'इतिहास घडलाय! भारतीय वायू दल चीनपासून अवघ्या ६० किमी अंतरावर पोहोचलंय!

इतिहास घडलाय! भारतीय वायू दल चीनपासून अवघ्या ६० किमी अंतरावर पोहोचलंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारताची तिन्ही सशस्त्र दले कायम देशाच्या सुरक्षेसाठी झटत असतात हे तर आपल्याला माहीतच आहे आणि त्याचे पुरावे वारंवार त्यांच्या कृतीतून दिसतातच.

आपल्या सशस्त्र दलातील अतिशय धाडसी, शूर आणि बुद्धिमान असलेले लोक व्यवस्थित योजना आखून त्यांची कार्ये पूर्ण करतात आणि यश मिळवतात.

आपल्या एका बाजूला पाकिस्तानसारखा उपद्रवी शत्रू आहे तर दुसऱ्या बाजूला चीन धूर्तपणे चाली खेळत कायम आपल्या देशाचा भूभाग गिळंकृत करण्याच्या प्रयत्नांत असतोच.

ईशान्येकडील राज्यांत कायम घुसखोरीचे प्रयत्न सुरु असतात.ते हाणून पाडण्यासाठी आपले सैन्य, वायुसेना कायमच डोळ्यात तेल घालून दक्ष असतात.

 

iaf-inmarthi
defence.com

नुकतेच भारतीय वायुसेनेचे AN -३२ हे वाहतूक करणारे विमान सिक्कीमच्या पाकयाँग विमानतळावर वायुसेनेने यशस्वीरीत्या उतरवले.

पाक्योंग विमानतळ हे भारताच्या ईशान्येला असलेल्या सिक्कीम राज्यात आहे. 

ह्या विमानतळाला सिक्कीम विमानतळ असेही म्हटले जाते. अतिशय खडकाळ व दुर्गम भागात हे विमानतळ आहे.

समुद्रसपाटीपासून ४,५०० फुटांवर असलेले हे विमानतळ सर्वात उंच ठिकाणी असलेल्या पाच विमानतळांपैकी एक आहे.

हे भारतातील शंभरावे विमानतळ आहे. ईशान्य भारत हा दुर्गम भूप्रदेश आहे.

 

pakyong-inmatathi
wyrta.com

मागील वर्षापर्यंत सिक्कीमला जाण्यास थेट विमानसेवा उपलब्ध नव्हती.

सिक्कीमची राजधानी असलेल्या गंगटोक शहरापासून १२५ किमी असलेल्या बागडोग्रा ह्या पश्चिम बंगालमध्ये असलेल्या ठिकाणी विमानतळ आहे. पण तिथून नंतरचा गंगटोक पर्यंतचा ५ तासांचा प्रवास मात्र रस्त्याच्या मार्गाने करावा लागत असे.

पाक्योंग हे ग्रीनफिल्ड विमानतळ गंगटोकपासून ३५ किमी लांब आहे. ईशान्य भारतातील हे पहिलेच ग्रीनफिल्ड विमानतळ असून सिक्कीममधील पहिले विमानतळ आहे.

ह्या विमानतळामुळे सिक्कीम वायुमार्गाने जोडले गेले. ह्या विमानतळाचे उद्घाटन २४ सप्टेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या हस्ते झाले.

काहीच काळात हे विमानतळ आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्याची योजना आहे.

 

Pakyong-Airport-inmarathi
traveltriangle.com

ह्या विमानतळाच्या बांधकामाची सुरुवात २००९ सालीच झाली होती परंतु काही अडचणींमुळे ते काम स्थगित झाले.

नंतर २०१४ साली पुन्हा विमानतळाचे काम सुरु झाले आणि २०१८ सालपर्यंत सगळे काम पूर्ण होऊन ५ मार्च २०१८ रोजी भारतीय वायुसेनेचे डॉर्नियर २२८ हे विमान पाक्योंगच्या हवाई पट्टीवर पहिल्यांदा उतरले.

हे विमानतळ २०१ एकर जमिनीवर बांधण्यात आले आहे आणि इंजिनियरिंगचा उत्तम नमुना आहे.

पाक्योंग गावापासून दोन किमी लांब समुद्रसपाटीपासून ४५०० फूट उंच असलेल्या एका डोंगरावर हे विमानतळ द एरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाने बांधले आहे.

इतक्या उंच ठिकाणी हे विमानतळ बांधण्यासाठी सॉईल रिइन्फोर्समेंट आणि स्लोप स्टॅबलायजेशन ह्या तंत्रांचा वापर करण्यात आला आहे.

 

sikkim-airport-inmarathi
thefactexpress.com

हे विमानतळ बांधण्यासाठी सुमारे ६०५ कोटी रुपयांचा खर्च आला. ह्या विमानतळावर एयर ट्रॅफिक कण्ट्रोल टॉवर तसेच अग्निशमन केंद्र, दोन अत्याधुनिक CFT, प्रवाश्यांसाठी एक टर्मिनल बिल्डिंग, हाय इंटेन्सिटी रनवे लाईट्स आणि ५० वाहनांसाठी पार्किंग ह्या सुविधा देण्यात आल्या आहेत.

इंडो-चायना बॉर्डरपासून हे विमानतळ फक्त ६० किमी लांब आहे.

ह्या विमानतळावर जी रिइन्फोर्समेंट वॉल आहे ती ८० मीटर उंच बांधण्यात आली आहे व ही जगातील सर्वात उंच रिइन्फोर्समेंट वॉल्स पैकी एक आहे.

तर ह्या चीनच्या सीमेजवळच्या विमानतळावर भारतीय वायुसेनेने गेल्या बुधवारी म्हणजेच १६ जानेवारी २०१९ रोजी आपले विमान यशस्वीरीत्या उतरवले.

“विंग कमांडर एस के सिंग ह्यांच्या नेतृत्वाखाली हे AN ३२ विमान येथे उरतवण्यात आले.

 

an-32-inmarathi
aviationindia.com

हे विमान वायुसेनेत वाहतुकीसाठी उपयोगात आणले जाते. हे रशियन बनावटीचे टर्बोप्रॉप प्रवासी विमान आहे. ह्या उंच व दुर्गम ठिकाणी असलेल्या पाक्योंग एयरफिल्डवर AN-32 सारख्या विमानाचे पहिल्यांदाच लँडिंग झाले”, असे वायुसेनेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

ह्याच वर्षी १४ जानेवारी रोजी भारतीय वायुसेनेचे C-130J हे विमान प्रथमच अरुणाचल प्रदेशच्या तेझु एयरफिल्ड वर उतरवण्यात आले होते.

ह्या विमानाचे लँडिंग दिवसा व रात्री सुद्धा यशस्वीपणे करण्यात आले.

वायुसेनेच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या संवेदनशील भागात सैन्याची हालचाल वाढवण्यासाठी आणि वेळेत सामग्री पोचवण्यासाठी हे लँडिंग करण्यात आले.

२०१७ साली डोकलामची समस्या भारतापुढे उभी राहिली होती. त्यापासून धडा घेऊन सुमारे ४०००किमी असलेल्या चीनच्या सीमेजवळील भागात पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत.

 

doklam-marathipizza
amazonaws.com

मागच्या वर्षी मार्चमध्ये भारतीय वायुसेनेचे C-17 ग्लोबमास्टर हे सर्वात मोठे विमान अरुणाचल प्रदेशच्या तुटींग एयरफिल्डमध्ये उतरवण्यात आले होते. तुटींग हे गाव चीनच्या सीमेजवळच आहे.

तर अशा रीतीने भविष्यात कधी चीनने युद्ध लादले तर, कधी युद्धजन्य परिस्थिती उद्भवली तर सीमेलगतच्या दुर्गम प्रदेशातही सैन्य आणि युद्धसामग्री लवकरात लवकर पोहोचू शकेल ह्यासाठी भारत संपूर्ण तयारी करीत आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “इतिहास घडलाय! भारतीय वायू दल चीनपासून अवघ्या ६० किमी अंतरावर पोहोचलंय!

 • January 21, 2019 at 4:53 pm
  Permalink

  good information

  Reply
 • February 12, 2019 at 3:09 pm
  Permalink

  छान

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?