' नोबेलचा इतिहास आणि ५ शोध ज्यांना नोबेल पुरस्कार मिळायलाच हवा होता...!

नोबेलचा इतिहास आणि ५ शोध ज्यांना नोबेल पुरस्कार मिळायलाच हवा होता…!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

जगद्विख्यात नोबेल पुरस्काराच्या जन्माची कथा खूप रोचक आहे. अनेक धूर-विरहित स्फोटकांचा शोध लावणाऱ्या, ज्यात डायनामाईट सर्वात प्रसिद्ध आहे,आल्फ्रेड नोबेल ह्यांनी बेसुमार संपत्ती कमावली होती.

त्यांच्या जीवनात एक प्रसंग घडला आणि त्यांच्या जीवनाला कलाटणीच मिळाली.

साल १८८८ मध्ये, एक दिवस, अचानक त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली.

दुसऱ्या दिवशी सर्व वृत्तपत्रांनी त्यांच्या मृत्युच्या बातम्या छापल्या. त्यातील एका वृत्तपत्रानी “The merchant of death is dead” अश्या मथळ्याची बातमी छापली होती. आपला उल्लेख “मृत्यूचा सौदागर” असा झालेला बघून नोबेल ह्यांना खूप वाईट वाटलं.

लोक आपल्याला “असे” लक्षात ठेवतील काय – ह्या विचारात ते पडले आणि त्यांनी आपली संपत्ती मानवतेला मदत करणाऱ्यांच्या सन्मानार्थ वापरण्याचा निर्णय घेतला. ह्यातूनच सुरुवात झाली नोबेल पुरस्काराची.   

 

novel prize inmarathi
phys.org | AP Photo/Fernando Vergara

या नोबेल पुरस्काराची रक्कम असते – 8 million स्वीडिश क्रोनोर (SEK, स्वीडनचं चलन) – जे भारतीय रुपयांमध्ये होतात – सुमारे ७ कोटी रुपये…!

१९०१ पासून, दरवर्षी ६ क्षेत्रांमधील भरीव कामगिरीसाठी Nobel पारितोषिक दिलं जातं. हे ६ क्षेत्रं आहेत – साहित्य, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शांती, अर्थशास्त्र आणि शरीरशास्त्र व औषधशास्त्र.

अनेक महत्वाच्या शोधांना ह्या निमित्ताने “मान्यता” मिळते, त्या शोधांच्या जनकांना गौरविलं जातं.

पण विशेष म्हणजे – सर्वच महत्वाचे शोध गौरविले गेलेत, असं नाही.

पुढे आहेत ५ असे शोध, जे Nobel Foundation (Nobel पारितोषिकांची यादी ठरवणारी यंत्रणा) कडून आश्चर्यकारकपणे दुर्लक्षित आहेत.

1 – The Periodic Table

केमिस्ट्रीच्या परीक्षेआधी हा टेबल आपण सर्वांनी पाठ करण्यात भरपूर वेळ दिला आहे.

 

PeriodicTable-marathipizza

Image source: Sciencenotes

फक्त ७ आडव्या आणि १८ उभ्या रेषांमध्ये मानवाला माहित असलेल्या सर्व element – म्हणजेच मूलद्रव्यान्ना, त्यांच्या गुणधर्मानुसार वर्गवारी करून रचून ठेवणारा हा साधा परंतु अत्यंत उपयुक्त शोध!

Dmitri Mendeleev ह्या रशियन शास्त्रज्ञाने १८६९ मध्ये हा टेबल तयार केला.

शिवाय ह्या टेबलच्या मदतीने काही मूलद्रव्यांचा अभ्यास करून त्यांचे गुणधर्म नव्याने समोर आणले. ह्या शोधाला नोबेल पुरस्कार मिळाला नाही…!

2 – Black Hole Death

सर्वात बुद्धिमान व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या Stephen Hawkins – ह्यांना देखील Nobel मिळालं नाही!

 

stephen-hawking-marathipizza

Image source: chemtrailsplanet

त्यांच्या “Black Hole Death” ह्या थियरीने black holes म्हणजेच कृष्णविवरं हे “अमर” असतात, चिरंतन असतात ह्या गृहितकाला सुरुंग लावला.

स्टीफन हॉकिंग्ज यांनी संशोधन करून असं मत मांडलं की “ब्लॅक होल्स स्वतःच गॅमा किरणांच्या स्फोटाने स्वतःचा नाश करून घेतात”. या संशोधनामुळे अॅस्ट्रोफिजिक्समध्ये नवीन अध्यायाला सुरुवात झाली.

3 – “WWW”…The World Wide Web…!

तुम्ही हा लेख ज्या जादूमुळे वाचू शकत आहात, त्या जादूला म्हणतात – इंटरनेट…म्हणजेच World Wide Web.

 

Internet-marathipizza
juniorinventors.com

१९८० साली, Tim Barnes-Lee ह्यांनी “hypertexts” च्या सहाय्याने पेजेस एकमेकांशी जोडण्याची प्रणाली तयार केली. १९९० पर्यंत Robert Cailliau ह्या त्यांच्या सहाय्यक शास्त्रज्ञाच्या मदतीने त्यांनी एक नेटवर्किंग सिस्टीम उभी केली – जी आपण आज World Wide Web म्हणून ओळखतो.

अक्ख्या जगाचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या ह्या शोधाला आजपर्यंत नोबेल मिळालं नाहीये.

4 – गुणधर्मांचं जनुकीय हस्तांतरण – Inheritance through DNA

१९३० पर्यंत असं समजलं जायचं की पिढीजात गुणधर्म हे पेशींच्या प्रोटीन्समधून पिढी दर पिढी हस्तांतरित होतात.

 

dna-marathipizza

Source: Indiatoday/Shutterstock

Oswald Avery, Macleod आणि McCarty ह्यांच्या संशोधनामुळे जगाला हे समजलं की पेशींमधल्या DNA मध्ये ही सर्व माहिती साठवली जाते. ह्या तिघांनासुद्धा नोबेल मिळालं नाही.

5 – Stellar Nucleosythesis

हे जग कसं निर्माण झालं? निर्माणाची सुरुवात कशी झाली? प्रचंड तारे कसे निर्माण झाले? ते एवढे धगधगत कसे असतात? ह्या आणि अश्या अनेक प्रश्नांभोवती शास्त्रज्ञ फिरत असतात.

Sir Fred Hoyle ह्यांनी ह्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचा एक मार्ग दाखवला.

 

Stellar-nucleosythesis-marathipizza

Image source: Deviantart

एवढंच नाही तर ताऱ्यांच्या धगधगण्या मागचं गूढ त्यांनी सोडवलं. त्यांनी हे सिद्ध केलं की तारे म्हणजे महाकाय अणुभट्टी आहेत, ज्यांच्यात हायड्रोजन आणि हिलीयममध्ये प्रक्रिया होऊन प्रचंड उर्जा निर्मिती होते.

Sir Fred Hoyle ह्यांना नोबेल पुरस्कार मिळाला नाही हे खरंच आश्चर्यकारक आहे.

थोडक्यात, ही ५ उदाहरणं म्हणजे नोबेल पारितोषिकांची चुकलेली गणितंच आहेत!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?