' "नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका" पोलिसाने आमदाराला सुनावले होते! पहा व्हिडीओ..

“नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका” पोलिसाने आमदाराला सुनावले होते! पहा व्हिडीओ..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पोलीस अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांचे राजकारणी लोकांशी असलेले संबंध, त्यांच्यात होणारे वाद यावर खमंग चर्चा रंगल्याचे आपण पाहतो. राजकारणी आपली राजकीय ताकद वापरून अनेकदा पोलीस अधिकार्यांचा हवा तसा वापर करून घेतात हेही काही काही नवीन नाही.

मात्र याउलट एक प्रसंग दोन वर्षांपुर्वी घडला होता. गोष्ट आहे कोल्हापूर महापालिका निवडणूकीची!

कोल्हापुर महानगर पालिकेत महापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. या निवडीसाठी शहरातील सर्व नगरसेवक मतदान करायला महापालिकेत आले. या नगरसेवकांचे ओळखपत्र तपासून त्यांना गेटवरून आत मतदानासाठी सोडले जात होते. पोलीस उपअधीक्षक सुरज गुरव हे या कामासाठी महानगरपालिकेच्या गेटवर उभे होते.

 

kolhapur-inmarathi

 

सर्व कामकाज सुरळीत चालू असताना राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी या प्रकारावर आक्षेप घेतला. ओळखपत्र तपासणीच्या कामात त्यांनी अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यावर उपअधीक्षक सुरज गुरव आणि हसन मुश्रीफ यांच्यात वाद झाला.

या वादात मुश्रीफ यांनी गुरव यांना थेट “गडचिरोलीची हवा दाखवेन” अशी धमकी दिली. या धमकीला न घाबरता सुरज गुरव यांनी “गडचिरोलीला जातो नाहीतर घरला जातो, पण भीती घालायची नाही.आम्ही नोकरी करतोय, राजकारण करत नाही. सायेब, वर्दीवर यायचं काम नाही, तुम्ही घरला जा” असे निर्भीड उत्तर दिले.

मुळचे इस्लामपूरचे असलेल्या सुरज गुरव यांनी २०१३ साली महाराष्ट्र पोलीस दलात उपअधीक्षक म्हणून जबाबदारी स्वीकारली.

 

suraj-gurav-inmarathi

 

नाशिकच्या पोलीस दल प्रशिक्षण केंद्रात त्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी जळगाव येथे प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक म्हणून काम पाहिले.

कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यात उपअधीक्षक म्हणून समर्थपणे काम पाहिल्यानंतर ते काही काळासाठी करवीर तालुका पोलीस उपअधीक्षक म्हणून काम पाहत होते.

हसन मुश्रीफ यांना त्यांनी दिलेल्या या निर्भीड उत्तरानंतर हा विडीओ व्हायरल झाला आहे.

 

 

 

त्यानंतर सुरज गुरव यांच्या हिमतीची तुफान चर्चा रंगली.

 

kolhapur-inmarathi

कोल्हापुर महापालिका निवडणूकीची चर्चा होत असल्याने या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार महापालिकेच्या आवारात घडू नये म्हणून पोलीस दलाने जय्यत तयारी करून आवारात बंदोबस्त लावला होता. त्याचाच एक भाग म्हणून सुरज गुरव हे मतदानासाठी येणाऱ्या नगरसेवकांचे ओळखपत्र तपासण्याचे काम करत होते.

आमदार हसन मुश्रीफ यांना आत सोडण्यास गुरव यांनी नकार दिल्यानंतर मुश्रीफ यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला.

नेत्यांच्या मुजोरीसमोर सहसा पोलीस अधिकाऱ्यांचे काही चालत नाही, पण सुरज गुरव या मुजोरीसमोर बधणार नाहीत याचा अंदाज हसन मुश्रीफ यांना नसावा.

नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे “गडचिरोलीची हवा खायला लागेल” ही प्रसिध्द धमकी त्यानीन गुरव यांना दिली.आणि सुरज गुरव यांनी प्रश्न वर्दीचा आहे म्हटल्यानंतर परिणामांची परवा न करता मुश्रीफ यांना खडे बोल सुनावले.

 

mushrif-inmarathi

 

प्रशासन, कायद व सुव्यवस्था आणि लोकप्रतिनिधी या तिन्ही व्यवस्था कामकाज सुरळीत चालावे यासाठी बनवल्या गेल्या आहेत. त्यात प्रत्येक स्वतःची जबाबदारी ओळखून आणि एकमेकांच्या जबाबदारीचा आदर करत काम करायचे असते.

पण गब्बर राजकारणी हे तत्व पाळतात असे सहसा दिसत नाही. हसन मुश्रीफ यांनीही हेच केले.

पण या धमकीला न जुमानता सुरज गुरव यांनी आपल्या वर्दीची प्रतिष्ठा जपत थेट आणि निर्भीडपणे दिलेले उत्तर महाराष्ट्र पोलीस दलातील सर्वच अधिकाऱ्यांनी आदर्श घ्यावा असे होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

24 thoughts on ““नोकरी करतो, राजकारण नाही. वर्दीवर जाऊ नका” पोलिसाने आमदाराला सुनावले होते! पहा व्हिडीओ..

 • December 10, 2018 at 3:51 pm
  Permalink

  गुरव यांचे मनापासून अभिनंदन

  Reply
 • December 10, 2018 at 6:02 pm
  Permalink

  हो

  Reply
 • December 10, 2018 at 7:34 pm
  Permalink

  खूप छान सूरज गुरव तुमच्या निर्भीडतेला सलाम…. अभिनंदन

  Reply
 • December 10, 2018 at 8:10 pm
  Permalink

  सुरज

  Reply
 • December 10, 2018 at 8:16 pm
  Permalink

  salute to Gaurav

  Reply
 • December 10, 2018 at 8:17 pm
  Permalink

  मुश्रीफ साहेब अशी दादागिरी बरी नाही नाहीतर जनता सर्व बघतेच आहे

  Reply
 • December 10, 2018 at 8:23 pm
  Permalink

  fantastic suraj gaurav sir

  Reply
 • December 10, 2018 at 8:31 pm
  Permalink

  उर्मट राजकारणी लोकांना त्यांची जागा दाखवल्याबद्दल dysp साहेबांचे अभिनंदन

  Reply
 • December 10, 2018 at 8:48 pm
  Permalink

  मस्तच

  Reply
 • December 10, 2018 at 9:40 pm
  Permalink

  महाराष्ट्र पोलीस जय महाराष्ट्र

  Reply
 • December 10, 2018 at 10:30 pm
  Permalink

  नालायक आहेत असले लोकप्रतिनिधी… अभिनंदन गुरव साहेब

  Reply
 • December 11, 2018 at 6:02 am
  Permalink

  हसन मुश्रीफ यांना कोणीतरी जाऊन समजवा

  पोलीस वालो से ना दोस्ती अच्छी और नाही दुश्मनी

  आमदारकी चा माज मोडायला गुरव साहेबां सारख्या पोलीस अधिकाऱ्याला 1 मिनिट सुध्दा लागायचा नाही

  गुरव सर our society need some more police officers like u. But also we dont need any political leader like hasan mushreef who is willing to misuse his power…

  Hasan mushreef sheput ghalun palalas ka? Dum hota tar tevach nadayche na
  Tumchi (rajkarnya chi) jatch kutrya chi aste

  Reply
 • December 11, 2018 at 8:47 am
  Permalink

  असे अधिकारी सर्व क्षेञात तयार झाले पाहिजेत नाहीतर राजकारणी मुजोरी करतच राहतील

  Reply
 • December 11, 2018 at 9:42 am
  Permalink

  जय हिंद

  Reply
 • December 11, 2018 at 11:54 am
  Permalink

  गुरव साहेबाना सलाम, सध्या सर्वच क्षेत्रात राजकीय लोकांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप वाढला आहे. त्यामुळे पोलीस अधिकारी, कर्मचारी किंवा कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ते आपले नोकर समजत आहेत. गुरव साहेबांनी जे धाडस दाखविले, तेच धाडस इतर सर्वानीच दाखवून राजकीय नेत्यांची हुजरेगिरी थांबविली पाहिजे. अन्यथा यातीलच काही अधिकारी राजकीय नेत्यांशी जवळीक करून त्यांना पुन्हा त्रास देण्याची शक्यता नाकारता येत नाही,,,

  Reply
 • December 11, 2018 at 1:26 pm
  Permalink

  जबरदस्त

  Reply
 • December 12, 2018 at 11:28 am
  Permalink

  एकदम भारी त्या हसन ला चांगला ठेचा साल्याला

  Reply
 • December 12, 2018 at 12:43 pm
  Permalink

  सूरज

  Reply
 • December 12, 2018 at 5:46 pm
  Permalink

  जबरदस्त व्यक्तिमत्व

  Reply
 • December 13, 2018 at 11:46 am
  Permalink

  very nice

  Reply
 • December 13, 2018 at 12:50 pm
  Permalink

  _सूरज गुरव साहेब यांच्या या कार्याला सलामअसाच एक आदर्श ठेऊन सर्व पोलिस कर्मचारी ,आधिकरी आपले कर्तव्य बजावले पाहिजेजय हिंद खूपच छान

  Reply
 • December 15, 2018 at 5:11 pm
  Permalink

  हेच

  Reply
 • December 15, 2018 at 7:01 pm
  Permalink

  Good Sir..

  Reply
 • January 24, 2019 at 5:34 pm
  Permalink

  श्री

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?