' हे वाचा – ३० ते ४० वयातसुद्धा करिअरची दिशा बदलून लाखोंचं उत्पन्न मिळवायला लागाल! – InMarathi

हे वाचा – ३० ते ४० वयातसुद्धा करिअरची दिशा बदलून लाखोंचं उत्पन्न मिळवायला लागाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एकदा का तिशी ओलांडली की अचानक वय वाढल्याचे वगैरे विचार येतात. त्यातच आपल्या सामाजिक चौकटी प्रमाणे या वयापर्यंत काही गोष्टी प्राप्त करणे अप्व्क्षित असते.

व्यवस्थित नोकरी, लग्न, घर, या किमान गोष्टी तरी हाताशी असाव्या लागतात. यात सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे नोकरी. कारण चांगल्या पगाराची नोकरी असेल तरच तुम्ही घर आणि इतर भौतिक गोष्टी मिळवू शकता. आणि एकदा का या गोष्टी मिळाल्या की तुम्हाला लग्नाच्या बाजारात चांगली किंमत मिळते.

तीस-पस्तीशी पर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्ही मिळवल्या म्हणजे तुम्ही यशस्वी झालात. त्यानंतर तुम्ही निश्चिंतपणे जीवन जगू शकता, आयुष्याचा आनंद घेऊ शकता.

 

 

परंतु अचानक पस्तीशीनंतर तुमची नोकरी किंवा क्षेत्रच कंटाळवाणे वाटू लागले तर? किंवा जी नोकरी तुम्ही करताय ते काम आता यापुढे करणे तुम्हाला शक्य वाटत नाहीये..तर काय? नोकरी किंवा क्षेत्र बदलून टाकूयात हा विचारही करावासा वाटत नाही ना?

अगदी साहजिक आहे. मोठ्या कष्टाने बसवलेली संसाराची घडी परत विस्कटेल ही भीती अशावेळी डोकावते.

पण अनेकदा काही अपरिहार्य कारणांमुळे सध्याची नोकरी सोडावी लागते किंवा या वयात नोकरीला सुरुवात करावी लागते. अशावेळी या वयात कोण नोकरी देणार? मला जमेल का? जम बसवता येईल का? सगळे नाव ठेवतील का? अशा असंख्य प्रश्नांचे काहूर माजते.

याच प्रश्नांचे उत्तर घेऊन आम्ही आलोय. तिशी पस्तीशीनंतर सुद्धा नोकरीसाठीचे असे पर्याय जे या वयातील नोकरीसाठी उत्तम आहेत. शिवाय यासाठी तुम्हाला नव्याने शिक्षण घेण्याची वा कॉलेजमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.

  • मानसिक स्वास्थ्य

हे असे क्षेत्र आहे की जिथे तुमच्या अनुभवांना आणि समज असण्याला खूप किंमत असते.  कारण यात समस्या जाणून घेऊन त्यावर अनुभवांच्या जोरावर मार्ग शोधायचे असतात. म्हणूनच शिक्षणाएवढेच महत्व तुमच्या वयाला असते. कारण जेवढे वय जास्त तेवढाच अनुभवही जास्त.

 

Meaning of 24 spokes of Ashok Chakra.Inmarathi1

 

त्याचमुळे तिशी पस्तीशीनंतर नोकरी करण्यासाठी हा सर्वात चांगला पर्याय आहे. काही दिवसांचे किंवा महिन्यांचे कोर्सेस, डिप्लोमा करून थोडा सराव करून तुम्ही या क्षेत्रात सहज शिरकाव करू शकता.

जसजसे तुम्ही काम कराल तसतसा तुमचा अनुभव वाढतो आणि या कामांत तुम्ही चांगलेच रुळता. या क्षेत्रात असंख्य संधी आहेत. त्यातील काही

१. थेरपिस्ट

यासाठी काही कौशल्ये शिकून त्यांचा सराव करावा लागतो. त्यानंतर तुम्हाला कोणत्या वयोगटाच्या लोकांसोबत किंवा कोणती समस्या असणाऱ्या गटासोबत काम करायचे हे ठरवावे लागते.

 

therepist inmarathi

 

त्यानंतर तुम्ही त्यांच्याशी वेग वेगळ्या माध्यमातून संवाद साधू शकता, तुमची कौशल्ये वापरून समस्या सोडवू शकता आणि मदतीची भावनाही जोपासू शकता.

२. कौन्सेलर

बदलती जीवन शैली आणि तंत्रज्ञामुळे कितीतरी नवीन मानसिक समस्यांची भर पडली आहे. खास त्यामुळेच संवादासाठी आणि मार्गदर्शनासाठी म्हणून सगळीकडे कौन्सेलरची गरज भासतेय. या नोकरीसाठी प्रचंड मागणी आहे.

 

counselor inmarathi

 

शाळा, कॉलेज, कंपनी, हॉस्पिटल असे सगळीकडेच कौन्सेलर काम करतात. त्यासाठी वयाची अटही नसते.

३. लाईफ कोच

बऱ्याच लोकांना कोणत्या प्रसंगाला काय निर्णय घ्यावा, कोणत्या टप्प्यावर कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यावे याचे ज्ञान नसते. शिवाय हे सांगायला त्यांच्या आजू बाजूला अनुभवी मोठी माणसेही नसतात. अशा लोकांना तुम्ही आजवरच्या अनुभवाच्या जोरावर अनेक सल्ले देऊ शकत. त्यांना निर्णय घेण्यातही मदत करू शकता.

उद्योग/ व्यवसाय

तरुण वयात अनेकांचे स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचे स्वप्न असते. अनेकांकडे तर त्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि व्यक्तिमत्त्वही असते. पण कधी पैसा, कधी आधार किंवा इतर गोष्टींच्या अभावाने हे स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यांना नोकरीचा पर्याय स्वीकारावा लागतो.

अशा लोकांसाठी या क्षेत्रात खूप चांगली संधी आहे. कारण हल्ली शिक्षण घेऊन नोकरीसाठी नोकरदार तर मिळतात. पण आवडीने जबाबदाऱ्या घेऊन त्या कल्पकतेने पार पडणार्यांचा मात्र तुटवडा आहे.

 

Airbnb Business Success.Inmarathi

 

१. बिझनेस ऑपरेशन मनेजमेंट

प्रत्येक व्यवसायाला सगळ्या विभागांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नवनवीन कल्पना असणारी आवश्यक असते. या नोकरीत तुम्हाला नवीन लोकांना नोकरीवर घेणे, आर्थिक नियोजन करणे, लहान सहान हिशोब बघणे, नवीन ग्राहकांकडे लक्ष देणे ही कामे असतात.

त्यासाठी कोणत्याही ठराविक शिक्षणाची गरज नसते. अनुभवाच्या जोरावाराही तुम्ही छान काम करू शकता.

२. फंड रेजिंग

यात तुमच्या कंपनीला अधिकाधिक आर्थिक सहाय्य मिळवून देण्यासाठी मदत करायची असते. त्यासाठी तुमचा जनसंपर्क आणि संभाषण कौशल्ये चांगले असणे गरजेचे आहे.

 

PR inmarathi

 

अर्थातच वयानुरूप या गोष्टी बऱ्यापैकी विकसित झालेल्या असतात. त्यामुळे या नोकरीत काही अडचण येत नाही.

.फायनान्स ऍनालिस्ट

जर तुम्हाला आर्थिक व्यवहार करण्याची सवय असेल, बिनचूकपणे ते करता येत असतील तर ही नोकरी तुमच्याचसाठी आहे.

 

planning inmarathi

 

यात इतरांच्या व्यवहारात मदत करणे, गुंतवणुकीसाठी मार्गदर्शन करणे अशी कामे असतात. इन्शुरन्स आणि पोलिसी विभागातही काम करता येते.

  • रीक्रुटर

म्हणजे इतरांना नोकरी देण्याची नोकरी. यात अनुभव आणि निरीक्षणाच्या जोरावर विशिष्ट नोकरीसाठी उमेदवार निवडायचे असतात.

 

Job Interview inmarathi

 

काही मिनिटांच्या बोलण्यातून समोरच्याच्या क्षमता, चातुर्य, कौशल्ये यांचा अंदाज लावावा लागतो. यात जर तुम्ही सराईत असाल तर अनेक ठिकाणी फक्त उमेदवार निवडीचे काम करू शकता.

  • सौंदर्य आणि आरोग्य

तेच तेच टेबलावरचे काम करण्याचा कंटाळा आला म्हणून तुम्हाला वेगळ्या क्षेत्रात यायचे असेल तर हा चांगला मार्ग ठरू शकतो. यात सतत नवनवीन लोकांना नवनवीन ठिकाणी मार्गदर्शन, उपचार आणि सेवा द्यायची असते. शिवाय तुमच्या सोयीनुसार ही कामे करता येत.

१.पर्सनल ट्रेनर

तुम्हाला व्यायाम आणि चांगल्या आरोग्याची आवड असेल तर तुम्ही अशी नोकरी किंवा स्वतःचा ग्रुपही सुरु करू शकता.

 

yoga inmarathi

 

हे काम जिम, पार्किंग, बाग अशा कोणत्याही ठिकाणी करता येते.

२. मसाज थेरपिस्ट

यात इतरांचा ताण तणाव दूर करण्याची, त्यांना आरव वाटेल अशाप्रकारे मालिश करण्याची काही कौशल्ये शिकावी लागतात.

 

body-massage-inmarathi

 

त्यात अक्युप्रेशर, स्पा, सलून आणि इतर अनेक उपचार असतात.

३. सौंदर्य

यात करता येण्यासारखी असंख्य कामे आहेत. वेगवेगळे उपचार, मेकअप, सौंदर्य प्रसाधनांची विक्री, वेशभूषा, केशभूषा, नखे रंगवणे आणि खूप काही. तुम्हाला जे आकर्षक वाटेल ते तुम्ही आजमावून बघू शकता.

 

facial inmarathi

 

अशाप्रकारे कितीही वय झाले तरी नव्याने करता येणाऱ्या या काही नोकऱ्या आणि व्यवसाय आहेत. त्यामुळे अजिबात चिंता न करता स्वतःला आवडेल ते करण्याचा नक्की प्रयत्न करा.

===

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?