' "माझे वडील माझे 'मेन्टॉर' नव्हते, मला हवं तेच मी करते" : इंदिरा गांधी

“माझे वडील माझे ‘मेन्टॉर’ नव्हते, मला हवं तेच मी करते” : इंदिरा गांधी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इंदिरा गांधी ह्या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान, पोलादी स्त्री म्हणून आजवर आपल्याला परिचित आहेत. पण इंदिरा गांधीं ह्यांचा ह्या पोलादी व्यक्तिमत्वाच्या मागे त्यांची एक स्त्री म्हणून असलेली अथवा व्यक्ती म्हणून असलेली बाजू आजही फारशी उजेडात आलेली नाही.

इंदिराजी भारताच्या कर्तृत्ववान पंतप्रधान तर होत्याच परंतु त्यांनी त्यांच्या आयुष्यात आई म्हणून, बायको म्हणून तसेच एक मुलगी म्हणून पण खूप चांगली भूमिका निभावली आहे, जी अजूनही जगासमोर आली नाही.

परंतु इंडिया टुडे ह्या नियतकालिकेने इंदिरा गांधींची एक जुनी मुलाखत प्रकाशित केली असून त्यात इंदिरा गांधींनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडित बरेच खुलासे केले होते.

त्यांच्या आजवरच्या मुलाखतीपैकी ही मुलखात फार वेगळी आहे. यातून इंदिरा गांधी ह्या ‘पोलादी स्त्री’च्या हळुवार बाजूचा उलगडा होतो.

ही मुलाखत इंदिराजीनी त्याकाळी बिना ललवाणी ह्या बिझनेस वुमनला दिली होती. ही मुलाखत लंडन मध्ये पार पडली. ह्या इंयरव्ह्यूच्या माध्यमातून इंदिराजींच्या विविधांगी स्वभावाला व एकूण स्त्री म्हणून त्यांनी जगलेल्या आयुष्याचा उलगडा करण्यात आला.

त्यांनी ह्या इंटरव्ह्यू दरम्यान काही प्रश्नांवर अगदी दिलखुलास प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच ह्यातून एका प्रोग्रेसिव्ह भारतीय महिलेची एक प्रतिमा त्यांनी उभी केली होती. जी आज भारताची ओळख बनली आहे.

ह्या मुलखतीमध्ये त्यांनी अनेक खळबळजनक दावे देखील केले होते. जे बऱ्यापैकी हादरवून सोडणारे आहेत.

ही मुलाखत त्यांच्या पंतप्रधान पदी विराजमान होण्याच्या आधीची असल्याने तिला एक विशेष महत्व आहे. ह्या मुलाखतीतुन इंदिराजींनी केलेल्या काही प्रश्नांना आणि इंदिरा गांधींनी दिलेल्या चपखल उत्तरांना बघून त्यांचा एकूण आवाका लक्षात येतो.

१) पंडित जवाहरलाल नेहरू नव्हते इंदिरा गांधींचे मार्गदर्शक !

 

Indira gandhi.Inmarathi3
blogspot.in

 

ललवाणी यांनी इंदिरांना मुलाखती दरम्यान प्रश्न विचारला की तुम्हाला तुमचे वडील वगळता दुसरी कोणी व्यक्ती मेन्टॉर म्हणून आहे का? तेव्हा इंदिराजी म्हटल्या की “माझे वडील माझे मेन्टॉर नाहीत ! मला हवं तेच मी करते.”

२) इंदिराजीं आणि फिरोज गांधीची प्रेम कथा

 

Feroze_Gandhi_and_Indira_Gandhi-inmarathi
wikipedia.org

 

इंदिराजींना ललवाणी यांनी प्रश्न विचारला की इंदिराजी फिरोज गांधीसोबत तुमचं प्रेम कधी फुललं? त्यावर उत्तर देताना इंदिराजी म्हटल्या की वयाच्या १२-१३ व्या वर्षीच मी फिरोजला आवडले होते. तो माझ्या पेक्षा दोन वर्षे मोठा होता.

त्याने मला तेव्हापासून अनेकदा मागणी घातली. मग मी अखेरीस १६ व्या वर्षी त्याला हो म्हटलं आणि आमचं प्रेम प्रकरण सुरू झालं.

३) इंदिराजींचे त्यांच्या सासू सोबतचे संबंध!

 

indira-gandhi-marathipizza

 

इंदिराजींना त्यांच्या सासूबाबत विचारले असता त्या म्हटल्या की त्यांचे व त्यांच्या सासूचे संबंध हे असे फार काही नव्हते. कारण त्यांच्या सासूबाई ह्या अलाहाबादला  सध्याचं प्रयागराज) राहायच्या. फिरोज हे देखील त्यांच्या आईला जास्त पत्र पाठवत नसत. त्यांनी अगदी विवाहाची बातमी सुद्धा त्यांच्या आईला पत्रातून दिली होती!

ह्यानंतर राजकारणात पडल्यावर अजून दुरावा आला. तरी त्यांनी त्यांना दिल्लीला बोलवून घेत त्यांच्याशी जवळीक ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

४) इंदिराजी आणि त्यांची मुलं !

 

Indira-and-childs1-inmarathi
nehrumemorial.nic.in

 

इंदिराजीना त्यांच्या मातृत्वाबद्दल प्रश्न विचारला असता त्या म्हटल्या की त्यांच्या मातृत्वाचा काळ सुखद होता. जेव्हा त्यांना पहिला मुलगा झाला तेव्हापासून त्या मुलाला वाढवण्यात इंदिराजींना अधिक त्रास पुरला नाही. तो अनुभव त्यांच्यासाठी खूप छान होता.

५) इंदिराजींना नव्हता फॅशनमध्ये इंटरेस्ट !

 

indira-gandhi-inmarathi02
medias.rs

 

लालवाणींने जेव्हा इंदिराजींना प्रश्न विचारला की तुम्हाला फॅशनमध्ये रस आहे का? तेव्हा त्या म्हटल्या की मला काही कळत नाही त्यातलं, मला भारतीय पद्धतींचा पेहराव करायला आवडतो. तो पेहराव मला अधिक भावतो.

६) इंदिराजीना फिरायला आवडायचं…. पण…

 

indira-gandhi-inmarathi01
hindustantimes.com

 

ललवाणी यांनी इंदिराजींना प्रश्न विचारला की इंदिराजीना अनेक देशांना भेटी दिल्या असतील, एखादा देश जो त्यांना आवडला असेल असा? त्यावर प्रतिक्रिया देताना इंदिराजी म्हणाल्या की त्यांना देश विदेशात जायला लागतं. पण त्या जनरली मिटिंग्ज साठी म्हणूनच तेथे जातात, जिथे पर्यटक नाही.

त्यांच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा असतो. त्यामुळे भ्रमंती करून देश अनुभवता येत नव्हता.

७) इंदिराजीचं घटस्फोटावरील वरील मत

 

intoday.in

 

ललवाणी यांनी इंदिरा गांधींना घटस्फोट ह्या स्त्रीच्या आयुष्याशी निगडित मूलभूत प्रश्न विचारल्यावर इंदिराजी म्हटल्या होत्या की घटस्फोट मुळातच भारतीय संस्कृतीचा भाग नाही, ती पाश्चात्य संकल्पना आहे.

पण भारतात जर एखाद्या स्त्रीला नवऱ्याचा त्रास असेल तर त्या स्त्रीने घटस्फोट दिला पाहिजे. हे स्त्रीच्या व्यक्तिस्वातंत्र्याशी निगडित आहे.

८) इंदिराजी मोकळा वेळ कसा घालवत ?

 

indira-gandhi-reading-inmarathi
gettyimages.in

 

मुलाखतकार ललवाणी यांनी इंदिरांना प्रश्न विचारला की त्यांना त्यांचा मोकळा वेळ कसा घालवायला आवडतो?

त्यावर इंदिराजी म्हटल्या की मला बहुतांश मोकळा वेळ नसतो. पण मी माझा मोकळा वेळ अर्थात रात्रीचा वेळ वाचनात घालवते. जेव्हा माझ्या मुलांना सुट्टी असेल तेव्हा त्यांना डोंगर दऱ्यात हायकिंग करायला घेऊन जाते. तिथे आम्ही जेवढे जास्त अनुभव घेता येतील तितके घेत असतो.

९) इंदिराजींनी कधी जेवण बनवलं नाही !

 

indira-gandhi-serving1-inmarathi
thelallantop.com

 

इंदिरा गांधींना ललवाणी यांनी प्रश्न विचारला की तुम्हाला स्वयंपाक जमतो का ? त्यावर उत्तर देताना इंदिराजी म्हणाल्या, की “अंडा” वगळता त्यांना इतर कुठल्याही प्रकारचा स्वयंपाक करता आला नाही, ना त्यांना तो जमतो.

१०) इंदिराजींचा आवडता देव कोणता होता?

 

indira gadhi fraud.marathipizza
images.indianexpress.com

 

इंदिराजींना जेव्हा त्यांच्या आवडत्या देवाबद्दल विचारण्यात आलं तेव्हा उत्तर देताना त्या म्हणाल्या की मला असा पर्टीक्युलर कोणता देव आवडत नाही. आपल्या संस्कृती प्रमाणे देव हा सर्वत्र आहे या संकल्पनेवर माझा विश्वास आहे.

माझ्या घरात बालपणी गीता आणि रामायण वाचले आहेत त्यामुळे मला त्यांच्यातली काही पात्र आवडतात.

अशाप्रकारे इंदिराजी एक कुशल नेत्याच नव्हे तर आधुनिक स्त्रीचं रूप होत्या. सततच्या माणसातील वावरात देखील त्यांनी त्यांचं “स्त्रीत्व” आणि आवडी टिकवल्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?