' “मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग – InMarathi

“मुस्लिमाना मराठ्यांबरोबर आरक्षण द्या” आव्हाडांच्या फोटोवर नेटकऱ्यांची ट्रोलिंग

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मराठा आरक्षण हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली आहे. महाराष्ट्रात प्रत्येक शहरात गावात निघालेले मराठा मूक मोर्चे, मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी सरकारशी केलेल्या वाटाघाटी, चर्चा असफल झाल्याची भावना मराठा समाजात आहे.

 

maratha-morcha-inmarathi

लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून शांतपणे निदर्शने करीत आपल्या मागण्या लावून धरणाऱ्या मराठा समाजाला दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झाली होती. मात्र न्यायालयात हे आरक्षण रद्द केले.

दोन वर्षांपूर्वी मराठा आरक्षणाचा अध्यादेश विधानसभेच्या पटलावर मांडला जात असताना आणखी एक मागणी काही लोकांनी केली ती म्हणजे मुस्लिम आरक्षणाची.

‘मराठ्यांना तर मिळाले, मुस्लिमांना कधी?’ असा प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न विचारला म्हणून सगळ्यात जास्त चर्चेत आले ते राष्ट्रवादीचे मुंब्र्याचे आमदार जितेंद्र आव्हाड.

 

comments-inmarathi

 

आव्हाड यांचा सध्याचा मतदारसंघ मुस्लिमबहुल आहे. स्थानिक मुस्लिमांनी निवडून देऊन त्यांना आमदार केले आहे. असे असताना त्यांचे जनानुरंजन आव्हाड करणार यात फारसे आश्चर्य नाही.

पण असे अनुरंजन करत असताना आपण ज्या मागण्या करतो त्या कितपत शक्य आणि कायद्याला धरून आहेत हे विचार केला जात नाही.

धर्माच्या नावावर आरक्षण भारतीय संविधानाच्या मूळ तत्वालाच छेद देणारे ठरते. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी ही मागणी केली. ही बाब समोर आल्यावर त्यांना सोशल मीडियातून विरोधाचा, प्रसंगी ट्रोलिंगचा सामना करावा लागणार हे काही वेगळे सांगायला नकोच.

आव्हाड यांची राजकीय कारकीर्द एकूणच वादग्रस्त राहिली आहे. जनक्षोभ होईल अशी वक्तव्ये करण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही.

 

awhad-inmarathi

हे ही वाचा – शरद पवार : शाहबानो ते शायरा बानो : जाणत्यांचे अनुनयाचे राजकारण

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला तेव्हा आव्हाड यांनी त्याला विरोध केला, पण त्या विरोधाची भाषा किती विखारी आणि द्वेषपूर्ण होती हे महाराष्ट्राने पाहिले.

अशी अनेक उदाहरणे आव्हाड यांच्या वादग्रस्त वक्तव्याची देता येतील. हे नेहमीच होत असल्याने आव्हाड नेहमी नेटकऱ्यांच्या रडारवर असतात.

मुस्लिम आरक्षणाची अशक्य मागणी त्यांनी केली तेव्हा याच नेटकर्यांनी त्यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. कसा ते पाहू..

रवी गोडसे म्हणतात,

“आव्हाड मुस्लिम मतासाठी जातीचे राजकारण करू नका, राष्ट्वदी आणि काँग्रेस ला मराठा समाज 2019 ला चांगलाच धडा शिकवेल.”

गुरुदास भांबुरे म्हणतात,

“आम्ही कुणाला आरक्षण द्या देऊ नका याच्या विरोधात नाही, पण ह्या असल्या लोकापासून लांब राहा बाबांनो, आपल्या आपल्यात भांडण लावतात..”

 

comments-inmarathi

 

श्री आनंदा मारुती पाटील म्हणतात,

“मराठा आरक्षण संदर्भात शासकीय मागासवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल जाळणे हे संविधानाच्या कक्षेत बसते काय ? हे संविधान बचाव म्हणणारे व इतर समाजाचे बेगडी देशप्रेम म्हणावे काय ?”

परिमल वाघ यांनी आपल्या भावना तीव्र शब्दात व्यक्त करताना म्हटले,

“हे महाशय नक्की कोण आहे ? आणि आत्ता तुम्ही कही लोकांचा धर्म पुढे करून राजकरण करायला सुरवात केली आहेच ना मग आत्ता आम्ही आमचे धर्म कार्य आणि देश कार्य म्हणून मोदी ला मतदान करतो आणि जानते राजे २०१९ ला म्हणू नका की देशात असहिष्णुता वाढली आहे कारण हे असले नमूने बघून सटकते ओ राव आमची .”

 

comments-inmarathi

 

भारत खळे यांनी आपले अभ्यापूर्ण मत मांडताना म्हटले आहे की,

“काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मागच्या सरकारने निवडणूका डोळ्यासमोर ठेवून अत्यंत घाईघाईत कोर्टात न टिकणारे आरक्षण जाहीर करून सर्व मराठा समाजाची अवहेलना केली होती.

परंतु आता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्यात टिकणारे संवैधानिक आरक्षण देवून सर्व मराठा समाजाला नक्कीच दिलासा दिला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र शासनाचे जाहीर अभिनंदन!

‘अरे, आरक्षण मागतोय तुझी बायको नाही’ अशी अत्यंत खालच्या पातळीवरील भाषा मुख्यमंत्र्यांबद्दल भर सभेत वापरणारे बिग्रेडी व बामसेफी मराठेही आरक्षणाचा लाभ घेतील यात तीळमात्र शंका नाही!

त्याचबरोबर, ‘अभ्यास करत आहेत, अभ्यास करत आहेत’ म्हणून मुख्यमंत्र्यांची जाहीर खिल्ली उडवणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी आपला अभ्यास चांगलाच दाखवल्याने सगळेच विरोधक चारी मुंड्या चीत झालेले आहेत हे नक्की!

 

comments-inmarathi

 

आता, दिलेला शब्द पूर्ण केला म्हणून विरोधक मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करणार की मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीत कुठला मुद्दाच शिल्लक ठेवला नसल्यामुळे ते डोक्याला हात लावून बसणार हे पाहणेही तितकेच मनोरंजक ठरेल!”

ऋतुराज पाटील म्हणतात,

“हिंदू ख्रिस्ती पंजाबी जैन लोकांनी काय घोडं मारलंय फक्त मुस्लिमांना आरक्षण द्यायला धर्मा वर आधारित आरक्षण देता येत नाही हे वेड्या ला माहित नाही काय”

 

comments-inmarathi

 

“मराठा समाज शिकवणार कॉंग्रेस राष्ट्रवादीला धडा” या शीर्षकाची एक सूचक कमेंट किशोर पाटील यांनी केली आहे. ते म्हणतात,

“मराठा समाज शिकवणार काँग्रेस- राष्ट्रवादीला धडा!

गेले पाच दिवस सरकार मराठा आरक्षणावर चर्चा करत असताना काँग्रेस- राष्ट्रवादी भलतेच मुद्दे उपस्थित करून सभागृहात गोंधळ घालत आहे.

मुस्लिम समाजाला obc, st … मध्ये आरक्षण असताना त्याचप्रमाणे अल्पसंख्या समाजाच्या सुविधाही असताना आणि धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नसताना सुद्धा मुद्दामून मराठा आरक्षण भेटू नये म्हणून यांचे आमदार सभागृहात चर्चाच होऊ देत नाहीत. जेणेकरून मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही.

मुद्दाम मराठा ओबीसी संघर्ष लावून देत आहेत. ३२ वर्षपासूनची मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही त्याचप्रमाणे साधे सरकारी नोकरीत २५ वर्षे वयाची अट ही काढली नाही.

कोणतीच शैक्षणिक, सामाजिक सुविधा मराठा समाजाला या दोन्ही पक्षाने दिली नाही आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळत असताना मुद्दाम खोडा घालत आहेत. ७० वर्षे सत्ता भोगून शेतकऱ्यांना साधे पाणी, वीज देऊ शकले नाहीत या दोन गोष्टी दिल्या असत्या तर शेतकऱ्यांनी कर्ज मागितले नसते दुसऱ्यांना दिले असते.

 

comments-inmarathi

 

पुढील निवडणुकांत नाही तुम्हाला ४४ वरून ४ वर आणले नाही तर मराठा बोलणार नाही. एक मराठा लाख मराठा.

जितेंद्र आव्हाड यांच्या या मागणीवर इतरही अनेक लोकांनी तिखट शब्दात आक्षेप नोंदवला आहे. त्यातला काही कमेंट्स जितेंद्र आव्हाड यांच्यावर खालच्या पातळीला जाऊन टीका करणारी आहेत.

आव्हाड यांनी कितीही खालच्या पातळीचे राजकारण केले तरी ही खालच्या पातळीची टीका निश्चितच समर्थनीय नाही.

 

पण अशी वक्तव्ये केल्यानंतर त्याचे परिणाम जनतेच्या तोंडून लगेच भोगावे लागतात याची जाण नेत्यांनाही यायला हवी.

तूर्तास, ‘हा सूर्य आणि हा जयद्रथ’ या न्यायाने लोकांनी व्यक्त केलेल्या संतप्त प्रतिक्रिया पाहून आव्हाड साहेब आता काय करतील हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

===

हे ही वाचा – जेव्हा शरद पवार सुद्धा म्हणाले होते ‘मी पुन्हा येईन’, ‘मी पुन्हा येईन’…!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?