' विक्रमी वेळेत उभा राहिलेला हा प्रकल्प एका व्यक्तीच्या भव्यतेची प्रचिती देतो….. – InMarathi

विक्रमी वेळेत उभा राहिलेला हा प्रकल्प एका व्यक्तीच्या भव्यतेची प्रचिती देतो…..

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचे ३१ ऑक्टोंबर रोजी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकार्पण केले. जगातील सर्वात उंच म्हणजे १८२ मीटर उंचीचा हा पुतळा सरदार पटेलांच्या कार्याच्या भव्यतेची साक्ष देणाराच आहे. २० हजार चौरसमीटर क्षेत्रामध्ये नर्मदा नदीवरील साधू बेटावर हे स्मारक साकारले गेले आहे.

या पुतळ्यासाठी एकूण २५ हजार मेट्रिक टन लोह लागले आहे. त्यामधील लोकसहभाग आपल्याला विसरता येणार नाही.

याचे कास्टिंग शांघाय मध्ये झाले आहे. या ठिकाणी पुतळ्याच्या आत असलेली इमारत, अभ्यासकेंद्र, चविष्ट खाद्यपदार्थांची सोय यांसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

तेव्हा फक्त एक स्मारक एवढीच ओळख न राहता हा एक परिपूर्ण प्रकल्प आहे असे म्हणता येईल.

 

sardar-patel-statue1-inmarathi
indiatoday.inmarathi

आता “स्टॅचू ऑफ युनिटी” चे लोकार्पण झाले आहे, त्यानिमित्ताने या पुतळ्याची वैशिष्ट्ये सांगणारी यांसह या ठिकाणी काय काय उपलब्ध असेल याची बरीच माहिती माध्यमांकडून वाचक/श्रोत्यांना मिळाली आहे. पण आता “स्टचू ऑफ युनिटी” ला पर्यटक भेट देत आहेत त्यांचा अनुभव कसा आहे याची माहिती पर्यटक, त्यांचे आत्पेष्ट समाजमाध्यमांतून देऊ लागले आहेत.

हा अनुभव पर्यटकांसाठी कसा आहे, त्यांची निरीक्षणे काय आहेत याची माहिती वाचकांना व्हावी यासाठी अभिजित कोठीवाले यांची ही ४ नोव्हेंबर ची फेसबुक पोस्ट…….

अभिजित कोठीवाले यांच्या आईने,सौ. सुप्रिया कोठीवाले यांनी “स्टॅच्यु ऑफ युनिटी” ला भेट दिली. त्या प्रकल्पाचे आल्हाददायक अनुभव..

===

माझ्या आई-वडीलांनी शनिवारी म्हणजे उद्घाटन झाल्यावर तीन दिवसांनी या प्रकल्पाला भेट दिली. आई आज सकाळी याविषयी भरभरून बोलली, तू जर याविषयी काही लिहित असशील, तर तुला या पैलूविषयी माहीत असायला हवं तो म्हणजे या प्रकल्पाचा स्थानिकांवर झालेला परिणाम.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हा प्रकल्प म्हणजे पैशांची उधळपट्टी आहे असं काहीसं चित्र तथाकथित उदारमतवाद्यांनी उभं केलेलं पहायला मिळते.

भाजप/आरएसएस, मोदी यांसाठी कसे जबाबदार आहेत, नेहरूंना कसं बाजूला सारलं जात आहे आणि या प्रकल्पावर इतका पैसा खर्च केला जात असतांना स्थानिकांना पाण्यासाठी कसं वणवण फिरावं लागत आहे इत्यादी.

मात्र माझ्या आईची निरीक्षण या प्रकल्पाचे सकारात्मक चित्र दर्शवणारी आहेत.

 

statue-of-unity-inmarathi
dnaindia.com

प्रथम म्हणजे, हा पुतळा प्रेरणा निर्माण करणारा आहे, या प्रकल्पाच्या जडणघडणीबद्दल बरंच लिहिलं गेलं आहे. या प्रकल्पापर्यंत पोहोचण्यासाठी रुंद रस्ते बांधण्यात आले आहेत. या संकुलाचा अनुभव म्हणजे आईच्याच शब्दात सांगायचं तर “परदेशी पर्यटन स्थळासारखाच” आहे.

१२० रुपये प्रतिव्यक्ती प्रवेश असून बससाठी ३० रुपये अजून द्यावे लागतात. जर आपण पुतळ्याच्या वरतीपर्यंत जाणार असाल तर अजून ३५० रुपये वेगळे द्यावे लागतील. बस या आधुनिक असून वातानूकुलित आहेत. पुतळ्याच्या पायथ्याशी संग्रहालय आहे. ४५ व्या मजल्यावर म्हणजे पुतळ्याच्या छातीच्या उंचीला प्रेक्षकांसाठी सज्जा आहे.

इथे जाण्यासाठी लिफ्ट आणि इतर साधने आहेत. या उंचीवरून सरदार सरोवर लहान दिसते.

सर्व काही एकदम सुबक आणि स्वच्छ आणि सुंदर असंच आहे. स्वच्छतागृह वगैरे व्यवस्था पण उत्तम आहे. तिथे मोठे फूडकोर्ट आहे जे नेहमी सुरु असते आणि चांगल्या दर्जाचे पदार्थ तिथे मिळतात. आई-वडिलांना पूर्ण ट्रीप आवडली.

आता एका उल्लेखनीय मुद्द्याकडे वळूयात. तिथे काम करणारा संपूर्ण कर्मचारी वर्ग हा आजूबाजूच्या परिसरातील असून गरीब आणि मागासलेल्या भागातील आहे. हा पूर्ण प्रकल्प त्यांच्याकडूनच सांभाळला आणि चालवला जातो. तिथे गणवेशातील तरुण मुले/मुली गाईड म्हणून काम करतात.

गरीब, आदिवासी आणि शेतकऱ्याची ही मुले/मुली आहेत. या संपूर्ण प्रकल्पासाठी जे मनुष्यबळ लागणार होत त्यासाठी कौशल्य विकास करणारी केंद्र इथे उभारण्यात आली आहेत.

 

skills devlopment.marathipizza
netdna-ssl.com

मुले/मुली आपल्या आवडीनुसार आणि क्षमतेनुसार हे प्रशिक्षण घेतात. फक्त गुजराती बोलणार असेल तर त्या गाईडला २५ हजार रुपये वेतन मिळते, जर अजून हिंदी बोलू शकत असेल तर ३५ हजार आणि इंग्रजी येत असेल तर ४५ हजार इतके वेतन मिळते.

हा प्रकल्प सरकारच्या माध्यमातून असल्याने ही सरकारी नोकरी मिळण्यासाठी अधिकारी अनेकांना प्रशिक्षित करत आहेत.

हा प्रकल्प येण्यापूर्वी आम्ही नुसते बसून होतो असे तिथले स्थानिक लोकं सांगतात, आता आमच्याकडे रोजगार असून अनेक पर्यटक इथे येतात त्यामुळे आमचे जीवनमान बदलून गेले आहे. ही आमच्यासाठी मोठी संधी आहे.

या प्रकल्पामुळे त्यांचे जीवनमान पूर्णच बदलले असल्याने ते आनंदात आहेत आणि मोदींची स्तुती करतात. माझ्या आई-वडिलांकडे तिथल्या स्थानिक गाईडने ही बदलेली परिस्थिती कथन केली. एक बस ड्रायव्हर आपल्या परिचिताला मोबाईल वर सांगत होता की “इथे लवकर अर्ज कर आणि वाहन परवाना आणायला विसरू नकोस” हे सर्व इथल्या संधी आणि सुधारणा सांगणारच आहे.

ज्या लोकांच्या या प्रकल्पासाठी जमिनी गेल्या आहेत त्यांना पर्यायी जागा आणि पक्की घर मिळाली आहेत. सरकारने या ठिकाणच्या अनेक अडचणी दूर केल्या आहेत.

पुतळ्याच्या जवळच टेंट असलेली दोन गावं नदीच्या किनारी वसवण्यात आली असून पर्यटक तिथे भाड्याने राहू शकतात. रात्रीचा लेसर शो पण एक उत्कृष्ट अनुभव आहे.

 

laser-show-inmarathi
india.com

रांगेत उभं राहणे टाळायचे असेल तर तुम्ही ओनलाइन तिकीट प्रवासाआधी घेऊ शकतात. एकंदरीत, विक्रमी वेळेत उभा राहिलेला हा प्रकल्प एका व्यक्तीच्या भव्यतेची प्रचीती तर देतोच पण त्याचबरोबर अनेक स्थानिक लोंकांचे जीवनमान देखील बदलावणारा ठरतो.

नकारात्मक विचार करणाऱ्या लोकांनी कितीही बोटे मोडावीत पण हे उत्कृष्ट आहे. पंतप्रधान आणि गुजरात सरकार यांचे अभिनंदन!

===

वरील अनुभव हा प्रातिनिधिक आहे. शक्य आहे प्रत्येकाचा अनुभव काही सारखा नसेल पण हे वर्णन या प्रकल्पाचा एक महत्वाचा पैलू समोर आणतो तो म्हणजे स्थानिकांसाठी रोजगारनिर्मिती.

यासाठी व्यवस्थापन किती बारकाईने करण्यात आले आहे याचा विचार केला आणि त्यासाठी कुठलाही अतिरिक्त वेळ न घेता हा प्रकल्प आज लोकांसाठी खुला आहे. हे निश्चितच या प्रकल्पाचे मोठे यश आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?