' "आम्हाला मागासलेले कसे म्हणता?" विवेकानंदांनी गोऱ्यांना केला होता खडा सवाल!

“आम्हाला मागासलेले कसे म्हणता?” विवेकानंदांनी गोऱ्यांना केला होता खडा सवाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : निखिल सोनजे

===

“माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो .. ” असं म्हणून स्वामी विवेकानंदांनी १८९३ साली शिकागो येथे झालेल्या जागतिक धर्मसंसदेत सर्वांना अचंबित केले!

शिकागो येथे विवेकानंदांनी मिशनऱ्यांचा ख्रिश्चन धर्म सर्वोत्तम असण्याचा गैरसमज दूर केला, तसेच आपण सर्व पापी आहोत आणि आपण

येशूला मानलं तरच आपली सुटका होईल हादेखील चुकीचा समज त्यांनी खोडून काढला. प्रसारमाध्यमे, इतर क्षेत्रातील दिग्गजसुद्धा हिंदू धर्माकडून बरंच शिकण्यासारखं आहे असं मानू लागले.

परंतु, हे ख्रिस्ती धर्मप्रचारक – मिशनऱ्यांना काही रुचलं नाही. जेव्हा विवेकानंदांनी डेट्रॉईट येथे फेब्रुवारी ते मार्च १८९४ दरम्यान जाहीर व्याख्यानं दिली तेव्हा तर ह्या मिशनऱ्यांचा असंतोष अजून वाढला.

 

Swami_Vivekananda02-marathipizza

 

असं काय म्हणाले विवेकानंद ह्या व्याख्यानांमध्ये!? तेच आपण ह्या लेखात वाचणार आहोत!

डेट्रॉईटला आल्यावर पहिल्याच मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले – “भारत हा भौतिकदृष्ट्या खूपच मागास आहे, तर आम्ही तुमच्या मायभूमीला महान कसं म्हणू शकता?”

विवेकानंदांनी खूप सुंदर उत्तर दिलं –

“भारताने कधीही परकीयांवर आक्रमणं केली नाहीत. लुटालूट केली नाही! भारतात सर्वात प्राचीन धर्म आहे जो वेदांमधून जन्माला आला.

ह्या धर्माने खूप पूर्वीच जाहीरपणे सांगितलंय कि मानवतेचं अंतिम साध्य स्वत:चं अनादी, अनंत स्वरूप जाणून घेणं हे असलं पाहिजे!”

त्यांच्या जाहीर व्याख्यानांची theme ” भारताची एक सभ्यता म्हणून महानता” अशीच होती.

भारतावर अनेक परकीयांनी आक्रमणे केली परंतु स्थानिक धर्माची, संस्कृतीची हानी होऊनही ती अजून टिकून आहे असं ते म्हणाले.

भारतात ख्रिस्ती मिशनऱ्यांची अजिबात गरज नाही असं ते म्हणतात. इथला स्थानिक धर्म जर माणसांवरच नव्हे तर सर्व प्राणिमात्रांवर दया करणारा असेल तर धर्मांतरणाची गरजच काय? असा खडा सवाल त्यांनी केला.

ख्रिस्ती मिशनर्यांचा उद्धटपणा इतका होता (आहे) की ते परधर्मीयांवर टीका करू शकत होते आणि इतरांनी मात्र आम्हाला शिकवू नये असा attitude ठेऊन ते त्यांच्यावर टीका करणाऱ्यांवर आक्रमणं करत होते.

 

missionary-inmarathi

 

मिशनर्यांची कामे विवेकानंदांच्या टीकेचं कारण बनली होती. विवेकानंद म्हणतात की – ह्यांचा मुख्य उद्देश धर्मांतरण करणे हाच आहे. मानवतावादी विचार वगैरे सर्व खोटं आहे.

स्थानिक लोकांना आर्थिक आणि इतर बाबतीत मदत ही फक्त एक फूस आहे – ख्रिस्ती धर्म स्वीकारण्यासाठी.

भारतात काही मिशनऱ्यांनी शैक्षणिक संस्था सुरु केल्या आहेत. पण ह्या संस्थांमधून जर राष्ट्रवादाच्या विरोधात जाणारं शिक्षण दिलं जात असेल तर ह्याला चांगलं काम म्हणावं काय?

राजकीय आणि आर्थिक वसाहतवादासोबतच धार्मिक वसाहतवाद पसरवणे हेच यांचं उद्दिष्ट आहे. मिशनऱयांनी कितीही मूर्तीपूजेला नावं ठेवली तरी इथले हिंदू हे मूर्तिपूजा करणारे आहेत….

आणि ते करतच राहणार!

असं नाहीये कि विवेकानंदांनी फक्त टीकाच केलीये. काही मिशनर्यांचं कौतुक देखील केलंय त्यांनी.

डॉक्टर जेम्स लॉन्ग, ज्यांनी “इंडिगो”चं  बळजबरी पीक घेणाऱ्या ईंग्रजांवर जबर टीका केली होती. त्या जेम्स लॉन्गचं कौतुक विवेकानंद करतात.

 

indigo-inmarathi

प्रसारमाध्यमांमधून आणि फक्त काही आठवडे भारतात राहून प्रवासवर्णनं असणाऱ्या पुस्तकांमधून भारताची बदनामी जगभरात सुरु आहे असं त्यांचं मत होतं.

भारताचं खरं वर्णन जाणून घेण्यासाठी कुठली पुस्तकं वाचावीत ह्याचं देखील समाधान ते करतात.

सर विल्यम विल्सन हंटर यांचं “A Brief History of the Indian People” हे पुस्तक सर्वांनी वाचावं असं त्यांनी आवाहन केलं होतं.

भारतात हिंदूंमधे अनेक अंधश्रद्धा आहेत असा प्रचार त्यावेळी जोर धरत होता.

त्यातल्या काही खोट्या गोष्टी म्हणजे भारतातल्या स्त्रिया नवजात बाळं मगरीला खायला देतात, जगन्नाथ रथाखाली लोक जीव देतात आणि सती प्रथा!

यावर त्यांचा एक विनोदी प्रतिसाद –

“माझ्या आईने मला जेव्हा मगरीसमोर फेकलं तेव्हा त्यांनी मी खूप स्थूल (लठ्ठ) असल्यामुळे खाण्यास नकार दिला”

असा विनोदी reply ऐकून देखील एका पत्रकाराने फक्त नवजात मुलींना मगरीस खाण्यासाठी फेकतात का? असा प्रश्न विचारला…. किती हा कर्मदरिद्रीपणा!

जगन्नाथ रथयात्रेसमयी रथाची मोठी दोरी ओढण्याची प्रथा आहे त्यावेळी दुर्दैवाने काहींच्या हातून दोरी निसटत असे आणि रथाच्या चाकाखाली येऊन त्यांचा अपघाती मृत्यू होत असे.

ह्याचं भलतच interpretation पाश्चिमात्त्य देशात मिशनर्यांनी केलं असं स्पष्टीकरण विवेकानंद देतात.

 

puri-inmarathi

 

सती प्रथेबद्दल त्यांचं प्रत्युत्तर ऐकून बऱ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसेल (ज्यांना हिंदू तत्वज्ञानाचा थोडाबहुत गंध आहे त्यांना काळजी करण्याचं कारण नाही )  – हा अपप्रचार आहे!

काही स्त्रिया त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर स्वतःहुन चितेत उडी घेत असत.

हिंदूधर्माप्रमाणे आत्म्याचं फक्त शरीर बदलत असतं, तर आपल्या पतीच्या ह्या transformation मध्ये आपणही स्वत:ला ट्रान्सफॉर्म करावं असं काहींना वाटत असे.

तरीही ब्राम्हण आणि विद्वान त्या स्त्रीला असं करू नको असा सल्ला देत असत (किती वोल्टचा झटका बसला!? मोजून बघा).

ती स्त्री आगीत हात वगैरे धरून संपूर्ण क्रियेचा  शारीरिक पातळीवर अंदाज घेत असे आणि मगच तिचा निर्णय घेत असे. ( आता तुम्हीच ठरवा कि राजा राममोहन रॉय खरे कि विवेकानंद)

एवढं बोलूनही विवेकानंद थांबले नाहीत,

त्यांनी अमेरिकेतील Salem (मॅसॅच्युसेट्स राज्यातील एक ठिकाण) येथे नुकत्याच घडलेल्या “witch hunting” चं उदाहरण देऊन सांगितलं कि पाश्चिमात्त्य देशांमध्ये चेटकीण जाळण्याचे प्रकार सर्रास होत आहेत!

 

Witch-Hunt-inmarathi01

 

भारताबद्दल आणि हिंदू धर्माबद्दल आणखी एक अपप्रचार त्यावेळी होत होता तो म्हणजे इथलं मागासलेपण. त्यावर विवेकानंद म्हणतात कि – प्राचीन असणं म्हणजे मागास असणं नव्हे!

आम्ही मूर्त्यांची पूजा करत नाही! आम्ही मूर्त्यांच्या माध्यमातून पूजा करतो!

हिंदू धर्म हा सर्वांना सामावून घेणारा आणि प्रत्येकाला आपली परंपरा जोपासण्याची परवानगी देणारा धर्म आहे.

भारतातले लोक tolerant आहेत. आमचे लोक कधी तुमच्याकडे धर्मप्रचारासाठी आलेले आठवतंय का? तुम्ही म्हणता “आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करा”

…पण आमचा धर्म म्हणतो कि स्वत:पेक्षा दुसऱ्यांवर जास्त प्रेम करा! मग आम्ही मागास कसे?

स्वामीजींनी त्यांच्या जाहीर व्याख्यानांमधून अमेरिकेतील स्त्रियांचे एक स्वतंत्र आणि बुद्धिमान म्हणून कौतुक केले. तिथल्या यंत्रांचे, हॉस्पिटल्स, समाजसेवा करणाऱ्या संस्थांचे देखील कौतुक केले.

विवेकानंद काय म्हणाले होते त्याचा हा “जसे आहे तसे” मांडण्याचा प्रयत्न!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on ““आम्हाला मागासलेले कसे म्हणता?” विवेकानंदांनी गोऱ्यांना केला होता खडा सवाल!

 • January 12, 2019 at 2:37 pm
  Permalink

  १.व्यास मुनी आर्य होते..आर्य आले आग्नेय युरोप मधून..मग त्यांनी सिंधू नदी काठी वस्ती केली..मग आग्नेय युरोपमध्ये कुठला धर्म अस्त्थित्वात होता का?२. ब्रम्हवैवर्त ग्रंथामध्ये लिहीलयं..परमेश्वराची मूर्ती बनवून उपासना करणारा एखाद्या बैलासाठी चारा वाहणार्‍या गाढवाप्रमाणे आहे.३. अधमा प्रतिमा पूजा – मूर्तीपूजा पाप आहे.४. भविष्यपुराण – प्रतिसर्गपर्व – तृतीय खंड – अध्याय द्वितीय – (व्यासमुनी लिहीतात, येशू ख्रिस्त परमेश्वराचा पुत्र जो कुमारीच्या पोटी जन्मेल..कुमारीगर्भसंभवम)५. हिंदू, बौद्घ, मुस्लिम, शीख धर्मग्रंथात येशूला परमेश्वराचा पुत्र का म्हटलं आहे?६. आदामाला कालिने भुलवलं (भविष्यपुराणानुसार)..मग त्यावर परमेश्वराने त्यातून बाहेर येण्यासाठी कुठला मार्ग काढला?

  Reply
 • January 12, 2019 at 3:28 pm
  Permalink

  आभारी

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?