' हे गाणं ऐकून १०० पेक्षा जास्त लोकांनी चक्क स्वतःचा जीव गमावला… – InMarathi

हे गाणं ऐकून १०० पेक्षा जास्त लोकांनी चक्क स्वतःचा जीव गमावला…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

संगीत हे आपल्या जीवनावर खूप प्रभाव पाडत असतं. कधी कंटाळा आला किंवा बोर वाटायला लागलं की तुमचं आवडतं गाणं ऐका, मग बघा मूड कसा ठीक होतो ते!

म्हणजेच माणसाच्या मनावर आणि भावनांवर संगीत भुरळ घालतं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पण समजा आम्ही तुम्हाला सांगितलं की जगाच्या इतिहासात एका अश्या गाण्याने जन्म घेतला होता जे गाणं ऐकून कित्येक लोकांनी आत्महत्या केल्या आहेत, तर???

 

gloomy sun day inmarathi
the 13th floor

 

तुम्ही लगेच या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही, पण ही गोष्ट संपूर्ण जाणून घेतल्यावर कदाचित तुमचा विचार बदलू शकतो.

या गाण्याचं नाव आहे ‘Gloomy Sunday’! हे गाणं ऐकून जवळपास १०० हून अधिक लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे.

हे गाणं ज्या व्यक्तीने लिहील आणि संगीतबद्ध केलं होतं त्या व्यक्तीच्या मृत्यूशी या गाण्याचा जवळचा संबंध असल्याचे आढळून येते.

या गाण्याचे इंग्रजी बोल पुढीलप्रमाणे आहेत- ग्लूमी संडे

Gloomy is Sunday, with shadows I spend it all
My heart and I have decided to end it all
Soon there’ll be candles and prayers that are sad, I know
Let them not weep, let them know that I’m glad to go
Death is no dream, for in death I’m caressing you
With the last breath of my soul I’ll be blessing you.

 

gloomy-sunday-marathipizza

हंगेरियन पियानीस्ट आणि संगीतकार Rezsó Seress यांनी १९३२ साली हंगेरियन भाषेत Gloomy Sunday हे गाणं लिहिलं होतं.

त्यावेळेस त्यांचे वय केवळ ३४ वर्ष होते आणि संगीत क्षेत्रात नाव कमवण्यासाठी त्यांची धडपड सुरु होती.

असे म्हटले जाते की त्यांची प्रेयसी त्यांना सोडून गेल्यावर ते अतिशय दु:खात होते आणि त्या कठीण काळातच त्यांनी Gloomy Sunday हे गाणं लिहीलं.

तर काहींच्या मते Seress यांनी त्यावेळच्या युद्धाचे वर्णन आणि जगाचा होणारा शेवट सांगण्यासाठी हे गाणे लिहिले होते.

 

gloomy-sunday-marathipizza01
latestly

हे गाणं वाचताना जितकं दु:ख व्हायचं त्यापैकी जास्त दु:ख गाणं ऐकताना व्हायचं, इतकं रडकं संगीत या गाण्याला दिलं होतं.

 

Rezsó Seress चं मूळ गाणं ऐकल्यावर László Jávor या कवीने स्वत:च्या भाषेत गाण्याचे नवीन बोल लिहिले. Pál Kalmár यांनी नवीन गाणं १९३५ साली हे गाणं रेकॉर्ड केलं. ज्याचा अर्थ होता ,

माझ्या प्रेयसीच्या मृत्यनंतर जीवनात काहीच उरलेलं नाही, म्हणून मला देखील आत्महत्या करून तिच्याजवळ जायचे आहे.

ही दोन गाणी रिलीज झाल्यावर ती ऐकल्यामुळे हंगेरी आणि अमेरिका देशामध्ये एकूण १९ लोकांनी आत्महत्या केल्याची नोंद सापडते.

परंतु या सर्व आत्महत्या गाणं ऐकूनच झाल्या आहेत याबद्दल सबळ पुरावा मात्र देण्यात आलेला नाही.

१९३६ साली Sam M. Lewis यांनी हंगेरियन भाषेतील हे गाणं इंग्रजीमध्ये लिहिलं आणि त्याच वर्षी Hal Kemp यांनी इंग्रजीमध्ये गाणं रेकॉर्ड केलं.

 

gloomy sudnay inmarathi
YouTube

 

इंग्रजी भाषेमधील Sam M. Lewis यांचे बोल देखील ऐकणाऱ्याला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करतील असेचं होते.

त्याच वर्षी Desmond Carter यांनी लिहिलेले अश्याच आशयाचे गाणे Paul Robeson यांनी रेकॉर्ड केले. या दोन गाण्यांना म्हणावी तेवढी प्रसिद्धी मिळाली नाही.

परंतु १९४१ साली Sam M. Lewis यांनी लिहिलेलं गाणं Billie Holiday या गायिकेच्या आवाजामध्ये रेकॉर्ड करून रिलीज केलं गेल आणि या गाण्याला भयंकर प्रसिद्धी मिळाली.

“Hungarian Suicide Song” या नावाखाली या गाण्याच्या कॅसेटने जगभर अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरुवात केली.

 

gloomy sudnay record inmarathi
orbit records

 

पोलिसांच्या नोंदीनुसार ज्या लोकांनी हे गाणं ऐकून आत्महत्या केली, त्यापैकी काहींच्या हातामध्ये गाण्याचा कागद सापडला, तर काहींनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये गाण्याचे बोल आढळून आले.

दोन व्यक्तींनी तर गाणं ऐकताना स्वत:च्याचं डोक्यात गोळी झाडून घेतल्याची देखील नोंद आहे.

१९४० च्या सुरुवातीला या गाण्यावर हंगेरीमध्ये बंदी घालण्यात आली. काही काळाने रेडियोवर या गाण्याचं केवळ संगीत चालवण्यास परवानगी देण्यात आली.

परंतु गाण्यांच्या शब्दांवर अजूनही बंदी होती. १९३२-१९४० या काळात १०० पेक्षा जास्त लोकांनी गाणं ऐकून आत्महत्या केल्याची नोंद आहे.

 

gloomy sunday suicides inmarathi
YouTube

 

या गाण्याशी निगडीत अनेक आत्महत्येच्या कथा तुम्हाला इंटरनेटवर सापडतील. त्यापैकी एक घटना अशी आहे की,

एका संध्याकाळी एका गार्डने व्हायोलिनिस्टला Gloomy Sunday गाणं वाजवण्यास सांगितलं, तो त्याला वारंवार गाणं वाजवण्यास सांगू लागला.

अश्याप्रकारे बऱ्याच वेळ गाणं ऐकल्यावर हा गार्ड बाल्कनीच्या दिशेने चालत गेला आणि त्याने बाल्कनी मधून थेट खाली उडी मारत आत्महत्या केली.

 

gloomy-sunday-marathipizza03

 

मूळ गाण्याचे गीतकार Rezsó Seress यांनी देखील १३ जानेवारी १९६८ रोजी आत्महत्या करण्याच्या उद्देशाने आपल्या अपार्टमेंट मधून खाली उडी मारली, परंतु त्यांचा मृत्यू झाला नाही.

त्यांना थेट इस्पितळामध्ये हलवण्यात आलं. पण तेथे मात्र त्यांनी वायरने स्वत:चा गळा घोटून आत्महत्या करत स्वत:ची जीवनयात्रा संपवली.

Rezsó Seress हे Gloomy Sunday च्या यशामुळे अधिकच दु:खी झाले, कारण त्यांना आशा नव्हती की ते पुन्हा इतकं सुंदर आणि प्रसिद्ध गाणं लिहु शकतील.

अशी आहे या अपशकुनी गाण्याची दुर्दैवी गोष्ट !!!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?