'"मला महात्मा फुले सर्वात जास्त भावतात ते ह्या ११ विशेष कारणांमुळे!"

“मला महात्मा फुले सर्वात जास्त भावतात ते ह्या ११ विशेष कारणांमुळे!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : हेरंब कुलकर्णी

ब्रिटीशकालीन भारतात परिवर्तन आणि स्त्री शिक्षणाचा पाया घालणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती. भारतीय प्रबोधनाचे काही टप्पे आहेत. त्यापैकी सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे फुले पर्व.

भारतात स्त्री शिक्षण आणि समानता यांचा पायाच एका अर्थाने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी घालून दिला. 

वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी त्यांनी मुलींसाठी पहिली शाळा पुण्या सुरु केली. ही स्त्री शिक्षांची आणि सबलीकरणाची नांदी ठरली. सगळ्या क्षेत्रात आज स्त्रियांनी

यशाचे जे शिखर गाठले आहे त्याचे श्रेय महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनाच द्यावे लागेल.

 

savitri-inmarathi

 

फुले यांच्या चरित्रातल्या कितीतरी गोष्टी अशा आहेत ज्या पहिल्या की त्याचं व्यक्तिमत्त्व अनुकरणीय म्हणून आपल्या समोर येतं.

त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असेच काही पैलू समोर आणणारी पोस्ट हेरंब कुलकर्णी यांनी लिहिली आहे. ती इनमराठी च्या वाचकांसाठी देत आहोत.

 

महात्मा फुले मला का भावतात ? महात्मा फुले मला भावतात कारण..

१) ते विचारही करतात आणि कृतीही करतात. जग जेव्हा उत्तर शोधील तेव्हा शोधील पण आज मला जे सुचते आहे ती कृती मी माझ्यापुरती करील ही त्यांची मनोभूमिका मला भावते. त्याअर्थाने ते one man army आहेत.

 

mahatma-phule-inmarathi

 

२) ते एकाचवेळी व्यवस्था बदलाचे लांबचे उत्तर सांगतात आणि जवळची करायची ती कृतीही करतात think globally act locally चे ते प्रतिक आहेत.

३) ते एकाचवेळी शिक्षण, धर्म, परंपरा, शेतकरी, स्त्रिया, राजकारण, शोषण ,साहित्य या जीवनाच्या सर्वच क्षेत्रावर भाष्य आणि कृती करतात.

 

Mahatma-Jyotirao-Phule-inmarathi

 

४) हंटर कमिशन ते आसूड पर्यंत वंचित समूह हाच त्यांच्या सर्व मांडणीचा केंद्रबिंदू आहे. प्रत्येक मुद्दा ते शेवटच्या माणसापर्यंत नेतात. वंचित हाच त्यांच्या चिंतनाचा गाभा आहे.

५) एका वर्तुळात अडकलेले शिक्षण त्यांनी मुक्त केले त्यामुळे आज बहुजन आणि स्त्रिया यांचा सहभाग वाढून आजचा समाज अधिक एकजिनसी झाला.याचे श्रेय त्यांना आहे.

 

mahatma-phule-inmarathi

 

६) एखाद्या प्रश्नावर ते बोलून थांबत नाहीत किंवा आपल्यासारखी फेसबुक पोस्ट टाकून कृतीचे खोटे समाधान ते मिळवत नाहीत. ते लगेच कृतीकरीत होते.

साहित्य संमेलनावर मोर्चा, राजपुत्राला निवेदन, न्हाव्यांचा संप,अशा कितीतरी छोट्या मोठ्या या प्रत्येक बाबतीत ते कृती करतात. क्रियावान या पंडित: या उक्तीप्रमाणे ते खरे पंडित आहे.

 

phule-working-inmarathi

 

७) आज शिक्षणानेच विकास होईल ही सर्व तळातल्या जातीत निर्माण झालेल्या आकांक्षा, दलित आदिवासी भटके यांच्यात झालेली जाणीव जागृती, तळातून झालेली राजकीय घुसळण, धर्मसत्तेला दिले गेलेले आव्हान आणि शेतकरी आंदोलने हे त्यांनी मांडलेल्या तर्कावर विकसित झालेल्या प्रक्रिया आहेत.

८) डावे धर्माला झोडपतात आणि सामान्य माणसापासून तुटतात. कार्यकर्ते समुहापासून तुटणे शोषक असलेल्या व्यवस्थेला हवेच असते..

त्यांचे वैशिष्ट्य हे की त्यांनी धर्माचे ठेकेदार झोडपले आणि माणसातील आदिम धर्माची भूक जाणून सत्यधर्म ही दिला.

हा विवेक आपण कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडून शिकायला हवा.

 

phule-savitri-inmarathi

 

९) कार्यकर्ते लेखनाला महत्व देत नाहीत पण फुलेंनी इतक्या गर्दीच्या आयुष्यात लेखन ही केले. कविता, नाटक वैचारिक सर्वप्रकारे लिहिले. त्या लेखनातून शोषण कसे होते?

हे समजून सांगितले आणि व्यवस्था सहजपणे कसे लुटते हे कसब उकळून सांगितले.

धर्मसत्तेची फसवणूक त्यांनी पुढे आणली. लेखनाचे महत्व त्यांच्याकडे बघून पटते. लिहिण्याला वेळ नाही हे सांगणाऱ्या सर्वांसाठी हे महत्वाचे आहे

११)आपल्याला एखादी गोष्ट पटली असेल तर जगाविरुद्ध परिणामाची पर्वा न करता उभे राहण्याची हिंमत त्यांनी मला दिली. त्यासाठी सामाजिक बदनामी, हल्ले याचा विचारही मनात आणला नाही. ही हिंमत फुले मला देतात.

१० ) विचार करा पण कृती त्यापेक्षा जास्त महत्वाची आहे हे फुलेंनी मला शिकवले… कृती करण्याची आणि जगाविरुद्ध ठाम उभे राहण्याची धमक ते आपल्याला देतात म्हणून महात्मा फुले मला खूप भावतात.

 

mahatma-phule-wada-inmarathi

 

माझ्या घराच्या  दर्शनी भागात त्यामुळे फक्त एक आणि एकच फोटो लावलेला आहे तो म्हणजे महात्मा फुलेंचा.

कष्टकरी शेतकऱ्यांना गुलामीत ठेवणाऱ्या वर्चस्ववादी व्यवस्थेवर ‘शेतकऱ्याचे आसूड’ ओढत ‘गुलामगिरी’ मोडीत काढण्यासाठी प्रसंगी प्राणघातक हल्ले झेलणाऱ्या या महान सुधारकाचे कर्तृत्व आपल्याला प्रेरणा देत राहील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

4 thoughts on ““मला महात्मा फुले सर्वात जास्त भावतात ते ह्या ११ विशेष कारणांमुळे!”

 • November 28, 2018 at 2:37 pm
  Permalink

  महात्मा ज्योतिबा फुले हे एक द्रष्टे समाजसुधारक होते . त्यांचा पदर धरून बाबासाहेब अंबेडकर चालले त्यांनी वंचित व शोषित समाजासाठी लढले. बाबासाहेब हे महात्मा फुल्यांच्या मानवतावादी विचाराची देणगी आहे.

  Reply
 • December 1, 2018 at 2:58 pm
  Permalink

  जर येथून पुढे जरी महात्मा फुले सर्वांना समजले तर कदाचित संपूर्ण भारत वेगळाच असेल

  Reply
  • April 11, 2019 at 3:56 pm
   Permalink

   अगदी बरोबर …..विचार तर करावाच पण त्याबरोबर कृती​ महत्त्वाचीच​ आहे ….हेही तितकेच सत्य…..।

   Reply
 • December 10, 2018 at 8:25 pm
  Permalink

  uy

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?