'भारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

भारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

भारतीय पोलीस सेवा ही अतुलनीय सेवा मानली जाते. सदैव तत्पर राहणे हीच या सेवेची खरी भावना आहे. २४ तास जनतेची सेवा करणे, कुठल्याही क्षणी अपराधाला पकडण्यासाठी तयार राहणे आणि जर गरज पडलीच तर भारतीय पोलीस जनतेसाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावायला मागेपुढे बघत नाहीत.

या भारताला वैभवशाली मार्गावर नेण्यासाठी सर्वात मोठा वाटा हा भारतीय पोलिसांचाच आहे आणि सामान्य नागरिकांना त्यांच्या अतुलनीय कर्तुत्वाची जाणीव करुन देणे हा या लेखाचा उद्देश आहे.

खाली काही पोलिस अधिकाऱ्यांची माहिती दिलेली आहे त्यांची नावे कदाचित आपण ऐकली असतील कदाचित नाही…पण, या सर्वांचे कर्तुत्व आणि शौर्य ज्यावेळी आपण वाचाल तेव्हा नक्कीच या पोलिस खात्याबद्दल बोलताना तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल.

हेमंत करकरे

यात पहिलं नाव येतं ते म्हणजे हेमंत करकरे यांचे, त्या दुर्दैवी रात्री, २६ नोव्हेंबर २००८ रोजी महाराष्ट्राचे दहशतवादी विरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे घरी निघाले होते आणि त्यांना माहिती मिळाली की ओबेरॉय हॉटेल येथे काही शस्त्रधारी अंदाधुंद गोळीबार करत आहेत.

 

Hemant-Karkare-inmarathi
livelaw.in

आणि जेव्हा ही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली त्यावेळी खरं म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे जास्त परिस्थिती गंभीर होती.

आणि मग काही अधिकार्‍यांना सोबत घेत ते दहशतवाद्यांशी दोन हात करण्यासाठी निघून गेले.

अजमल कसाबला लक्ष करत त्यांनी गोळीबार केला पण दुर्दैवाने दुसऱ्या एका दहशतवादाच्या गोळीबाराचे ते बळी ठरले. करकरे नेहमीच त्वरित हालचाल करण्यासाठी प्रसिद्ध होते ते त्यांच्या सुरक्षेची तसूभरही काळजी करत नसत करकरे.

 विजय साळसकर

मुंबईचे गुन्हेगारी जगत यांच्या नावाने थरथरत असे. विजय साळस्कर यांचे एवढेच वर्णन त्यांचं कर्तुत्व सांगण्यासाठी पुरेस अाहे.

 

vijay-salaskar-inmarathi
Tentaran.com

खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख असलेले साळस्कर यांनी त्या रात्री करकरे यांना सोबत दिली अत्यंत शौर्याने दहशतवाद्यांना तोंड दिल्यानंतर काही वेळाने मात्र साळसकर ही याच दहशतवाद्यांच्या गोळीबाराला बळी पडले.

अशोक कामटे

जेव्हा आपण करकरे आणि साळस्कर यांच्या बद्दल बोलतो तेव्हा आपण मुंबईचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त अशोक कामटे यांना विसरू शकत नाही.

 

ashok-kamte-inmarathi
Tentaran.com

अशोक कामटे हे त्यचा पथकातील आहेत ज्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी उपस्थिती दर्शवली आनी हालचाल केली.

कामटे हे एक निर्भयअधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.कामटे आपल्या पथकासोबत लीलया मिसळत असत. कामटे प्रसिद्ध धावपटू होते. त्यांना व्यायामाची ही खूप आवड होती.

कामटे यांनी डिपार्टमेंट साठी तसेच यूएम साठी अनेक पदके मिळवली आहेत अशा व्यक्तिमत्त्वाला सलाम.

मोहनचंद शर्मा

शर्मा हे दिल्ली पोलिसांचे एन्काऊंटर स्पेशलिस्ट अधिकारी म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलेले आहे तर ८० दहशतवाद्यांना जेरबंद केलेले आहे.

 

mohan-sharma-inmarathi
deccanchronicles.com

पण ते सर्वात जास्त प्रसिद्ध यासाठी आहेत की त्यांनी २००८ मध्ये बाटला एनकाउंटर पथकाचे नेतृत्व केले होते.

४१ व्या वर्षी दिल्ली येथील एका छोट्याशा चकमकीमध्ये त्यांना दुखापत झाली. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी निष्ठुर दहशतवाद्यांशी निकराने लढा दिला. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही कारण त्या चकमकीतील दोन दहशतवादी मारले गेले तर दुसऱ्या दोघांना पकडण्यात आले.

विनोद कुमार चौबे

२००९ मध्ये रायपूर येथे ज्यावेळी विनोद कुमार चौबे यांच्याकडे अशी माहिती आली की काही नक्षलवाद्यांनी २ पोलिसांना मारून टाकले.

त्यावेळी त्यांनी तेच केले ज्यासाठी ते प्रसिद्ध होते.

 

Vinod-Kumar-Choubey-inmarathi
thebureaucratnews.com

त्यांनी एक पथक तयार केले आणि या पथकाचे स्वतःचे नेतृत्व करत असताना नक्षल्यांच्या हल्ल्याला ते निडरपणे सामोरे गेले. नक्षल्यांशी लढणे हे काही त्यांच्यासाठी नवीन नव्हते पण दुर्दैवाने यावेळी काळाने त्यांचा घात केला. ते ४९ वर्षाचे होते ज्यावेळी त्यांनी त्यांचा जीव गमावला. ते निडरपणे लढा देण्यासाठी प्रसिद्ध होते.

शिवदीप वामन लांडे

कुठल्याही बॉलीवूडच्या पटकथेला लाजवेल असा या माणसाचा दरारा आहे.

 

Shivdeep Waman Lande-inmarathi
scoopwhoop.com

पटना शहर म्हणजे गुंडांचं शहर असं एक समीकरण तयार झालेलं होतं पण जे व्हा लांडेंनी जबाबदारी स्वीकारली तेव्हापासून त्यांनी सर्व समीकरणच बदलून टाकली.

वन मॅन आर्मी चरित्राचा माणूस चुलबुल पांडे लाही प्रेरणा देऊ शकतो कारण ज्यावेळी हा माणूस कारवाई करतो त्यावेळी शहरातील गुन्हेगारीचा दर मात्र नक्कीच कमी होतो.

फक्त दहा महिन्यांमध्ये त्यांनी फक्त औषधी माफीयालाच उध्वस्त नाही केले तर त्यांनी अवैध वाईन शॉप तसेच शहरात वाहतुकीचे कायदे तंतोतंत पाळले जातील याकडेही लक्ष दिले.

त्यांनी त्यांच्या मेहनतीने जनसामान्यांची मनेही जिंकली. त्यांनी शहरातील प्रत्येक जनसामान्याला त्यांचा नंबर दिलेला होता जेणेकरून अडचणीच्या काळी ती व्यक्ती मदतीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल.

लांडे यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे पोलिसांना खरा हिरो म्हटले जाते एवढे मात्र नक्की.

के प्रसाद बाबू

पोलीस उपनिरीक्षक जे नक्षलवादी विरोधी पथकाचे सदस्य आहेत. प्रसाद नक्षल्यांशी लढा देण्यासाठी प्रसिद्ध आहेत.

 

k-prasadbabu-inmarathi
Indiatimes.com

त्यांनी एका ऑपरेशनमध्ये अत्यंत निकराने लढा दिला, त्यासोबतच ४ जवानांचे जीव वाचवले आणि ९ नक्षल्यांना कंठस्नान घातले.

ही घटना छत्तीसगड आणि आंध्रप्रदेश या सीमेलगत घडली. प्रसादकडील गोळ्यांची संख्या कमी असतानाही आणि जखमी असतानाही प्रसाद एखाद्या वाघासारखा लढत होता. त्याने देशासमोर त्याच्या बलिदानाने एक आदर्श घालून दिला.

रुकसाना कौसर

यांना त्यांच्या शहरांमध्ये शेर बीबी असंही म्हटलं जातं. रुकसाना यांनी हे सिद्ध केलं की अन्यायाशी लढण्यासाठी तुम्ही अधिकारी असणं महत्त्वाचं नसतं.

 

rukhsana-inmarathi
Oneindia.com

हे करण्यासाठी तुमच्या मनात सर्वसामान्यांसाठी कणव आणि मनामध्ये दयाशीलता असन्याची गरज असते.

जेव्हा रुकसाना यांच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न काही दहशतवाद्यांनी केला त्यावेळी काश्मीरमधील ही कन्या त्यांच्या अन्यायाविरुद्ध निकराने लढली. तिच्या ह्या शौर्याबद्दल काश्मीर सरकारने तिला विशेष पोलीस अधिकारी म्हणून नियुक्त केले. तिच्या शौर्याला सलाम.

अजित कुमार डोवाल

भारताचा शेरलॉक होम्स असा ज्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेख होतो ते म्हणजे अजित डोवाल. एक पोलीस अधिकारी जे पुढे जाऊन भारताच्या एका प्रमुख खात्याचे प्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले.

 

ajit-doval-marathipizza05

आता त्यांचे कडे भारताचे संरक्षण विषयक सल्लागार अशी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या पूर्ण कार्यकाळामध्ये त्यांनी अनेक मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या आहेत.

त्यांना कीर्तिचक्र अवार्डनेही सन्मानित केलेले आहे जे फक्त सैन्यासाठी राखीव असते.

त्यांनी पाकिस्तानमध्ये सात वर्ष भूमिगत राहुन काम केले आणि तेथील अत्यंत महत्त्वाची माहिती भारतात पाठवली.

तेवढेच नाही तर १९८० त्या दरम्यान ज्या वेळेस सुवर्ण मंदिरामध्ये खलिस्तान चळवळी मार्फत हल्ला करण्यात आला त्यावेळी डोवाल अतिरेक्यांना मदत करण्याच्या बहाण्याने त्यांच्याशी भेटले आणि ही त्यांच्याकडची महत्त्वाची माहिती त्यांनी सैन्याकडे सुपूर्त केली.

व्ही व्ही लक्ष्मी नारायण

 

 

ज्या देशात भ्रष्टाचार आणि आपसातील सामंजस्यातून दडपले जाणारे खटले यासारख्या अनधिकृत गोष्टी या सर्वमान्य आहेत. अशा आपल्या भारत देशात असाही एक अधिकारी आहे ज्याने पारदर्शकपणे एम आर मालमत्ता घोटाळा, 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा, सत्यम घोटाळा यासारख्या अनेक घोटाळ्यांची चौकशी अत्यंत पारदर्शकपणे व कोणाचेही दडपण न घेता पार पाडल्या.

असे अधिकारी भारतात अस्तित्वात आहे हे जाणून जनसामान्यांना नक्कीच आनंद होईल.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “भारतीय पोलिसांच्या असामान्य बहादुरीच्या या कथा वाचून त्यांचा अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही

 • January 13, 2019 at 5:47 pm
  Permalink

  छान माहिती सांगितली, जे विद्यार्थी अधिकारी होण्याच्या वाटेवर आहेत त्यांच्यासाठी हे खुप मार्गदर्शन देणार आहे, त्यांच्यात उत्साह वाढेल. धन्यवाद

  Reply
 • January 16, 2019 at 11:14 am
  Permalink

  salute our jawans and police force

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?