' ह्या काल-परवा आलेल्या “फडणवीस” नावाच्या पोराने “आमचे” खायचे-प्यायचे वांधे केलेत हो! – InMarathi

ह्या काल-परवा आलेल्या “फडणवीस” नावाच्या पोराने “आमचे” खायचे-प्यायचे वांधे केलेत हो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

काल परवाचं पोरगं! ते पण “फडणवीस”…! अवघ्या ३-४ वर्षांत आमच्या खाण्यापिण्याचे वांधे करून ठेवतंय म्हणजे काय!

खाण्यापिण्याचे म्हणजे थोडे थोडके नव्हेत. १२,५०० कोटी रूपये “वाचवलेत” फडणवीसांनी.

 

devendra fadnavis marathipizza

 

सरकारचे पैसे वाचले म्हणजे तुमचे आमचे पैसे वाचले. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे साधारण १२ कोटी. माणशी १,००० रूपये. हे वाचवले “नसते” तर तुमच्या आमच्या खिश्याला १,००० चा फटका बसला असता, असाच ह्याचा अर्थ.

कसे वाचवले?

तर ज्या माय-बाप शेतकऱ्याच्या नावाने बोंबा मारल्या जातात, ज्याच्या नावाचा निर्लज्ज वापर करून आपल्या पोतड्या भरून घेतल्या जातात, त्याच शेतकऱ्याला दिलेल्या कर्जमाफीतील गळती टाळून.

सगळ्यात लक्षणीय बाब ही, की “सरकारचं अपयश” म्हणून जी गोष्ट अधोरेखित केली जात होती, तीच गोष्ट फडणवीसांच्या यशाची सगळ्यात मोठी पावती आहे.

जुलै २०१७ मधे कर्जमाफीची घोषणा झाली. प्रत्यक्षात कर्जमाफीचा निधी देण्याची सुरूवात झालो ऑक्टोबर २०१७ मधे. ह्याला गेल्या महिन्यात १ वर्ष पूर्ण झालं. घोषणा होताच State Level Bankers Committee ने साधारण ८९ लाख शेतकरी ह्या कर्जमाफीची लाभार्थी असतील असा रिपोर्ट सरकारला दिला.

खरी गंमत ह्या पुढे आहे.

कर्जमाफीची अमलबजावणी, थ्री स्टेप व्हेरिफिकेशन करून, सरळ शेतकऱ्यांच्या अकाऊंटमधे जमा केली जाईल – हे जेव्हा कळालं तेव्हा अचानक कर्जमाफीची मागणी करणाऱ्या “शेतकरी” लोकांची संख्या धडाधड उतरू लागली. तीनच महिन्यांनी नवा सर्व्हे झाला, आणि अंदाजे ६७ लाख शेतकरी लाभार्थी असतील असं समोर आलं. आता वर्ष संपलं आहे – आणि – वर्षाअखेरीस एकूण लाभार्थी आहेत — ४८ लाख शेतकरी.

उरलेले कुठे गायब झाले?

एक वरिष्ठ अधिकारी म्हणतो –

“थ्री स्टेप व्हेरिफिकेशन द्वारे खातरजमा करून, आजपर्यंत आम्ही २५ लाख “घोस्ट अकाऊंट्स” शोधून काढले आहेत.”

थोडक्यात, वर्षानुवर्षे शेतकऱ्यांसाठी वाटल्या गेलेली अनुदानं, कर्जमाफी इ इ “ह्या” लोकांच्या खिश्यात जात होती. डिजिटल पेमेन्टस, आधार लिंकिंग, प्लास्टिक मनी, डायरेक्ट बेनेफिट ट्रान्सफर…ह्या सगळ्यांना विरोध होत होता – तो ह्या भीतीने.

सुरुवातीला एस्टीमेट काढलं गेलं, की पीक कर्जमाफीसाठी साधारण ३४,००० कोटींचा निधी लागणार आहे. पुढे लक्षात आलं की एवढा पैसे खर्चच होणार नाहीये! कारण तोतया अकाऊंट्सची गळती सुरू झाली होती! आणि मग “कर्जमाफी फेल गेली” चा प्रचार सुरू झाला. पुढे तोतया अकाऊंट्स अजूनच कमी झाले. आणि आता समोर येतीये ती ही अशी आकडेवारी नि हे सत्य.

म्हणून तर.

फडणवीस म्हणून तर नकोसे झालेत ह्यांना…!

(बाय द वे, माहिती इंडियन एक्स्प्रेसमधे आलीये. १० दिवस जुनी बातमी आहे.

ही पहा लिंक : One year of farm loan waiver scheme: With 25 lakh ‘ghost’ bank accounts identified, govt saves Rs 12,500 cr.

पहा काही नकारात्मक सापडतंय का ते.)

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?