'भारतीय आणि अमेरिकन दुग्धव्यवसायाचे 'दुर्दैवी' साम्य : आपणही तीच चूक करतोय का?

भारतीय आणि अमेरिकन दुग्धव्यवसायाचे ‘दुर्दैवी’ साम्य : आपणही तीच चूक करतोय का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

दुग्ध व्यवसाय हा आपल्या भारतात चांगलाच रुजलेला आहे. भारताच्या वार्षिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात दुग्धव्यवसायाचा वाटा सुमारे सहा टक्के इतका आहे.

ग्रामीण अर्थव्यवस्थेत  दुग्ध व्यवसायाचे मोठे योगदान आहे. आज या क्षेत्रात देखील अनेक समस्या आहेत.

एकीकडे छोट्या शेतकऱ्यांना हा व्यवसाय परवडत नाही आणि दुसऱ्या बाजूला मोठे उद्योग या व्यवसायात येत आहेत. 

पण हा लेख भारतातील दुग्ध व्यवसायाबद्दल नाही तर अमेरिकेतील दुग्ध व्यवसायाबद्दल आहे.

छोटे शेतकरी आणि त्यांचा दुधव्यवसाय कसा अडचणीत आहे आणि अमेरिकेत या क्षेत्राचे भविष्य काय आहे, याविषयी जिम गुडमॅन यांनी तेथील शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे.

जिम गुडमॅन यांच्या मागच्या दोन पिढ्या देखील याच व्यवसायात होत्या. जिम गुडमॅन हे स्वतः ४० वर्षांपासून या व्यवसायात होते.

त्यांनी यातून नुकतीच निवृत्ती स्वीकारली आहे आणि ही निवृत्ती स्वेच्छेने नाही.

 

dairy-inmarathi
nodpa.com

दुधाचा व्यवसाय हा तसा फायद्याचा होता. त्यात चांगले उत्पन्न मिळत असे.

महामंदी असेल, १९८० चे शेतीप्रश्न, तेलाचे राजकारण, अमेरिका -रशिया वाद आणि त्यातून येणारे अनिश्चितता यातून शेतकरी या दूध व्यवसायामुळे वाचले.

मात्र कुठेतरी फायदेशीर व्यवसाय हे कारणच या व्यवसायाच्या भरभराटीला नख लावणारे ठरले आहे.

यात आता मोठे व्यावसायिक पुढे आले आहेत. “गेट बिग ऑर गेट आऊट” ही संस्कृती फोफावली आहे. यातून दुधाचा अतिरिक्त पुरवठा होतो आहे, परिणामी दुधाचे भाव घसरले आहेत.

मोठे व्यावसायिक हे नुकसान पचवू शकतात पण लहान शेतकरी हे नुकसान कसे पचवणार.

आज ग्रामीण अमेरिकेचा चेहरा बदलला आहे. शेतकरी दिवाळखोर होऊन या व्यवसायातून बाहेर पडत आहेत.

याहून भयानक म्हणजे शेतकरी आता आत्महत्या करण्याचा मार्ग देखील स्वीकारत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना अपघात ठरवून त्यावर पांघरून देखील घातलं जातं आहे.

 

farmer-inmarathi
aljazeera.com

 

लहान शेतकरी साध्या पद्धतीने हा व्यवसाय करतात. गायींना मोठे कुरण उपलब्ध असते. सेंद्रिय पद्धतीने होणारा हा व्यवसाय गायींच्या आरोग्यासाठी सुद्धा लाभदायक असतो.

दुसरीकडे मोठ्या संघटीत पद्धतीने केल्या जाणाऱ्या या व्यवसायात गाय म्हणजे दूध देण्याचे एक मशीन असते. निसर्गाशी त्यांचे नातेच राहत नाही.

अजून एक फरक समजून घेतला म्हणजे या दोन व्यवसाय पद्धतीतील मूल्य कसे वेगळे आहेत ते समजेल. लहान शेतकरी आपल्या गायींना नावाने ओळखता तर मोठे व्यावसायिक गायींना क्रमांकाने !

सेंद्रिय पद्धतीने दूध उत्पादन कारण्यासाठी शेतकरी काटेकोरपणे नियम पाळताना दिसून येतो. तर मोठ्या व्यावसायिकांची इथेही मुजोरी दिसते. ते नियमांना फाट्यावर मारतात.

लहान शेतकऱ्यांची शेती असते तर यात उतरलेल्या दिग्गजांचे हे एकप्रकारे कारखानेच असतात.

लहान शेतकरी आणि यात उतरलेले मोठे व्यावसायिक यांच्या व्यवसायात किती तफावत आहे ते जाणून घेतले तर विस्कॉन्सिन प्रांतातील ४५३ लहान डेअरी उद्योग जितके दूध पुरवतात तितके दूध ६ महाकाय डेअरींमार्फत पुरवले जाते.

यातूनही या व्यवसायावर मोठे उद्योजक कसे नियंत्रण मिळवत आहे ते दिसून येईल.

 

milk-marathipizza05jpg
www.frbiz.com

 

या व्यवसायात आता खाद्यान्न अधिक महाग झालं आहे, शिवाय गायीच्या आरोग्याचा प्रश्न आहेच. विमा देखील महाग झाला आहे. अजून करांचा बोजा सुद्धा वाढला आहे.

एकंदरीत गुंतवणूक अधिक करावी लागते मात्र भाव काय मिळेल याची शाश्वती नाही.

शेतकरी अनुदान अथवा मदत मागण्यांसाठी आंदोलन करत नाही आहे तर दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून त्यांना आंदोलन करावे लागत आहे.

सरकार या व्यवसायाकडे कसे पाहत आहे तर मोठ्या उद्योगांना लाभ मिळेल असे धोरण डोनाल्ड ट्रम्प यांनी मंजूर केले आहे.

त्यासाठी कराव्या लागणाऱ्या जनसंपर्क मोहिमेचा आणि लॉबिंगचा हा परिणाम आहे.  इकडे लहान शेतकरी मात्र वाऱ्यावर आहे.

एकीकडे उत्पन्नाची शाश्वती नाही तर उत्पन्न नाही म्हणून कर्ज मिळणे मुश्किल झाले आहे. लहान शेतकरी व्यवसाय विस्तारू शकत नाही, की नवीन तंत्रज्ञानासाठी गुंतवणूक करू शकत नाही.

परिणामी त्यांच्या व्यवसायाचा आकार आक्रसत चालला आहे. गेल्या वर्षभरात ३८२ जणांनी आपले व्यवसाय बंद केले आहे.

 

milk-inmarathi
madison.com

 

हवामान बदल हे नवे संकट देखील लहान शेतकऱ्यांना अधिक जाचाचे ठरले आहे. एकतर पूर्वीपेक्षा तापमान अधिक वाढत असल्याने दुधात घट झाली आहे.

अजून ते थंड ठेवण्यासाठी अधिक सामग्रीची गरज भासत आहे.

शेतकऱ्यांसाठी प्रत्येक पावसाळा एक नवीन संधी असते पण हवामानाच्या या बदलत्या चक्रामुळे निसर्गाने ही संधी पण हिरावून घेतली आहे. दुधाबरोबरच शेतीचा आकृतीबंध देखील बदलला आहे.

एकच एक पीक, जमिनीकडे दुर्लक्ष यांमुळे पर्यावरणाची अधिक हानी होत आहे. 

जिम गुडमॅन यांनी आता गायी विकल्या आहेत. त्यांना याचे मोठे दुःख आहे. त्यातल्या त्यात समाधान एकाच की दिवाळखोर होऊन निवृत्ती पत्करावी लागली नाही. त्यांची निरीक्षणं  भेदक आहेत.

“गेट बिग ऑर गेट आऊट” या संस्कृतीने ग्रामीण अमेरिकेत चांगलाच शिरकाव केल्याचे सांगतात. यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलली असून ती मृतप्राय होईल.

 

milk-industry-inmarathi
youtube.com

 

हा भाग म्हणजे केवळ मोठमोठाले कुरणं यापुरताच मर्यादित असेल.

याचा मोठा परिणाम ग्रामीण अमेरिकेतील जीवनशैलीवर झाला असून इथले स्थानिक दुकान देखील बदलत्या अर्थव्यवस्थेत टिकतांना दिसत नाही.

जिथे शेतकरी दुधाचे भाव, हवामान, इतर घडामोडी जाणून घेण्यास जात असे ते कॅफे आता बंद झाले आहेत.

एकूण भारतातल्या परिस्थितीपेक्षा हे चित्र वेगळे नाही. किंबहुना आपण अमेरिकेचे अनुकरण करताना दिसत आहोत.

यातून आपल्या ग्रामीण भागाचे भविष्य काय असेल हेच यातून दिसून येते.

संपन्न देश म्हणून ओळखला जाणारा अमेरिका आतून कसा पोखरला जातो आहे हे विदारक चित्र यातून स्पष्ट होते. पण हे सुद्धा लक्षात येईल की पुढचा क्रमांक आपला आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “भारतीय आणि अमेरिकन दुग्धव्यवसायाचे ‘दुर्दैवी’ साम्य : आपणही तीच चूक करतोय का?

 • December 30, 2018 at 6:56 am
  Permalink

  अमेरिकेतील

  Reply
 • January 2, 2019 at 4:51 am
  Permalink

  हे तर खरेच आहे

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?