' हिटलरने आत्महत्या केली की तो ९५ वर्षे जगला? वाचा यामागचं थक्क करणारं सत्य!

हिटलरने आत्महत्या केली की तो ९५ वर्षे जगला? वाचा यामागचं थक्क करणारं सत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

जगातील सर्वात क्रूर हुकुमशाह म्हणून आजही हिटलरचं नाव घेतलं जातं. त्याच्या घोर क्रूर कृत्यांनी त्याला क्रूरकर्मा हिटलर अशी पदवी मिळवून दिली आणि जगाच्या काळ्या इतिहासात तो अजरामर झाला.

हिटलरला क्रूरकर्मा म्हणण्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याने केलेला ज्यू लोकांचा अमानुष संहार. ज्यू धर्माला आणि त्या धर्मातील लोकसमूहाला समूळ नष्ट करण्याचा जर्मनीचा सर्वे-सर्वा असणाऱ्या हिटलरने जणू विडाच उचलला होता.

ज्यू लोकांनीच जर्मनीला तळागाळात नेऊन ठेवलं त्यामुळे, ती अत्यंत धूर्त व लबाड जात असून त्यांना ठेचलंच पाहिजे, तरच जर्मनी बलवान बनू शकेल असं हिटलरला वाटत असे.

“न भूतो, न भविष्यति” अशा कत्तली करण्यात आल्या. असतील तिथे त्यांना ठेचण्यात आलं. जे जिवंत राहिले त्यांनी देशातून पलायन केलं आणि स्वतः चा जीव वाचवला.

 

hitler-inmarathi

 

त्याच्या महत्त्वकांक्षी, पण गर्विष्ठ स्वभावामुळे त्याने लोकांवर अतोनात अत्याचार केले. हजारो लोकांच्या हत्येचा कलंक त्याच्या माथी लागला. त्याच्या याच पापांची शिक्षा त्याला मरतेवेळी मिळाली असं म्हटलं तरी वावगं ठरू नये.

जगातील एका हुकुमशहावर स्वत:च्या हातानं गोळी झाडून आत्महत्या करण्याची वेळ यावी यापेक्षा दुर्दैव ते काय..! कोणासमोरही न झुकणाऱ्या हिटलरने त्या दिवशी स्वत:ला मृत्युच्या स्वाधीन केलं.

 

हे ही वाचा :

===

 

death-of-hitler-marathipizza01

 

१९४५ साली दुसऱ्या महायुद्धानंतर जेव्हा हिटलरला आपली घोडचूक लक्षात आली आणि जर्मनीचा घोर पराभव त्याला दृष्टीक्षेपात दिसू लागला तेव्हा त्याने ३० एप्रिल १९४५ रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली ही बाब संपूर्ण जगाला माहित आहे. हा इतिहास नाकारता येणार नाही.

परंतु Simoni Renee Guerreiro Dias या लेखिकेने Hitler in Brazil – His Life and His Death या आपल्या पुस्तकामध्ये काही असे दावे केले आहेत जे हिटलरचा मृत्यच नाकारतात. तिच्या मते, हिटलरने संपूर्ण जगाला चांगलंच चकवलं आहे.

 

hitler death inmarathi

 

असा दावा पहिल्यांदाच केला जात आहे असंही नाही, कारण यापूर्वी एका नाझी पत्रकाराने हिटलरचा मृत्य ब्राझीलमध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी झाला होता असा दावा करत खळबळ उडवून दिली होती. सोबत पुरावा म्हणून त्यानं हिटलर आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं एक छायाचित्र देखील सादर केलं होतं.

आता त्याच गोष्टीला पुढे नेत  Simoni Renee या लेखिकेने त्याचं विधान सत्य होतं असं जगजाहीर करून टाकलं आहे.

 

hitler-death-marathipizza02

 

हे ही वाचा :

===

 

पुस्तकातील वर्णनानुसार,

दुसऱ्या महायुद्धानंतर हिटलरने स्वत:वर गोळी झाडली नव्हती. तर तो तेथून निसटून थेट ब्राझीलला गेला आणि वयाच्या ९५ व्या वर्षापर्यंत आपल्या गर्लफ्रेंडसोबत सुखाचं आयुष्य जगला.

ब्राझीलला पलायन केल्यावर त्याने अॅडॉल्फ लिपजेग नाव धारण केले. तो ज्या भागात राहायचा त्या भागात देखील याच नावाचा मनुष्य राहत असल्याची पुष्टी करण्यात आली आहे. तेथील स्थानिकांना त्याच्याबद्दल एवढीच माहिती होती की तो जर्मनीचा रहिवासी आहे.

Simoni Renee  या लेखिकेने जवळपास २ वर्षं संशोधन करून हिटलरबद्दल हा दावा केला आहे. तिच्या मते, हिटलर सर्वांच्या नजरा चुकवित एका गुप्त मार्गानं अर्जेंटिनामध्ये पोचला.

तेथे त्याची ब्राझीलमध्ये राहणाऱ्या कटिंगा नामक महिलेशी ओळख झाली आणि पुढे त्यांचे प्रेमसंबंध जुळले. या पुस्तकामध्ये Simoni Renee हिने एक छायाचित्र देखील दिले आहे. परंतु ते खूपच धुरकट आहे. या छायाचित्रामधील महिला कटिंगा असून तिच्या सोबत उभा असणारा मनुष्य हिटलर आहे.

 

death-of-hitler-marathipizza03

 

Simoni Renee यांच्या मते हिटलरच्या खोलीमध्ये मिळालेलं शव हे हिटलरचं नव्हतं. तो कोणी दुसराच व्यक्ती होता. इथे हिटलरने दुसऱ्या एका व्यक्तीचा बळी देऊन स्वत:च्या आत्महत्येचा बनाव रचला.

Gerrard Williams या पत्रकार आणि इतिहासकाराच्या म्हणण्यानुसार, त्याच्याजवळ FBI ची अशी काही कागदपत्रे आहेत जी सिद्ध करतात की, अमेरिका हिटलरच्या मृत्यूनंतरही त्याचा शोध घेत होती. म्हणजेच त्यांना देखील हिटलरच्या मृत्यूविषयी शंका होती.

 

adolf-hitler-marathipizza

 

हे ही वाचा :

===

 

अजून एक मुख्य आणि दुर्लक्ष न करता येण्यासारखी गोष्ट म्हणजे, हिटलरच्या जिवंत असलेल्या कुटुंबियांच्या मदतीनं एक डीएनए टेस्ट करण्यात आली होती.

त्या डीएनए टेस्टमध्ये हिटलरच्या कुटुंबियांचे डीएनए आणि ब्राझीलमध्ये राहत असलेल्या अॅडॉल्फ लिपजेग या व्यक्तीचे डीएनए मॅच झाले.

हा या दाव्याला बळकटी देणारा सर्वात मोठा पुरावा ठरलाय की, ब्राझीलमधील अॅडॉल्फ लिपजेग हाच अॅडॉल्फ हिटलर होता.

Simoni Renee यांच्या या दाव्यावर जगभर उलटसुलट चर्चा सुरु आहे. अनेकजण हा दावा पोकळ असल्याचे सांगतात तर अनेक जणांनी तिने दाखवलेल्या पुराव्यामुळे या दाव्यावर विश्वास देखील ठेवला आहे.

 

hitler bodyguard inmarathi

 

Simoni Renee हिच्या या खळबळजनक दाव्याला खोडून काढणारा एकच पुरावा होता तो म्हणजे Rochus Misch हा हिटलरचा बॉडीगार्ड !

याच बॉडीगार्डने सांगितले होते की, ‘हिटलरने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडली आणि तो टेबलवर पडला.’ या बॉडीगार्डचा देखील २०१३ साली सप्टेंबर महिन्यात वयाच्या ९६ व्या वर्षी मृत्यू झाला.

हिटलरच्या मृत्यूचे गूढ दिवसेंदिवस अधिकच वाढत चालले आहे. ते लवकरच उकलले जाईल अशी आशा करूया !

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?