' “पर्यावरणपूरक” फटाके बनवणाऱ्या आसाममधील कारखान्याची कथा – InMarathi

“पर्यावरणपूरक” फटाके बनवणाऱ्या आसाममधील कारखान्याची कथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पर्यावणपूरक फटाके म्हणजे नक्की काय? त्यांची व्याख्या काय? आणि असे फटाके असणे शक्य तरी आहे का? असे अनेक प्रश्न उपस्थित केले गेले.

आसामच्या एका छोट्याशा खेडयातील लोकांनी याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्याकडे आपल्या प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांना पर्याय म्हणून पर्यावारणपूरक फटाके उपलब्धआहेत.

आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की मोठ मोठे वैज्ञानिक अजून याचा शोध घेत आहेत आणि या खेडूतांना याचे उत्तर कसे काय माहिती. आणि आजवर याबद्दल ऐकण्यात कसे आले नाही. पण हे खरे आहे.

आसामच्या बारपेटा जिल्ह्यातील गानाकुच्ची या गावाकडे घातक प्रदूषके असणाऱ्या फटाक्यांना पर्यायी फटाके उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे गेली १३० वर्षे असे पर्यावरणपूरक फटाके इथे बनवले जातात. याची खबर आपल्याला आजवर नव्हती.

न्यायालयाच्या निर्णयानंतर या गावाचे आणि त्यांच्याकडील फटाके बनवण्याच्या पद्धतीचे महत्त्व अचानक वाढले आहे.

 

crackers-ban-marathipizza

 

त्यामुळेच आत्ता कुठे ही १३० वर्ष जुनी पद्धत प्रकाशात आली. १८८५ पासून इथे हे फटाके बनवले जातात. ते बनवण्यासाठी आजही जुन्या प्रक्रियेचा वापर केला जातो. या प्रक्रियेत घातक प्रदुषकांचा समावेश नाही. त्यामुळे हे फटाके कमी आवाज, कमी धूर आणि कमी प्रकाश देणारे असतात. असे असले तरीही या गावातील लोकांनी या पद्धतीत अजिबात बदल केलेला नाही.

या फटाक्यांचा आवाज आणि प्रकाश जरी कमी असला तरी आपला आनंद साजरा करण्यासाठी ते पुरेसे ठरतात. त्यांनी प्रदूषण तर कमी होतेच पण आपल्यालाही आतिषबाजी केल्याचा आनंद मिळतो.

हे संपूर्ण गाव कित्येक पिढ्यांपासून हाच व्यवसाय करते. शिवाय त्यांनी त्यांची पद्धत कायम ठेवली ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे.

याच गावातील चार पिढ्यांपासून फटाक्यांचे उत्पादन करणारे गोपजीत पाठक म्हणतात की,

“आम्ही उत्पादन करत असलेले फटाके जवळपास पर्यावरणपूरकच आहेत. ते खूप कमी प्रदूषण करतात कारण आम्ही त्यात कोणतीही घातक आणि जास्त प्रभावी स्फोटके वापरत नाही.

पण आपल्या देशातली समस्या अशी आहे की कोणते फटाके पर्यावरणपूरक आहेत आणि कोणते नाहीत हे ठरवण्यासाठी आपल्याला तज्ञ आणि मोठी यंत्रणाच हवी असते. त्यांनी प्रमाणपत्र दिले तरच तुमच्या कामाला काहीतरी अर्थ असतो. त्यामुळे एकदा का असे झाले की मग आमच्यासारख्या लहान उद्योगांची भरभराट होईल.

 

crackers-inmarathi

 

पुढे ते असंही म्हणाले, की सगळे काम आम्ही हातानेच करतो. त्यामुळे हे फटाके पर्यावरणपूरक आहेत असे म्हणायला हरकत नाही.”

असेच एक उत्पादक नारायण दास यांनी अशी खंत व्यक्त केली की,

“आम्ही सगळे काम हातानेच करतो. आमच्याकडे कुठल्याही प्रकारची यंत्रे किंवा नवीन तंत्र नाही. त्यामुळे आम्हाला उत्पादनात वेगवेगळे प्रयोग करता येत नाहीत. परिणामी आम्ही वर्षानुवर्षे एकाच प्रकारचे उत्पादन घेत आहोत.”

ही बाब लक्षात घेऊन आसाम सरकारने या गावाला काही प्रमाणात यंत्रे पुरवली आहेत. परंतु हे काम पूर्णपणे यंत्रावर विकसित होण्यास काही अवधी जाईल असे त्यांचे म्हणणे आहे. शिवाय फटाक्यांची मागणी बघता अधिक यंत्र सामुग्रीची गरज आहे. उत्पादन जर यंत्रांवर सुरु केले तर ते कित्येक पटींनी वाढेल.

हे फटाके पेट्रोलियम अँड एक्स्प्लोजिव सेफ्टी ऑर्गनायझेशन ( PESO )  कडॆ तपासणीसाठी पाठवले जातील. ही संस्था उत्पादन सुरक्षेच्या दृष्टीने कसे आहे आणि एकंदरीत उत्पादनाचा दर्जा काही अटी आणि नियमांनुसार ठरवते.

जर PESO ने हे फटाके पर्यावरण पुरक आहेत यावर शिक्कामोर्तब केले तर या उत्पादकांना मदत पुरवण्यात येईल. जेणेकरून ते मोठया प्रमाणात पुरवठा करु शकतील.

 

Firecrackers-assam1-inmarathi

 

या उत्पादकांचे सध्याचे वार्षिक उत्पन्न एक कोटी एवढे आहे. न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांच्या फटाक्यांची मागणी वाढेल म्हणून ते खुश आहेतच. पण जर PESO ने हे फटाके पर्यावरण पुरक आहेत यावर शिक्कामोर्तब केले तर त्यांचे उत्पन्न कितीतरी पटींनी वाढेल आणि हा आनंद द्विगुणीत होईल.

त्यामुळे यानंतर सुरक्षित आणि पर्यावरण पुरक फटाके मनमोकळेपणाने वाजवता येतील अशी आशा करायला हरकत नाही.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?