' हजारो लोकांचा बळी घेणारं भारतीयांच्या विस्मृतीत गेलेलं, सर्वात मोठं नैसर्गिक संकट… – InMarathi

हजारो लोकांचा बळी घेणारं भारतीयांच्या विस्मृतीत गेलेलं, सर्वात मोठं नैसर्गिक संकट…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताला नैसर्गिक आपत्ती नव्या नाहीत. भारताच्या भौगोलिक रचनेमुळे बऱ्याचदा भारताला निरनिराळ्या नैसर्गिक विपदांचा सामना करावा लागत असतो. भारताचे ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठया प्रमाणात नुकसान होत असते. मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्त हानी होत असते.

नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात, कधी भूकंप , कधी त्सुनामी, कधी महापूर, कधी चक्रीवादळ तर कधी भीषण दुष्काळ.

ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवितहानी ही प्रचंड असते. अनेक लोक आपला जीव गमावतात.

भारताच्या इतिहासात अश्या अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या आहेत ज्यांनी एक संपूर्ण संस्कृती संपवली आहे. इतक्या त्या नैसर्गिक आपत्ती विनाशकारी होत्या.

 

kerala-flood-inmarathi

 

आज आपण भारताच्या इतिहासातील एका अश्याच नैसर्गिक आपत्ती बद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे ६०००० लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते!

५ ऑक्टोबर १८६४ रोजी, कोलकाता शहराला एका चक्रीवादळाचा तडाखा बसला होता. या चक्रीवादळात ६०००० लोक मृत्युमुखी पडले होते आणि हजारो लोक नंतर त्या वादळानंतर आलेल्या रोगांच्या साथीमुळे मृत्युमुखी पडले होते.

या वादळाने भारताच्या पूर्व किनारपट्टीला झोडपले होते.

गंगेच्या संगमावरून हे वादळ कोलकाताला धडकले. या वादळाने कोलकाता मधील नद्यांची पाणी पातळी प्रचंड वाढ झाली होती. ४० फुटापर्यंत पाणी वाढल्याने त्याने अख्खी कोलकाता नगरी गिळायला सुरुवात केली होती.

 

culcutta-inmarathi

===

हे ही वाचा – चक्रीवादळांना नावे कशी दिली जातात? ती नावे अशी विचित्र का असतात? जाणून घ्या..

===

या वादळात अनेकांनी आपले प्राण गमावलेच पण संपूर्ण कोलकाता शहर आणि बंदर नष्ट झाले. त्याचं पुढे जाऊन पुनर्निर्माण करण्यात आलं.

मुळात हे चक्रीवादळ इतकं भयंकर का होतं आणि त्यामुळे इतकी जीवित हानी का घडली ह्याबद्दल आपण जाणून घेऊ..

जगभरात वादळांना वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं आणि त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत. आशिया खंडात ३६९ मीटर प्रति तास वेगाच्या वाऱ्याला ट्रॉपिकल डिप्रेशन अर्थात कमी दाबाचा पट्टा म्हटले जाते.

जर वेग त्या पेक्षा जास्त असेल तर वादळ म्हटले जाते. जर वेग ७३ मीटर प्रति तास यापेक्षा जास्त असेल तर त्यांचं वर्गीकरण चक्रीवादळात करण्यात येतं.

भारतातील हवामान हे कॅरेबियन प्रदेशातील हवामानापेक्षा खूप वेगळे आहे. आपल्याकडे वाऱ्याचा वेग प्रचंड असतो, पावसाचे प्रमाण जास्त असते.

 

storm-inmarathi

 

१९ व्या शतकापर्यंत वादळाचा सामना करू शकेल अशी यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने भारतात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची इतिहासात नोंद आहे. कोलकाता येथील जीवित हानी त्याचाच एक प्रकार आहे.

२००४ साली पूर्व किनारपट्टीवर आलेल्या त्सुनामीमुळे अनेकांनी त्यांचे प्राण गमावले होते. तेव्हा देखील योग्य तयारी करायला आपण कमी पडलो होतो.

भारत हा भौगोलिक दृष्ट्या कर्कवृत्तात येतो. आपल्याकडे तापमान जास्त असल्याने बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होते ज्यामुळे वादळी वारे सोबत मोठ्या प्रमाणात ढग घेऊन येतात ज्यामुळे किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

कोलकाता आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातदेखील पावसाचे प्रमाण खूप जास्त असते.

कोलकाताच्या उत्तरपूर्वेकडे असलेल्या चेरापुंजीत सर्वात जास्त पाऊस पडतो. इथे ४५० मिमी पाऊस दरवर्षी पडत असतो. त्यामुळे आपल्याकडे पाऊस आणि वादळ हे दुहेरी संकट मोठ्या इष्टापत्तीला कारणीभूत ठरत असतात.

 

rain-inmarathi

 

१८६४ चं कोलकाता येथील वादळ देखील अशीच एक आपत्ती होती. त्याआधी १७९७ मध्ये पण अश्याच एका वादळाने कोलकाताला झोडपले होते. पण १८६४ चा वादळाची कथा वेगळी होती.

तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांना भारताच्या हवामान विषयक परिस्थितीची इतकी कल्पना नव्हती. त्यांनी त्या वादळाचं वर्णन केलं आहे.

तापमान व दाब याचे मोजमाप करणारे त्यांचे यंत्र आणि माहिती याच्या पल्याडचं १८६४ चं वादळ होतं.

ब्रिटीश अधिकारी व खलाशी त्यांचा यंत्राच्या साहाय्याने सहज वाऱ्याचा वेग व वादळाची परिस्थिती ओळखायचे. ५ ऑक्टोबर १८६४ ला त्यांनी समुद्रात आपली नाव उतरवली.

वाऱ्याचा वेग वाढतोय ह्याचा त्यांना अंदाज होता पण त्यावेळी त्यांची नाव ही ताकदीची असल्याने त्यांनी ती न डगमगता पाण्यात उतरवली खरी पण किनाऱ्या पासून २०० मीटर लांब गेल्यावर त्यांना परिस्थितीचा अंदाज आला.

 

ship-inmarathi

 

मग त्यांनी वाऱ्याच्या दिशेने बोट नेण्याचा प्रयत्न केला पण अचानक वाऱ्याची गती इतकी प्रचंड वाढली की त्याना काही कळायच्या आता पाण्याने त्यांचा बोटीत प्रवेश केला. नाव समुद्रात गटांगळ्या खात होती.

तब्बल ६ तास नावेतील कर्मचारी पाणी बाहेर पम्प करण्याचा प्रयत्न करत होते.

त्यांनी नावेचं वजन कमी करण्यासाठी त्यांचं सर्व सामान पाण्यात फेकलं. तरी समुद्राच्या लाटांचा फटका त्यांना बसत होता.

शेवटी त्यांनी अगदी लाकडी फ्लोअर पाण्यात टाकला. तरी जहाज गटांगळ्या खात होतं. सरतेशेवटी शर्थीचे प्रयत्न करून हे खलाशी आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले होते.

हे वादळ पुढे जाऊन कोलकाता व पूर्व किनारपट्टीला धडकलं होतं आणि त्याने तिथे हाहाकार माजवत लाखोंचा जीव घेतला होता.

 

recession-india

 

ब्रिटिशांची भारतीय राजधानी संपूर्णतः बरबाद करून टाकली होती. त्या वादळाचे वर्णन करणारा हा एकमेव पुरावा आज उपलब्ध आहे.

आज हवामान खातं इतकं प्रगत झालं असतांना देखील भारताच्या भौगोलिक परिस्थितीमुळे हवामानाचा अचूक अंदाज लावणं शक्य होत नाही.

===

हे ही वाचा – जगातील अशी ८ चक्रीवादळं ज्यामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?