तुमच्या स्वप्नातली राणी-Yamaha RX 100-पुन्हा येतीये?अफवा की सत्य?वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

=== 

एकेकाळी तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली एक दुचाकी परत येणार अशी बातमी बरेच दिवस झाले फिरत आहे.

होय, ही तीच दुचाकी ज्या दुचाकीवर आपल्या आधीची पिढी मनसोक्त फिरली, अनेक किस्से आहेत त्या दुचाकी बद्दल त्यांच्या मनात…

नाही म्हणायला आजच्या तरुणाईला पण ही दुचाकी मोठ्या प्रमाणात भुरळ घालत आहे.

म्हणूनच ज्यावेळी अशी अफवा पसरवली जाते की ‘यामाहा RX 100’ या दुचाकीचं प्रोडक्शन परत चालू करणार, त्यावेळी अनेक तरुणांना हुरूप आला. त्यांना असं भासु लागलं की त्यांच्या स्वप्नातली राणी परत सत्यात उतरू शकते.

 

rx100-inmarathi
Cartoq.com

पण ही बातमी खरी आहे का की फक्त अफवाच आहे? हे आपण या लेखामध्ये बघणार आहोत.

खरं बघायला गेलं तर या दुचाकी बद्दल आपलं असणारं प्रेम हे स्वीकार करण्याजोगं नक्कीच आहे पण आधुनिक तंत्रज्ञान बघता अशा प्रकारची एखादी जुनी रचना असलेली दुचाकी परत बाजारात उतरवणं हे खूपच अवघड दिसतंय.

त्याहीपुढे जाऊन एक जुनी स्पेसिफिकेशन असलेली दुचाकी आज परत रस्त्यावर न उतरणे हेच चांगलं ठरेल.

खरं सांगा, ही अफवा ऐकल्यानंतर तुम्ही खुश झाला असालच ना? कारण ही आपल्यासाठी बेस्ट गाडी आहे असं मानणारा एक वर्ग मोठ्या प्रमाणात अस्तित्वात आहे.

याबद्दल मात्र आम्ही नक्कीच साशंक आहोत की यामाहा आर एक्स 100 ही दुचाकी परत आणणे चांगली कल्पना आहे काय, त्याची काही कारणे कारण आपण खाली बघुयात.

आपणा सर्वांना माहिती आहे की जसा काळ पुढे जातो तसंच तंत्रज्ञानही वेगाने पुढे जात राहतं.

या दुचाकीसाठी त्याकाळी टू स्ट्रोक इंजिन वापरण्यात आले होते.आज टू स्ट्रोक इंजिन वापरून एखाद्या गाडीची रचना करणे म्हणजे कालबाह्य उत्पादन उत्पादित करण्यासारखेच आहे.

कारण टू स्ट्रोक इंजिन आपण कालबाह्य ठरवलं आहे. या इंजिनांत एफिशियन्सी नव्हती आणि तसंही भारत सरकारने टू स्ट्रोक इंजिन उत्पादनावर बंदी आणलेली आहे.

 

2stroke-inmarathi
wikimedia.com

जी गाडी बाजारात येणार आहे ती मात्र जास्त किचकट रचनेत आणणे टाळण्यात आलेले आहे. आणि या गाडीत नेहमीपेक्षा मुविंग पार्ट्स की कमी आहेत. कदाचित यामुळेच याआधीही ही गाडी एवढी पसंतीस उतरलेली होती.

फोर स्ट्रोक मशीनही वाल्सने ताब्यात ठेवता येते आणि या गाडीत तर चारही स्ट्रोक्स हे पावर स्ट्रोक्स आहेत.

याविरुद्ध टू स्ट्रोक इंजिन हे मात्र पोर्ट्स माध्यमातून आपल्याला ताब्यात ठेवावे लागत असते त्यामुळे याचा प्रत्येक दुसरा स्ट्रोक हा पावर स्ट्रोक लागत असे. त्यामुळे सहाजिकच इंडक्शन स्ट्रोक हा एक्सहॉशण स्ट्रोक म्हणून वापरला जात असे.

यामुळे इंधन या एक्झॉस्ट गॅसेस सोबत मिसळले जात असे आणि यामधुन पर्यावरणासाठी अत्यंत घातकअसणारा धूर बाहेर फेकला जात असे.

यामुळेच भारत सरकारने टू स्ट्रोक इंजिन बंद करण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला. हे तर नक्कीच सिद्ध झाले की यामाहा कितीही इच्छा असली तरी तीच गाडी परत बाजारात उतरवु शकत नाही.

यावरून आपला पुढचा मुद्दा – तो म्हणजे यामाहा आर एक्स 100 फोर स्ट्रोक मध्ये असू शकते का?

ही दुचाकी एवढी प्रसिद्ध होण्यामागे एक सोप्पं कारण होतं ते म्हणजे यामाहाने सुरुवातीलाच अत्यंत कमी किमतीत स्पोर्टस बाईक्सचा अनुभव तरुण-तरुणीना दिला होता.

याचं मुख्य कारण म्हणजे अत्यंत सुटसुटीत रचना तेही टू स्ट्रोक इंजिन, खिशाला खूप कमी झळ बसून तुमच्या पदरात पडत होतं.

 

kundalkar-inmarathi
onroad.com

त्याच्या रचनेत 98 सीसी आणि टू स्ट्रोक – वाऱ्याने थंड होणारे इंजिन बसवले गेल्यामुळे या गाडीचे वजन अत्यंत कमी म्हणजे फक्त एकशे तीन किलो होते. हे वजन जर आपण तत्कालीन इतर गाड्यांसोबत तुलना करुन पाहिलं तर आपल्या लक्षात येईल, की त्याकाळी ही सर्वात हलकी दुचाकी होती.

जरी यामाहाने असे ठरवले की आर एक्स 100 चार स्ट्रोक मध्ये आणायची तर यामाहाला आजच्या पुढारलेला तंत्रज्ञानासोबत याची सांगड घालावी लागेल.

याचाच अर्थ यात अजून काही किचकट बदल करायला लागतील ज्यामुळे या दुचाकीचे वजन वाढण्याची शक्यता आहे.

आपण हे विसरू नये की टू स्ट्रोकची आणि फोर स्ट्रोकची बरोबरी कधीही होऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला झटक्यात मिळणाऱ्या वेगाला अलविदा नक्कीच म्हणायला लागेल.

यामाहा ने नवीन निर्माण केलेली गाडी ही स्वस्त नसेल.

आपणा सर्वांना माहिती आहे की यामाहा आर एक्स 100 ही दुचाकी 1985 साली बाजारात आणली गेलेली होती. हा तो काळ होता ज्या काळी मोटरसायकल सुरक्षा प्रत्यक्षात उतरायची होती यामुळे उत्पादकाला किंमत कमी ठेवणे परवडले असेल.

पण त्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये प्रचंड उलथापालथ झालेली आहे. तंत्रज्ञान वेगाने पुढे गेलेले आहे आणि उत्पादकावर सुरक्षेसाठी प्रचंड निर्बंध लादले गेलेले आहेत.

जर यामाहाने आरएक्स 100 परत आणायचे ठरवले तर त्यांना संपूर्ण प्रक्रिया परत पूर्ण करत बसायला लागेल, आणि हे काम एका उत्पादकाच्या दृष्टीने अत्यंत किचकट आणि खर्चिक ठरेल.

 

yamaha-inmarathi
yamaha.com

उदाहरणार्थ यामाहाला सस्पेन्शन सेटप, ब्रेक सेटअप यासारखे अनेक घटक तपासायला लागतील ज्यामुळे फक्त या दुचाकीची किंमतच वाढणार नाही, तर ही दिसायलाही बाजारातील इतर दुचाकी सारखीच दिसेल. ज्याने आपली स्वप्नसुंदरी खरंच प्रत्यक्षात उतरू शकेल का यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण होतं.

आणि जरी यामाहाने असे करायचे ठरवले तरी याची काहीच खात्री नाही की भारतीय खरेदीदारांवर या गाडीची तीच भुरळ कायम राहील जी 85 च्या दशकात होती.

आमच्यावर विश्वास नसेल तर मग तुम्ही बजाज पल्सर 135 या गाडीचे विक्री दाखले तपासू शकता.

यामाहा ने असे करावे याचे एकही कारण सध्याच्या परिस्थितीत तरी दिसत नाही तसे बघता या जापनीज कंपनीने त्यांचे अनेक प्रसिद्ध उत्पादने भारतीय बाजारातून आधीच काढून घेतलेली आहेत. उदाहरणार्थ आर 15 अानी एफ झेड 125…

वरील सर्व बाबी लक्षात घेतल्यानंतर असे कुठलेही कारण दिसत नाही की ही कंपनी या प्रकारचे उत्पादन परत बाजारात आणण्याची काही शक्यता आहे.

आणि याला मुख्य मुद्दा बनवणे हे कंपनीसाठी आर्थिक दृष्ट्या हितावह आहे असे वाटत नाही.

 

Restored-inmarathi
Gaadiwaadi.com

ही बाईक त्याच किमतीत पुन्हा बाजारात आणणे म्हणजे इतरांसारखं एक साधारण दुचाकी बनवून स्पर्धेत उतरण्या जोगे आहे, बाकी काही नाही. इलेक्ट्रिक मोटरच्या काळात अशा प्रकारचं एखाद जुनं वाहन घेऊन बाजारात उतरणे म्हणजे कुठल्यातरी जुनाट कल्पना घेऊन भविष्याशी लढण्यासारखेच आहे.

पण आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी अशी की यामाहाचे नवनियुक्त चेअरमन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना असे सांगितले की यात काही बदल करून गाडीची रचना तशीच ठेवण्याचा प्रयत्न यामहा कडून करण्यात येईल.

या सर्वामध्ये करण्यात येणारा प्रमुख बदल असा की ही दुचाकी 150 सीसी ची करण्यात येऊ शकते.

पण यातील बदल गुपित ठेवताना श्री. शी तारा म्हणाले की यामाहा इंडिया सध्या भारताच्या औद्योगिक बाजाराचा अभ्यास करत असून यामध्ये नवीन दुचाकी 300cc पर्यंत येऊ शकते का, किंवा वेगवेगळे बदल करता येऊ शकतात का याबद्दल त्यांचा सध्या अभ्यास चालू आहे.

या सर्व घटकांचा नीट अभ्यास केल्यानंतर आपण एक गोष्ट एवढ्या ठामपणे सांगू शकतो यामाहा आर एक्स 100 ही गाडी परत उत्पादित केली जाऊ शकत नाही पण त्यात काही बदल करून त्यासारखीच पण मॉडिफाइड “कॅरेक्टर” भारतात आणले जाऊ शकते.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?