' प्रत्येक भारतीय उद्योजकाने हे शिकायलाच हवं; जे चीनचा सर्वात श्रीमंत माणूस करतोय...

प्रत्येक भारतीय उद्योजकाने हे शिकायलाच हवं; जे चीनचा सर्वात श्रीमंत माणूस करतोय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतात पूर्वी राजे महाराजे एका विशिष्ट वेळी आपलं भलं मोठं साम्राज्य त्यागून ते आपल्या पुत्रांच्या अथवा वारसांच्या हाती सोपवून आपलं उर्वरित आयुष्य हे शांततेत तपश्चर्या आणि देवाचं नामस्मरण करण्यात घालवायचे. योग्य वेळी ते स्वतःला रिटायर करायचे.

प्राचीन भारतीय संस्कृतीचा हा ट्रेंड आज कोणी भारतात फॉलो करतंय का नाही माहिती नाही. पण चीनच्या एका जगप्रसिद्ध उद्योजकाने ह्या मार्गाचा अवलंब करत आदर्श घालून दिला आहे.

नुकताच चीनच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीने त्याच्या ५४ व्या वाढदिवशी त्याच्या जगप्रसिद्ध कंपनीच्या कार्यकारी अधिकारी पदावरून २०२० च्या वर्ष अखेर पर्यंत पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे जॅक मा आणि त्याच्या प्रसिद्ध कंपनीचे नाव आहे “अलिबाबा”. जी सध्याच्या घडीला जगातल्या काही सर्वश्रेष्ठ ऑनलाइन रिटेल मार्केट जायंट्स पैकी एक आहे.

 

jack-ma-inmarathi
shanghai-dail.com

जॅक मा हे जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आहेत. ते खूप मोठे वक्ते देखील असून जागतिकीकरण तसेच अनेक आर्थिक विषयांवर त्यांचा जागतिक चर्चासत्रात सहभाग असतो.

जॅक माँ यांचा अलिबाबाच्या मोठ्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय त्यांच्या ४२० दशलक्ष डॉलर इतक्या किंमतीच्या कंपनीसाठी नवीन युगाची सुरुवात ठरणार आहे. ह्या जगातल्या काही मोठ्या कंपनीपैकी एक असलेल्या कंपनीला जॅक मा यांनी स्वतः उभारलं आहे.

जॅक माँ यांच्या कथेची सुरुवात हाँगझोऊ शहरात झाली, जे चीनच्या पौर्वात्य सीमेवर असून जिथे १० दशलक्ष लोक वास्तव्यास आहेत. जॅक माँ यांचा जन्म १९६४ साली एका गरीब कुटुंबात झाला. त्यांच्या शारिरीक वाढीवर त्यांचे शाळकरी सवंगडी चिडवायचे, मा त्या पोरांसारखे धष्टपुष्ट नव्हते. परंतु मा कधीच बिथरले नाही, ना त्यांनी कधी मित्रांच्या धमक्यांना भीक घातली.

मा ह्यांना इंग्रजी भाषा अवगत नव्हती. त्यांच्या शहराला भेट देणाऱ्या परदेशी प्रवाश्यांना ते संपूर्ण शहराचे दर्शन इंग्रजी शिकवण्याचा अटीवर करत होते. त्यांनी त्यानंतर एक रेडियो विकत घेतला व त्यावर चालणाऱ्या प्रोग्राममधून आपला इंग्रजी भाषेवरील प्रभाव वाढवला. त्यांनी मैत्री केलेल्या एका प्रवाशानेच त्यांना ‘जॅक’ हे नाव दिले.

शालेय शिक्षण झाल्यावर मा यांनी महाविद्यालयीन शिक्षणाला अर्ज केला. त्यांना गणितात कमी मार्क्स मिळाल्यामुळे ते एकदा नव्हे तर दोनदा चीनच्या महाविद्यालयीन प्रवेश परीक्षेत फेल झाले. तिसऱ्या प्रयत्नात ते पास झाले. त्यांनी १९८८ ला हाँगझोऊ टीचर्स इन्स्टिट्यूट मधून पदवी संपादन केली.

मा यांनी त्यानंतर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या जॉब्ससाठी अर्ज केला. पण निराशा पदरी पडत होती. त्यांनी पोलीस अधिकाऱ्यापासून वेटर पर्यंतच्या नोकरीला अर्ज केला होता. ह्या संपूर्ण अनुभवातून जॅक मा एक धडा शिकले ज्याने त्यांना त्यांचा उद्योजकतेच्या युगासाठी तयार केले.

तो धडा होता ” अपयशाची सवय करून घेणे आणि त्यातून शिकणे”.

 

jack-na-forbes-inmarathi
dianshangwin.com

त्यानंतर मा यांना एका शाळेत इंग्रजी विषयाच्या शिक्षकाची नोकरी मिळाली. ज्यातून त्यांना महिन्याला १३ डॉलर अर्थात २००० रुपयांची कमाई होत होती.

१९९५ ला त्यांनी अमेरिकेला भेट दिली आणि त्यांचा संबंध इंटरनेटशी आला. त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडत, हजार रुपयांचे कर्ज घेत इंटरनेटवर चायनीज पेज चालू केले. ती पेजेस चीन मधील पहिली इंटरनेटवर व्यवहार करण्याचं साधन होती. त्यासाठी मा ने हाँगझोऊ टेलिकॉमसोबत करार केलेला. पण नंतर त्यावर बंदी घालण्यात आली.

जॅक मा यांनी पुढे अलिबाबाची स्थापना केली. त्यांनी न्यू यॉर्क स्टोक एक्सचेंज मध्ये नोंदणी केली. पण तिकडे ही त्यांना निराशा पदरी पडली. मग त्यांनी त्यांच्या १७ मित्रांना तयार करत त्यांच्याकडून निधी घेऊन आपल्या कल्पनेला नावारूपाला आणलं.

त्यांनी ६०००० डॉलरची उभारणी अलिबाबा.कॉमच्या माध्यमातून केली. मा ने त्याच्या कंपनीचे नाव सॅन फ्रान्सिस्कोच्या कॅफेत अलिबाबा आणि चाळीस चोर ह्या कथेला वाचत असताना दिलं होतं.

काही महिन्यात अलिबाबाची प्रगती होत गेली. जॅपनीज टेलिकॉम कंपनी आणि गोल्डमन सॅक कडून त्यांच्या प्रकल्पाला २५ दशलक्ष डॉलरचा निधी मिळाला. २००३ ला अलिबाबाने त्यांची कॉम्पिटेटर असलेल्या इबेला मागे टाकलं. अलिबाबाची प्रगती बघता याहूला त्यांनी ४०% स्टॉक विकत घ्यायला भाग पाडले. ते सुद्धा १ अब्ज रुपयांच्या अवाढव्य किमतीला!!

 

 

सुरुवातीच्या काळात केलेल्या चांगल्या कार्यामुळे अलिबाबाला लाखो ग्राहक मिळाले आणि जगातील सर्वात मोठी टेक कंपनी म्हणून अलीबाबाचा उदय झाला. व्यापाऱ्यांना याद्वारे त्यांचे सामान विकणे सोपे झाले. जगभर अलिबाबाचे जाळे विस्तारले.

२०१४ ला कंपनी पब्लिक झाली. त्यातून त्याने २५ बिलियन डॉलरची संपत्ती वॉल स्ट्रीट वर उभी केली. जी आजवरच्या इतिहासात सर्वोच्च होती.

अलिबाबा आज जगातील खूप मोठी कंपनी असून तिचा व्यापार जगभर विस्तारला आहे. अमेझॉन जी अलिबाबाची प्रतिस्पर्धी आहे तिने आता व्हिडिओ, ऑनलाइन पेमेंट आणि क्लाउड सर्व्हिसच्या क्षेत्रात धाव घेतल्याने अलिबाब देखील तिकडे इन्व्हेस्ट करणार आहे.

२०२० ला मा अलिबाबच्या प्रमुख पदावरून पाय उतार होतील. त्यांचे जवळचे सहकारी असलेले डॅनियल झंग यांची वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. जॅक मा यांनी सूचक विधान करत स्वतःच्या थांबण्याची घोषणा केली. ते विधान होतं ” No Company Can Rely Solely On Its Founders”. त्यांनी हे वाक्य अलिबाबाच्या ग्राहकांना व शेयर धारकांना उद्देशुन म्हटलं व आपल्या निर्णयाची त्यांना कल्पना दिली.

 

jack-ma-marathipizza02
cnbc.com

जॅक मा हे यापुढे काय करणार असं विचारलं असता ते पुन्हा टिचिंग प्रोफेशनकडे वळणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ते पुन्हा विद्यार्थ्यांना शिकवू इच्छित आहेत.

याउपर अजून ते स्वतःला सामाजिक कार्यासाठी वाहून घेणार आहेत. ह्यासाठी त्यांनी उघडलेल्या जॅक मा फाउंडेशनच्या माध्यमातून जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करणार आहेत. सामाजिक समस्या, पर्यावरण आणि आरोग्य ह्या विषयात लक्ष घालणार आहेत.

जॅक मा हे खरंच आदर्शवत असून त्यांनी केलेलं असामान्य कार्यच नव्हे तर कुठे थांबावं याचा घालून दिलेला परिपाठ खूप काही शिकवणारा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “प्रत्येक भारतीय उद्योजकाने हे शिकायलाच हवं; जे चीनचा सर्वात श्रीमंत माणूस करतोय…

 • December 13, 2018 at 8:03 pm
  Permalink

  very Amezing

  Reply
 • January 4, 2019 at 12:04 pm
  Permalink

  Your great sir

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?