' मध्यमवर्गीय मराठी माणूस बनलाय शांतीचा शिलेदार, तोही नाठाळ नॉर्थ कोरिया सोबत… – InMarathi

मध्यमवर्गीय मराठी माणूस बनलाय शांतीचा शिलेदार, तोही नाठाळ नॉर्थ कोरिया सोबत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अनिकेत राठी

छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अगदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्यंत अनेक महापुरुष या भारतभूमीने पाहिले. या महापुरुषांनी आपल्या कीर्तीने अटकेपार झेंडा रोवला.

आपल्या महाराष्ट्रासाठी हि कायमच गौरवाची बाब राहिली आहे की हे महापुरुष आपल्या महाराष्ट्राच्या मातीत जन्मले आणि त्यांनी मराठी माणूस म्हणून जगभर लौकिक मिळवला.

स्वातंत्र्यानंतरही अनेक मराठी भाषिक महापुरुष जन्माला आले आणि त्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगात महाराष्ट्राची शान वाढविली.

राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैद्यकीय, सांस्कृतिक अश्या अनेक क्षेत्रात आज महाराष्ट्राच्या या भूमीने या देशालाच नाही तर जगाला अनमोल असे हिरे दिले. “मराठी पाऊल पढते पुढे…” या वाक्याला साजेसे काम आजही देशात आणि देशाबाहेर अनेक मराठी भाषिक लोक करीत आहे. त्यातील एक नाव म्हणजे अतुल मल्हारी गोतसुर्वे.

हे नाव मागील काही वर्षात आपल्यापैकी अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना माहित असेल. त्याचे मुख्य कारण म्हणजे अतुल गोतसुर्वे सरांचे काम आणि त्यांना मिळालेलं यश.

 

atul-gotuskar InMarathi

 

तर नेमके कोण आहेत अतुल गोतसुर्वे ? काय आहे त्यांचे कार्य ? का आहेत ते युवकांचे प्रेरणास्थान ? हे जाणून घेण्याच्या आधी आपण आपल्या देशाचा थोडासा इतिहास जाणून घेऊ. म्हणजे आपल्याला अतुल गोतसुर्वे यांच्या कार्याबद्दल नीट माहिती होईल.

ब्रिटिशांच्या काळात सुरवातीला प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना प्रवेश नव्हता. स्वातंत्र्य मिळण्याच्या काही काळ आधी प्रशासकीय सेवेत जाण्याची संधी भारतीयांना मिळाली आणि या संधीच सोन करणारा पहिला माणूस होता चिंतामणराव देशमुख.

चिंतामणरावांनी पहिल्याच प्रयत्नात इंडियन सिविल सर्व्हिस ही सर्वात अवघड मानली जाणारी परीक्षा पास करून ब्रिटिशांना भारतीय माणसाच्या बुद्धिमत्तेची जाणीव करून दिली होती.

त्यांनतर देशात हळूहळू प्रशासकीय सेवेत जाण्याचे आणि ती स्पर्धा परीक्षा पास होऊन अधिकारी होण्याचे स्वप्न अनेकांनी पूर्ण केले.

अश्याच प्रकारे प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न सोलापूर जिल्हातील चपळगाव या छोटाश्या गावातील अतुल गोतसुर्वे या मराठी तरुणाने काही वर्षांपूर्वी बघितले आणि २००४ सालच्या सुरवातीस अतुल गोतसुर्वे हा एक सामान्य चेहरा न राहता भारतीय विदेश सेवेतील एक मराठी चेहरा म्हणून समोर आला.

मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या अतुल गोतसुर्वे यांनी आपल्या मेहनतीच्या आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर एक एक शिखर प्रादाकांत करत आपले धेय्य गाठले.

 

gotsurve-inmarathi

 

पुण्यातील क्रेसेंट शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी इंजिनियर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे येथून पूर्ण केले. काही काळ पुण्यातील एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी केल्यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे आणि देशसेवा करण्याचे ठरवले.

वडील सरकारी सेवेत असल्यामुळे सरकारी सेवेत जाण्याचे स्वप्न गोतसुर्वे यांनी लहानपणीच बघितले होते.

अभ्यासात आधीपासून हुशार असलेल्या अतुल गोतसुर्वे यांनी पहिल्याच प्रयत्नात इंडियन इंजिनियरिंग सर्विसेस ही परीक्षा पास होऊन आपली हुशारी पुन्हा एकदा सिद्ध केली.

काही वर्षे केंद्र सरकारच्या विविध विभागात काम केल्यानंतर त्यांनी परराष्ट्र सेवेत जाण्याचे ठरविले. त्यानुसार ते पुन्हा एकदा चांगल्या मार्काने युपीएससी ची परीक्षा पास होऊन अखेर भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. काही काळ ते मेक्सिकोच्या भारतीय दूतावासामध्ये कार्यरत होते.

क्युबामध्ये त्यांनी भारतीय दूतावासाचे उपराजदूत या पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २०१४ मध्ये पुण्यामध्ये पासपोर्ट अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली.

अतुल गोतसुर्वे यांच्या स्वच्छ आणि कार्यक्षम पद्धतीमुळे त्यांना अगदी कमी वयात विविध मोठ्या हुद्द्यावर काम करण्याची संधी मिळाली. नजीकच्या काळात परराष्ट्र सचिव श्री. ज्ञानेश्वर मुळे यांच्या नंतर परराष्ट्र सेवेत महाराष्ट्राचे नाव देशात गाजविणारा अधिकारी म्हणून अतुल गोतसुर्वे यांनी आपली ओळख निर्माण केली.

एक लोकाभिमुख आणि मृदू स्वभावाचा अधिकारी म्हणून अतुल गोतसुर्वे हे महाराष्ट्राच्या विशेष करून पुणेकर नागरिकांना परिचित आहे.

 

atul-g-inmarathi

 

पुण्याचे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी म्हणून त्यांनी अत्यंत योग्य पद्धतीने जबाबदारी हाताळली. त्यांनी नवनवीन प्रयोग पुण्याचे पासपोर्ट अधिकारी असताना राबविले. अतुल सरांनी पासपोर्ट कार्यालयात असणारी अर्जाची पेंडेन्सी कमी केली.

त्यासाठी त्यांनी अधिकारी कर्मचारी यांच्या कामाच्या वेळा बदलल्या. जास्त वेळ काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना प्रोत्साहन दिले.

रविवारी विशेष पासपोर्ट मेळावे, पासपोर्ट आपल्या दारी यांसारख्या अभिनव उपक्रम राबवित त्यांनी पासपोर्ट कार्यालयाचा चेहरामोहरा बदलून टाकला.

नागरिक आणि अधिकारी यांच्या मधील दुवा बनत त्यांनी अगदी सोप्या पद्धतीने हा बदल घडविला. पासपोर्ट कार्यालयात केलेल्या बदलामुळे अतुल सर हे नागरिकांचे आवडते अधिकारी बनले.

पुणे विभागातील पासपोर्ट अधिकारी म्हणून गोतसुर्वे गेल्या चार वर्षांत चर्चेत आले. पुण्याची पासपोर्ट प्रक्रिया सुरळीत करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे सांस्कृतिक, सामाजिक, कार्पोरेट, शैक्षणिक संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये जाऊन त्यांनी पासपोर्ट प्रक्रियेविषयीचे सर्व गैरसमज दूर केले.

केवळ पासपोर्ट कार्यालयच नव्हे गोतसुर्वे यांच्याकडे आत्तापर्यंत ज्या जबाबदाऱ्या दिल्या तिथे त्यांनी सोने करून दाखवले. जसा राजा तशी प्रजा असे आपण ऐकतो तसच काही अतुल सर पुण्याचे क्षेत्रीय अधिकारी असताना पाहायला मिळाले. या काळातच अनेक मोठ्या संस्थांनी त्यांच्या या कामाची दखल घेऊन त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले.

 

atul-gotsurve-inmarathi

 

त्यांच्या कामाची दखल विदेश मंत्रालयाने घेऊन त्यांना विदेश मंत्रालयात मोठी जबाबदारी देऊ केली. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना दिल्लीत बोलावून घेतले. काही महिन्यांसाठी ‘इंडियन कौन्सिल ऑफ कल्चरल रिलेशन’ विभागाच्या संचालकाचा कार्यभार दिला आणि आता थेट उत्तर कोरियामध्ये राजदूतपदीची जबाबदारी गोतसुर्वे यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

उत्तर कोरिया आणि भारत या दोन्ही देशांमधील राजकीय, उद्योग आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याची धुरा गोतसुर्वे यांच्या खांद्यावर आहे.

जिथे जाऊ तिथे आपला ठसा उमटवू अशी जणू प्रतिज्ञा घेतलेल्या अतुल सरांना, वयाच्या अवघ्या चाळीशीत उत्तर कोरिया या देशाचे भारताचे राजदूत हे सर्वोच्च पद भूषविण्याची संधी मिळाली.

विशेष म्हणजे त्या देशात राहणारे ते एकमेव मराठी व्यक्ती आहेत. मराठी, हिंदी इंग्रजी, स्पॅनिश आणि फ्रेंच अश्या विविध भाषेमध्ये अतुल सर हे पारंगत आहे. उत्तर कोरिया देशाचा सर्वेसर्वा किम जोंग युन याला भेटल्यानंतर आपण त्याला गौतम बुद्धीची मूर्ती भेट म्हणून देणार असणार असल्याचे गोतसुर्वे यांनी उत्तर कोरियाचे राजदूत म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांगितले.

या विधानावरून शांततेसाठी आणि भारत उत्तर कोरिया देशाचे संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत वाहावे आणि शांतता प्रस्तापित व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अतुल गोतसुर्वे यांच्या विधानावरून कळते.

मूळचे शिक्षक असलेल्या अतुल सरांनी आतापरेंत अनेक महाविद्यालयात जाऊन युवकांना मार्गदर्शन केले आहे. त्यामुळे विद्यार्थीही म्हणतात आम्हाला अधिकारी बनायचे पण ते अतुल सरांसारखे.

लोकाभिमुख प्रशासनमुळेच अतुल गोतसुर्वे हे लोकांचे आवडीचे अधिकारी बनले. आपल्या नावाला साजेसे “अतुल”नीय काम या मराठी अधिकार्याने करून दाखविले जे कि आपल्या सारख्या अनेक युवकांसाठी प्रेरणादायी आहे.

( लेखक हे परिवर्तन या पुण्यातील सामाजिक संस्थेचे सदस्य असून अतुल गोतसुर्वे यांचे ते मित्र देखील आहे.)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही.आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?