' २०० रुपये ते ३० कोटी पर्यंतचा यशस्वी प्रवास, वाचा आणि मित्रांना सांगा!

२०० रुपये ते ३० कोटी पर्यंतचा यशस्वी प्रवास, वाचा आणि मित्रांना सांगा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

=== 

आयुष्यात अनेकदा असं होतं जेव्हा आपण कुठलाही विचार विनिमय न करता कुठला तरी निर्णय घेतो. आणि मग आपल्याच चुकीच्या निर्णयावर आपण आयुष्यभर पश्चाताप करत बसतो. त्यामुळे कधीही कुठलाही महत्वाचा निर्णय हा घाईघाईने घेऊ नये.

पण कधीकधी आपण खूप उत्साही होऊन एखादा चुकीचा निर्णय घेतो. त्यावेळी जरा संयम बाळगणे गरजेचे असते.

याच संयमाची प्रचीती तामिळनाडू येथे राहणाऱ्या प्रेम गणपती ह्यांनी निर्माण केलेल्या ३० कोटींची उलाढाल असलेल्या व्यवसायाचा प्रेरणादायी प्रवासातून आली आहे.

प्रेम गणपती हे नुकतेच १० वी उत्तीर्ण झाले होते जेव्हा त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

काय करायचे हे ठरलेले नव्हते, अंगी काही खास कौशल्य नव्हते, पण पुरेसा आत्मविश्वास आणि काहीतरी करून दाखवण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती.

 

dosa plaza inmarathi

 

हे ही वाचा –

===

 

त्यावेळी त्यांच्या खिशात केवळ २०० रुपये होते. एवढ्याच भांडवलावर त्यांनी कठोर परिश्रम करून सुमारे ३० कोटीचे साम्राज्य उभे केले आणि कैक विचित्र अनुभवांना तोंड दिल्यानंतर त्यांच्या प्रिय डोसा प्लाझा फ्रँचाईझ चा जन्म झाला.

प्रेम गणपती मूळचे तमिळनाडुच्या तुतीकोरिन जिल्ह्यातील नागलपुरममधील एका गरीब कुटुंबात जन्मले.

त्यांना सात भावंडे घरीआर्थिक अडचण त्यामुळे त्यांना उच्च शिक्षणाचे स्वप्न सोडून द्यावे लागले. त्यांनी बर्याच नोकर्या केल्या ज्यात मोठा कष्टाने फार फारतररुपये २५०/- च्या आसपास मिळकत होई तीही ते घरी पाठवून देत.

दरम्यान त्यांना मुंबईत १२००/- पगाराच्या नोकरीची संधी चालून आली आणि आईवडिलांना आधार होईल म्हणून घरी न सांगता त्यांनी ती स्वीकारली. आपण लुटले जाऊ ह्याची त्यांना काडीमात्रही कल्पना नव्हती. ते मुंबईला आले आणि बांद्र्याला अडकले.

 

dosa-plaza-inmarathi
achhikhabre.com

 

तेव्हा ते फक्त १७ वर्ष होते. त्यांना ना मुंबईची भाषाही कळत नव्हती ना शहराबद्दल काही माहिती होती. परत जायचे तर खिशात तीकिटापुरतेही पैसे नव्हते. कुठलाही पर्याय दिसत नव्हता.

शेवटी त्यांनी मुंबईतच राहण्याचा निर्णय घेतला, त्यांना आशा होती की ह्यातून नक्की मार्ग निघेल, आपले नशीब नक्की बदलेल आणि तसेच घडले.

सुरुवात बेकरीत ताटे धुण्यापासून झाली त्यासाठी त्यांना दरमहा १५०/- मिळत. पुढे दोन वर्षात त्यांनी विविध रेस्टॉरंट्समध्ये अने लहानमोठ्या नोकऱ्या केल्या आणि शक्य तितके पैसे वाचवण्याचा प्रयत्न केला.

अशांत दोन वर्ष वेगाने सरली आता त्यांच्याकडे पुरेसे पैसे साठले होते त्यातून त्यांनी इडली आणि डोसा विकण्याच्या व्यवसायाचा विचार केला.

त्यासाठी लागणारा वाणसामान खरेदी केले आणि एक हातगाडी भाड्याने घेतली. अशी एकूण १०००/- रुपयांची गुंतवणूक केली. वाशी रेल्वे स्टेशनच्या समोर रस्त्यावर त्यांनी दुकान थाटले.

जसा जसा कामाचा व्याप वाढला तसे तसे त्यांनी आपल्या भावांनाही मदतीकरिता मुंबईत बोलावून घेतले.

हे ही वाचा –

===

 

Prem-Ganpathy-inmarathi
Drilers.com

 

स्थानिक प्रतिस्पर्ध्यांपासून ते वेगळेठरले कारण त्यांनी गुणवत्ता आणि स्वच्छता यावर प्रचंड भर दिला आणिनीटनेटका पेहराव ठेवला.

ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या त्यांच्या इडली आणि डोसाच्या चवीचे  श्रेय ते त्यांच्या जन्मगावच्या अस्सल पाककृतीलाला देतात ज्यामुळे अल्पावधीतच त्यांना सुमारे २००००/- चा नफा दर महिना होऊ लागला.

पुढे त्यांनी रोजची पूर्वतयारी आणि मसाले तयार करण्यासाठी वाशी जवळच आणखी थोडी जागा भाड्याने घेतली

१९९७ मध्ये त्यांनी त्याच परिसरात एक छोटी जागा घेतली आणि त्याला नाव दिले प्रेम सागर डोसा प्लाझा!

 

dosa plaza 2 inmarathi
gyani pandit

 

कोलेजला जाणाऱ्या तरुणांकडून ते इंटरनेट चा वापर करायला शिके आणि त्याचा फायदा आपला व्यवसाय कसा वाढेल ह्यासाठी केला.

इंटरनेटच्या माध्यमातून त्यांना आपल्या डोसा प्लाझा मध्ये जगभरातल्या अनेक पाककृतींचा उपयोग करण्याची संधी मिळाली.

सेझवान डोसा, पनीर चिली,आणि स्प्रिंग रोल डोसा हे त्यातलेच काही प्रकार. पहिल्या वर्षातच त्यांनी २६ वेगवेगळ्या प्रकारचे डोसाखवैयांसाठी उपलब्ध करून दिले.

 

dosa-inmarathi
Wix.com

 

प्रेम गणपती ह्याचं बर्याच आधीपासून मॉलमध्ये एक छोटेखानी दुकान उघडण्याचं स्वप्न होत. त्यासाठी ते प्रयत्नशील होते आणि वारंवार नकार देऊनहि  शेवटी  सेंटर वन मॉलच्या व्यवस्थापनाने त्यांना आपल्या मॉलमध्ये आउटलेट सेट करण्याची संधी दिली.

लोकांकडून त्यांचे बरेच कौतुक झाले आणि नंतर त्यांना फ्रँचाईझिंग साठी सतत विनंतीचा ओघ येऊ लागला.

 

dosa inmarathi 2
curly tales

 

त्यांनी तो आनंदाने स्वीकारला आणि अशाप्रकारे ठाण्यात वंडर मॉल येथे २००३ साली त्यांचा प्रथम फ्रँचाईझ आउटलेट उघडला गेला. आणखी एक स्वप्न पूर्ण झाले.

आता ह्या क्षणी त्यांच्याकडे संपूर्ण जगभरात डोसा प्लाझाचे ७२ आउटलेट्स आहेत त्यापैकी सात न्यूजीलँड, दुबई आणि ओमानमध्ये पसरलेले आहेत. 

केवळ रुपये १००००/-च्या मूळ भांडवलासह सुरू झालेला हा व्यवसाय आता सुमारे ३० कोटींच्या घरात गेला आहे.

हे ही वाचा –

===

 

prem-inmarathi
teengazette.com

मुंबईच्या जमिनीवर पाऊल टाकल्यानंतर त्यांना जे कडूगोड अनुभव आले त्यानंतर ते परत जाऊ शकले असते.

पण त्यांनी हार मानली नाही ते टिकून राहिले आणि यशस्वी झाले.

ही कहाणी आपल्याला हेच शिकवून जाते की, जर तुमचे उद्देश्य तुमच्या नजरेत पक्के असेल तर ते तुम्हाला तिथे नक्की घेऊन जाते जिथे तुम्हाल जायचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “२०० रुपये ते ३० कोटी पर्यंतचा यशस्वी प्रवास, वाचा आणि मित्रांना सांगा!

  • July 6, 2019 at 7:50 pm
    Permalink

    प्रेम गणपती याच व्यवसायातील यश नक्कीच प्रेरणादायी आहे

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?