‘रॉ’च्या खास विमानातून भारतात आणलेला क्रिश्चियन मिशेल एवढा महत्वाचा का आहे?: अगुस्ता वेस्टलँड प्रकरण

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

४ डिसेंबर रोजी अगुस्ता वेस्टलँड प्रकरणातील सर्वात महत्वाचा आरोपी मिचेल ख्रिश्चन याला रॉ या भारतीय गुप्तहेर संघटनेच्या खास विमानाने भारतात आणण्यात आले. बऱ्याच दिवसांपासून या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी भारत आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न करत होता.

इंटरपोल, काही आंतरराष्ट्रीय गुप्तहेर संघटना यांच्या मदतीने भारतीय तपास संस्थांचे हे प्रयत्न चालु होते. अखेर काल या आरोपीला भारतात आणण्यात रॉ ला यश आले.

पण हा मिचेल ख्रिश्चन नक्की आहे कोण? त्याला भारतात आणण्यासाठी सीबीआय आणि रॉ जंग जंग का पछाडत होते? त्याच्यासाठी खास विमानाची व्यवस्था का केली गेली? हे आपण जाणून घेणार आहोत..

ब्रिटिश नागरिक असलेला ख्रिश्चियन जेम्स मिशेल हा वादग्रस्त ठरलेल्या ३७०० कोटी रुपयांच्या अगुस्ता-वेस्टलँड चॉपरच्या व्यवहारात झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे.

त्याला काल म्हणजेच चार डिसेम्बर रोजी आपल्या देशातील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

मिशेल ह्याच्या एव्हिएशन रिसर्च सेंटरच्या विमानातून रिसर्च अँड ऍनालिसिस विंगच्या विमानातून काल रात्री १०.४५ च्या सुमारास नवी दिल्ली येथे आणण्यात आले आणि नंतर पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने त्याला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टीगेशन (सीबीआय)च्या मुख्यालयात नेले.

मिशेल ह्यास आज दिल्ली कोर्टासमोर सादर केले जाण्याची शक्यता आहे.

 

newindianexpress.com

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हे ऑपरेशन सीबीआयचे एम नागेश्वरा राव ह्यांनी पार पाडले. ह्या कामगिरीसाठी एक टीम तयार करण्यात आली होती आणि ह्या टीमचे नेतृत्व जॉईंट डायरेक्टर ए. साई मनोहर ह्यांच्यावर सोपवण्यात आले होते.

ए.साई मनोहर ह्यांचे पथक ह्या कामगिरीसाठी दुबईला गेले होते असे सीबीआयच्या प्रवक्त्याने एका निवेदनात जाहीर केले.

अगुस्ता वेस्टलँड व्यवहारात दलाल म्हणून मिशेल ह्याचा सहभाग असल्याचे २०१२ साली उघडकीला आले.

ह्या व्यवहारात एकूण १२ हेलिकॉप्टर्सची खरेदी करण्यात आली होती. मिशेल ह्याने ह्या व्यवहारात दलाल म्हणून अगुस्ता वेस्टलँडला फायदा होईल असा व्यवहार घडवून आणला. आणि भारतीय अधिकाऱ्यांबरोबर बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केले.

ह्या घोटाळ्याची चौकशी आधी इटालीयन अधिकाऱ्यांनी केली आणि आंतराष्ट्रीय व्यवहारात लाचखोरीच्या गुन्ह्याखाली त्याला आरोपी ठरवले असे सीबीआयच्या निवेदनात म्हटले आहे.

मिशेल ह्यास फेब्रुवारी २०१७ मध्ये दुबई पोलिसांनी त्याच्याविरुद्ध जारी झालेल्या इंटरपोलच्या रेड नोटीसच्या आधारावर अटक केली.

मिशेल व इतर आरोपींवर सीबीआयने सप्टेंबर २०१७मध्ये चार्जशीट दाखल केली.

निवृत्त एयर चीफ मार्शल एस.पी. त्यागी व त्यांचे नातेवाईक, माजी एयर मार्शल जे.एस. गुजराल , कार्लो जेरोस आणि गाईदो हॅशके हे दोन एजन्ट आणि तेव्हाचे अगुस्ता वेस्टलँडचे सीइओ ब्रुनो स्पॅग्नोलिनी, फिनमेकॅनिकाचे चेअरमन ऑर्सी व इतर काही लोक ह्या व्यवहारात दोषी आढळले आहेत.

ह्या घोटाळ्यामुळे देशाच्या अर्थखात्याचे २,६६६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे असे सीबीआयचे म्हणणे आहे.

 

michel-inmarathi
deccanherald.com

ह्या घोटाळ्यासह मिशेल व इतर आरोपींवर प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सीबीआयची मिशेल ह्यास भारताच्या स्वाधीन करण्याची विनंती १९ मार्च २०१७ रोजी युएईच्या अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली होती. युएईमधील कोर्टापुढे ह्यासंदर्भात सुनावणी झाली आणि १९ नोव्हेम्बर रोजी कॅसेशन कोर्टाने त्याला हद्दपार करण्याचा खालच्या कोर्टाच्या निर्णयास मान्यता दिली.

मिशेल ह्यास अटक करून कस्टडीत ठेवण्यात आले आणि नंतर चार डिसेम्बर रोजी भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.

सीबीआयने आरोप केला आहे की मिशेल व इतर आरोपींनी गुन्हेगारी कट रचून व्हीव्हीआयपी हेलिकॉप्टर्सची सर्व्हिस ६००० ते ४५०० मिटर पर्यंत कमी केली आणि त्यामुळे कंपनी ह्या व्यवहारासाठी बोली लावू शकली.

आणि २ फेब्रुवारी २०१० रोजी ५५६. २६२ मिलियन युरोचा कॉन्ट्रॅक्ट अगुस्ता वेस्टलँड इंटरनॅशनल लिमिटेड ह्या कंपनीला देण्यात आला. आणि ह्या व्यवहारात मिशेलची दोन इतर एजन्टचा कंट्रोलर म्हणून नेमणूक करण्यात आली.

अगुस्ता वेस्टलँडचा तेव्हाच कमर्शियल मॅनेजर रेंझो ल्यूनार्दी ह्याने हि नेमणूक केली आणि ह्या नेमणुकीला ऑर्सि ने सुद्धा मान्यता दिली होती.

 

westland-inmarathi
uni.com

जुलै २००६ मध्ये इटलीमधील कॅसिना कोस्टा मध्ये एक मिटिंग झाली होती. ह्या मिटिंगला ऑर्सी सुद्धा हजर होते. ह्या मिटिंग मध्ये ल्यूनार्दीने असा प्रस्ताव मांडला की मिशेल व इतर दोन एजन्ट मिळून ह्या संपूर्ण व्यवहारावर लक्ष ठेवतील.

त्यांनी असे ठरवले की ह्या व्यवहारातील सात टक्के रक्कम ही ह्या लोकांची फी व खर्च म्हणून त्यांना देण्यात येईल.

मिशेलने ह्या संपूर्ण व्यवहारात त्याच्या ग्लोबल ट्रेंड अँड कॉमर्स लिमिटेड व ग्लोबल सर्व्हिस FZE ह्या दोन कंपन्यांद्वारे व फिनमेकॅनिका व अगुस्ता वेस्टलँड तसेच वेस्टलँड हेलिकॉप्टर्स व इतर कंपन्यांसहा एकूण १२ कॉन्ट्रॅक्ट केले व ह्या बेकायदेशीर व्यवहारांना कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न केला.

फिनमेकॅनिका कंपनीने एकूण २९५ कोटी रुपये मिशेलच्या कंपन्यांना काहीही काम न करून घेता दिले असा सीबीआयचा आरोप आहे.

मिशेल वेस्टलँड हेलिकॉप्टर्स लिमिटेड ह्या कंपनीसाठी १९८०पासून काम करत करीत होता. त्याने ह्या आधी अनेकदा भारताची वारी केली आहे. १९९७ ते २००३ पर्यंत तो किमान ३०० वेळा भारतात येऊन गेला.

त्यानंतर सीबीआयने ह्या संदर्भात एफआयआर नोंदवण्याच्या आधी मात्र तो दुबईला निघून गेला.

 

christian_michel_inmarathi
indiatoday.com

सीबीआयचा असा आरोप आहे की मिशेलने ह्या व्यवहारात एक एजन्ट म्हणून काम बघितले. ह्या व्यवहार करण्यासाठी त्याला एका मोठ्या नेटवर्कची मदत झाली.

त्याच्या ह्या नेटवर्क मध्ये वायुसेना व संरक्षण मंत्रालयातील काही लोक तसेच काही निवृत्त अधिकारी सुद्धा होते.

त्याने ह्या व्यवहाराची माहिती ,त्यासंदर्भातील कागदपत्रे ह्यावर नजर ठेवली आणि ही संपूर्ण माहिती तो अगुस्ता वेस्टलँड कंपनीला वेळोवेळी कळवत होता.

ह्यासाठी त्याने इटली आणि स्वित्झर्लंड मधल्या त्याच्या माणसांना कामाला लावले होते.

आता स्विस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती व कागदपत्रांच्या आधारावर मिशेलची चौकशी करण्यात येईल. ह्या कागदपत्रांतून लक्षात येते की मिशेलने हा व्यवहार करण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना लाच दिली.

सीबीआयच्या मते मिशेलचे वडील वुल्फगॅंग मॅक्स रिचर्ड मिशेल हे सुद्धा १९८० अगुस्ता वेस्टलँडचे भारत व इतर देशांसंदर्भात कन्सल्टन्ट होते.

 

cbi02-marathipizza
deccanchronicle.com

ह्या वुल्फगॅन्ग मिशेलने एंटेरा कॉर्पोरेशन, UCM इंटरनॅशनल ट्रेडिंग लिमिटेड आणि फेरो इंपोर्ट्स लिमिटेड ह्या तीन कंपन्यांना प्रमोट केले. १९८७ ते १९९६ ह्या काळात एंटेरा कॉर्पोरेशन ह्या कंपनीने २ मिलियन युरो भारतातून कमावले.

मिशेलची आई वॅलरी फुक्स क्वेड एज्युकेशनल फौंडेशन ह्या नावाने एक ट्रस्ट चालवते.

ह्या ट्रस्टद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षण घेण्यासाठी अर्थसहाय्य केले जाते अशी सीबीआयला माहिती मिळाली आहे.

अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात ह्या सर्व माहितीचा सीबीआयला संपूर्ण गोष्टीचा छडा लावण्यासाठी मदत होईल.

ह्या महाघोटाळ्यामुळे भारताचे मोठे नुकसान झाले आहे. आणि ह्या संपूर्ण प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी क्रिश्चियन जेम्स मिशेलचा सीबीआयला खूप उपयोग होऊ शकतो.

कारण त्याचा ह्या व्यवहारात मुख्य सहभाग असल्याने त्याला ह्या व्यवहाराची संपूर्ण माहिती आहे. म्हणूनच अगुस्ता वेस्टलँड प्रकरणात मिशेल अतिशय महत्वाचा आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “‘रॉ’च्या खास विमानातून भारतात आणलेला क्रिश्चियन मिशेल एवढा महत्वाचा का आहे?: अगुस्ता वेस्टलँड प्रकरण

 • December 5, 2018 at 6:00 pm
  Permalink

  nice

  Reply
 • December 5, 2018 at 6:53 pm
  Permalink

  सर्वप्रथम

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?