' नात्यात गोंधळ टाळायचा असेल तर या ‘७’ गोष्टी पार्टनरला न सांगितलेल्याच बऱ्या! – InMarathi

नात्यात गोंधळ टाळायचा असेल तर या ‘७’ गोष्टी पार्टनरला न सांगितलेल्याच बऱ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तन, मन, धन, मेंदू, पैसे.. सगळंच अर्पून प्रेम करत असाल तरी एकदा नीट लक्ष देऊन ऐका की, आयुष्यात सगळ्याच गोष्टी जोडीदारासमवेत शेअर करण्याची गरज नसते.

तुम्ही शेअर करत असलेली प्रत्येक गोष्ट ही तितकी महत्वाची आहे किंवा असेल आणि तिच्या शेअर करण्यामुळे आपल्या नात्यात काही फरक पडणार नाही किंवा पडेल असे वाटत असल्यास काही नवीन जाणून घेण्याची तुम्हाला गरज आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

काही अश्या गोष्टी, ज्या तुम्ही त्यांना न सांगितलेल्याचं बऱ्या..

१. तुमचे पासवर्ड

खरे प्रेम असलेल्यांनी एकमेकांवर विश्वास दाखवणं महत्वाचं असतं.  एकमेकांचा पासवर्ड माहीत असला पाहिजे ज्यावरून आपण आपल्या जोडीदाराच्या सोशल मिडिया वरील गोष्टींवर करडी नजर ठेवू शकू असा विचारही मनात आणू नका.

पण तुम्ही जर तुमचा फोन किंवा तुमचे अकाउंट आणि लॅपटॉप पासवर्डने संरक्षित ठेवत असाल तर ते तसेच राहू द्या. जोडीदारावर असलेला ‘आंधळा विश्वास’ व्यक्त करण्यासाठी तुम्ही ते शेअर करण्याची काहीएक गरज नाही. यातून तुम्ही विकोपाला जाणाऱ्या वादांना आमंत्रण देऊ शकता.

 

married-couple-fighting-InMarathi

 

हे ही वाचा : 

===

 

पण पासवर्ड न देण्याचे सक्षम कारण किंवा विश्वासाची पातळी सेट करून योग्यप्रकारे ते हाताळू शकता. लक्षात ठेवा तुमची वैयक्तिक जागा “पर्सनल स्पेस” ही नात्यामध्ये बरीच महत्वाची गोष्ट असते.

त्यामुळे जर पासवर्ड असेल तर….. झिप इट!

२.सौंदर्याची गुपिते

हो हो, ही देखील एक गुपित ठेवण्यासारखी गोष्ट आहे.

म्हणजे आज तुम्ही काय सौंदर्य उपचार केलेत किंवा काय करणार आहे, आणि तुमचे गाल असे स्ट्रॉबेरीसारखे लाल कसे काय आहेत, मुलायम ओठ, लांब व चमकदार केस आणि सिल्कसारख्या त्वचेच्या मागील रहस्य काय आहे हे तुम्ही तुमच्या जोडीदारापासून लपवू शकता.

 

holi-tips-for-skin-and-hair-inmarathi05

ते एक गुपितच ठेवून त्यांना त्याबाबत गूढता वाटू देत. ज्यामुळे ते तुमच्या आणखीच प्रेमात पडू शकतील.

३. तुमचा शयनगृहात केलेला पराक्रम वगैरे..

जोडीदाराला भेटण्याआधी जर तुम्ही काही लैंगिक आयुष्याबद्दलचे अनुभव घेतले असतील, तर ते तुमच्यापर्यंतच ठेवा. जोडीदाराला हेवा, मत्सर वाटावा म्हणून, घाबरवण्यासाठी किंवा काही सूचित करण्यासाठी जर तुम्ही असे काही करत असाल तर ते टाळा.

 

couple-sex-inmarathi

यात तुम्ही एकमेकांना खूप चांगले ओळखत असाल किंवा समजून घेत असाल तरीही हे गुपित ठेवणं योग्य ठरू शकते. कारण, या बऱ्याच संवेदनशील गोष्टी असू शकतात. जोडीदार कदाचित यांना समजावून घेऊ शकले नाहीत तर ते स्वतःच्या किंवा तुमच्या भावनांना हानी पोहोचवू शकता.

या गोष्टींना तुमच्यातील शिरकाव नामंजूर करण्यास प्राधान्य देऊन तुम्ही त्या मनातच ठेवू शकता. अर्थात जोडीदारावर खूपच विश्वास असेल तर त्याला या गोष्टी सांगा पण जरा जपूनच.

४. तुमच्या प्रियकर/प्रेयसीच्या गोष्टी..

भलेही त्या कितीही कौतुकास्पद असतील किंवा अगदीच फुटकळ गोष्ट असेल, तरीही तुम्ही त्यांच्याबद्दल आलेले चांगले वाईट अनुभव किंवा तुम्ही घालवलेले क्षण, असलेल्या आठवणी, तुमचे साजरे केलेले वाढदिवस, तुमच्या गुप्त भेटी, भेटवस्तू आणि बाकी प्रसंग यांना एखाद्या संदूक मध्ये व्यवस्थित बंद करून तो आठवणींचा पेटारा कृपया त्यांच्यासमोर उघडू नका.

तुमच्या ‘त्या’ प्रिय व्यक्तीच्या चांगल्या वाईट सवयी, आवडीनिवडी, त्यांचा तुम्ही केलेला अवमान यावरून तुमचा जोडीदार तुम्हाला पारखू शकतो.. कारण आज ते तुमच्या ‘प्रिय’ व्यक्तीच्या पारड्यात बसलेले आहेत.

 

couple-arguing-inmarathi

त्यामुळे शितावरून भाताची परीक्षा करण्याची संधी देऊन उगाच आपली अविवेकबुद्धी त्यांचा समोर आणू नका.

हे ही वाचा :

===

 

५. तुमच्या खरेदीची यादी आणि बँक स्टेटमेंट

भलेही तुमचा जोडीदार जहागीरदार असेल किंवा सावकार. एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा ती म्हणजे तुमच्या खरेदीची लांबलचक यादी पाहून त्यांना काही फारसा आनंद होणार नाही.

कारण जर त्या व्यक्तीला खरेदीमध्ये रस नसेल तर ती व्यक्ती तुमच्या यादीकडे कपाळावरील आठ्यांशिवाय पाहू शकणार नाही. तुमची खाजगी खरेदी करून झाल्यानंतर शक्यतो जोडीदारासमवेत त्यांची बिले शेअर करणे टाळा.

 

online-inmarathi

 

तुमचे जोडीदार याबाबतीत पारदर्शकता झेलू शकत नसून, अगदी थोडेसे कंजूस आहेत याची भनक लागली असेल तर त्यांना यापासून दूर ठेवलेलेच बरे..

६. त्यांच्या तीर्थरूपांबद्दलचे तुमचे विचार.

तुम्हाला माहीतच असेल की भारतात ६०% घटस्फोट किंवा ताटातूट ही सासू(?) मुळे होते.

आईबाबतीत मुले आणि वडीलांबद्दल मुली थोड्या हळव्या असतात. साहजिक आहे जन्मदाते असतात ते. आपण त्यांच्याबद्दल करत असलेले गाऱ्हाणे ऐकून त्यांची नक्कीच द्विधा मनस्थिती होते आणि पर्यायाने आपल्याबद्दल चुकीचा विचार केला जाऊ शकतो.

आपल्या आई /वडीलांबद्दल जोडीदाराने तितकाच आदर ठेवावा ही माफक अपेक्षा प्रत्येकाचीच असते. यामुळे आपल्याप्रमाणेच जोडीदारासाठीदेखील त्यांचे आईवडील तितकेच महत्वाचे आणि अनमोल आहेत.

 

family featured inmarathi

 

याची जाणीव ठेवून त्यांच्या तीर्थरूपांबद्दल काही वाईट किंवा न पटण्यासारखे असलेले आपले विचार व्यवस्थितरीत्या व्यक्त करा किंवा मनातून काढून टाका पण त्यांचा बाऊ करू नका.

७. तुमचे वजन

हा एक वजनदार बिब्बा तुमच्या उत्साहावर पडू शकतो जेंव्हा तुम्ही नेहमीच वजन किंवा पथ्य आणि कॅलरीबद्दल बोलत असाल.

शारीरिक आकारमान हे हळूहळू घटते किंवा वाढते याची कल्पना तुम्हाला असली पाहिजे. त्याची सारखीच जाहीर नोंद घेणे अपेक्षित नसते. ढेरी कमी झाली नाही (दोघांपैकी कोणाचीही) म्हणून दिवस खराब करणे अजिबात स्वीकारार्ह नाही. तुमचा जोडीदार कदाचित सुरुवातीला उत्साह दाखवेल पण हळू हळू तो मावळण्याची शक्यतादेखील असते.

जर तुम्ही उठता बसता प्रत्येक जिन्नस मध्ये चव, रंग आणि आवड सोडून फक्त याने किती कॅलरी किंवा फॅट आपण शोषून घेतोय इतकाच बोलत असाल तर या गोष्टी जोडीदाराला चीड आणू शकतात. त्यामुळे वजन, पथ्य, कॅलरी इत्यादींना बासनात गुंडाळून ठेवलेलं बरं.

 

foods-inmarathi06

तुमचे नाते टिकवायचे असेल आणि त्यातील गोडवा नेहमी टिकून राहावा असे वाटत असेल तर या गोष्टींचा नक्की विचार करा.

 

हे ही वाचा :

===

 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?