निखिल वागळेंची “…काशिनाथ…” चित्रपट आणि चित्रपट आवडलेल्यांवर टीका – वाचकांनी केलं भन्नाट ट्रोल!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
===
मराठी चित्रपट हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. दर्जेदार आणि लोकप्रिय विषयावरचा चित्रपट असेल तर मराठी माणूस थिएटरमध्ये गर्दी करतो. काही अपवाद वजा जाता अनेक चित्रपट चांगली कमाई करतात. नागराज मंजुळे यांच्या सैराट ने हे सिद्ध करून दाखवलं..
मराठी चित्रपटांना सोन्याचे दिवस आल्याचा पुरावा म्हणून अनेक चित्रपटांच्या नेत्रदीपक यशाकडे पाहता येईल.
सध्या गाजतोय तो चित्रपट म्हणजे सुबोध भावे या ताकदीच्या अभिनेत्याने अभिनय केलेला, मराठी रंगभूमीवरील महान कलाकार डॉ. काशीनाथ घाणेकर यांचा चरित्रपट – ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’!
रिलीज होण्याच्या आधीच या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. बायोपिक हा सिग्नेचर फॉर्म्युला झालेल्या सुबोध भावेला एकेकाळी रंगभूमी गाजवलेल्या डॉ. घाणेकरांच्या भूमिकेत पाहणे ही मराठी प्रेक्षकांसाठी पर्वणी होती.

अपेक्षेप्रमाणे हा चित्रपट गाजला. त्याने भक्कम कमाई केली आणि त्याचबरोबर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. चित्रपट बरा-वाईट यावर सोशल मीडियात चर्चा रंगली. चित्रपट वाईट असल्याचे सांगणारे लोक फारच थोडे असतील. त्यापैकी एक होते पत्रकार निखिल वागळे.
चित्रपट पाहून आल्यानंतर त्यांनी आपल्या फेसबुक पेजवर दोन तीन ओळीत त्याबद्दल नकारात्मक लिहिले.
निखील वागळे या चित्रपटाबद्दल म्हणतात,
‘…आणि डाॅ. काशिनाथ घाणेकर’ बघितला. फारशा अपेक्षा नसल्याने अपेक्षाभंग झाला नाही. अभिनयाने तारलेली एक कचकड्याची कलाकृती, एवढंच म्हणता येईल. सिरियल्सवर वाढलेल्या प्रेक्षकांची नाडी यांना नेमकी कळली आहे!
मग काय विचारता. निखिल वागळेंच्या या समीक्षेवर ‘आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ च्या चाहत्यांनी त्यांना मजबूत ट्रोल केलं. काही कमेंट्स वाचून तर हसू आवरणार नाही.
या पोस्टच्या कमेंट बॉक्समध्ये असलेल्या अनेक कमेंट्सपैकी काहींनी तर धमाल उडवून दिली. निखील वागळे यांच्या समीक्षेवर अनिकेत मेहता म्हणतात,
बरं बरं, तुम्ही आता तुमच्या सध्याच्या परिस्थिती वर येणारा सिनेमा बघा : ‘झिरो’
निखील वागळे हे सुरुवातीला आयबीएन लोकमत या वृत्तवाहिनीवर संपादक म्हणून काम पहायचे. काही कारणांनी त्यांन तिथून काढण्यात आले. त्यानंतर ते मी मराठी या वाहिनीवर दिसले. महेश मोतेवार यांचा घोटाळा उघड झाल्यानंतर त्या वाहिनीवरूनही ते गायब झाले.
त्यानंतर ते टीव्ही ९ मराठी या वाहिनीवर दिसले. या वाहिनीवरून त्यांची जी एक्झिट झाली त्याची तर कथाच वेगळी आहे. त्याबद्दल स्वतंत्र लेख येथे वाचता येईल.
या सगळ्या लपाछपीच्या खेळात निखील वागळे आपल्या सोशल मिडिया पेजेसवर काहीबाही लिहित राहिले. वरकडी म्हणजे त्यांच्या फेसबुक लोकांनी त्यांना अनेक वाहिन्या सोडल्याबद्दल आणि सध्या कुठेच नसल्याबद्दल प्रश्न विचारले आणि प्रचंड ट्रोल केले.
या चित्रपटावर लिहिलेल्या पोस्टवर तर त्यावर बोलणाऱ्या अनेक लोकांच्या कमेंट्स आहेत.
“तुमच्याकडे काय आता वेळच वेळ आहे. ‘थग्स ऑफ हिंदुस्तान’ची पण समीक्षा करा”, “केवढी ही बेकारी, काहीच काम दिसत नाही आजकाल” असं म्हणत वागळे यांच्या पोस्टवर त्यांची खेचणाऱ्या लोकांची संख्या कमी नाही.
दर्शन म्हणतात,
“आणि डॉ.काशीनाथ घाणेकर या चित्रपटाने हिंदी सिनेमाचे शो काढायला लावून आपली जागा बनवली पण या समालोचक महाराजांची मराठीतली जागा ही ते गमावून बसल्याने केलेला आक्रोश दुसरं काही नाही . Get well soon 💐”
यापैकी काही कमेंट्स मात्र विचारात टाकणाऱ्या होत्या. समीर जोशी म्हणतात,
“तुम्ही मराठी चित्रपटाचे समिक्षण करावे त्यात ही सुबोध भावेंच्या चित्रपटाचे इतके ही वाईट दिवस आलेले नाहीत….. ना मराठी चित्रपटाचे ना सुबोध भावेंचे ना मराठी प्रेक्षकांचे….”
वैभव रुईकर म्हणतात,
असू दे सर. प्रत्येकाची अभिरुची वेगळी. तुम्हाला शाहीर संभाजी भगत, सचिन साठे, शीतल माळी या सारख्यांंनी ” उधळून टाक सगळं” आणि ” पुन्हा कोरेगाव भीमा घडावं” असे विद्रोही ऐकून सवय झाली आहे. तुम्हाला हे बामणी अभिनय मिळमिळीत वाटणार. कोणीतरी अन्याय आणि त्यावर क्रांती हेच तुम्हाला आवडणार”
हे सगळे कमी की काय म्हणून लेखक तुषार दामगुडे यांनी या पोस्टवर एक भन्नाट उपहासात्मक कमेंट केली आहे. ते म्हणतात,
“ज्येष्ठ चित्रपट समीक्षक निखिलजी यांच्या बद्दल लोकांनी जी आक्षेपार्ह भाषा कमेंट बॉक्स मध्ये वापरली गेली ती वाचून दुःखाने माझे अंतकरण पिळवटून निघाले आहे. या देशात असहिष्णुतेचा अगदी कडेलोट झाला आहे.
काँग्रेसच्या काळात असे चित्रपट निघत नव्हते. २०१४ पासुन हे सर्व सुरू झाले आहे. धुम , रेस, ठुग्ज आणि घाणेकर ….. शीऽऽऽऽऽऽ
घाणेकर कुठे चित्रपटाचे नाव असते काय ?
२०१९ मध्ये नेहरू विरुध्द मोदी या लढाईत मोदी आणि त्यांच्या असहिष्णु भक्तांची मोठी हार होणार आहे. आमची सत्ता येऊ द्या. मग आम्ही बहुजनांवर छान छान चित्रपट काढू.
…….आणि मिया खलिफा !”
इतरही अनेक कमेंट्स या पोस्टवर आहेत ज्यात लोकांनी वागळे यांना ट्रोल केलं आहे.
हा सगळा विनोदाचा भाग तर आहेच, पण वाचकांनी वागळेंचा विरोध करताना त्यांना एकेरी संबोधन करणे, आडनावाचा विपर्यास करणे अश्या कृती केल्या…ते अजिबात समर्थनीय नाही.
बाकी निखिल वागळे यांचे विचार, त्यांची सध्याची विचारधारा आणि त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया हा वेगळा चर्चेचा विषय आहे!
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
छान
तुम्हाला सर्वांना माहित आहे ना निखिल वागळे हे कोणत्या विचारसरणीचे आहेत ?आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर हा अतिशय बॅलन्स पिक्चर आहे सर्वांनी बघावा अशी माझी आग्रहाची विनंती .
फारच छान निखिल वागळे ना मराठी प्रेक्षकांनी त्यांची जागा दाखवून दिली