' युद्ध सोडून अनेक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या भारतीय सेनेला सॅल्यूट! – InMarathi

युद्ध सोडून अनेक लोकोपयोगी कार्य करणाऱ्या भारतीय सेनेला सॅल्यूट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारतीय सेना हा भारताचा तो कणा आहे ज्याच्या भरवश्यावर आपला भारत देश हा ताठ मानेने ह्या जगासमोर उभा आहे. आपल्या सीमांची रक्षा करणारे हे भारतीय सेनेचे जवान आपल्या जीवाची परवा न करता अविरतपणे देशासाठी झटत असतात.

एवढचं काय तर आपल्या कुटुंबीयांना दुय्यम ठेवत आपल्या मातृभूमीला आपल्या देशाला ते पहिलं स्थान देतात. त्यांचा केवळ एकच हेतू असतो तो म्हणजे देशाच्या शत्रूंपासून देशाचे रक्षण करणे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

भारतीय सेनेचे हे जवान नेहमी कर्तव्याची जाण ठेवत दिवसरात्र आपल्या देशाची देशाच्या नागरिकांची रक्षा करत असतात. देशावर कुठलेही परकीय संकट आले की हे जवान त्यांच्यासमोर एक मजबूत भिंती प्रमाणे उभे राहतात.

ज्यांच्या शौर्याची कहाणी आपल्याला भारताच्या प्रत्येक घरात ऐकायला मिळते, एवढंच काय तर शत्रू देश देखील ज्यांच्या शौर्याचे गुणगान करतात असे आपल्या भारतीय सेनेतील जवान खरंच खूप शूर आहेत.

 

army-inmarathi
legendnews.in

भारतीय सैन्य जम्मू काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी सदैव कार्यरत असते. तिथे सीमेपल्याडच्या शत्रूचा जितका धोका आहे, तितकाच धोका हा तिथल्या फुटीरतावादी संघटना, जमावाचा असतो, आतंकवादी संघटनांचा असतो.

अश्यावेळी बऱ्याचदा सैन्य आणि नागरिक यांच्यात संघर्ष होतो. बऱ्याचदा सैनिकांना काही ठिकाणी कठोर कारवाई करावी लागते.

भारतीय सैन्याने काश्मीरमध्ये आपलं शौर्य वेळोवेळी दाखवलं आहे.

chiana and india border InMarathi

परंतु ह्यातून एक गैरसमज नेहमी पसरवला जात असतो की भारतीय सैन्य जम्मू काश्मीर मध्ये फक्त लष्करी कारवाई करतं आणि तिथे हिंसाचार पसरवत असतं. परंतु हे सत्य नाही.

भारतीय सैन्य जम्मू काश्मिरात केवळ सीमा रक्षण आणि कायदा सुव्यवस्था टिकवण्याचे प्रयत्न करत नाहीत तर तिथे अनेक चांगली समाज उपयोगी कामे देखील करत असतं, ज्याद्वारे ते स्थानिक काश्मिरी लोकांच्या जवळ जाऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत असतात.

भारतीय सैन्याचं काश्मीर मधील लोकांसाठीचं समाज कार्य हे “ऑपरेशन सद्भावना” नावाने सुरू आहे. ह्या ऑपरेशन द्वारे काश्मीर मधील सामान्य नागरिकांशी संपर्क प्रस्थापित करून त्यांच्याशी चांगले संबंध निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय सैन्य करत असतं.

 

sadbhavna-inmarathi
network18.com

ह्या ऑपरेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त काश्मिरी जनतेशी संपर्क प्रस्थापित करून त्यांना “आपलं” करण्यासाठी सैन्य प्रयत्न करत असतं. हे करण्यासाठी सैन्याकडून विविध मोहीमा आखल्या जातात. विविध कार्यक्रम हाती घेतले जातात. जे तिथल्या समाजाला उपयुक्त ठरतात.

ह्यासाठी सैन्याला स्थानिक सरकारची मदत मिळते. ह्या ऑपरेशनवर दरवर्षी ४५० कोटींचा खर्च करण्यात येतो.

शाळा उभारणी

भारतीय सैन्याने ५३ इंग्रजी माध्यमाच्या सद्भावना शाळांची निर्मिती जम्मू आणि कश्मीरच्या राजोरी, पुछ, बोनियार, उरी ( बारामुल्ला), खानाबल ( आनंतनाग), करू ( लेह), कारगिल आणि चांडिगाम ( कुपवाडा) ह्या भागात करण्यात आली आहे.

 

school-inmarathi
frontire.com

२७०० शाळांना चालवण्यासाठी सैन्याने मदत केली आहे. ह्या सैनिकी शाळा चांगल्या शैक्षणिक दर्जा साठी ओळखल्या जातात, अगदी अशांत वातावरणात ही ह्या शाळा सुव्यवस्थित पणे सुरू असतात.

आर्मीच्या ह्या शाळा काश्मीर खोऱ्यातील १०००० विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा पोहचवतात आणि जम्मू काश्मीर एकत्र करून हा आकडा १४००० इतका आहे.

स्त्री सबलीकरण केंद्र

जम्मू काश्मिरातल्या महिलांना विविध परिस्थितीचा सामना करण्या योग्य बनवण्यासाठी ह्या केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. त्यांचा आरोग्य विषयक समस्या बद्दल त्यांना याठिकाणी जागृत केलं जातं.

 

women-empoverment-inmarathi
thenewsnow.com

त्यांना अनेक बँकिंग संबंधित आर्थिक व्यवहार शिकवले जातात. कर्ज कसं काढायचं ते शिकवलं जातं. बहुसंख्य स्त्रिया अशिक्षित असल्याने त्या स्त्रियांना सामन्य शिक्षण दिलं जातं. त्या स्त्रियांना कॉम्प्युटर वापरण्यापासून शिलाई काम करण्यापर्यंतच्या विविध कला कुसरीच प्रशिक्षण दिलं जातं.

महिलांच्या स्किल डेव्हलपमेंट याठिकाणी प्रचंड महत्व दिले जाते. ह्या कार्यक्रमांतर्गत महिलांसाठी प्रशिक्षण केंद्रांची निर्मिती पुछ मध्ये, तसेच फॅशन डिझाइनिग इन्स्टिट्यूट व महिला सबलीकरण केंद्राची निर्मिती बारा मुल्ला जिल्ह्यात करण्यात आली आहे.

नवीन ग्राम उभारणी

 

soldiers-constructing-bridge-inmararthi
jandknews.com

अनेक मॉडेल गावांची निर्मती ऑपरेशन सद्भावनाच्या आखात्यारित्या करण्यात आली आहे. कुपवाडा जिल्ह्यात लोलब हे गाव निर्माण करण्यात आलं आहे चांदीगाम मध्ये आणि पुछ मध्ये सागरा मॉडेल गावाची निर्मिती करण्यात आली आहे.

शैक्षणिक आणि प्रेरणादायी सहली

२०१२ ते २०१५ या काळात भारतीय सैन्याने जवळपास २५० शैक्षणिक, राष्ट्रीय एकात्मता जागवणाऱ्या आणि व्यक्तिमत्व विकासावर आधारित सहलींचे आयोजन केले आहे.

army team with villegers 1 InMarathi

प्रत्येक सहलीत ३० जणांचा समावेश असतो. ह्या सहलीत पंजाब, डेहराडून, केरळा, कोलकाता, भूभनेश्वर, गोपाळपूर, आग्रा आणि नवी दिल्ली ह्या शहरात नेण्यात येते. यात विद्यार्थ्यांना भारतातील विद्यार्थ्यांशी चर्चा करायला संधी मिळवून दिली जाते.

सोबतच भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची भेट घडवण्यात येते. बऱ्याचदा या सहलीच्या माध्यमातून त्या काश्मिरी विद्यार्थ्यांना काश्मीरच्या बाहेरचं जग बघायची पहिल्यांदा संधी मिळते.

आरोग्य

भारतीय सैन्याकडुन वेळोवेळी काश्मिरात मेडिकल कॅम्पसंच आयोजन करण्यात येतं. सैनिकी रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ह्या रुग्णालयात नागरीकांना अनेक वैद्यकीय सुविधा ह्या मोफत अथवा माफक दरात उपलब्ध होतात.

 

medical-camp-inmarathi
news18.com

विविध फाउंडेशनच्या माध्यमातून गरजूंना कृत्रिम पाय वाटप केले जाते. आजवर तब्बल ३१०० गरजू रुग्णांना ही मदत करण्यात आली आहे. ह्या योजनेअंतर्गत केवळ माणसंच नव्हे प्राण्यांच परीक्षण केलं जातं व सूचना दिल्या जातात.

खेळ आणि क्रीडा

भारतीय सैन्याकडून जम्मूत विविध क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात. काही स्थानिक संघटनाशी एकत्र आयोजन करण्यात येते.

 

baramulla-inmarathi
harmukhnews.com

ह्या उपक्रमांतर्गत विविध स्पर्धा भरवल्या जातात जसे बारामुल्ला गर्ल बॅडमिंटन स्पर्धा, बारामुल्ला क्रिकेट लीग, बारामुल्ला प्रीमियर लीग, कुपवाडा प्रीमियर फुटबॉल लीग, गिंगले व्हॉलीबॉल टीम, अश्या अनेक स्पर्धा त्यात समाविष्ट आहेत. ह्या खेळात १६ संघांनी सहभाग नोंदवला होता.

अश्याप्रकारे भारतीय सैन्य विविध मार्गाने तिथल्या सामान्य जनतेशी जवळीक वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

एकीकडे फुटीरवादी विष कालवत असतांना संयमाने लोकांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम “सद्भावना” ह्या ऑपरेशन अंतर्गत भारतीय सैन्य करत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?