' जेव्हा “कॅश” वापरण्यासाठी सूट दिली जायची! कागदी नोटांचा हा इतिहास अतिशय रंजक आहे! – InMarathi

जेव्हा “कॅश” वापरण्यासाठी सूट दिली जायची! कागदी नोटांचा हा इतिहास अतिशय रंजक आहे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पैसा ही एक मानवनिर्मित संकल्पना आहे. या संकल्पनेचा जन्म गरज म्हणून झाला असला तरी या पैशाने अवघं विश्व व्यापलं आहे. ॲडम स्मिथने १७७६ मध्ये लिहिलेल्या ‘वेल्थ ऑफ नेशन्स’ या पुस्तकातील एक वाक्य आहे.

‘देवाण-घेवाण इतर सर्व प्राणी जगतापेक्षा वेगळा असणारा गुणधर्म माणसाच्या अंगी आहे.’

थोडक्यात पैसा हा अनेक प्रकारांनी आपल्या आजूबाजूला असतो. आपण वापरतो ते कागदी चलन म्हणजे त्या पैशाचं एक दृश्य स्वरूप आहे.

श्रीमंत असो वा गरीब प्रत्येकाला जगण्यासाठी पैसे हवेच असतात.

चलनाचा आजवरचा प्रवास रंजक आहे. पण आजच्या काळात वापरले जाणारे कागदी चलनाची निर्मिती कशी होते हे जाणून घेण्यात अनेकांना रस असतो.

 

indian-currency-marathipizza03

कागदी चलनाची निर्मिती कशी होते हे जाणून घेण्याआधी या कागदी चलनाच्या इतिहासातील काही टप्पे जाणले तर ही प्रक्रिया समजून घेणे अधिक सोपे जाईल.

कागदी चलन निर्माण करण्याचे श्रेय चीन या देशाकडे जाते. चीनने जगाला अनेक गोष्टी दिल्या त्यापैकी एक म्हणजे कागदी चलन.

चीनमध्ये धातूंची कमतरता जाणवल्याने हाईन संग या राजाच्या कारकिर्दीत म्हणजे इ.सन ८०६-८२१ या काळात चलन म्हणून कागदी नोटा वापरण्यास सुरुवात झाली.

नाणी वजनाला अधिक असतात त्यामुळे या नोटा वापरने अधिक सोयीचे होते. पण प्रश्न विश्वासार्हतेचा देखील होता.

त्यामुळे या चलनाचा प्रसार एकदम झाला नाही. हळूहळू या चलनाचा प्रसार होऊ लागला. इ.स. १२९४ नंतर यूरोपमध्ये कागदी चलन स्वीकारले गेले. पण मोठ्या प्रमाणावर हे चलन स्वीकारायला बराच अवधी जावा लागला.

कागदी चलनाचा उगम चीनमध्ये झाला असला तरी त्याचा जोरदार प्रसार झाला तो अमेरिका आणि यूरोपमध्ये. या प्रसाराला क्रांतीची पार्श्वभूमी आहे.

“इतिहासामध्ये कागदी चलनाचा जनक” म्हणून बेंजामिन फ्रँकलिनचं नाव घेतलं जातं. त्यांनी कागदी चलनाला अधिक महत्व दिलं होतं.

 

Ben-Franklin-inmarathi (1)
usatoday.com

अमेरिकेत कागदी नोटा स्वीकारायला जनतेमध्ये आधी साशंकता होती तेव्हा सरकारने जो कागदी चलन वापरून कर भरेल त्याला ५ टक्के सूट देण्याचा निर्णय घेतला. परिणामी चलन स्वीकारलं गेलं.

आता कागदी चलन म्हणून आपण नोटांचा उल्लेख करतो कारण आधी या नोटा तुतीच्या झाडापासून लगदा करून बनवल्या जात. पुढे बनावट नोटा निर्माण होऊ नये म्हणून वॉटरमार्क आले.

अशा प्रकारे नोटा अधिक सुरक्षित केल्या जाऊ लागल्या.

या दरम्यान गुटेनबर्गने छपाईच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा शोध लावल्यानंतर यूरोपमध्ये कागदी चलनाच्या प्रसाराला चालना मिळाली. तेव्हा यूरोपमध्ये दोन प्रश्न उभे राहिले होते.

प्लेगमुळे माणसे मरत आणि त्यांच्या कपड्यांचे काय करायचे हा पहिला प्रश्न आणि छपाई करायची पण एवढा कागद निर्माण कसा करायचा.

दोन्ही प्रश्नांचा ताळमेळ बसवण्यात आला, समस्या सुटल्या. भारतात १८३५ मध्ये इंग्रजांनी देशभर एकच चलन असण्याचे ठरवले.

 

1835-currency-inmarathi1

 

आजही नोटा छापण्यासाठी जो कागद तयार केला जातो त्यात सुती कापड आणि ताग यांचाच वापर केला जातो. जगात सर्वत्र नोटा बनविण्याची प्रक्रिया जवळपास सारखीच आहे. जगात नोटांसाठी कागद बनवणारे चार प्रमुख कारखाने आहेत.

भारतात देखील एक कारखाना आहे ज्यात हा कागद तयार केला जातो. भारत काही कागद बाहेरून आयात देखील करतो.

मुख्यतः सुती धागा ७० ते ९५ टक्के आणि मग प्राण्यापासून मिळणारे गोंद, लाकडी भुसा, अल्युमिनियम क्लोराईड, मेलॅमिन फॉर्मअलडेहाईड यांचा वापर करून हा कागद तयार केला जातो.

यामुळे कागद मजबूत बनतो आणि नोटा फाटणे, तुकडे पडणे, चुरगळणे यांपासून संरक्षण होते. या कागदाच्या लगद्यात रंगीत मिश्रणही मिळवले जाते. त्यामुळे विशीष्ट छटा होते ज्यामुळे नकली नोटांना काही प्रमाणात पायबंद घालणे शक्य होते.

यासाठी शाई निर्माण करण्याची जबाबदारी सरकारी कारखान्यांची आहे. शाई आयात देखील केली जाते. जगभरात अनेक देश शाई आयात करतात. हे सुरक्षेसाठी आवश्यक आहे.

या नोटांची डिझाईन ठरविण्याची जबाबदारी मध्यवर्ती बँक जसे की भारतात रिझर्व्ह बँकेचा एक विशेष विभाग यावर काम करत असतो.

 

RBI-marathipizza00

 

सतत नवीन डिझाईन तयार केल्या जातात. अर्थात कारण आहे ते नकली नोटांना आळा घालता यावा म्हणून. पुढे तयार झालेले कागदांचे शीट प्रिंटिंगसाठी पाठवले जातात. यासाठी अनेक रंगांच्या शाईचे थर दिले जातात.

एका शीट मध्ये ३२ ते ४८ नोटांची छपाई होते. यासाठी ऑफसेट प्रकारची शाई वापरण्यात येते.

नोटांवर असणारे क्रमांक देखील विशेष असतात. एका सिरीजसाठी एकच शाई वापरली जाते. या क्रमांकांची रचना अशी असते की कुठली नोट कुठल्या छापखान्यात छापली आहे, केव्हा छापली आहे ते पण समजते.

यात सुरक्षेच्या दृष्टीने वॉटरमार्क आणि इतर सुरक्षा प्रक्रियांचा समावेश असतो. या प्रक्रियेदरम्यान बरीच गुप्तता पाळली जाते जे साहजिक आहे.

साधारण १० वर्षांपेक्षा अधिक काळ या नोटा चलनात राहतील या दृष्टीने ही निर्मिती प्रक्रिया होत असते. भारतात चार छापखाने आहेत जिथे नोटांची छपाई केली जाते.

तिथून पुढे या नोटांचे वितरण करणे ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक आहे.

 

delarue-currency-notes-marathipizza

 

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांमध्ये प्लास्टिक पॉलिमर पासून बनवलेल्या नवीन नोटा चलनात येत आहेत. ज्या अधिक मजबूत आणि अधिक सुरक्षित आहेत. शिवाय अधिक काळ टिकणाऱ्या आहेत.

अजून महत्वाचे म्हणजे त्या अधिक स्वच्छ देखील राहू शकतात. त्यांच्यावर डाग देखील पडत नाहीत.

आता कॅशलेस सोयीसुविधा उपलब्ध झाल्या आहेत. पण कागदी चलनाची जादू अजूनही कायम आहे.

भविष्यात या कागदी चलनाचा प्रवास कसा असेल, त्या टिकतील का? असे प्रश्न आहेत पण लोकांचा कागदी चलनावरचा विश्वास अजूनही कायम आहे. अगदी प्रगत देशातसुद्धा! स्वीडन हा देश कॅशलेस दिशेने गेला आहे पण तो एक अपवादच म्हणावा लागेल.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?