पाणी पुरवते. येथील शेती तसेच इथे निवासास असणारे नागरिकही या नदीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.

ही नदी या दोन तीन गावांसाठी लाईफलाईन आहे.

या निर्णयाच्या विरुद्ध कुलसेकरंन आजोबांनी आवाज उठवला आणि शेतकऱ्यांसाठी ते तारकच ठरले.

काही काळापासून या गावातील लोकांचा असा आरोप होता की येथील औद्योगिक वसाहत या नदीतील एवढ्या पाण्याचा वापर करते की सर्वसामान्य नागरिकांना आणि शेतीसाठी काहीच पाणी या ठिकाणी उरत नाही.

असे सर्व वर्णन ऐकल्यानंतर तर पत्रकाराची आजोबांना भेटण्याची इच्छा अजूनच प्रबळ झाली त्या भागात कुठल्याही शेतकऱ्याकडे त्या आजोबांचा नंबरही नव्हता.

पण श्रीवैकुंठम् आणि कुरकुंबुरम् येथील शेतकऱ्यांना माहिती होतं की आजोबा राहतात कुठे, एवढे ते आजोबा येथे प्रसिद्ध आहेत.

शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही नथानी येथे जा आणि त्यांना विचारा “नयीनार कुलसेकरंन” कुठे राहतात ते घरीच असतील.

तुम्हाला कोणीही सांगेल पण जाण्याच्या आधी हे पुस्तक मात्र नक्की वाचा असे म्हणत सुबुने पत्रकाराच्या हातामध्ये एक जुने मळकट २०१० मध्ये कुलासेकरं यांनी लिहिलेलं पुस्तक ठेवलं.

जसं त्या शेतकऱ्यांनी सांगितलं होतं तसंच नथांनी येथे त्या आजोबांचे घर शोधण्यासाठी पत्रकाराला फार कष्ट नाही लागले.

जेव्हा पत्रकार त्यांच्या घरी गेले त्यावेळी ते त्यांच्या नेहमीच्या शैलीत लहानशा बाजेवर बसलेले होते.

 

kulsenkar-inmarathi
minnambalam.com

 

त्यांनी त्या पत्रकाराला बघताच स्मितहास्य केले आणि असे दर्शवले की जणू ते मुलाखतीसाठी त्या पत्रकाराची वाटच बघत होते.

मग ते म्हणाले माझं नाव “नथ्थानी एस नयीनार कुलसेकरन” आहे पहिले मला काय सांगायचे आहे ते सांगतो मग तुम्ही काही प्रश्न असल्यास विचारू शकता.

कुलसेकरंन आजोबांना थामीरब्बानी नदीबद्दल सर्व काही माहिती होतं. तसे उगमस्थान, ही  नदी कुठे कुठे जाते, या नदीचा मार्ग कुठला आहे.

१२० किलोमीटर मार्गामध्ये तिरूनेलवेली व तुटिकोरिन या जिल्ह्यांमधून ही नदी वाहते आणि ८० हजार एकर एवढ्या क्षेत्रफळाच्या शेतीची तहान ही नदी लीलया भागवते.

या भागात जास्त करून केळी आणि नारळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

त्यांनी या भागात घेतले जाणारे विविध धान्य उत्पादनांबद्दल त्यांच्या ऋतूनुसार मला समजून सांगितले ही नदी आमची आई आहे, ही आमच्यासाठी जीवनदायिनी आहे.

“अडचण तीस वर्षापूर्वीच निर्माण झाली होती. ही अडचण राज्य शासन किंवा कंपनीबद्दल नाही. खरी अडचण तेव्हा सुरू झाली जेव्हा येथील शेतकऱ्यांनी तांदूळ सोडून केळीचे पीक घ्यायला सुरुवात केली.

केळीला नगदी पीक म्हणून ओळखले जाते तामिळनाडूमध्ये, ज्यामुळे जास्त पैसे मिळतात. पण केळीच्या पिकाला तांदळापेक्षा जास्त प्रमाणात पाणी लागते.

यातच भर म्हणून १९७५ रोजी राज्य शासनाने कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवसाला २० लाख गँलन्स एवढे पाणी देऊ केले.

या सर्वांचा परिणाम व्हायचा तोच झाला आम्हाला उन्हाळ्यामध्ये शेती करताना फार मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते.

खरीप हंगामामध्ये आमचे पीक जेमतेम होते. आम्ही आता फक्त पावसाळ्यातच पिक घेतो आहोत. या सर्वाचं कारण राज्य शासनाने कंपन्यांना देऊ केलेले पाणी आहे.”

 

thamirabani-inmarathi
newindianexpress.com

 

कूलसेकरण यांचं असं म्हणणं आहे की,

त्यांना नदीमधील सर्व तळी, डबकी माहिती असून त्यांनी या दोन्ही जिल्ह्यामध्ये पन्नास वर्षांपासून पायी प्रवास केलेला आहे.

त्यांनी येथील शेतकऱ्यांना एकत्र करून या सर्व प्रकाराला उत्तर देण्यासाठी “थांमीरब्बानी रिवर वॉटर फ्रंट” नावाने एक संघटना ही चालू केलेली आहे.

ही संघटना या सर्व प्रश्नांवर सरकारकडे दाद मागते आहे. आणि तसेही आजोबाच्या मते कोका-कोला आणि पेप्सी या कंपन्या अडचणीत छोटासा भाग आहेत.

सर्वात मोठा भाग आहे तो म्हणजे दैनंदिन ९.७५ लाख लिटर पाणी राज्य शासनाकडून औद्योगिक वसाहतींना प्रोत्साहनपर देण्यात येते. या पाण्याचा फार मोठ्या प्रमाणात अपव्यय होताना दिसून येत आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना दैनंदीन वापरासाठी व शेतीसाठी पाणी मिळत नाही असं त्यांचं मत आहे. त्यांनी तमिळ मध्ये एक म्हण म्हंटली ज्याचं भाषांतर असं होतं की

“जर तुम्ही चिखलाच्या घोड्यावर नदी पार करण्याची अपेक्षा केली तर तो घोडा तुम्हाला बुडवेल हे मात्र खरे.”

स्वातंत्र्यसैनिक ते नदी संवर्धक

आजोबांचा जन्म इंग्रजांच्या काळात नथांनी येथे झाला होता. त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले आणि आणि त्यानंतर गांधीजींनी ज्यावेळी “चले जाव” ची हाक दिली त्यावेळी ते सर्व काही सोडून स्वातंत्र्यसंग्रामाच्या रणामध्ये उतरले होते.

ते राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यही होते. १९४५ मध्ये त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या समाजवादी मोहिमेशी जुळून घेण्यासाठी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि दोन वर्षांनी ते कम्युनिस्ट पार्टी मध्ये आले.

त्यांचा चरितार्थ ते वृत्तपत्र वितरणामधून चालवतात. वर्ष सीपीएम मध्ये काम केल्यानंतर त्यांनी परत काँग्रेसमध्ये येण्याचा निर्णय घेतला.

आयुष्यात एवढं सगळं पाहिल्यानंतरही ज्यावेळी त्यांच्या मनात त्यांच्या जीवनदायिनी नदी बद्दल विचारत येतो त्यावेळी मात्र ते वयस्कर न राहता एखाद्या तरतरीत तरुणासारखे ते नदीबद्दल सांगू लागतात.

 

Nainar-Kulasekaran-dead_inmarathi
dtnext.in

 

यावरून त्या नदी बद्दल त्यांचे प्रेम आपण लक्षात घेवु शकतो. कूलसेकरण यांचा औद्योगिकरणाला विरोध नाही.

त्यांचे फक्त एवढंच म्हणणं आहे की कंपन्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अस्तित्वात असलेल्या व्यवस्थेचा गळा दाबणे हा प्रकार त्यांना पसंत नाही आणि दुर्दैवाने त्यांच्या मते हाच प्रकार राज्यशासन त्या नदीच्या बाबतीत करताना आढळून येते.

अशा या संघर्षशील आजोबांचा दोन वर्षांपूर्वी वयाच्या ९३व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या मरणोत्तर तरी यश मिळावे एवढेच इथे चिंतीत करता येऊ शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?