' महाराष्ट्रातील या दोन “लोकप्रिय” रेल्वे घाटांनी तब्ब्ल २४,००० कामगारांचा बळी घेतलाय – InMarathi

महाराष्ट्रातील या दोन “लोकप्रिय” रेल्वे घाटांनी तब्ब्ल २४,००० कामगारांचा बळी घेतलाय

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच तामिळनाडूची राजधानी असलेल्या चेन्नई येथील रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन रुळावरून घसरली. मात्र सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या सह्याद्री पर्वतरांगांतून डोंगर कापून रस्ते तयार करणे किंवा रेल्वेमार्ग बांधणे हे एक मोठे आव्हान होते. कठीण पाषाणातून रस्ते तयार करणे हे सोपे नाही. ह्या दरम्यान अनेक अपघात झाले. घाटातील रेल्वेमार्ग हा सिव्हिल इंजिनियरिंगचा एक उत्तम नमुना म्हणून ओळखला जातो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (GIPR) ही आपल्या देशातील सर्वात जुनी रेल्वेसेवा आहे.

या रेल्वेसाठी भोर घाटात म्हणजे कल्याण व पुणे दरम्यान तसेच थाल घाट म्हणजेच कल्याण व इगतपुरी दरम्यान रेल्वे ट्रॅक बांधण्यात आले.

ह्या घाटात ट्रॅक बांधताना कुठल्या अडचणी आल्या किंवा काय काय आव्हानांना तोंड द्यावे लागले ह्याची सगळी माहिती जर्नल ऑफ रेल्वे हिस्ट्रीमध्ये प्रकाशित झाली आहे.

हा प्रकल्प म्हणजे सिव्हिल इंजिनीअरिंगचा उपयोग करून केलेली एक मोठी कामगिरीच होती, हे रेल्वेसाठी एक मोठे यश होते परंतु ह्या प्रकल्पाच्या बांधकामादरम्यान सह्याद्री पर्वतातून मार्ग काढताना तब्बल २४ हजार कामगारांना आपले प्राण गमवावे लागले.

 

train inmarathi

हे ही वाचा –

===

 

रेल्वेच्या विविध प्रकल्पांबद्दल माहिती सांगणारे हे जर्नल मध्य रेल्वेद्वारे प्रकाशित करण्यात आले होते. GIPR ही मध्य रेल्वेच्या आधीची संस्था होती. GIPR १८४९ साली उदयास आली. जगभरात रेल्वेतील लोकांनी कुठल्या कुठल्या भागात अत्यंत कठीण आव्हाने स्वीकारून तेथे रेल्वे सुरु केली ह्याबद्दल सुद्धा संग्रहणांत माहिती दिली.

ब्रिटिश काँट्रॅक्टर्सचे फिल्ड रिपोर्ट सुद्धा ह्यात दिले आहेत. ह्या ब्रिटिश कॉन्ट्रॅक्टर्सने ह्या प्रकल्पात काम केले होते. हा प्रकल्प त्या वेळचे भारताचे गव्हर्नर जनरल असलेल्या लॉर्ड डलहौसी ह्यांनी मंजूर केला होता.

मध्य रेल्वेचे ऍडिशनल जनरल मॅनेजर ए के श्रीवास्तव सांगतात की एकोणिसाव्या शतकात मुंबईत मोठ्या प्रमाणावर व्यापार सुरु झाले आणि मुंबईचे बंदर अत्यंत गजबजले.

परंतु अंतर्गत भागात असलेल्या ग्रामीण भागात जाणे मात्र अजूनही कठीण होते. ह्याचे कारण होते सह्याद्रीचा खडकाळ भूप्रदेश! ह्या अंतर्गत भागात कापूस मोठ्या प्रमाणावर पिकवला जात असे व त्याबरोबर इतर पिके सुद्धा घेतली जात असत.

त्या काळात या प्रदेशात वाहतुकीसाठी रस्ते अतिशय खराब परिस्थितीत होते आणि पावसाळ्यात तर हे ही रस्ते वाहतूक करण्याच्या अवस्थेत राहत नसत.

त्यामुळे पिकांना बाजारपेठेपर्यंत आणणे सुद्धा कठीण होते. १८६३ साली भोर घाटात आणि १८६३ साली थाल घाटात रेल्वे आल्यापासून कापसाची सोलापूर ते मुंबई वाहतूक करणे सोपे झाले. त्यानंतर हा प्रदेश कलकत्ता, मद्रास आणि कानपूर मार्गे दिल्लीशी सुद्धा जोडला गेला.

भोर घाट पळसदरी आणि खंडाळ्याच्या मध्ये आहे आणि थाल घाट कल्याण व भुसावळच्या मध्ये आहे.

 

thal-ghat-inmarathi

 

ह्या प्रदेशात रेल्वे ट्रॅक बांधण्यासाठी जवळजवळ दहा वर्षे लागली. ह्या कामासाठी बेचाळीस हजार कर्मचारी कामाला लागले होते. हे कर्मचारी ठाणे, कल्याण, सोलापूर, धारवाड, रत्नागिरी ह्या भागातील होते.

डोंगरकड्यावर बांधकामाचे साहित्य व कर्मचाऱ्यांना पोचवण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लोकांनी दहा हजार बैल आणले होते.

जेव्हा ह्या भागाचे काम सुरु होते तेव्हा एकावेळी पंचवीस हजार कामगार पर्वतरांगांमध्ये काम करीत असत. फक्त पावसाळ्यात काम करणे शक्य नसल्यामुळे काम थांबत असे. इतके कर्मचारी तर जगप्रसिद्ध सुएझ कालव्याच्या कामासाठी सुद्धा लागले नव्हते. असे श्रीवास्तव सांगतात.

ह्या जर्नलमध्ये युनिव्हर्सिटी ऑफ मॅनिटोबा मधील ज्येष्ठ अभ्यासक आणि भारतीय रेल्वेमधील एक महत्वाचे अधिकारी इयन केर ह्यांचाही लेख प्रसिद्ध झाला आहे.

ते लिहितात की

“भोर घाटातील रेल्वेचा ट्रॅक बांधण्याची संकल्पना आणि बांधकाम ही मृत्यू, संघर्ष, सहनशक्ती, वीरता, क्रूरता, धैर्य आणि हे सगळे दोन दशकांपर्यंत सहन करत शेवटी मिळवलेला विजय ह्या सर्वांची लार्जर दॅन लाईफ कथा आहे.”

“ह्या कथेचे हिरो ही त्या ठिकाणी काम केलेले पुरुष, महिला व लहान मुले हेच आहेत कारण त्यांनीच सर्वात जास्त काम केले आहे. आणि ह्या दरम्यान विविध अपघातांमध्ये पंचवीस हजार पेक्षाही जास्त कामगारांचा जीव गेला आहे. “

हे ही वाचा –

===

 

bridge-inmarathi

 

माळशेज घाटानंतर भोर व थाल घाट रेल्वेद्वारे ट्रॅक टाकण्यासाठी निवडले गेले. परंतु माळशेज घाटाची उंची कमी असली तरी तेथेही काम करणे कठीणच होते. भोर घाटाचा उतार २०२७ फूट तर थाल घाटाचा उतार १९१२ आहे.

ह्या जर्नलमध्ये दिल्याप्रमाणे भोर घाटात २५ बोगदे, २३ पूल आणि ६० कल्व्हर्टस बांधण्यात आले.

येथे काम करणे कर्मचाऱ्यांसाठी अतिशय धोकादायक तर होतेच, शिवाय त्यांना उष्णता, पाण्याची कमतरता, साथीचे रोग आणि केव्हाही कोसळू शकणारी दरड ह्या सर्व समस्यांना सुद्धा तोंड द्यावे लागले.

भोर घाटात बांधकामाच्या वेळी ५४ दशलक्ष क्युबिक फीट इतका कठीण दगड कापण्यात आला. ह्या दोन्ही घाटांत जेव्हा बांधकाम सुरु होते तेव्हा कायम मलेरिया, कॉलरा ह्यांच्या साथी पसरत असत.

 

tunnel-inmarathi

 

यामुळे अनेक कर्मचारी व ब्रिटिश काँट्रॅक्टर्स सुद्धा आजारी पडून मृत्यू पावले आहेत. कधी कधी दोन कॉन्ट्रॅक्टरच्या आपापसातील भांडणांमुळे सुद्धा काही प्रमाणात नुकसान झाले.

श्रीवास्तव ह्यांच्या मते एकोणिसाव्या कापसाच्या व्यापाराला चालना मिळण्यात मध्य रेल्वेने खूप मोठी भूमिका बजावली आहे. त्याबद्दलची माहिती सुद्धा पुढील वर्षाच्या जर्नलमध्ये देण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न आहे.

भोर घाट व थाल घाटाच्या बांधकामादरम्यान कर्मचाऱ्यांना कश्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले हे सामान्य लोकांना माहिती होणे गरजेचे आहे. म्हणूनच हे जर्नल प्रसिद्ध व्हायच्या सात ते आठ महिने आधीपासूनच माहिती संकलित करणे सुरु झाले.

संग्रहित कागदपत्रे तसेच त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम केलेले कर्मचारी ह्यांच्याकडून ही माहिती संकलित केली. तेव्हाचे टाईमटेबल सुद्धा मिळवले.

 

ghat-inmarathi

हे ही वाचा –

===

 

जी डब्ल्यू मॅकजॉर्ज त्यांच्या १८९४ रोजी लिहिलेल्या वेज अँड वर्क्स इन इंडिया ह्या पुस्तकात लिहितात की,

“भव्यदिव्य अश्या भोर आणि थाल घाटातील मोठ्या आणि आरामदायक रस्त्यावरून आज अनेक लोक सुरक्षितपणे आणि सहज प्रवास करीत आहेत.

आपल्या आरामदायक अश्या रेल्वेच्या डब्यात बसून आजूबाजूचा रम्य परिसर न्याहाळताना त्यांना हे नक्कीच लक्षात येऊ शकेल की ह्या अजस्त्र डोंगरातून रस्ता खोदताना किती कष्ट लागले असतील, किती आव्हानांना तोंड द्यावे लागले असू शकेल तेव्हा कुठे हा रस्ता यशस्वीपणे पूर्ण झाला आहे.”

जवळजवळ शतकानंतर हाच विचार आपण हा दोन्ही घाटांतून जाताना करतो.

खरंच हा रेल्वेट्रॅक बांधणे किती कष्टप्रद आणि खडतर होते तरीही असामान्य जिद्द, अविरत कष्ट, चिकाटी आणि हजारो लोकांचे जीव ह्याच्या जोरावर आज सर्वसामान्य माणूस मुंबई-पुणे, मुंबई -नाशिक हा प्रवास अगदी कमी वेळात, सहज आणि सुरक्षितपणे करू शकतो.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?