' कहाणी S400 खरेदीची. आणि देशाच्या "वाचलेल्या" तब्बल ४९,३०० कोटी रुपयांची

कहाणी S400 खरेदीची. आणि देशाच्या “वाचलेल्या” तब्बल ४९,३०० कोटी रुपयांची

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

तुम्हाला आठवत असेलच.

काही दिवसांपूर्वी, S400 च्या खरेदीची खूप कौतुकं होत होती. अर्थात, व्हायलाच हवी होती. अमेरिकेच्या दबावाला भीक नं घालता केलेली ५ सिस्टिम्सची खरेदी कौतुकास्पदच आहे. पण ह्यात एक मोठं कौतुक राहून जातंय.

भारतीय डिफेन्स प्रिपेरेशनमध्ये आपल्या अल्प कार्यकाळात मोलाची भर घालणाऱ्या, मनोहर पर्रीकर, ह्या माणसाचं.

 

manohar-parrikar-marathipizza
deccanchronicle.com

पर्रीकरांनी संरक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला वर्षानुवर्षे पॉलिसी पॅरालिसिसमध्ये अडकलेल्या अवस्थेत.

तिथून राफेल असो वा S400 खरेदी – पर्रीकरांनी महत्वाचे निर्णय घेऊन एकेक समस्या सोडवण्याचा धडाकाच लावला. राफेलवर भरपूर लिहून झालं आहे. त्यात पर्रीकरांनी किती महत्वाची भूमिका पार पाडली हे सुद्धा तसं आता समोरच आहे.

S400 च्या बाबतीत मात्र एक महत्वाचा पैलू तितकासा समोर आला नाहीये.

एअर डिफेन्स स्ट्रॅटेजी आखताना – म्हणजे शत्रूची विमानं, क्षेपणास्त्र दुरूनच पाडायची सोय करताना – तीन टप्प्यांचा विचार होतो. लांब पल्ल्याचा, मध्यमचा आणि जवळचा हल्ला थांबवणे.

S400 खरेदी लांब पल्ल्यावरील हल्ला हवेतल्या हवेतच उधळून लावण्यासाठी केली गेली आहे.

 

s400 system inmarathi
© Sputnik / Sergey Malgavko

३८० किमी रेंजमधील हल्ला थांबवण्याची क्षमता असणाऱ्या ह्या ५ डिफेन्स शिल्ड्सची खरेदी करण्याचा विचार पर्रिकरांच्या काळातच झाला. आणि त्यावेळी पर्रिकरांनी एक दुसरी मोठी कामगिरी पार पाडली.

डिफेन्स परचेस प्लॅनच्या रिव्हॅल्यूएशनची कामगिरी.

आपल्या एअरफोर्सने 2027 पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यात, शॉर्ट-मिडीयम-लॉंग रेंज डिफेन्स सिस्टिम्सच्या खरेदीची आखणी करून ठेवली होती. S400 खरेदीचा निर्णय झाल्यावर ह्या पुढील १५ वर्षांच्या खरेदीची किती गरज उरणार ह्याचा सखोल आढावा घेतला. आढाव्यात एअरफोर्सकडून टेक्निकल स्टडी झाली.

त्या अभ्यासातून हे लक्षात आलं की S400 मुळे आपली शॉर्ट आणि मिडीयम रेंज डिफेन्स सिस्टीमची गरज मोठ्या प्रमाणात घटणार आहे.

एअर फोर्सने पुढील १५ वर्षांत, टप्प्या टप्प्याने शॉर्ट आणि मीडियम डिफेन्सच्या प्रत्येकी १०० सिस्टिम्स विकत घेण्याचा प्लॅन केला होता. पर्रीकरांना एअरफोर्सबरोबर चर्चा करून हे ठळकपणे लक्षात आलं की हा आकडा S400 मुळे मोठ्या प्रमाणावर कमी होणार.

आणि एअरफोर्सने आपला प्लॅन बदलला…! परिणामी – देशाचे ४९,३०० कोटी रूपये वाचले.

इकॉनॉमिक टाईम्स ह्याला “रेअर एक्सरसाईज” म्हणतंय. डिफेन्स मिनिस्टरने असं खोलात शिरून, सैन्याच्या अधिकाऱ्यांबरोबर बसून निर्णय घेणं, हे रेअर असावं. पण त्यामुळे झालेला फायदा लक्षणीय आहे.

कंपनीमधे गुड एम्प्लॉई आणि ग्रेट एम्प्लॉई असा फरक असतो तो ह्याच प्रकारचा. सामान्य लोक आणि काहीतरी भरीव काम करणारे लोक – फरक असतो तो हाच.

पुढाकार घेऊन, आऊट ऑफ द वे जाऊन, जबाबदारीने काम करणारे लोकच विरळा.

पर्रीकर अश्याच लोकांपैकी एक!

 

Manohar-Parrikar-inmarathi12

 

अर्थात, विषयाला धरून मत मांडता नं येणारे लोक, नेहेमीप्रमाणे शेरेबाजी करतीलच.

आपण विषयापुरता विचार करावा. आणि सत्य-असत्य स्वतः तपासावं. अधिकृत माहितीद्वारे.

ही आहे अधिकृत माहिती देणारी लिंक : Manohar Parrikar’s defence rejig saved Rs 49,300 crore

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 173 posts and counting.See all posts by omkar

One thought on “कहाणी S400 खरेदीची. आणि देशाच्या “वाचलेल्या” तब्बल ४९,३०० कोटी रुपयांची

  • October 23, 2019 at 7:24 pm
    Permalink

    खूप

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?