'मुस्लिम सायबर आर्मी-  दहशतवाद आता ऑनलाईन आणि हायटेक झालाय!

मुस्लिम सायबर आर्मी-  दहशतवाद आता ऑनलाईन आणि हायटेक झालाय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

१ मार्च रोजी इंडोनेशियाच्या पोलिसांनी १४ लोकांना अटक केल्याचे जाहीर केले. हे लोक तथाकथित मुस्लिम सायबर आर्मी (MCA) चे सदस्य आहेत. ही सायबर आर्मी इंटरनेटवर होएक्स पसरवणे, सोशल मीडियावर  हेट  स्पीच तयार करून ते व्हायरल करणे तसेच प्रसिद्ध व्यक्तींची किंवा एखाद्या ठिकाणची, संस्थेची बदनामी करणे हे प्रकार करते.

इंडोनेशियातील इंटरनेट वापरणाऱ्या लोकांना तसेच सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असणाऱ्या लोकांना मुस्लिम सायबर आर्मीचे नाव माहिती असेल.

ह्या नेटवर्कला लोक वाईट तसेच निरुपयोगी समजतात. साऊथईस्ट आशिया फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन  नेटवर्क (SAFEnet ) ह्या गृपवर जानेवारी २०१७ पासून नजर ठेवून आहे. सेफनेटच्या कार्यकर्त्यांनी ह्या मुस्लिम सायबर आर्मीमुळे  ज्यांचे नुकसान झाले आहे किंवा ज्यांना त्रास झाला आहे अश्या पीडित लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, फिल्ड इन्व्हेस्टीगेशन केले आहे.

हे कार्यकर्ते सोशल मीडियावर करडी नजर ठेवून आहेत तसेच सोशल नेटवर्कची नियमितपणे पाहणी करतात. ह्या पाहणी दरम्यान असे लक्षात आले आहे की ह्या सायबर अटॅक्ससाठी एक  पद्धतशीर पॅटर्न वापरला जातो.

हे लोक सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करून लोकांमध्ये तेढ व तिरस्कार निर्माण करतात.

 

muslim-army-inmarathi
indonesiaatmelbourne.unimelb.edu.au

MCA  म्हणजेच सायबर मुस्लिम आर्मी किंवा मुस्लिम मेगा सायबर आर्मी ह्या संस्थेला कोणतीही विशिष्ट रचना नाही. ह्या संस्थेसाठी काम करणारे लोक सांगतात की त्यांना कुणीही नेता नाहीये. तसेच त्यांचे मुख्य ऑफिस वगैरे सुद्धा अस्तित्वात नाही. त्यांना उत्पन्नाचा कुठलाही स्रोत नाही.

ह्या संस्थेचे सदस्य असेही सांगतात की ह्या कामाचे त्यांना कुठलेही वेतन मिळत नाही MCA शी निगडित श्रीकंडी मुस्लिम सायबर आर्मी, युनायटेड मुस्लिम सायबर आर्मी, द लिजण्ड MCA , मुस्लिम कमिंग आणि अश्या अनेक संस्था आहेत .

MCA  चे काही सदस्य ह्या संस्थेला शॅडो ऑर्गनायझेशन मानतात. सरकारी वेबसाईट्स, मोठ्या संस्थांच्या वेबसाईट्स,चर्च ऑफ सायंटॉलॉजीवर जे हॅकर्सचे अनामिक गृप्स  सायबर अटॅक  करतात ही संस्था त्याच संस्थांप्रमाणे आहे. कधी कधी हे लोक एखाद्या फोटोचा किंवा काही इमेजेस चा वापर करतात.

ही इमेज हॅकर्स ज्या मास्क घातलेल्या माणसाचा फोटो वापरतात त्याप्रमाणेच असते. ही इमेज हॅकर्स आणि हे लोक सुद्धा ओळख लपवण्यासाठी किंवा निनावी राहण्यासाठी वापरतात. गुन्हा केल्यानंतर आपली ओळख लपवण्यासाठी आणि पकडले न जाण्यासाठी  निनावी  राहणे ही गोष्ट मात्र ह्या हॅकर्समध्ये आणि ह्या लोकांमध्ये सारखीच आहे.

MCA च्या सदस्यांची काही प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे ते ट्विटर, व्हॉट्सऍप व फेसबुकवर सर्वात जास्त ऍक्टिव्ह असतात. तसेच टेलेग्राम व इंस्टाग्रामवर सुद्धा ह्यांचा काही प्रमाणात वावर असतो.

अनेक लोक ह्या गृपचा सदस्य असल्याचे जाहीर करतात. आपले प्रोफाइल पिक्चर किंवा सोशल मीडिया अकाउंटचे नाव बदलूनMCA चा फोटो किंवा अवतार ठेवतात. किंवा MCA चा फेसबुक व व्हॉट्सऍप  गृप जॉईन करतात.

ह्या गृपचे सदस्य एकत्र मिळून कृत्ये करतात. एखादा अटॅक करायचा असेल किंवा काही व्हायरल करायचे असेल तर त्यासाठी प्रत्येकाला एक जबाबदारी दिली असते. ह्या सदस्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे लोक एकाच वेळी अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकच मेसेज टाकत असतात.

Twittbot.net ह्यासारख्या टुल्सचा वापर करून एकाच वेळी ट्विटरवर व इतर सोशल मीडियावर MCA  एखाद्या ठराविक हॅश टॅगशी निगडित असंख्य मेसेज टाकू शकतात.

 

social-media-inmarathi
indiia.com

सेफनेटला MCA च्या कृत्यांची कुणकुण लागली आणि त्यांनीMCA च्या ऍक्टिव्हिटीजवर नजर ठेवणे सुरु केले. ऑनलाईन निंदा व छळ ह्यांच्या केसेसवर लक्ष ठेवणे सुरु केले.  ह्या केसेस त्यांनी  “The Ahok Effect” ह्या नावाखाली एकत्र केल्या. जाकार्ताचे माजी गव्हर्नर बसुकी “अहोक” तजाह पूर्णमा ह्यांना झालेल्या शिक्षेनन्तर इस्लामला नावे ठेवणाऱ्या लोकांना छळ, धमकावणीला तोंड  द्यावे लागले.

अश्या १०० केसेस आता पुढे आल्या आहेत. ह्या केसेसची चौकशी सुरु आहे आणि गुन्हेगारांची कार्यपद्धती व त्यांचा त्यामागचा हेतू काय आहे ह्याचा शोध सुरु आहे.

ह्या ट्रेंडचे पहिला संकेत म्हणजे एक व्हायरल झालेला व्हिडीओ होय. ह्या व्हिडीओमध्ये दर्शकांना इस्लामचा अपमान करणाऱ्या लोकांना शोधण्याचे ह्यात आवाहन करण्यात आले आहे. हा व्हिडीओ १. २५ मिनिटांचा आहे.

ह्यात सुरुवातीला“Blasphemer Hunter Team” (Tim Pemburu Penista Agama) चा लोगो दिसतो. ह्यात मुस्लिम समाजासाठी “वॉन्टेड” असलेल्या लोकांची यादी दिलेली आहे.ह्या यादीत इस्लामचा अपमान करणाऱ्या लोकांची नावे आहेत. ह्या व्हिडिओत लोकांना आवाहन केले आहे कि त्यांना इस्लामचा अपमान करताना कोणी आढळल्यास त्यांनी त्या व्यक्तीची माहिती  lapormca@gmail.com ह्या ईमेल ऍड्रेसवर पाठवावी.

ह्याच्याशी निगडित, “Database of People Wanted by the Muslim Community” ह्या नावाचे एक फेसबुक पेज सुद्धा आहे. ह्या पेजवर इस्लाम बद्दल वाईट लिहीणाऱ्या  व्यक्तींची नावे व त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटचे स्क्रीनशॉट्स आहेत.

तसेच त्यांची खाजगी माहिती म्हणजे त्यांच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता, फोन नंबर सुद्धा दिलेले आहेत. सायबरसिक्युरिटीच्या क्षेत्रात ह्या प्रकाराला doxing  असे म्हटले जाते.

डॉक्सिन्ग म्हणजे एखाद्या व्यक्तीची खाजगी माहिती द्वेषयुक्त कारणाने उघड करणे. सेफनेटने जो रिसर्च केला आहे त्यात त्यांना ऑफलाईन छळ आणि सोशल मीडियावरच्या ह्या ऍक्टिव्हिटीजमध्ये परस्परसंबंध असल्याचे आढळून आले आहे. एखाद्या व्यक्तीची खाजगी माहिती उघड झाल्यानंतर २ ते ३ दिवसांतच सावधगिरीची पावले उचलली जातात.

इस्लामिक डिफेंडर्स फ्रंट सारख्या संस्था त्या व्यक्तींना छळ करून त्यांच्याकडून इस्लामची माफी मागण्याची मागणी करतात. किंवा त्या व्यक्तीला पोलिसांकडे  नेऊन इस्लामचा अपमान केल्याबद्दल त्याला/तिला ताब्यात घेतल्याचे सांगतात.

 

mca2-inmarathi
detikNews.com

सेफनेटने ह्या घटनांचा पाच महिने अभ्यास करून हा सारखा पॅटर्न तपासून बघितला आणि २७ मे २०१७ रोजी एक प्रेस रिलीज प्रसिद्ध केले. दोनच दिवसात फेसबुकने MCA चे डेटाबेस पेज ब्लॉक केले. सेफनेट  व  Anti-Persecution Network ह्यांना असे आढळले की MCA ने लोकांच्या भावना भडकावून त्यांना छळ करण्यास भाग पाडण्यात सक्रिय सहभाग घेतला आहे.

 MCA  लोकांचे खोटे अकाउंट तयार करून त्या अकाउंटवरून खोटीच माहिती प्रसारित करून मुस्लिम लोकांच्या भावना भडकवण्याचे काम करत आहेत.

असाच प्रकार मध्य जावा भागातील हानंतो नावाच्या व्यक्तीबरोबर घडला होता. ह्या व्यक्तीचे अकाउंट डिटेल्स घेऊन MCA सारख्या कुणीतरी तसेच दुसरे अकाउंट तयार केले आणि ह्या अकाउंटवरून कुराण जाळत असलेले आणि त्यावर पाय ठेवलेले फोटो शेअर केले.

हे फोटो शेअर केल्यानंतर हानंतो ह्यांचा छळ करण्यात आला , त्यांना धमकावण्यात आले. असेच Parlindungan Sinurat ह्यांच्या @parlindsinurat_  ह्या ट्विटर हँडलचे फेक ट्विटर हॅन्डल तयार करण्यात आले. Parlindungan ह्यांनी नॅशनल पोलीस सायबरक्राईम युनिटकडे तक्रार केली परंतु तोवर उशीर झाला होता.

त्या फेक अकाउंटवरून फेक ट्विट पसरवण्यात आले. त्यांच्या घरावर मोर्चा आला आणि अखेर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

MCA चे सदस्य असण्याचा दावा करणाऱ्या लोकांचे अकाउंट आयपी ट्रॅकर साईट वापरून सेफनेटने ट्रेस करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्व सदस्यांनी VPN  व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून आपली ओळख गुप्त ठेवली होती. जरी त्या अकाउंटचे लोकेशन समजले तरीही सेफनेट वाल्यांना त्या अकाउंटचा ओनर सोशल मीडियावर ऍक्टिव्ह दिसत असूनही

अनेक दिवसांपूर्वीच दिवंगत झालाय अशी माहिती मिळाली. MCA गेलेल्या व्यक्तीचे अकांऊट ऍक्सेस कसे काय मिळवतात हे मात्र सेफनेटला अजूनतरी शोधून काढता आलेले नाही.

 

mca-inmarathi
linetoday.com

मुस्लिम सायबर आर्मी अनेक वर्षांपूर्वी तयार झाली. ह्यांचे मुख्य ध्येय सायबर जिहाद हेच होते. ते स्थानिक राजकीय गोष्टींमध्ये हस्तक्षेप  करीत नव्हते. मात्र आता त्यांनी राजकारण टार्गेट करणे सुरु केले आहे.  त्यांनी अनेक उपसंस्था तयार केल्या आहेत. पोलिसांनी MCA च्या १४ लोकांना अटक केली असली तरी हा गृप अजूनही ऍक्टिव्ह आहे.

ह्या गृपच्या इतर लोकांनी आपली ओळख लपवण्यासाठी गृपचे नाव आणि अवतार बदलले आहेत. मात्र काही लोकांनी अजूनही  MCA चे सदस्य म्हणून गर्वाने आपली ओळख ,नाव, फोटो, अवतार तसेच कायम ठेवले आहेत. सध्या पश्चिम, मध्य व पूर्व जावा येथे MCA अतिशय सक्रिय आहे.

येथे थोड्याच दिवसात निवडणूका होणार आहेत. MCA  पश्चिम जावा येथील किमान एका तरी उमेदवाराला पाठिंबा देत जिंकवून देण्यासाठी कामास लागली आहे.

२१ मार्च २०१८ रोजी “Fathul Khoir Ham” नावाच्या फेसबुक अकाऊंटने मुस्लिम सायबर आर्मी न्यूजच्या सदस्यांना एका घुसखोरावर  अटॅक  करण्यास सांगितले.

हा घुसखोर म्हणजे इंडोनेशियन राष्ट्राध्यक्ष जोको “जोकोवी” विडोडोचा समर्थक असल्याची व MCA च्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी नेमण्यात आलेला गुप्तहेर असल्याचा संशय MCA च्या हॅमला आला होता. हॅमने सदस्यांना आवाहन केले की,”बऱ्याच दिवसांत घुसखोरी झालेली नाही. आता र बटणाचा (रिपोर्ट) व्यवस्थित उपयोग करा.”

हॅमने त्या तथाकथित घुसखोरांच्या अकाउंटची लिंक सुद्धा दिली. व पुढे असे लिहिले की ,”ह्या घुसखोराच्या वॉलवर जा. आणि पोस्ट ला स्पॅम म्हणून रिपोर्ट करा.” त्याने फेसबुकला अकाउंट कसे रिपोर्ट करायचे व बंद पाडायचे ह्याचे स्टेप बाय स्टेप ट्युटोरियल सुद्धा दिले. अनेक MCA च्या सदस्यांनी ही पोस्ट लाईक केली आणि ते अकाउंट रिपोर्ट केले.

MCA  वर खोटी माहिती पसरवण्याचा, हेट  स्पीच पसरवून धार्मिक व वांशिक तेढ निर्माण करण्याचा आरोप आहे. तसेच त्यांनी पीकेआय, चीनी इंडोनेशियाई आणि एलजीबीटी समुदायांच्या पुनरुत्थानाबद्दल भीती निर्माण करण्याचा सुद्धा प्रयत्न केला आहे.

MCA च्या कामाची अशीच पद्धत आहे.MCA न्यूज ह्या फेसबुक गृपचे  ३,००,००० सदस्य आहेत. असेच युनायटेड मुस्लिम सायबर आर्मीचे १,५०,००० तर मुस्लिम सायबर आर्मी २१२ चे १८००० सदस्य आहेत.

 

cca-inmarathi
youtube.com

इंडोनेशियामध्ये होएक्स पसरण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात भयंकर वाढले आहे. हे होएक्स पसरवणे सुद्धा MCA चे एक काम आहे. ह्यांचे फेसबुक गृप  हे पब्लिक गृप  असतात परंतु ह्यांची संस्था जॉईन करणे इतके सोपे नाही.

जॉईन करण्यासाठी सदस्यांना शहादा लिहून द्यावा लागतो आणि तसेच मुस्लिम धर्मशास्त्रज्ञ आणि हबीब (मोहम्मद पैगंबर ह्यांचे वंशज)  ह्यांच्याविषयीच्या निष्ठेची शपथ घ्यावी लागते. त्यानंतरच त्यांना  संस्थेत प्रवेश मिळतो.

हीच परिस्थिती भारतात सुद्धा येऊ शकते. किंवा छुप्या मार्गाने आली असली तरी आपल्याला त्याचा पत्ता नाही. देशाची शांतता, सुव्यवस्था व सार्वभौमत्व धोक्यात येऊ शकते इतकी ही समस्या गंभीर आहे व ह्यावरचा उपाय मात्र सोपा नाही.

ह्यासाठी प्रचंड मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे. टास्कफोर्स तयार करावे लागतील. ह्यासाठी राजकीय पक्ष, सत्यता पडताळून पाहणारे गृप्स आणि सामान्य माणसाचे सहकार्य मिळणे  अतिशय आवश्यक आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?