' उत्खननात सापडलेलं, सोबत झोपलेलं जोडपं, आपल्याला काय सांगतंय ते जाणून घ्या – InMarathi

उत्खननात सापडलेलं, सोबत झोपलेलं जोडपं, आपल्याला काय सांगतंय ते जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===  

शालेय जीवनात प्रत्येकाने प्राचीन इतिहासाबद्दल शिकताना उत्खनन ,अवशेष हे शब्द नक्कीच ऐकले असतील. त्याचबरोबर हडप्पा संस्कृती याविषयी देखील बराच इतिहास जाणून घेतला असेल.

फारफार वर्षापूर्वी संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात.

ही संस्कृती प्रामुख्याने सिंधू नदीच्या प्रदेशात केंद्रित असल्याने तिला ‘सिंधू संस्कृती’ असेही म्हणतात.

उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या.

 

indus-vally-civilisation-inmarathi

हे ही वाचा – देशाला ‘भारत’ नाव कसं मिळालं ठाऊक आहे? वाचा त्यामागचा पौराणिक इतिहास

अशाच प्रकारच्या संस्कृतीचे अवशेष पश्चिम भारतात कालीबंगन, धोळावीरा, सुरकोटडा, लोथल, दायमाबाद इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.

वरील उत्खननातील भक्कम व शास्त्रीय पुराव्यांच्या आधारे बोलायचे झाल्यास हडप्पा-मोहेंजोदडो येथून भारताच्या नागरी संस्कृतीचा उगम झाला.

पण, आता याही दाव्याला धक्का देणारे एक संशोधन देशात नामांकित असणाऱ्या पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पुरातत्वशास्त्र विभागाने पुढे आणले आहे.

हडप्पा-मोहेंजोदडो या शहराच्याही आधीचे शहर हरियाणात राखीगढी गावाजवळ जमिनीच्या पोटात दडलेले आहे, असे हे संशोधन सांगते.

या शहराचे वय हे आजपासून साडेसात हजार वर्षापूर्वीचे आहे, असे प्राथमिक अनुमान आहे. याचप्रमाणे राखीगढीच्या उत्खननात सापडलेलं शेजारी झोपलेलं जोडपं आढळून आले आहे. हा नवा ऐतिहासिक पुरावा मिळाला.

 

couple-inmarathi

 

या ठिकाणी राखीखास व राखी शहापूर अशी दोन गावे वसलेली आहेत. दोन गावांना मिळून राखीगढी अर्थात राखेची उंच टेकडी आहे.

राखीगढीचं एकूण क्षेत्रफळ ३५० हेक्‍टर असून इथे सिंधू संस्कृतीचं मूळ सापडण्याची दाट शक्‍यता आहे.

या ठिकाणी झालेल्या उत्खननात सिंधू संस्कृतीप्रमाणेच विकासाचे टप्पे दिसून येतात. इथल्या दोन थरांचे अवशेष मिळतात.

इ.स.पू सुमारे ४५०० वर्षीपूर्वी जगातील सर्वात प्राचीन अशा नागरी संस्कृतीच्या पठाराच्या बाहेरील भागात एक थडगे असणारी कबर आढळली. ही कबर पुरण्यात आली असावी. हीच ती ‘जोडप्याची कबर’ आहे.

२०१६ मध्ये दक्षिण कोरियाच्या पुरातत्त्व खात्यांना राखीगढीच्या उत्खननात शेजारी झोपलेलं अत्यंत दुर्मिळ असे जोडपं सापडलं.

अतिशय दुर्मिळ अशी ही ‘जोडप्याची कबर’. जवळपास दोन वर्षं या जोडप्याच्या मृत्यूच्या कारणांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.

उत्तर भारतात हरियाणाच्या भागात राखीगढी हे गाव आहे. त्यात हे अवशेष सापडले. ह्या जोडप्यांना कबरीमध्ये पुरले असावे.

अर्धा मीटर खोल त्या दोघांना पुरले होते. त्यांच्या हाडांच्या सांगाड्यावरून असे लक्षात येते की त्यांचे आरोग्य उत्तम असावे. तसेच त्यांच्या शरीरावर कोणत्याही प्रकारच्या जखमा देखील आढळून आल्या नाहीत.

त्यामुळे दोघांनाही कोणत्या तरी कारणाने पुरले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

इतिहास तज्ञांनी अभ्यास केल्यावर असे लक्षात आले की यात पुरूषाचे वय मरण पावले तेव्हा ३५ असावे आणि उंची ५.८ फूट असावी. तर स्त्रीचे वय २५ असावे आणि उंची ५.६ असावी.

पण पुरुष आणि स्त्री हे जोडपे एकाच वेळी नैसर्गिकरित्या मरण पावले असावेत असा अंदाज डॉ. वसंत शिंदे यांचा आहे.

 

vasant-shinde-inmarathi

 

संशोधनकर्त्यांना सांगाड्यांवर कुठेही जखम, हाडांवर कसल्याही प्रकारच्या रेषा किंवा कवटीच्या हाडावर कुठेही असामान्य फुगवटा किंवा जाडी दिसली नाही.

त्यामुळे दोघांना जखम किंवा मेंदूतापासारखा काही आजार झाला असण्याची शक्यता नाही.

यावरून मृत्यूच्यावेळी दोघेही सुदृढ होते, असा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला आहे. तसेच त्याकाळी ज्या पद्धतीने अंत्यसंस्कार करण्याची प्रथा होती, तसा हा प्रकार नाही, असं पुरातत्व शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

दोघांचाही ‘मृत्यू एकाचवेळी झाला असावा आणि म्हणून त्यांना एकत्रच एका कबरीत पुरलं असावं’, असं त्यांना वाटतं.

यावरून असे लक्षात येते की राखीगढी या नगराला सुध्दा ऐतिहासिक वारसा हडप्पा संस्कृतीप्रमाणे लाभला असावा. तेथे बरेच उत्खनन झाले आहे.

 

rakhigadhi-inmarathi

 

एका उत्खननात धान्याची कोठारं मिळाली राखीगढी इथल्या उत्खननात पाच पिढ्यांची घरं आढळून आली आहेत. त्यात धान्याची मोठी कोठारं आढळून आली असून, संपूर्ण गावाचं हे कोठार असल्याचं दिसून येतं.

धान्याची कोठारं मातीने सारवलेली असून, धान्याला कीड लागू नये, यासाठीचीसुद्धा व्यवस्था केलेली दिसून येते.

कोठारात तांदूळही मिळाले आहेत. उत्खननात सात खोल्या आढळून आल्या असून उत्कृष्ट रंगकाम केलेली मातीची भांडी, लाल दगडापासून बनवण्यात आलेले मणी, त्रिकोणी आकाराच्या सजावट केलेल्या, नक्षीकाम केलेल्या टेराकोटाच्या बांगड्या, कुंभाराचा आवा, मऊ दगडापासून तयार केलेला एकशिंगी प्राणी, पाच अक्षरं (अद्याप ही अक्षरं ओळखता आलेली नाहीत) असे पुरावं मिळाले आहेत.

इस.पूर्व ४५०० ते १५०० अर्थात साडेसहाशे हजार वर्षांपूर्वीचा आहे. याचा अर्थ ‘घगर खोऱ्यातून’ ही संस्कृती विकसित होत ती सिंधू संस्कृतीचा भाग झाला असल्याची शक्‍यता आहे.

 

rakhigadhi-grave-inmarathi

 

जगातील सर्वांत मोठे उत्खनन असल्यामुळे ‘राखीगडी’ला ‘जागतिक वारसा’ मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

===

हे ही वाचा – चक्क मुंबईच्या आत दडलेल्या या जुन्या गावाची भन्नाट कथा वाचून तुम्ही थक्क व्हाल!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?