' “मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं?” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं – InMarathi

“मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं?” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सोशल मीडियाचा उदय झाल्यापासून जग अधिकच जवळ आले आहे. आपल्या घरात बसल्या बसल्या आपण जगाच्या दुसऱ्या टोकावर असलेल्या देशातील लोकांशी संवाद साधू शकतो.

त्यांच्याशी मैत्री करू शकतो, विविध विषयांवर चर्चा करून एखाद्या घटनेबाबत किंवा एखाद्या विषयावरील त्यांची मते जाणून घेऊ शकतो, एकमेकांशी आपल्याला माहित असलेल्या गोष्टी शेअर करू शकतो.

कोरा नावाच्या व्यासपीठावर लोक अनेक प्रश्न विचारून विविध माहिती जाणून घेत असतात. देशविदेशातील लोक एकमेकांचे शंकानिरसन करीत असतात.

विविध विषयांवर आपापली मते मांडून चर्चा करीत असतात. मध्यंतरी कोरावर एक प्रश्न विचारला गेला होता. हा प्रश्न जगातील मुस्लिम बांधवांना विचारण्यात आला की,

“हिंदू धर्माविषयी मुस्लिम म्हणून त्यांचा काय दृष्टिकोन आहे?”

 

muslimindia1-inmarathi

===

हे ही वाचा वारकरी आणि मुस्लिम यांच अनोखं नातं, हे फक्त भारतातच होऊ शकतं!

===

अहमद अब्देलहाक झेदान नावाच्या एका व्यक्तीने असे उत्तर दिले आहे कीं,

“मला हिंदू धर्माविषयी उत्सुकता वाटते आणि त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल. मी ज्या ठिकाणी वाढलो तिथे भारतीय हिंदू नाहीत.

खरे सांगायचे तर मी आजवर एकही हिंदू व्यक्तीला भेटलो नाहीये. पण माझ्या आजूबाजूच्या भागात अनेक पाकिस्तानी लोक राहत होते. त्यामुळे मशिदीत अनेक हिंदू धर्माविषयी बोलले जात असे.

लहान असताना मला असे शिकवले गेले होते की हिंदू धर्म हिंदू लोकांना मुस्लिम लोकांची हत्या करून इस्लामचे अस्तित्व नष्ट करण्याची शिकवण देतो.

आयुष्यातील बराच काळ मी हे खरे समजून चाललो कारण मी अनेकदा बातम्यांमध्ये ऐकले वाचले की हिंदू जमावाने बीफ खाण्याला विरोध म्हणून मुस्लिम स्त्रीवर बलात्कार करून तिच्या कुटुंबियांना ठार मारले.

तरीही मी हिंदू लोक व हिंदू धर्माचा द्वेष करत नाही. मात्र काही विचित्र घटनांबद्दल ऑनलाईन वाचल्यानंतर मी सावधगिरी बाळगत होतो पण कोरा जॉईन केल्यानंतर मी अनेक प्रतिभावंत हिंदू लेखकांचे साहित्य वाचले.

सर्वेश चक्रवर्तींच्या ओळखीतील एका व्यक्तीने मला हिंदुधर्मातील महत्वाच्या बाबी समजावून सांगितल्या आणि आदित्य पांडे ह्याने मला श्रीमद्भगवद्गीता विकत घेऊन वाचण्यास सांगितले.

 

hindu_sacred_texts_inmarathi

 

म्हणूनच आता मी असे म्हणू शकतो की पूर्वीपेक्षा आता मला भारत व हिंदू धर्माविषयी थोडीबहुत माहिती आहे. माझ्या मनातील अनेक शंका व गैरसमज दूर झाले आहेत.

आता हिंदू धर्मातील अनेक संकल्पना मी समजून घेऊ शकतो जसे की देव/ देवतांची प्रार्थना कशी करायची तसेच जातीव्यवस्था काय आहे वगैरे वगैरे.

परंतु अजुनही हे जग म्हणजे मिथ्या आहे, भगवान विष्णूंची माया आहे अश्या काही गोष्टी मला पूर्णपणे समजून घेता आलेल्या नाहीत. थोडक्यात सांगायचे झाले तर हिंदू धर्माविषयी आणखी जाणून घेण्याची मला उत्सुकता आहे.”

ह्याच प्रश्नाचे उत्तर देताना झायिन मोहम्मद म्हणतात की,

“मी एक भारतीय मुसलमान आहे तसेच माझे अनेक मित्र हिंदू आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचे उत्तर मी देऊ शकेन असे मला वाटते. २००७ पर्यंत मी अतिशय धार्मिक व कट्टर मुस्लिम होतो.

मी इस्लामिक धर्मगुरूंची शिकवण कट्टरपणे पाळत होतो व इतर धर्मांचा द्वेष करीत होतो. मी प्रामाणिकपणे विनंती करतो की हे जाणून घेतल्यानंतर कृपया माझा राग करू नका.

मी भगवद्गीता वाचली कारण मला त्यातील चुका शोधून काढून माझ्या बिगर मुसलमान मित्रांशी वाद घालायचा होता.

परंतु भगवद्गीता वाचल्यानंतर भगवद्गीता, बायबल, व कुराण ह्यात काय साम्य आहे हा विचार मी करू लागलो. कुराणात तृतीयपंथीयांविषयी काहीही उल्लेख नाही.

===

हे ही वाचा “माझ्या बहिणीने मुस्लिम प्रियकराशी लग्न जरूर करावं, पण धर्मांतर न करता…!”

===

मला कायम प्रश्न पडतो की तृतीयपंथीयांची निर्मिती कोणी केली? ह्याचे उत्तर मला हिंदू ग्रंथांत सापडले. भगवद्गीता, बायबल, व कुराण ह्या तिन्ही ग्रंथांत चांगल्याच गोष्टी सांगितल्या आहेत व माझ्या लेखी हे तिन्ही ग्रंथ सामान आहेत.

 

geeta-inmarathi

 

हिंदू धर्मात प्रत्येक व्यक्तीचा व प्रत्येक गोष्टीचा आदर करण्याची शिकवण दिली जाते. मोठ्यांना वाकून नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेण्याची परंपरा मला अतिशय आवडते. ह्याने आपल्याला कळते की आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तींना आयुष्याचा जास्त अनुभव आहे.

तसेच हात जोडून वणक्कम, नमस्कारम व नमस्ते म्हणणे हे मी रोज करतो. माझ्या कंपनीतील सुरक्षा कर्मचाऱ्यांना मी रोज हात जोडून नमस्ते करतो. मला असे करायला आवडते. हे मी हिंदू धर्माकडून शिकलो.

भारताबाहेर भारतीय संस्कृतीचा आदर केला जातो. भारतीय संस्कृतीतील ह्या सर्व गोष्टी हिंदू धर्मातूनच आल्या आहेत. त्या हजारो गोष्टीतील एक गोष्ट म्हणजे लग्नाचे बंधन!

हिंदू धर्मात पती पत्नीला एकमेकांचा आदर करण्यास सांगितले जाते. आयुष्य कसे जगावे ह्याची संपूर्ण शिकवण हिंदू धर्मात मिळते. हिंदू धर्मामुळेच एक मुस्लिम म्हणून मी भारतात सुरक्षित व शांत आयुष्य जगतो आहे.”

युसूफ हसन ह्या व्यक्तीने ह्या प्रश्नाचे उत्तर देताना असे म्हटले की,

“माझे अनेक मित्र हिंदू आहेत. त्यातले जवळजवळ सगळेच सुशिक्षित व खुल्या विचारांचे आहेत. म्हणूनच त्यांना न दुखावता हिंदू धर्माविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची संधी मला अनेकदा मिळाली.

मला असे समजले की हिंदू लोक नदी, गाय, सूर्य, पर्जन्य, झाडे ह्यांची पूजा करतात कारण ह्याद्वारे ते निसर्गावरील कृतज्ञता व्यक्त करीत असतात.

ते निसर्गाची पूजा करतात कारण निसर्गामुळेच आपण पृथ्वीवर जगू शकतो. ह्या पूजेद्वारे ते निसर्गाचे आभार मानतात. अनेकांनी मला सांगितले की हिंदू हा धर्म नसून हा आयुष्य जगण्याचा एक मार्ग आहे.

सूर्यनमस्कारापासून ते गेलेल्यांच्या अंत्यसंस्कारापर्यंत सर्व गोष्टींमागे काही ना काही आध्यात्मिक कारण आहे.

 

Woman-doing-yoga-Shutterstock-800x430

 

हिंदू धर्मात अनेक कथा सांगितल्या जातात. ह्या कथांमधून आपल्याला नैतिकता, धैर्य, आदर्श जीवन ह्यांची शिकवण मिळते तसेच अप्रामाणिकपणा, खोटे बोलणे आणि फसवणूक केल्याने काय परिणाम होतात हे सुद्धा समजते.

मी मुस्लिम असून देखील रामायण व महाभारताच्या वर्गांना हजेरी लावली. सुदैवाने मी हे शिकतोय म्हणून कोणी मला कमी दर्जाचा मुस्लिम अशी विशेषणे लावली नाहीत.

हिंदू धर्मात नात्यांचा सन्मान केला जातो. मला रक्षाबंधन आणि करवाचौथ हे सण फार आवडतात.

इतर धर्मांप्रमाणेच ह्या धर्मात सुद्धा आई वडील व गुरु ह्यांचे स्थान उच्च मानले जाते.

घरातील मुलींचा सन्मान केला जातो (मला त्या सणाचे नाव आठवत नाहीये पण माझ्या एका ब्राह्मण मैत्रिणीने सांगितले होते की त्यांच्या एका सणाच्या दिवशी कन्यापूजन करून त्यांना गोड खाऊ व भेटवस्तू दिल्या जातात.)

मला हिंदू धर्मातील लग्नाच्या बंधनाची संकल्पना सुद्धा फार आवडते. एकमेकांना वाचणे देऊन ते वचन ७ जन्म पाळणे हि संकल्पना खूप सुंदर आहे.

हे वचन अग्नीसमोर दिले/घेतले जाते. तसेच आई वडील व इतर मोठ्या व्यक्तींच्या पाय पडून त्यांचे आशीर्वाद घेणे ह्यातून आपण त्यांचा आदर केला पाहिजे ही परंपरा इस्लाममध्ये नसली तरी मला भावते.”

 

Weird Wedding Ceremonies.Inmarathi4

 

पाकिस्तानी पंजाबी मुस्लिम असलेल्या मुहम्मद आमिर खोखर ह्या व्यक्तीने हिंदू धर्माविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

हिंदू लोक खुल्या विचारांचे असतात, त्यांच्या धर्मात एकेश्वरवाद, नास्तिक असणे गुन्हा मानत नाहीत, प्रत्येकाला आपल्या आवडत्या देवावर श्रद्धा ठेवण्याचे स्वातंत्र्य आहे.

ह्या धर्मात कालानुरूप आवश्यक ते बदल घडत आले आहेत, हा धर्म सर्वसमावेशक आहे अशी माहिती ह्या व्यक्तीने ह्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान दिली आहे.

ह्याचप्रमाणे देशविदेशातील अनेक मुसलमान लोकांनी आपापली मते व्यक्त केली आहेत. जवळजवळ सगळीच उत्तरे सकारात्मक असून ह्यातील बऱ्याच लोकांना हिंदू धर्माविषयी थोडीबहुत माहिती आहे.

अनेकांना हिंदू धर्मातील परंपरा आवडतात. त्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्याची, शिकून घेण्याची उत्सुकता आहे.

===

हे ही वाचा मुस्लिम आक्रमणांपासून हिंदू धर्माचं रक्षण करणाऱ्या “नागा साधूंचा” अचंबित करणारा इतिहास…

===

येथे उत्तर देणारे बहुतांश लोक मुसलमान असून देखील हिंदू धर्माचा किंवा हिंदू धर्मियांचा द्वेष करीत नाहीत. उलट त्यांना हिंदू धर्मातील प्रथा व परंपरांचे आकर्षणच वाटते.

बहुतांश लोकांना हिंदू धर्मातील सर्वांचा आदर करणे, सर्वसमावेशकता, खुले विचार, निसर्गाविषयी कृतज्ञता बाळगणे ह्या गोष्टी भावतात. ही गोष्ट एक हिंदू म्हणून आपल्यासाठी सकारात्मक आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?