' …वाजपेयींचं स्वप्न पूर्ण होतंय… देशातील सर्वात लांब “रेल-रोड ब्रिज” सुरू होतोय! – InMarathi

…वाजपेयींचं स्वप्न पूर्ण होतंय… देशातील सर्वात लांब “रेल-रोड ब्रिज” सुरू होतोय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

अटल बिहारी वाजपेयी भारताचे पंतप्रधान असताना त्यांनी भारताच्या कनेक्टिव्हिटीमध्ये अमुलाग्र आणि क्रांतिकारी बदल घडवून आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम क्षेत्राचे मजबुतीकरण केले. त्यांनी अनेक नव- नवे हायवे प्रोजेक्ट्स लाँच केले.

सुवर्ण चतुष्कोन हा त्या महत्वकांक्षी प्रोजेक्ट्सपैकी एक होता. तेवढ्यावरच न थांबता त्यांनी अनेक नव्या प्रोजेक्ट्सला त्यांचा काळात मंजुरी दिली होती.

ईशान्य भारतात वाहतुकीसाठी चांगले प्रकल्प निर्माण करायला अटलजींच्या सरकारने मान्यता दिली. ह्या प्रकल्पामुळे सुदूर ईशान्य भारताची भारत भूमीशी असलेली कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत झाली.

परंतु अटलजींचं सरकार २००४ साली गेल्यानंतर अटलजींने मुहूर्तमेढ रोवलेले अनेक प्रकल्प रखडले. ह्या प्रकल्पापैकी एक प्रकल्प होता बोगीबिल ह्या महाकाय पुलाचा!

 

rail-inmarathi
FreeBlitz.com

१९९७ साली मुहूर्तमेढ रोवण्यात आलेल्या ह्या पुलाचे काम आज २०१८ साली पूर्ण झाले इतके ते रखडले होते. नरेंद्र मोदी सरकारने अटलजींच्या स्वप्नातला हा पूल बांधला असून हा पूल सर्वार्थाने वरदान ठरणार आहे.

आसाम मधील दिब्रूगडच्या दक्षिणेकडे असलेल्या नदीतुन देहामजी ह्या अरुणाचल मधील ठिकाणापर्यंत ४.९८ किमीच्या पुलाचे निर्माण केले गेले आहे.

हा प्रकल्प संपूर्णतः वेल्डिंग करून निर्माण केलेला असून तो भारतातला पहिला पूर्णतः वेल्डेडे पूल आहे. हा भारतातील पहिला अश्याप्रकाचा पूल आहे.

ह्या पुलाच्या निर्मितीचा एकूण खर्च हा ५३०० कोटी इतका आहे.

 

bridge-inmarathi
thebetterindia.com

आसाममधील सामन्य जनतेबरोबर सैन्याला देखील याचा फायदा होणार आहे. ह्या पुलामुळे आसाम आणि अरूणाचल हे अंतर ४ तासाचे होणार आहे. यामुळे आसाममधून अरुणाचलला जाणाऱ्या लोकांचा १७० किमीचा फेरा वाचणार आहे.

ह्या पुलाचे वैशिष्ट्य म्हणजे ह्या पुलावर तीन पदरी मार्ग व दोन रेल्वे ट्रॅक टाकण्यात आलेले आहेत. ज्यामुळे मालाची वाहतूक अजून सोपी होणार आहे.

ह्या नव्या रेल्वे मार्गावर दोन नव्या स्टेशनची निर्मिती करण्यात येणार आहे जे नदीच्या दोन टोकावर दोन वेगवेगळ्या राज्यात असतील.

ह्यांचा उपयोग मालाची चढ उतार करण्या बरोबर प्रवाशी वाहतुकी साठी होईल. आधी आवश्यक पुरवठा करताना येणाऱ्या अडचणी दूर होऊन, जलद गतीने रसद पुरवठा शक्य होणार आहे.

 

railway-inmarathi
irctc.com

भारतीय सैन्यासाठी तसेच तिथल्या ५० लाख जनतेसाठी हा पूल वरदान ठरणार आहे. हा पूल तिथल्या लोकांपर्यंत जास्तीत जास्त वैद्यकीय व अत्यावश्यक सुविधा जलद गतीने उपलब्ध करण्यास फायदेशीर ठरणार आहे.

पुलाच्या एका बाजूला असलेल्या अत्याधुनिक इस्पितळात उपचार घेण्यासाठी दुसऱ्या बाजूच्या लोकांना करावा लागणारा द्रविडी प्राणायम यामुळे वाचणार आहे.

तसेच ह्या भागातील शहरीकरणाचा वेग वाढण्यास देखील ह्या पुलाने चालना मिळणार आहे. सामान्य जनतेला दळण वळण, आरोग्य तसेच शिक्षण ह्या क्षेत्रात नव्या संधी ह्यामुळे उपलब्ध होणार आहेत.

ह्या पुलाचा वापर आणि फायदा सर्वाधिक भारतीय सैन्याला होणार आहे. भारतीय सैन्याला आधी रसद पुरवठा करताना आणि शस्त्र पुरवठा करताना अनंत अडचणींचा सामना करावा लागायचा. जुन्या मार्गामुळे प्रचंड वेळ ह्या संपूर्ण प्रक्रियेला लागायचा.

 

bogibeel-inmarathi
defence.com

अरुणाचलची सीमा चीनच्या सीमेशी भिडत असल्याने त्याठिकाणी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास सैन्याला रसद तसेच शस्त्रपुरवठ्या साठी हा मार्ग उपयोगी ठरणार आहे.

भारतीय सैन्याची बेस टू बेस कनेक्टिव्हिटी वाढायला हा पूल महत्वाचा ठरणार आहे.

भारतीय सैन्याचे ईशान्येतील मजबुतीकरण हे चीन सोबत असलेल्या सीमावादाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. चीन ह्या प्रदेशावर करत असलेला दावा मोडण्यासाठी व चीनच्या विस्तार वादी भूमिकेला आळा घालण्यासाठी हा पूल महत्वाचा ठरणार आहे.

ह्या पुलाचा प्रकल्प हा भूकंप प्रवण क्षेत्रात निर्माण करण्यात आला असून यात वापरण्यात आलेल्या स्पेसिफिक मेटल मुळे सात रिष्टर स्केलचा भूकंप हा प्रमुख सहन करू शकतो.

इतका हा पूल मजबूत करण्यात आला आहे. त्यामुळे कुठल्याही भूकंपाचा यावर जास्त काही फरक पडणार नाही.

 

army-logistic-inmarathi
indiandefence.com

ह्या प्रकल्पाचे भूमिपूजन जरी १९९७ साली झालं असलं तरी प्रत्यक्ष कामासाठी हालचाल २००८ मध्ये टेंडर काढून कॉन्ट्रॅक्ट वाटप करून करण्यात आलं.

पण प्रत्यक्षात काम सुरू व्हायला २०११ उजाडलं आणि काम संपूर्ण व्हायला २०१८ साल उजाडाव लागलं.

आसाम मधील ज्या लोकांचा बालपणी ह्या महत्वकांक्षी प्रकल्पाची घोषणा झाली होती, आज ते मुलं मोठे झाल्यावर तब्बल २० वर्षांनी त्यांना हा पूल प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे .

ह्या प्रकल्पाचे उद्धाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अटलजीच्या जयंती दिनी केले.

 

china-inmarathi
theindianexpress.com

ज्यांचा स्वप्नातून हा प्रकल्प आकारास आला होता. अटलजींच्या निधनानंतर हा प्रकल्प पूर्ण होणे खरतर दुर्दैव आहे.

पण हा प्रकल्प जो निरनिराळ्या पद्धतीने लोकांच्या हिताचा ठरणार आहे, ते बघता हा प्रकल्प अटलजींना वाहिलेली एक खरी श्रध्दांजली असणार आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?