' स्त्रियांच्या मते 'पुरुषांचं सौंदर्य' या "विशेष" गोष्टींमध्ये असतं! रहस्य जाणून घ्या...

स्त्रियांच्या मते ‘पुरुषांचं सौंदर्य’ या “विशेष” गोष्टींमध्ये असतं! रहस्य जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्याकडे असं म्हणायची पद्धत होती की स्त्रियांचं सौंदर्य त्यांच्या शालीनतेमध्ये असतं आणि पुरुषांचं सौंदर्य त्यांच्या कर्तृत्वात बघावं! मागच्या पिढीतले वडील जेव्हा मुलींसाठी स्थळं बघत असत तेव्हा ते मुलीला सांगत असत,

“अगं पुरुषाचं का कुठे सौंदर्य बघतात? पुरुषांचं कर्तृत्व बघतात.”

तर असं हे पुरुषाचं सौंदर्य हा विषय गेले काही वर्ष काहीसा दुर्लक्षितच होता. सुंदर दिसणं, त्यासाठी विविध प्रयत्न करणं हा प्रांत स्त्रियांचाच म्हणून ओळखला जाई.

इतकंच काय तर बाजारात असणारी सौंदर्यप्रसाधने ही सुद्धा स्त्रियांनाच डोळ्यापुढे ठेवून तयार केली जात असत आणि त्यांची जाहिरात सुद्धा स्त्री ग्राहकांसाठीच असे.

पण नंतर काळ बदलला. ग्लोबलायजेशन आलं. आणि स्त्रियांबरोबरच पुरुषांनी सुद्धा चांगलं दिसलं तर त्यांचं व्यक्तिमत्व अधिक आकर्षक दिसतं, प्रेझेंटेबल राहणं स्वतःच्याच फायद्याचं असतं हे पुरुषांना पटू लागलं आणि समाजाने सुद्धा स्वीकारलं.

 

vikeykaushal-inmarathi

 

नंतर पुरुषांच्या आकर्षक दिसण्यासाठी “मेन्स स्पेशल” सौंदर्यप्रसाधने, फॅशन ऍक्ससेसरीज ह्यांची भली मोठी रेंजच बाजारात उपलब्ध झाली. ह्या सगळ्यात पुरुषांचं बाह्य सौंदर्य तर उजळून निघालं पण ते स्त्रियांना अपेक्षित असं आहे का?

स्त्रियांच्या मते पुरुषांचं सौंदर्य कुठल्या गोष्टींत असतं? आज ह्याबद्दल माहिती घेऊया.

स्त्रियांच्या मते पुरुषांचं बाह्य सौंदर्य फार महत्वाचं नाही तर एकूण त्याचे व्यक्तिमत्व कसे आहे, त्याचा स्वभाव कसा आहे हे जास्त महत्वाचे आहे.

बहुसंख्य स्त्रियांच्या मते तारुण्य, चांगले कमावलेले शरीर, शार्प जॉ लाईन, गालावरची खळी , उंची, सिक्स पॅक ऍब्स, रग्ड लूक ह्या सगळ्या अस्थायी गोष्टी आहेत.

सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तो आपल्या कुटुंबाशी कसे वागतो, त्यांची किती काळजी करतो, घरचे कुणी संकटात असेल, दु:खात असेल किंवा आजारी असेल तर तो त्यांची कशी काळजी घेतो हे महत्वाचे आहे.

तसेच त्याची त्याच्या कामाप्रती कशी निष्ठा आहे, तो त्याच्या आयुष्य आणि करियर बाबतीत किती केंद्रित आहे, त्यासाठी तो किती सचोटीने काम करतो, किती मेहनत घेतो हे महत्वाचे आहे.

 

hrithik-roshan-inmarathi

हे ही वाचा – पुरुषांनो, नको त्या लफड्यात अडकायचं नसेल तर हे १३ नियम तुम्ही पाळायलाच हवेत!

तसेच त्याला कुठले छंद आहेत, कशाची आवड आहे हे सुद्धा महत्वाचे आहे. एखाद्या छंदाचे त्याला वेड आहे का, मग तो त्यासाठी कसा वेळ काढतो ह्या गोष्टी सुद्धा स्त्रियांना आकर्षक वाटतात.

आपली मते बिनधास्तपणे, मोकळेपणाने व्यक्त करणे, आपल्या भावना मोकळेपणाने सांगणे, एखाद्या गोष्टीचे मनापासून कौतुक करणे तसेच मनातले काहीही आडपडदा न ठेवता मोकळेपणाने शेअर करणे ह्या गोष्टी स्त्रियांना भावतात.

एखाद्या मुलात हे गुण असतील तर त्याच्याकडे स्त्रिया नक्की आकर्षित होतात.

स्त्रियांना आवडणारा पुरुषांचा आणखी एक गुण म्हणजे त्याचा ‘सेन्स ऑफ ह्युमर’ होय. वातावरण तंग असताना एखादा हलकाफुलका जोक सांगून वातावरण हलके करणारी माणसे सगळ्यांनाच आवडतात. असे पुरुष स्वतःदेखील खुश राहतात आणि आपल्या बरोबरीच्यांना देखील हसवतात.

तुमच्यात जर दुसऱ्याला हसवण्याची कला असेल तर मग अनेक मुली तुमच्यावर फिदा होऊ शकतात. (फक्त पीजे मारून मारून त्यांना त्रस्त करू नका म्हणजे झाले!)

असे म्हणतात की स्त्रियांना इगो असलेले पुरुष आवडतात. पण असे नाही. आपल्याकडून चूक झाली तर ती स्वीकारून माफी मागण्याची संवेदनाशीलता असणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.

त्यांच्याबरोबर स्त्रिया अधिक मोकळेपणाने बोलू-वावरू शकतात, व्यक्त होऊ शकतात. मेल इगो असणारे पुरुष स्त्रियांना तुच्छ लेखतात आणि हीच त्यांची मोठी चूक होते. सतत इगो दाखवून ताठ्यात राहणारी व्यक्ती कोण सहन करेल?

अश्या व्यक्तीपेक्षा आपली चूक झाली असेल तर ती पटकन स्वीकारून माफी मागून वातावरण परत नॉर्मल करणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.

 

Katrina-Kaif-inmarathi

हे ही वाचा – जोडीदार ‘हॅंडसम’ नाही अशा स्त्रिया अधिक सुखी असतात – असं का?

पुरुषांची स्त्रियांना आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांची बुद्धिमत्ता! घाबरू नका! तुमचा आयक्यू अल्बर्ट आईन्स्टाईन इतकाच हवा असे नाही. पण जर तुम्हाला बऱ्याच गोष्टींबद्दलची माहिती असेल, त्याविषयी तुमचे एक मत असेल, तुम्हाला अनेक गोष्टींवर चर्चा करता येत असेल तर त्याने तुमचे व्यक्तिमत्व चांगले बनते.

कुठल्याही गोष्टीवर चारचौघांत चर्चा करायची असेल किंवा तुमचे मत मांडायचे असेल तर त्या विषयीची माहिती तुम्हाला असायला हवी.

तुमचे ज्ञान जर तुम्हाला चारचौघांत चांगल्या प्रकारे मांडता येत असेल तर त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्वात चांगली भर पडते आणि तुम्ही समोरच्यावर चांगला प्रभाव पाडू शकता. त्यावरूनच लोक तुमची हुशारी जोखतात. म्हणूनच मुलींना हुषार मुले आवडतात.

हल्ली नव्याने रूढ झालेल्या “Sapiosexual ” ह्या संज्ञेबद्दल तुम्हाला माहित असेलच. अनेक मुलींना मुलांच्या रूपापेक्षा त्याची बुद्धिमत्ता महत्वाची वाटते.

काही पुरुष असे समजतात की आपण सदानकदा आपला “पुरुषत्वाचा” मुखवटा घालूनच जगलं पाहिजे.

“मला काही होत नाही, मर्द को दर्द नही होता, आपल्याला काही रडू बिडू येत नसतंय, आपण काही बायकांसारखे इमोशनल फूल नाही”

असा विचार अनेक पुरुष करतात आणि स्त्रियांनाही असेच पहाडासारखे भक्कम ,कधीही कमजोर न पडणारे पुरुष आवडतात असं त्यांना वाटतं! पण असं नाही.

स्त्रियांनाही माहितीये की पुरुष हा सुद्धा सर्वसामान्य मनुष्यच आहे. त्यालाही भावना असतात. त्यालाही कधी व्यक्त व्हावंसं वाटतं. तो ही व्हल्नरलेबल असू शकतो. त्यालाही कधी भीती वाटू शकते, रडावंसं वाटू शकतं! तो ही कधीतरी कमजोर पडू शकतो. अशावेळी आपल्या माणसांकडे व्यक्त होणं ही चांगली गोष्ट आहे.

 

shahid-kapur-inmarathi

 

आपल्या “पुरुषत्वाचा, मर्द” असण्याचा मुखवटा काढून आपण फक्त एक माणूस आहोत हे स्वीकार करून आपले आनंद, दु:ख, भीती, त्रास आपल्या मैत्रिणीशी, बायकोशी, बहिणीशी शेअर करणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.

आपल्या खऱ्या भावना व्यक्त करणाऱ्या, शेअर करणाऱ्या पुरुषांशी स्त्रिया जास्त चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतात.

पुरुषांचे शिष्टाचार, त्यांची आपल्यापेक्षा खालच्या लेव्हलच्या व्यक्तीशी वागण्याची बोलण्याची पद्धत, नम्रता, समंजसपणा ह्या गोष्टी सुद्धा स्त्रीच्या मनात घर करतात.

ज्याच्याकडून आपल्याला कुठलाही फायदा होणार नाही अश्या व्यक्तीशी सुद्धा चांगले वागणारे, नम्रतेने बोलणारे पुरुष स्त्रियांना आवडतात.

विचार प्रवाही असणे, कालसुसंगत असणे, सतत काहीतरी नवे शिकून आपल्यात सुधारणा करू पाहणे हे गुण पुरुषांच्या सौंदर्यात भर घालतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक बनवतात. आणि सर्वात महत्वाची व लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे एखाद्याचे स्त्रियांबद्दलचे विचार!

जे पुरुष स्त्रियांना एक माणूस समजतात, त्यांना कमी लेखत नाहीत, त्यांच्याही स्वप्नांना ,विचारांना महत्व देतात,स्त्रियांचा आदर करतात ते पुरुष स्त्रियांच्या मनात विशेष घर करतात.

आपण पुरुष आहोत म्हणजे काहीतरी विशेष आहोत, स्त्रियांपेक्षा सरस आहोत, परफेक्ट आहोत असा विचार न करणारे पुरुष स्त्रियांच्या मते सगळ्यात आकर्षक असतात.

 

deepika-irrfan-inmrathi

हे ही वाचा – या देशात पुरुषांना गुलामीच करावी लागते… जाणून घ्या या अजब देशाची गोष्ट!

तसेच स्त्रियांच्या ध्येयांना किंमत देणे, ते ध्येय गाठण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभे राहणे, आपल्याला हवे तसे त्यांना बदलायला भाग न पाडणे आणि आहे तसे पूर्णपणे स्वीकारणे – पुरुषांचे हे गुण स्त्रियांना अतिशय मोहित करतात.

म्हणजे थोडक्यात काय तर पुरुषांच्या बाह्य रूपाची स्त्रियांना फारशी भुरळ पडत नाही. तर त्यांचे आंतरिक गुण स्त्रियांसाठी महत्वाचे असतात. पुरुषांच्या ह्याच विशेष गोष्टींमध्ये त्यांचे सौंदर्य दडलेले असते असे स्त्रियांचे मत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “स्त्रियांच्या मते ‘पुरुषांचं सौंदर्य’ या “विशेष” गोष्टींमध्ये असतं! रहस्य जाणून घ्या…

  • January 8, 2019 at 4:34 pm
    Permalink

    अतिशय अभ्यासपूर्ण लेख आहे.वेगळा विषय आहे तरीही वाचनीय झालाय.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?